प्र. 1. (अ) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यायाचा क्रमांक लिहा : (i) ऑक्सिश्वसनामध्ये ग्लुकोजचे पूर्ण विघटन होवून ऊर्जेबरोबरच पाणी आणि -----...
प्र. 1. (अ) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यायाचा क्रमांक लिहा :
- (i) ऑक्सिश्वसनामध्ये ग्लुकोजचे पूर्ण विघटन होवून ऊर्जेबरोबरच पाणी आणि -----------चे रेणू तयार होतात.
(अ) CO2 (ब) 02
(क) NaOH (ड) HNO3
उत्तर : ऑक्सिश्वसनामध्ये ग्लुकोजचे पूर्ण विघटन होवून ऊर्जेबरोबरच पाणी आणि CO2 चे रेणू तयार होतात.
(ii) व्हिनेगरमध्ये आम्ल ------------ असते.
(अ) अॅसेटीक (ब) लेक्टिक (क) टारटारीक (ड) हायड्रोक्लोरिक
उत्तर : व्हिनेगरमध्ये आम्ल अॅसेटीक असते.
(iii) ) जनुकांमध्ये अचानक बदल होवून सजीवात लहानसा बदल घडून येतो. तो बदल म्हणजेच --------- होय.
(अ) ) परिवर्तन (क) उत्परिवर्तन
(ब) स्थानांतरण (ड) विकृती
उत्तर : जनुकांमध्ये अचानक बदल होवून सजीवात लहानसा बदल घडून येतो. तो बदल म्हणजेच उत्परिवर्तन होय.
(iv) मानवी शुक्रपेशीची निर्मिती ----------- या अवयवात होते.
(अ) ) शुक्रवाहिनी (ब) ) स्खलनवाहिनी (क) वृषण (ड) मूत्रजननवाहिनी
उत्तर : मानवी शुक्रपेशीची निर्मिती वृषण या अवयवात होते.
(v) सौर विदयुत घट सूर्यकिरणातील प्रकाश ऊर्जेचे रूपांतर सरळपणे ---------- करतात.
(अ) रासायनिक ऊर्जेत (ब) प्रकाश ऊर्जेत (क) यांत्रिक ऊर्जेत (ड) विद्युत ऊर्जेत
उत्तर : सौर विदयुत घट सूर्यकिरणातील प्रकाश ऊर्जेचे रूपांतर सरळपणे ---------- करतात.Science 2 Answer Key | विज्ञान 2 संपूर्ण उत्तरपत्रिका
प्र. 1. (ब) पुढील प्रश्न सोडवा :
- ( i) विसंगत पद ओळखा :
खंडीभवन, पुनर्जनन, मुकुलायन, फलन.
उत्तर : फलन
(ii) सहसंबंध लिहा :
मधुमेह : इन्सुलिन :: कॅन्सर : ---------
उत्तर : मधुमेह : इन्सुलिन :: कॅन्सर : इंटरल्युकिन
(iii) चूक की बरोबर, ते लिहा :
जीवाश्मांचा अभ्यास हे उत्क्रांतीच्या अभ्यासाचे एक महत्त्वाचे अंग आहे.
उत्तर : बरोबर
(iv) जैवतंत्रज्ञानाचे दोन व्यावहारिक उपयोग लिहा.
उत्तर : शेती व औषध निर्मिती
(v) मी मत्स्यप्राणी वर्गातील असूनही फुफ्फुसाद्वारे श्वसन करतो, तर मी कोण ?
उत्तर : लंगफिश
प्र. 2. (अ) शास्त्रीय कारणे लिहा (कोणतीही दोन)
- (i) काही उच्चस्तरीय वनस्पती व प्राणीसुद्धा काही वेळा विनॉक्सीश्वसन
करतात.
उत्तर : (I) काही उच्चस्तरीय वनस्पती व प्राणी त्यांच्या सभोवती असणारी ऑक्सिजन वायूची पातळी कमी झाल्यास ऑक्सिश्वसनऐवजी विनॉक्सिश्वसन करू लागतात.
(II) जिवंत राहण्यासाठी अशा विनॉक्सिश्वसनाचा आधार घेतला जातो.
