--> एस.एस.सी. बोर्ड परीक्षा मार्च 2025 इतिहास व राज्यशास्त्र Answer Key | marathi study

एस.एस.सी. बोर्ड परीक्षा मार्च 2025 इतिहास व राज्यशास्त्र Answer Key

प्र.  1. ( अ)   दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून पुढील विधाने पूर्ण करा :           (1)  )  जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय या ----...


प्र. 1. (अ) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून पुढील विधाने पूर्ण करा :

         (1) )  जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय या ----------------  शहराचे उत्खनन करताना
सापडले.
        (अ) दिल्ली               (ब) हडप्पा 
        (क) उर                   (ड) 
कोलकाता

         उत्तर :   उर 

      (2)   महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री ---------  हे होते.
            (अ) वसंतराव नाईक                 (ब) यशवंतराव चव्हाण
             (क) शंकरराव चव्हाण              (ड) वसंतदादा पाटील

        उत्तर :   यशवंतराव चव्हाण

(3)  हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद -------------   यांनी केला.
              (अ) जेम्स मिल                         (ब) फ्रेडरिक मॅक्सम्युलर
              (क) माऊंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन      (ड) जॉन मार्शल

            उत्तर :    फ्रेडरिक मॅक्सम्युलर

( उत्तर पत्रिकेत रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहावीत व योग्य पर्यायाला अधोरेखित करावे.)
SSC Board Exam March 2025 History and Political Science Answer Key

प्र. 1. (ब) पुढील प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखून लिहा :

        {1}

           (i) रायगडाला जेव्हा जाग येते   -      वसंत कानेटकर

          (ii) टिळक आणि आगरकर     -       विश्राम बेडेकर

          (iii) साप्टांग नमस्कार           -       आचार्य अत्रे

          (iv) एकच प्याला             -     अण्णासाहेब किर्लोस्कर

          उत्तर :   एकच प्याला   -     अण्णासाहेब किर्लोस्कर

       {2}

            (i) लिओपॉल्ड व्हॉन रांके      -       द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्टरी

          (ii) मायकेल फुको             -      आर्केऑलॉजी ऑफ नॉलेज

          (iii) कार्ल मार्क्स                 -    दास कॅपिटल

          (iv)  रेने देकार्त                     -     रिझन इन हिस्टरी

        उत्तर :   रेने देकार्त        -     रिझन इन हिस्टरी

    {3}        

       (i) प्रभाकर         -      आचार्य प्र. के. अत्रे

       (ii) दर्पण            -     बाळशास्त्री जांभेकर

       (iii) दीनबंधू      -        कृष्णराव भालेकर

       (iv) केसरी      -        बाळ गंगाधर टिळक

         उत्तर :  प्रभाकर    -      आचार्य प्र. के. अत्रे

प्र. 2. (अ)  दिलेल्या सूचनांनुसार कृती करा :

            [1] पुढील संकल्पना चित्रे पूर्ण करा :


       उत्तर :
  • कोलकाता  → नॅशनल लायब्ररी, 
  • दिल्ली       →   नेहरू मेमोरियल म्युझियमअँड लायब्ररी, 
  • हैदराबाद    →   स्टेट सेंट्रल लायब्ररी,
  • मुंबई      →  लायब्ररी ऑफ एशियाटिकसोसायटी व डेव्हिड ससून लायब्ररी

           [2] 
पुढील संकल्पना चित्रे पूर्ण करा :


 
उत्तर :

  •  हडप्पा संस्कृती,  
  • वैदिक काळ,
  • रामायण-महाभारताचा अन्वयार्थ,
  • जैन बौद्ध धर्मांचा विकास,
  • मौर्य-सातवाहन इत्यादी राजवटी,
  • महाजनपदे व गणराज्ये यांची माहिती.
  • भारतावरील तुर्क अफगाण आणि मुघल यांची आक्रमणे,
  • मुघल कालखंड व त्याचे भारतावर झालेले परिणाम,
  • भारतातील भक्तिचळवळी, संप्रदाय यांवर प्रकाश टाकला गेला आहे, 
  • छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य ,
  • भारताचा स्वातंत्र्यसंग्राम यांचे वर्णन केले आहे,
  • कला, सांस्कृतिक जीवन, सामाजिक-राजकीय चळवळी बाबत माहिती 

    इत्यादी सर्व 
    माहिती या मालिकेमधून प्रभावीपणे मांडली गेली आहे.

