प्रश्न 1 . दिलेल्या पर्यायापैकी योग्य ते पर्याय निवडून विधाने पूर्ण करा व उत्तरपत्रिकेत पुन्हा लिहा. (1) भारत व ब्राझील या देशाची रा...
प्रश्न 1. दिलेल्या पर्यायापैकी योग्य ते पर्याय निवडून विधाने पूर्ण करा व उत्तरपत्रिकेत पुन्हा लिहा.
(1) भारत व ब्राझील या देशाची राजवट -------------- प्रकाराची आहे.
(i) लष्करी
(ii) साम्यवादी
(iii) प्रजासत्ताक
(iv) अध्यक्षीय
उत्तर : प्रजासत्ताक
(2) हिमालयामुळे उत्तरेकडून येणारे ---------- वारे अडविले जातात
(i) अतिथंड
(ii) अतिउष्ण
(iii) उष्ण व कोरडे
(iv) बाष्पयुक्त
उत्तर : अतिथंड
(3) ब्राझील देशाची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने --------- व्यवसायावर अवलंबून आहे
(i) प्राथमिक
(ii) द्वितीयक
(iii) तृतीयक
(iv) चतुर्थक
उत्तर : तृतीयक
(4) ब्राझीलचा क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगात ------------- क्रमांक आहे.
(i) पाचवा
(ii) सातवा
(iii) सहावा
(iv) चौथा
उत्तर : पाचवा
(1) क्षेत्रभेटीसाठी आवश्यक साहित्य :
(i)- प्रश्नावली
(ii) कॅमेरा
(iii) संगणक
(iv) नोंदवही
उत्तर : कॅमेरा
(2) ब्राझीलमधील नदया :
(i) अॅमेझॉन
(ii) पॅराग्वे
(iii) उरुग्वे
(iv) गंगा
उत्तर : गंगा
(3) प्राथमिक व्यवसाय :
(i) शेती
(ii) खाणकाम
(iii) पर्यटन
(iv) मत्स्य व्यवसाय
उत्तर : पर्यटन
(4) वस्त्यांच्या केंद्रीकरणासाठी प्रमुख घटक:
(i) पाण्याची उपलब्धता
(ii) प्रतिकूल हवामान
(iii) सुपीक जमीन
(iv) अनुकूल हवामान
उत्तर : प्रतिकूल हवामान
(1) भारतातील लोकसंख्येत तरुणाईचे प्रमाण जास्त आहे.
उत्तर : बरोबर
(2) ब्राझील व भारत या दोन्ही देशात एकावेळी समान ऋतू असतात.
उत्तर : चूक
(3) मॅनॉस हे निग्रो व अॅमेझॉन या नद्यांच्या संगमावरील बंदर आहे.
उत्तर : बरोबर
(4) ब्राझीलमध्ये लिंगगुणोत्तर जास्त आहे.
उत्तर : बरोबर
(5) ब्राझील हा वाघ व सिंह हे दोन्ही प्राणी असणारा जगातील एकमेव देश आहे.
उत्तर : चूक
प्रश्न 4.(अ) तुम्हास पुरविलेल्या ब्राझीलच्या नकाशा आराखड्यात पुढील घटक दाखवा व चिन्हांची सूची तयार करा (कोणतेही चार) : 4
उत्तर :
(आ) दिलेल्या नकाशाचे वाचन करून त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा (कोणतेही चार) :
(1)वरील नकाशा काय दर्शवितो ?
उत्तर : भारत स्थान व विस्तार
(2) भारतातील सर्वात दक्षिणेकडील टोक कोणते ?
उत्तर : कन्याकुमारी
(3) भारतातील पूर्व-पश्चिम अंतर किती आहे ?
उत्तर : पुर्व-पश्चिम = 3000 किमी
(4) भारताची प्रमाणवेळ कोणत्या रेखावृत्तावरून निश्चित केली आहे ?
उत्तर : 82.30° रेखावृत्त
(5) भारताच्या पश्चिमेला कोणता समुद्र आहे ?
उत्तर : अरबी समुद्र
(1) हिमालयातील नद्या बारमाही वाहतात.
उत्तर :
(१) हिमालयातील बहुतांश नया अतिउंचावरीलबर्फाच्छादित पर्वतशिखरांमधून उगम पावतात.
(२) उन्हाळ्यात बर्फ वितळल्यामुळे उन्हाळ्यातही या नद्यांना पाणी मिळते.