म्हणून काही उच्चस्तरीय वनस्पती व प्राणीसुद्धा काही वेळा विनॉक्सीश्वसन करतात.
(ii) मुलगी होण्यासाठी स्त्रीला जबाबदार धरणे अयोग्य आहे.
उत्तर :
(1) दांपत्या ला मुलगा किंवा मुलगी होणे हे सर्वस्वी पुरुषावर अवलंबून आहे.
(2) जेव्हा युग्मक निर्मिती होते, तेव्हा पुरुषांकडून लिंगगुणसूत्रां पैकी X किंवा Y गुणसूत्र पुढील पिढीत येते. स्त्रियांकडून मात्र X गुणसूत्रच पुढील पिढीत येते. फलनाच्या वेळी जर पुरुषांकडून X गुणसूत्र आले की मुलगी होते आणि जर Y गुणसूत्र आले तर मुलगा होतो.
म्हणून मुलगी होण्यासाठी स्त्रीला जबाबदार धरणे अयोग्य आहे.
(iii) अणु ऊर्जेपासून मिळणारी ऊर्जा पर्यावरणस्नेही नाही.
उत्तर :
(1) अणू ऊर्जानिर्मिती केंद्रात आण्विक इंधनाचे अणुविखंडन झाल्यानंतर धोकादायक अशी आण्विक प्रारणे बाहेर पडतात.
(2) आण्विक कचऱ्याची विल्हेवाट लावणे कठीण असते.
(3) अपघात घडल्यास त्यातून बाहेर पडणाऱ्या आण्विक प्रारणांमुळे प्रचंड जीवितहानी होऊ शकते.
म्हणून अणु ऊर्जेपासून मिळणारी ऊर्जा पर्यावरणस्नेही नाही.
प्र. 2. (ब) पुढील प्रश्न सोडवा (कोणतेही तीन)
- (i) खालील अन्नसाखळी पूर्ण करा :
उत्तर :
(ii) फरक स्पष्ट करा :
मत्स्य प्राणी वर्ग आणि सरीसृपप्राणी वर्ग.
उत्तर :
(iii) खाली दिलेल्या चित्राचे निरीक्षण करून या आपत्तीचे कोणतेही दोन परिणाम लिहा :
उत्तर :
महापूर आणि अतिवृष्टी
1.किनाऱ्यानजीकच्या वस्तीत पाणी शिरते. सखल भागात पाणी साचते.
2. संपूर्ण प्रदेश जलमय होतो.
3. आर्थिक व जीवितहानी होते.
(iv) ताणतणाव कमी करण्यासाठी कोणतेही चार मार्ग लिहा.
उत्तर :
(1) हास्य मंडळ मोठमोठ्याने व मनमोकळे हसून ही माणसे स्वतःचे ताणतणाव हलके करणे
(2) मित्र मैत्रिणी, समवयस्क, भाऊ-बहिणी, शिक्षक व सर्वांत महत्त्वाचे म्हणजे पालक या सर्वांशी संवाद साधणे.
(3) जवळच्या व्यक्ती कडे मन मोकळे करणे, मनातील विचार लिहून काढणे, हसणे.
(4) अशा वेगवेगळ्या प्रकारांनी 'व्यक्त होण्याने' ताणतणाव कमी होण्यास मदत होते.
(5) वस्तूंचा संग्रह करणे, छायाचित्रण, दर्जेदार पुस्तकांचे वाचन, पाककला, शिल्पकला, चित्रकला, रांगोळी, नृत्य, संगीत असे छंद जोपासने.
(6) नियमित व्यायाम, स्नायूंना मालिश करणे, स्पा, योग प्राणायाम, ध्यानधारणा
(v) खालील संकल्पनाचित्र पूर्ण करा :
उत्तर :
प्र. 3. पुढील प्रश्न सोडवा: (कोणतेही पाच)
- (i) आनुवंशिकता म्हणजे काय हे स्पष्ट करून आनुवंशिक बदल कसे घडतात ते स्पष्ट करा.