(वरील  संकल्पना चित्रात वरील पैकी कोणत्याही चार घटना अपेक्षित ....)

  [3]  पुढील तक्ता पूर्ण करा :




   उत्तर :


SSC Board Exam March 2025 History and Political Science Answer Key,एस.एस.सी. बोर्ड परीक्षा मार्च 2025  इतिहास व राज्यशास्त्र Answer Key

प्र. 2. (ब) थोडक्यात टिपा लिहा (कोणत्याही दोन)

(1) उपयोजित इतिहास  :

 उत्तर :   
(१) एखादा विषय इतर क्षेत्रांमध्ये लागू करणे व त्यातून निघणारे निष्कर्ष प्राप्त करणे म्हणजे 'उपयोजन' होय.
(२) इतिहासाची उद्दिष्टे इतर विषयांना लागू करून नवीन निष्कर्ष काढणे, यालाच 'इतिहासाचे उपयोजन' असे म्हणतात.
(३) इतिहासाद्वारे भूतकाळातील घटनांसंबंधीचे जे ज्ञान प्राप्त होते, त्याचा उपयोग वर्तमानात आणि भविष्यकाळात सर्व समाजाला कसा होईल, याचा विचार उपयोजित इतिहासात केला जातो.
(४) इतिहासात सामाजिक, धार्मिक, कला, स्थापत्य इत्यादी घटक समाविष्ट असतात; तसे या विषयांमध्येही इतिहासाचे उपयोजन होते.

(प्रत्येक मुद्द्यास 1 गुण; एकूण 2 गुण)

2) ' मराठा चित्रशैली  :


उत्तर :   इसवी सनाच्या सतराव्या शतकाच्या उत्तरार्थात मराठा चित्रशैली विकसित होण्यास सुरुवात झाली.
(१) सचित्र हस्तलिखित पोथ्या, पोथ्यांच्या खाली आणि वर ठेवण्यात येणाऱ्या लाकडी फळ्यांवरील चित्रे, काचचित्रे आणि भित्तिचित्रे या विविध स्वरूपांत मराठा चित्रशैलीचा आविष्कार आढळतो.
(२) या शैलीतील चित्रे रंगीत असून ती भित्तिचित्रे आणि हस्तलिखितांमधील लघुचित्रे यांच्या स्वरूपांतील आहेत.
(३) वाड्यांचा दर्शनी भाग, दिवाणखाने, मंदिरांचे मंडप, शिखरे व छत यांवर मराठा चित्रशैलीतील भित्तिचित्रे पाहण्यास मिळतात.
(४) या चित्रशैलीवर राजपूत आणि माळवा चित्रशैलीचा; तसेच युरोपीय चित्रशैलीचा प्रभाव पडलेला दिसून येतो.

(3) स्थळ कोश :

उत्तर : १) भूप्रदेशाच्या आधारेच इतिहास घडत असतो, म्हणून इतिहासाच्या अभ्यासासाठी भूगोलही महत्त्वाचा आहे. या ऐतिहासिक स्थळांच्या संदर्भात माहिती देणारे कोश लिहिले जातात. 
(२) महानुभाव पंथाचे प्रवर्तक श्रीचक्रधरस्वामी ज्या ज्या गावी गेले, त्या त्या गावांची तपशीलवार नोंद 'स्थानपोथी' या ग्रंथात त्या पंथातील मुनी व्यास यांनी केली आहे.
(३) सिद्देश्वरशास्त्री चित्राव यांनी प्राचीन भारतीय स्थळकोशा'ची रचना केली. या कोशात वैदिक साहित्य, महाकाव्ये, पाणिनीचे व्याकरण, कौटिलीय अर्थशास्त्र, बौद्ध व जैन साहित्य, चिनी-फारसी-ग्रीक साहित्य या ग्रंथांतील भौगोलिक स्थळांची माहिती दिलेली आहे. 
(४) स्थळ कोशांमुळे प्राचीन नगरांची नावे, त्यांचा इतिहास कळतो.
      स्थळ कोश हे इतिहासलेखनाचे महत्त्वाचे साधन आहे.