(३) पावसाळा, हिवाळा व उन्हाळा या तिन्ही ऋतूंत पाणीपुरवठाहोत असल्यामुळे हिमालयातील जवळजवळ सर्व नया बारमाही स्वरूपाच्या आहेत.
(2) ब्राझीलमध्ये उष्णकटिबंधीय वादळे कमी प्रमाणात होतात.
(१) ब्राझीलच्या किनारी भागात विषुववृत्ताजवळसर्वसाधारणपणे तापमानात फारसा फरक पडत नाही.
(२) या प्रदेशात वाऱ्यांचे सातत्याने ऊर्ध्व दिशेने वहन होते.
(३) या प्रदेशातील आंतर उष्णकटिबंधीय एकत्रीकरण विभाग क्षीणस्वरूपाचा असल्यामुळे आवर्त निर्माण होत नाहीत. त्यामुळे ब्राझीलमध्येउष्णकटिबंधीय वादळे कमी प्रमाणात होतात.
(3) ईशान्य ब्राझीलमध्ये वस्त्या विरळ आहेत.
(१) ब्राझीलचा ईशान्य भाग हा ब्राझील उच्चभूमीच्यापलीकडील पर्जन्यछायेचा प्रदेश आहे.
(२) या प्रदेशात पर्जन्याचे प्रमाण केवळ ६०० मिमी आहे. त्यामुळेहा भाग अवर्षणग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो.
(३) पर्जन्याच्या अल्प प्रमाणामुळे या भागात शेतीचा पुरेशा प्रमाणात विकास झालेला नाही. परिणामी, या भागात विखुरलेल्या ग्रामीण वस्त्या आढळतात.
म्हणून ईशान्य ब्राझीलमध्ये वस्त्या विरळ आहेत.
(4) ब्राझीलमध्ये जलमार्गाचा विकास झालेला नाही.
(१) ब्राझीलमधील बहुतांश नयांतील विसर्गाचे प्रमाण प्रचंड आहे.
(२) ब्राझीलमधील बहुतांश नयांतील विसर्गाचा वेग जास्त आहे.
(३) ब्राझीलमधील नद्यांच्या खोऱ्यांच्या प्रदेशात उंचसखल भूभाग आहेत. त्यामुळे हे प्रदेश दुर्गम बनले आहेत. म्हणून, ब्राझीलमध्ये (अंतर्गत) जलमार्गांचा विकास झालेला नाही.
प्रश्न 6. (अ) खाली दिलेल्या सांख्यिकीय माहितीच्या आधारे साधा स्तंभालेख काढा व खालील प्रश्नांची उत्तरे लिहा : :
उत्तर :
प्रश्न :
(2) 1991 साली भारताची साक्षरता किती होती ?
(3) 1991 ते 2001 या दशकात भारताच्या साक्षरतेत किती टक्क्यांनी वाढ झाली आहे ?
आ) (आ) दिलेल्या आकृतीचे वाचन करून त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा :
प्रश्न
(1) प्राथमिक व्यवसायात गुंतलेल्या लोकसंख्येची टक्केवारी कोणत्या देशात जास्त आहे ?
(2) स्थूल आंतरदेशीय उत्पादनात कोणत्या देशात तृतीयक व्यवसायांचे योगदान जास्त
आहे ?
(3) स्थूल आंतरदेशीय उत्पादनात द्वितीयक व्यवसायांचा हिस्सा कोणत्या देशात जास्त
आहे ?
उत्तर : ब्राझील
(4) ब्राझीलमध्ये कोणत्या व्यवसायात जास्त लोकसंख्या कार्यरत आहे ?
उत्तर : तृतीयक
(5) स्थूल आंतरदेशीय उत्पादनात तृतीयक व्यवसायातील ब्राझीलचे योगदान भारतापेक्षा
कितीने जास्त आहे ?
उत्तर : 10 ने जास्त आहे.
(6) भारतात तृतीयक क्षेत्रातील कार्यरत लोकसंख्येची टक्केवारी किती ?
उत्तर : 26.9 %
(1) क्षेत्रभेट म्हणजे काय ? क्षेत्रभेटीची पूर्वतयारी कशी कराल ?
एखादया ठिकाणास प्रत्यक्ष भेट देऊन तेथील भौगोलिक व सांस्कृतिक घटकांची माहिती मिळवणे, म्हणजे 'क्षेत्रभेट' होय.