उत्तर : (1)एका जनक पिढीतील जैविक लक्षणे जनुकांद्वारे पुढच्या संततीच्या पिढीत संक्रमित होण्याची प्रक्रिया म्हणजे आनुवंशिकता होय.
(2) आनुवंशिक बदल होण्याची कारणे :
(i)उत्परिवर्तन : अचानक एखादया कारणाने जनक पिढीतील DNA मध्ये बदल घडला तर आनुवंशिक बदल होतात.
(ii)युग्मके तयार होताना अर्धगुणसूत्री विभाजन प्रक्रियेत जनुकांची सरमिसळ होते; त्यामुळेही आनुवंशिक बदल होतात.
(ii) सूत्री पेशीविभाजनाच्या चार अवस्था लिहा आणि कोणत्याही दोन अवस्थांचे स्पष्टीकरण करा.
उत्तर :
1.पूर्वावस्था 2.मध्यावस्था 3. पश्चावस्था 4. अंत्यावस्था
अ.) पूर्वावस्था: प्रकल विभाजनाच्या पूर्वावस्थेमध्ये मूलतः अत्यंत नाजूक धाग्यासारखे असलेल्या प्रत्येक गुणसूत्राचे वलीभवन होते. त्यामुळे ते आखूड व जाड होऊन त्यांच्या अर्धगुणसूत्र जोडीसहित दृश्य व्हाय ला सुरुवात होते. ताराकेंद्र द्विगुणित होते व प्रत्येक तारा केंद्र पेशीच्या विरुद्ध ध्रुवांना जाते. केंद्राकावरण आणि केंद्रिका नाहीसे व्हायला सुरुवात होते.
ब.) मध्यावस्था : मध्यावस्थेमध्ये केंद्राकावरण पूर्णपणे नाहीसे होते. सर्व गुणसूत्रांचे घनीकरण पूर्ण होऊन प्रत्येक गुणसूत्र त्याच्या अर्थ गुणसूत्र जोडीसहित स्पष्टपणे दिसतात.सर्व गुणसूत्रे पेशीच्या विषुववृत्तीय प्रतलाला (मध्य प्रतलाला) समांतर अवस्थेत संरचित होतात. दोन्ही तारा केंद्र आणि प्रत्येक गुणसूत्राचा गुणसूत्रबिंदू या दरम्यान विशिष्ट अशा लवचीक प्रथिनांचे धागे तयार होतात.
iii) एकपेशीय सजीवातील अलैंगिक प्रजननाचे प्रकार उदाहरणासह स्पष्ट करा.
उत्तर :
(iv) औष्णिक विद्युत निर्मितीमुळे कोणते इंधन वापरतात ? या विद्युतनिर्मितीमुळे निर्माण होणाऱ्या कोणत्याही दोन समस्या स्पष्ट करा.
उत्तर :
कोळसा हे इंधन वापरतात.
1. कोळशाच्या ज्वलनाने होणारे हवेचे प्रदूषणः कोळशाच्या ज्वलनाने कार्बन डायऑक्साइड आणि सल्फर ऑक्साइड, नायट्रोजन ऑक्साइड्स यांसारखे आरोग्यास घातक वायू वातावरणात उत्सर्जित होतात.
2. कोळशाच्या ज्वलनाने उत्सर्जित वायूसह इंधनाचे सूक्ष्म कणसुद्धा वातावरणात सोडले जातात. यामळे श्वसनसंस्थेचे गंभीर विकार उद्भवू शकतात.
v) मृदुकाय प्राणीसंघातील प्राण्यांच्या शरीराचे तीन वैशिष्ट्ये
उत्तर :
1. या प्राण्यांचे शरीर मऊ, बुळबुळीत असते म्हणून यांना मृदुकायप्राणी म्हणतात.
2. हा प्राण्यांम धील दुसरा सर्वा त मोठा असा संघ आहे.
3. हे प्राणी जलचर किंवा भूचर असतात. जलचर मृदुकाय प्राणी हे बहुतेक समुद्रात राहणारे असतात, परंतु काही गोड्या पाण्यातही आढळतात.
4. यांचे शरीर त्रिस्तरी, देहगुहायुक्त, अखंडित आणि मृदू असते.