(प्रत्येक मुद्यास 1/2 गुणप्रत्येक टिपेस 2 गुणएकूण 4 गुण)

प्र. 3. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा: (कोणतीही दोन)
(1) ) मायकेल फुको त्यांच्या लेखनपद्धतीला 'ज्ञानाचे पुरातत्त्व' असे म्हटले आहे.
उत्तर :  
(१) मायकेल फुको यांनी कालक्रमानुसार इतिहासाची अखंड मांडणी करण्याची पद्धती चुकीची ठरवली.
(२) त्यांच्या मते, अंतिम सत्यापर्यंत पोहोचणे, हे पुरातत्त्वाचे उद्दिष्ट नसते.
(३) भूतकाळातील स्थित्यंतरांचे, म्हणजेच बदलांचे स्पष्टीकरण देण्याचा पुरातत्त्चाचा प्रयत्न असतो.
(४) फुको यांनी इतिहासातील स्थित्यंतरांचे स्पष्टीकरण देण्यावर अधिक भर दिला म्हणून त्यांच्या लेखनपद्धतीला ज्ञानाचे पुरातत्त्व'असे म्हटले आहे.

(2)   बखर हा ऐतिहासिक साहित्यातील महत्त्वाचा प्रकार आहे.
उत्तर :   
(१) ऐतिहासिक साहित्यात फारसी ग्रंथ, ताम्र-शिलालेख,कागदपत्रे, नाणी, प्रवासवर्णने इत्यादी साधनांबरोबर ऐतिहासिकबखरींचाही समावेश होतो.
(२) बखरीत शूर योद्ध्यांचे गुणगान असते. ऐतिहासिक घडामोडीआणि युद्धांची वर्णने असतात.
(३) थोर पुरुषांची चरित्रे आणि त्या काळातील नगरांची वर्णने असतात.
(४) तत्कालीन सामाजिक, धार्मिक आणि आर्थिक जीवनाचे चित्ररंगवलेले असते. ही वर्णने इतिहासलेखनाला उपयुक्त ठरतात; म्हणून 'बखर' हा ऐतिहासिक साहित्यातील महत्त्वाचा प्रकार आहे.

(3)  चित्रपट माध्यमात इतिहास हा विषय महत्त्वाचा आहे.
उत्तर : 
(१) ऐतिहासिक घटनांवर आणि व्यक्तींवर चित्रपट बनवताना इतिहासाचा आधार घ्यावाच लागतो.
(२) ऐतिहासिक कथाविषय असल्यास तो वास्तववादी होण्यासाठी तत्कालीन वातावरणाची निर्मिती करावी लागते.
(३) पात्रांच्या तोंडची भाषा, चालण्या-बोलण्याच्या पद्धती याही माहीत असाव्या लागतात.
(४) त्या वेळची केशभूषा, वेशभूषा, रंगभूषा इत्यादींचे नियोजन करावे लागते. 
   एकूण, चित्रपटाचे वातावरण काळानुरूप वाटण्यासाठी चित्रपटाच्या माध्यमात इतिहास हा विषय आणि त्यातील जाणकार महत्त्वाचे आहेत.

(4)  तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो.
उत्तर : 
(१) लाखो वर्षांच्या वाटचालीत मानव प्रगतीच्या प्रत्येक टप्प्यात नवनवी कौशल्ये अवगत करीत गेला.
(२) दगडांपासून हत्यारे तयार करणे, शेतीचे तंत्र अशी वाटचाल करीत तो विज्ञानयुगात आला.
(३) कृषी उत्पादन, वस्तूंचे उत्पादन, स्थापत्य, अभियांत्रिकी इत्यादींमध्ये बदल होत गेले.
(४) यांत्रिकीकरणामुळे उत्पादन वाढले.
   ही सर्व प्रगती समजून घेण्यासाठी आपल्याला तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो.