क्षेत्रभेटीची तयारी/तपशीलवार नियोजन पुढील प्रकारे करू :
(१) ठिकाणनिश्चिती :
(१) क्षेत्रभेटीचे नेमके ठिकाण ठरवणे व त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी लागणारा कालावधी व उपलब्ध असलेली वाहतुकीची साधने इत्यादी बाबींचा आढावा घेणे.
(२) उदा. वन क्षेत्र, नदीकिनारा, शेत,समुद्रकिनारा, पर्वत, किल्ला, पठार, थंड हवेचे ठिकाण, कारखाना, रेल्वे स्थानक इत्यादी. शेत,
(२) हेतूनिश्चिती :
(१) क्षेत्रभेटीचा नेमका हेतू व अध्ययन निष्पत्ती निश्चित करणे.
(२) उदा. वनक्षेत्रास भेट देऊन या वनांतील प्राणी वनस्पती यांचा अभ्यास करणे इत्यादी.
(३) अत्यावश्यक कागदपत्रांची पूर्तता :
(१) क्षेत्रभेटीसाठी अत्यावश्यक नकाशे, महत्त्वाची माहिती, परवानगी पत्रे इत्यादी बाबींचे संकलन करणे.
(२) उदा. वनक्षेत्रास भेट देण्यासाठी वनक्षेत्रपालाने दिलेले परवानगी पत्र इत्यादी.
(४) प्रश्नावली निर्मिती :
(१) क्षेत्रभेटीच्या हेतूनुसार व निवडलेल्या ठिकाणानुसार प्रश्नावली तयार करणे.
उदा. वनक्षेत्रास भेट देताना वनक्षेत्रपालाकडून माहिती मिळवण्यासाठी पुढील स्वरूपाची प्रश्नावली तयार करणे :
(१) वनक्षेत्राचे नाव काय ?
(२) वनक्षेत्राचा प्रकार कोणता?
(३) वनक्षेत्रात कोणकोणते प्राणी आढळतात ?
(४) वनक्षेत्रात कोणकोणते वृक्ष आढळतात ?
(अशा प्रकारचे कोणतेही प्रश्न तयार करावेत).
(2) स्वातंत्र्योत्तर काळात भारत आणि ब्राझील या देशांना कोणत्या समस्यांना तोंड दयावे लागले ?
स्वातंत्र्योत्तर काळात भारत आणि ब्राझील या देशांना प्रामुख्याने पुढील समस्यांना तोंड दयावे लागले
(१) स्वातंत्र्योत्तर काळात पहिल्या वीस वर्षात भारताला तीन युद्धांना सामोरे जावे लागले.
(२) स्वातंत्र्योत्तर काळात भारतातील विविध प्रांतांतील लोकांना दुष्काळांनाही सामोरे जावे लागले.
(३) स्वातंत्र्योत्तर काळात भारतास विविध वित्तीय समस्या, आर्थिक विकासाचा मंद वेग इत्यादी समस्यांनाही तोंड दयावे लागले.
(४) स्वातंत्र्योत्तर काळात ब्राझील देशास विविध स्वरूपांच्या वित्तीय समस्यांना तोंड दयावे लागले.
(3) ब्राझील व भारताला कोणत्या पर्यावरणीय समस्यांना तोंड दयावे लागते ?
ब्राझीलला व भारताला पुढील पर्यावरणीय समस्यांना तोंड दयावे लागत आहे
(१) वाढत्या लोकसंख्येच्या निवासासाठी, इंधनासाठी व स्थलांतरित शेतीसाठी दोन्ही देशांत मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात येत आहे. त्यामुळे दोन्ही देशांना निर्वनीकरण समस्येला सामोरे जावे लागत आहे.
(२) दोन्ही देशांतील वाढत्या नागरीकरणामुळे प्रद्वणाच्या समस्येत वाढ झाली आहे.
(३) वाढते प्रक्षण, निर्वनीकरण इत्यादी कारणांमुळे दोन्ही देशांना पर्यावरणाच्या हासाच्या समस्येला तोंड दयावे लागत आहे.
(४) पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे दोन्ही देशांतील विविध प्रजातींच्या वनस्पती, प्राणी व पक्षी यांचे अस्तित्त्व धोक्यात आले आहे.
COMMENTS