(vi) आम्ल पर्जन्याचे घटक कोणते ? त्याचे पृथ्वीतळावर होणारे कोणतेही दोन दृष्यपरिणाम लिहा.
उत्तर :
कार्बन डाइऑक्साइड, सल्फर, नाइट्रोजन ऑक्साइड.
दुष्परिणाम :
1) पूल, जुन्या इमारती ऐतिहासिक वास्तू (ताजमहाल) यावर परिणाम होत आहे.
2) आम्ल्युक्क्त पाण्यामुळे जलचर सजीवांच्या अधिवासाल धोका पोहचत आहे.
3) जलीय परिसंस्था धोख्यात येत आहे.
(vii) खालील शब्दकोडे पूर्ण करा :
1) मद्य , व तंबाखूजन्य पदार्थांचे सतत सेवन.
2) या अप मुळे सायबर गुन्हे घडण्याची शक्यता
3) ताणतणाव नाहीसा करण्याचा एक उपाय.
4) ताणविरहीत जीवन जगण्यास आवश्यक>
(viii) तुम्ही ऐकलेल्या एका आपत्तीचे कारण, परिणाम आणि केलेली उपाययोजना लिहा.
उत्तर :
प्र. 4. पुढील प्रश्न सोडवा: (कोणताही एक)
- (i) जैवविविधता म्हणजे काय ? जैवविविधता संवर्धनाचे चार उपाय लिहा.
उत्तर :
निसर्गामध्ये आढळणाऱ्या एकाच जातीच्या सजीवांमधील आनुवंशिक फरक, सजीवांच्या जातींचे अनेक प्रकार आणि विविध प्रकारच्या परिसंस्था या सर्वांमुळे त्या भागातील निसर्गाला जी सजीवसृष्टीची समा त्याला जैवविविधता म्हणतात.
पुढील उपायांनी जैवविविधतेचे संवर्धन करता येईल :
(1) दुर्मीळ जातींच्या सजीवांचे संरक्षण करणे.
(2) राष्ट्रीय उद्याने व अभयारण्ये यांची निर्मिती करणे.
(3) काही क्षेत्रे 'राखीव जैवविभाग' म्हणून घोषित करणे.
(4) विशिष्ट प्रजातीच्या संवर्धनासाठी खास प्रकल्प सुरू करणे.
(5) प्राणी व वनस्पतींचे संवर्धन करणे.
(6) पर्यावरणविषयक कायद्यांचे पालन करणे.
(7) पारंपरिक ज्ञानाची नोंद करून ठेवणे.
(ii) मूळपेशी म्हणजे काय ? मूळपेशींचे चार उपयोग स्पष्ट करा.
उत्तर :
स्त्रीयुग्मक व पुंयुग्मक यांचे मिलन झाल्या नंतर जे युग्मनज बनते त्या पासून पुढील सजीव बनतो. वाढीच्या अगदी सुरुवातीच्या काळात तो सजीव 'पेशींचा एक गोळा' असतो. त्यातील सर्व पेशी जवळपास एकसारख्याच असतात. या पेशींना मूलपेशी म्हणतात.
1) पुनरुज्जीवित औषध क्षेत्र याअंतर्गत सेल थेरपी हे तंत्र वापरण्यात येते. (2) मधुमेह, हृदयविकाराचा झटका, अल्झायमरचा आजार, कंपवात (पर्किन्सनचा आजार) इत्यादींमुळे निकामी झालेल्या ऊती बदलण्यासाठी मूलपेशी वापरल्या जातात.
(3) अॅनीमिया, ल्यूकेमिया, थेंलॅसेमिया अशा रोगांमध्ये रक्तपेशीची कमतरता भासते. अशा वेळी रक्तपेशी बनवण्यासाठी मूलपेशी वापरल्या जातात.
(4) अवयवरोपण या तंत्रात मूलपेशींपासून अवयव बनवून त्यांचे रोपण करता येते.
उदा., यकृत, वृक्क (किडनी) असे अवयव निकामी झाल्यास त्यांच्या जागी सुदृढ अवयव रोपण करावे लागते. तेव्हा या पेशींचा फायदा होतो.
COMMENTS