प्र. 4. पुढील परिच्छेद काळजीपूर्वक वाचून त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा :
  • मेजर ध्यानचंद हे हॉकीचे महान खेळाडू आणि भारतीय हॉकी संघाचे संघनायक होते. त्यांच्या नेतृत्वाखाली १९३६ साली भारतीय हॉकी संघाने बर्लिन ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले. त्यापूर्वी १९२८ आणि १९३२ मध्येही भारतीय हॉकी संघाने सुवर्णपदके जिंकली होती. तेव्हा ध्यानचंद हे भारतीय संघाकडून खेळले होते. २९ ऑगस्ट हा त्यांचा जन्मदिवस 'राष्ट्रीय क्रीडा दिवस' म्हणून साजरा केला जातो. त्यांना 'हॉकीचे जादू‌गार' असे म्हणतात. १९५६ मध्ये त्यांच्या हॉकीतील कामगिरीब‌द्दल त्यांना 'पद्मभूषण' या सन्मानाने विभूषित करण्यात आले.
प्रश्न :
(1) 1936 मध्ये भारतीय हॉकी संघाचे संघनायक कोण होते ?
  उत्तर : 1936 मध्ये भारतीय हॉकी संघाचे संघनायक मेजर ध्यानचंद  होते.

(2)  भारतात कोणता दिवस राष्ट्रीय क्रीडादिवस म्हणून साजरा केला जातो ?
उत्तर :  २९ ऑगस्ट हा मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस भारतात राष्ट्रीय क्रीडा दिवस' म्हणून साजरा केला जातो.

(3) हॉकी खेळाविषयी आपले मत मांडा.
उत्तर : 
(  हॉकी खेळाविषयी विद्यार्थ्याचे स्वमत अपेक्षित )

SSC Board Exam March 2025 History and Political Science Answer Key,एस.एस.सी. बोर्ड परीक्षा मार्च 2025  इतिहास व राज्यशास्त्र Answer Key
 प्र. 5. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा (कोणतेही दोन)

(1) 'स्त्रीवादी इतिहासलेखन' म्हणजे काय ?
उत्तर :
 (१) स्त्रीवादी इतिहासलेखन म्हणजे स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची
पुनर्रचना होय.
(२) इतिहासाच्या लेखनात पुरुषवादी दृष्टिकोनाचाच प्रभाव अधिक होता.
(३) त्यावर पुनर्विचार करावा आणि त्यात स्त्रियांचा अंतर्भाव करावा, अशी भूमिका फ्रेंच विदुषी सीमाँ-द-बोव्हा हिने मांडली.
(४) त्यानंतर स्त्रीवादी इतिहासलेखन हा विचार स्वीकारला गेला.
(५) स्त्रियांशी संबंधित नोकऱ्या, रोजगार, ट्रेड युनियन्स, स्त्रियांचे कौटुंबिक जीवन,स्त्री संस्था या सर्वांवर सविस्तर संशोधन सुरू झाले.
(६) १९९० नंतर 'स्त्री' हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग मानून इतिहास लिहिण्यावर
भर दिला जाऊ लागला. या दृष्टिकोनालाच 'स्त्रीवादी इतिहासलेखन' असे
म्हणतात.

(2) कलाक्षेत्रात व्यवसायाच्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत, हे स्पष्ट करा.
उत्तर :  
  विविध कलाक्षेत्रांत व्यवसायाच्या पुढील संधी उपलब्ध असतात.
(१) कलेच्या अभ्यासकांना संग्रहालये, अभिलेखागारे,ग्रंथालये, पुरातत्त्वीय संशोधन पत्रकारिता आणि भारतीय विद्या या ठिकाणी व्यवसाय मिळू शकतात. (२) औदयोगिक आणि जाहिरात क्षेत्रांत तरोध कलावस्तूंच्या खरेदी-विक्रीव्यवसायांत कलांच्या जाणकारांची आवश्यकता असते.
(३) चित्रपट आणि नाटक निर्मितीसाठी नेपथ्य, कलाकार,दिग्दर्शक, छायाचित्रकार प्रकाशयोजनाकार इत्यादी कलाकारांची आवश्यकता असते.
(४) मुद्रणक्षेत्रात तसेच घरसजावटीच्या साहित्यनिर्मितीत कलाक्षेत्रातील जाणकारांची गरज असते.
(९) दागदागिने, धातूंच्या वा लाकडी शोभेच्या वस्तू बनवणे या क्षेत्रांत अनेक
व्यावसायिक संधी आहेत.
(६) बांबू, काव, कापड, माती वा दगडी कलापूर्ण वस्तू, शिल्पे बनवणे या क्षेत्रांतही व्यवसायाच्या अनेक संधी उपलब्ध असतात.

(3) पोवाडा म्हणजे काय ? हे स्पष्ट करा.
उत्तर : 
(१) घडलेल्या प्रसंगातील नाट्य किंवा वीर पुरुषांच्यागुणांचे स्तुतीपर वर्णन करणारी वीररसयुक्त रचना म्हणजे 'पोवाडा' होय.
(२) पोवाडा हा गदय-पदयमिश्रित सादरीकरणाचा प्रकार आहे.
(३) तो पूर्वी राजदरबारात वा लोकसमूहासमोर आवेशपूर्णरीत्या डफाच्या तालावर सादर केला जात असे. (४) पोवाड्यातून तत्कालीन सामाजिक, धार्मिक व राजकीयस्थितीचे, सामाजिक रीतिरिवाजांचे वर्णन केलेले असते.
(५) लोकजागृती आणि मनोरंजन हा पोवाड्यांचा मुख्य हेतू असतो.
(६) दरबारी प्रथा, युद्धांच्या पद्धती, शस्त्रांची नावे यांचे उल्लेखअसतात,
म्हणून पोवाडा हा इतिहासलेखनाचे उपयुक्त साधनही आहे.

(3)  पर्यटनाचे कोणतेही तीन प्रकार स्पष्ट करा.
उत्तर : 
पर्यटनाचे अनेक प्रकारांत वर्गीकरण करण्यात येते. यांतील प्रमुख तीन प्रकार
(१) ऐतिहासिक पर्यटन : पर्यटन आणि इतिहास यांचे अतूट नाते आहे; म्हणूनच जगभरातील पर्यटकांचा ऐतिहासिक ठिकाणे पाहण्यासाठी ओघ वाढतच आहे. आपल्या पूर्वजांचे पराक्रम, त्यांनी निर्मिलेल्या वास्तू पाहणे हा कुतूहलाचा विषय असतो. शिवरायांनी बांधलेले किल्ले, राजांचे राजवाडे, स्वातंत्र्य चळवळीतील नेत्यांची स्मारके, महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे यांसारख्या विभूतींचे आश्रम अशा ऐतिहासिक स्थळांना पर्यटक भेटी देतात. जगभरातच असे ऐतिहासिक पर्यटन मोठ्या प्रमाणात केले जाते,
(२) भौगोलिक पर्यटन: अभयारण्ये, समुद्रकिनारे, नयांचे संगम, लोणारसारखी उल्कापाताने निर्माण झालेली सरोवरे, बेटे, धबधबे, पर्वतराजी व अभयारण्ये हे प्रत्येक देशाचे वैभव असते. निसर्गराजीत राहायला, निसर्गाचा आनंद उपभोगायला प्रत्येकालाच आवडतो. निसर्गाची ओढ, कुतूहल आणि विरंगुळा यांसाठी जगभरातील लोक अशा ठिकाणांना भेटी देतात. हे भौगोलिक पर्यटन होय.
(३) आंतरराष्ट्रीय पर्यटन: आधुनिक काळात झालेल्या वाहतुकीच्या सोयींमुळे आंतरराष्ट्रीय पर्यटन वाढले आहे. आंतरराष्ट्रीय परिषदा, विश्वसंमेलने, बैठका, व्यावसायिक कामे, स्थलदर्शन, धार्मिक स्थळांना भेटी आदी निमित्ताने आंतरराष्ट्रीय पर्यटन मोठ्या प्रमाणात चालते. आर्थिक उदारीकरण आणि जागतिकीकरण यांमुळे आंतरराष्ट्रीय पर्यटनाला चालना मिळालेली आहे.
( पर्यटनाचे स्वरूपावरून व हेतुवरून असे एकूण जवळपास १५ प्रकार आहेत यापैकी कोणतेही वरीलप्रमाणे तीन प्रकार स्पष्ट करणे अपेक्षित )

प्र. 6. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा :

(1) महाराष्ट्रात स्थानिक शासनसंस्थांमध्ये महिलांसाठी -------  जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत.
      (अ) 25%            (ब) 30%
      (क) 40%              (ड) 50%

     उत्तर :  50%

(2) शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी -------- करण्यात आली.
        (अ) जलक्रांती
        (ब) हरितक्रांती
        (क) औद्योगिकक्रांती
        (ड) धवलक्रांती

       उत्तर :   हरितक्रांती
प्र. 7. पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा (कोणतीही दोन)

(1) विशिष्ट प्रसंगी निवडणूक आयोग एखादया मतदारसंघात पुन्हा निवडणुका घेतात.
उत्तर : हे विधान बरोबर आहे. कारण
(१)काही वेळा विधानसभेचाकिंवा लोकसभेचा एखादा सदस्य आपल्या प्रतिनिधित्वाचा राजीनामा देतो,
(२) एखादया प्रतिनिधीचे अकस्मात निधन होते.
(३) निर्वाचित सदस्याने पक्षांतर केले, तर पक्षांतरबंदी कायद्या प्रमाणे त्याचे सदस्यत्व रद्द होते. अशा वेळी त्या मतदारसंघाची कामे कोण करणार हा प्रश्न निर्माण होतो; म्हणून निवडणूक आयोग त्या जागेसाठी पोटनिवडणूक घेतो.

2)  माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील गोपनीयता वाढली आहे.
उत्तर : हे विधान चूक आहे; कारण -
  (१) लोकशाही अधिक सुदृढ होण्यासाठी आणि नागरिक व शासन यांचा परस्परांवरील विश्वास वाढण्यासाठी शासन काय करीत आहे,हे नागरिकांना माहीत असणे आवश्यक असते.
(२) पारदर्शकता आणि उत्तरदायित्व ही चांगल्या शासनाचीवैशिष्ट्ये या अधिकारामुळे प्रत्यक्षात येतात.
(३) शासनाचे व्यवहार अधिक खुले होण्यास या अधिकारामुळेमदत झाली; म्हणून माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातीलगोपनीयता कमी झाली आहे. 

(2) आघाडी शासनातून अस्थिरता निर्माण होते.
उत्तर : हे विधान चूक आहे. कारण -
(१) १९८९ च्या निवडणुकीनंतर कोणत्याही पक्षाला बहुमत न मिळाल्याने केंद्रात व राज्यात आघाडी सरकारे अधिकारावर आली.
(२) पक्षांनी आपापला कार्यक्रम बाजूस ठेवून समान कार्यक्रमावर, भूमिकेवर एकत्र येऊन हे पक्ष सरकार चालवू लागले.
(३) १९७७ चा जनता पक्षाचा प्रयोग फसल्यानंतर आता केंद्र व राज्य पातळीवर
आघाडी शासन चांगल्या प्रकारे काम करीत आहेत.
  म्हणून आघाडी शासनातून 
अस्थिरता निर्माण होते, हा समज खोटा ठरला आहे.

प्र. 8 (अ) पुढील संकल्पना स्पष्ट करा (कोणतीही एक)

(1) अल्पसंख्याकविषयक तरतुदी
उत्तर :
(१) अल्पसंख्याकांच्या अधिकारांचे रक्षण व्हावे व त्यांचा विकास व्हावा, यासाठी संविधानात या वर्गासाठी अनेक तरतुदी करण्यात आल्या आहेत.
(२) धर्म, वंश, भाषा, जात, प्रदेश इत्यादी घटकांवर आधारित भेदभावांना प्रतिबंध करण्यात आला आहे.
(३) अल्पसंख्याकांना शिक्षणाच्या आणि रोजगाराच्या संधी मिळाव्यात यासाठी शासन विविध योजना राबवीत आहे.
(४) अल्पसंख्याकांची भाषा, संस्कृती, लिपी, धर्म यांचे रक्षण करण्यासाठी संविधानात अनेक तरतुदी करण्यात आल्या आहेत.

(2) कामगार चळवळ..
उत्तर : 
 (१) १८५० नंतर भारतात कापड गिरण्या, रेल्वे कंपन्या असे उदयोग सुरू झाले. या औदयोगिकीकरणामुळे देशात कामगारांचा मोठा वर्ग निर्माण झाला.
(२) पुढे त्यांच्या समस्या वाढल्या. या समस्या सोडवण्यासाठी १९२० मध्ये 'ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस' स्थापन होऊन कामगार चळवळी जोम धरू लागल्या.
(३) स्वातंत्र्योत्तर काळातही कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी अनेक युनियन्सची स्थापना झाली. १९६० ते १९८० पर्यंत कामगार चळवळींचा प्रभाव होता. १९८० नंतर मात्र मुंबईतील कापड गिरणी कामगारांचा संप
अयशस्वी झाल्यानंतर हळूहळू ही चळवळ विखुरली व कमकुवत झाली.
(४) जागतिकीकरण आणि कंत्राटी कामगार पद्धतीने कामगार चळवळीवर मोठा आघात झाला आहे.

प्र. ४ (ब) पुढील सूचनांनुसार कृती करा (कोणतेही एक)

           (1) पुढील तक्ता पूर्ण करा : 



        उत्तर :
  •   निवडणूक आयोग (भूमिका)
           १. मतदारसंघांची निर्मिती करणे.
           २. मतदार यादया निश्चित करणे,
           ३. निवडणुका घोषित करणे,
           ४. उमेदवारांचे अर्ज स्वीकारणे व छाननी करणे.
           ५. मतदानाची व्यवस्था करणे.
           ६. मतमोजणी व निकाल जाहीर करणे.
( वरीलपैकी कोणतेही दोन लिहिणे अपेक्षित )

  • मतदार (भूमिका)
    १. निवडणूक काळात आचारसंहितेचे पालन करणे.
    २. प्रचारसभांना हजर राहून मतनिश्चिती करणे.
    ३. मतदान करणे
( वरीलपैकी कोणतेही दोन लिहिणे अपेक्षित )

       (2) पुढील संकल्पनाचित्रे पूर्ण करा :


          उत्तर : 
             
भारतीय लोकशाही समोरील सामाजिक आव्हाने :
  • बेरोजगारी 
  • साधनसंपत्तीचे असमान वाटप 
  • व्यसनाधीनता 
  • गरीब - श्रीमंत यांच्यातील वाढती दरी 
  • दुष्काळ 
  • जातीयता 
( वरीलपैकी कोणतेही चार  लिहिणे अपेक्षित )


प्र. 9. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा (कोणताही एक)

(1) राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळवण्यासाठी निवडणूक आयोगाने स्पष्ट केलेले निकष
सांगा.
उत्तर : 
राष्ट्रीय पातळीवर कार्यरत असणाऱ्या पक्षांना 'राष्ट्रीय पक्ष' असे म्हणतात. राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळण्यासाठी निवडणूक आयोगाने पुढील निकष ठरवले आहेत -
(१) किमान चार राज्यांमध्ये शेवटच्या लोकसभा निवडणुकीत किंवा विधानसभेच्या निवडणुकीत किमान ६ टक्के मते मिळणे आवश्यक. किंवा
(२) किमान चार सभासद लोकसभेत निवडून येणे आवश्यक आहे. किंवा
(३) आधीच्या लोकसभेच्या निवडणुकीत किमान तीन राज्यांमध्ये मिळून लोकसभेच्या एकूण जागांपैकी २ टक्के जागा निवडून येणे आवश्यक. किंवा
(४) किमान चार राज्यांमध्ये राज्यपातळीवरील पक्ष म्हणून मान्यता मिळणे आवश्यक आहे.

(2) भारतात लोकशाहीच्या यशासाठी कोणत्या बाबी आवश्यक आहेत ?
उत्तर : 
 भारतात लोकशाहीच्या यशासाठी पुढील आवश्यकता आहे बाबींची
(१) लोकशाही निर्णयप्रक्रियेत सर्व धार्मिक, वांशिक, भाषिक व जातीय गटांना सहभागी होण्याची संधी मिळाली पाहिजे.
(२) राजकारणाचे गुन्हेगारीकरण रोखण्यासाठी कडक शिक्षा असणारेकायदे असावेत व असे गुन्हेगारीकरण रोखणारी स्वतंत्र न्यायालयेअसावीत.
(३) केवळ शासकीयच नव्हे; तर सामाजिक आणि वैयक्तिकपातळीवरही लोकशाही यशस्वी होण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत.
(४) शासनव्यवहारात सर्व पातळ्यांवरील नागरिकांचा सहभाग
वाढला पाहिजे.

SSC Board Exam March 2025 History and Political Science Answer Key,एस.एस.सी. बोर्ड परीक्षा मार्च 2025  इतिहास व राज्यशास्त्र Answer Key

COMMENTS

नाव

इंग्रजी,3,इंग्रजी उपयोजित लेखन,3,इंग्रजी व्याकरण,2,प्रश्नपत्रिका,13,मराठी,2,मराठी उपयोजित लेखन,10,मराठी व्याकरण,7,शैक्षणिक Update,22,हिंदी रचना विभाग,3,हिंदी व्याकरण,4,
ltr
item
marathi study : एस.एस.सी. बोर्ड परीक्षा मार्च 2025 इतिहास व राज्यशास्त्र Answer Key
एस.एस.सी. बोर्ड परीक्षा मार्च 2025 इतिहास व राज्यशास्त्र Answer Key
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhlr4W-sVz8VxvW8e6v1cM92c0RIb9hjDNhV4mzMYWrOvvhf59mZnKfeANJTSS251xl2tqtrnkMFXyO4Mp6qtgHJ5rXsk9MMz4q9PQBW4tvxIo629WIcO6B19yhFUZq7kxGW2e3Hgj5UaYRzHCCulgkmm7KqJhQuIwdwfVvWNjEflKQ7mgVVVP2IGhfciZf/w640-h360/%E0%A4%8F%E0%A4%B8.%E0%A4%8F%E0%A4%B8.%E0%A4%B8%E0%A5%80.%20%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8%20answer%20Key.png
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhlr4W-sVz8VxvW8e6v1cM92c0RIb9hjDNhV4mzMYWrOvvhf59mZnKfeANJTSS251xl2tqtrnkMFXyO4Mp6qtgHJ5rXsk9MMz4q9PQBW4tvxIo629WIcO6B19yhFUZq7kxGW2e3Hgj5UaYRzHCCulgkmm7KqJhQuIwdwfVvWNjEflKQ7mgVVVP2IGhfciZf/s72-w640-c-h360/%E0%A4%8F%E0%A4%B8.%E0%A4%8F%E0%A4%B8.%E0%A4%B8%E0%A5%80.%20%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8%20answer%20Key.png
marathi study
https://www.marathistudy.com/2025/03/blog-post_15.html
https://www.marathistudy.com/
http://www.marathistudy.com/
http://www.marathistudy.com/2025/03/blog-post_15.html
true
5159341443364317147
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read More Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content