1. (अ) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यायाचा क्रमांक लिहा : i)अल्कधर्मी मृदा धातूंची संयुजा 2 आहे, म्हणजे त्यांची आधुनिक आवर्तसारणीतील जाग...
1. (अ) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यायाचा क्रमांक लिहा :
- i)अल्कधर्मी मृदा धातूंची संयुजा 2 आहे, म्हणजे त्यांची आधुनिक आवर्तसारणीतील जागा ..............मध्ये आहे
(अ) गण 2
(ब) गण 16
(क) आवर्त 2.
(ड) डी-खंड
उत्तर : गण 2
(ii) ज्या अभिक्रियांमध्ये अभिकारकामधील आयनांची अदलाबदल होऊन अवक्षेप तयार होतो अशा अभिक्रियांना -------------------असे म्हणतात.
(अ) संयोग अभिक्रिया
(ब) अपघटन अभिक्रिया
(क) विस्थापन अभिक्रिया
( ड) दुहेरी विस्थापन अभिक्रिया
उत्तर : दुहेरी विस्थापन अभिक्रिया
(iii) विजेच्या बल्बमध्ये कुंतल बनविण्यासाठी -------------------- धातूचा उपयोग करतात.
(अ) नायक्रोम
(ब) तांबे
(क) टंगस्टन
(ड) अॅल्युमिनिअम
उत्तर : टंगस्टन
(iv) एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात प्रकाश जाताना त्याची मार्गक्रमणाची दिशा बदलते, यालाच प्रकाशाचे -----------------म्हणतात.
(अ) परावर्तन
(ब) अपस्करण
(क) विकिरण
(ड) अपवर्तन
उत्तर : अपवर्तन
(υ) CaO + H₂O → Ca(OH), + उष्णता ही ----------------------- प्रकारचीअभिक्रिया आहे.
(अ) उष्मादायी
(ब) विद्युत अपघटनी
(क) अपघटन
(ड) उष्माग्राही
उत्तर : उष्मादायी
(ब) खालील प्रश्न सोडवा :
(i) चूक की बरोबर ते लिहा :
पेशीमधील श्वसनादरम्यान रेडॉक्स अभिक्रिया घडत असते.
उत्तर : बरोबर
(ii) वेगळा घटक ओळखा :
ध्वनिवर्धक, सूक्ष्मश्रवणी, विद्युतचलित्र, चुंबक
उत्तर : चुंबक
(iii) ताऱ्यांच्या लुकलुकण्याचे कारण काय ?
उत्तर : प्रकाशाचे अपवर्तन , हवा माध्यमाचा सतत बदलणारा अपवर्तनक
(iv) योग्य जोडी जुळवा : ,
'अ' स्तंभ 'ब' स्तंभ
साधा सूक्ष्मदर्शक (a) अतिसूक्ष्म वस्तूंचे निरीक्षण करणे
(b) दूरच्या वस्तूंचे निरीक्षण करणे
(c) घड्याळ दुरुस्ती करणे
उत्तर : साधा सूक्ष्मदर्शक- घड्याळ दुरुस्ती करणे
(v) 0°C ते 4°C या तापमानादरम्यान असणाऱ्या पाण्याच्या आचरणास काय म्हणतात ?
उत्तर : पाण्याचे असंगत आचरण
2. (अ) शास्त्रीय कारणे लिहा (कोणतीही दोन) :
(i) आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना अणुआकार कमी होत जातो.
उत्तर :
1) आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना अणुत्रिज्या कमी कमी होत जाते. कारण एका आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना अणुअंक एक-एकाने वाढत जातो, म्हणजेच केंद्रावरील धनप्रभार एकेक एककाने वाढत जातो. मात्र त्याप्रमाणे भर पडलेला इलेक्ट्रॉन हा असलेल्या बाह्यतम कवचामध्ये जमा होतो.
2. वाढीव केंद्रकीय धनप्रभावामुळे इलेक्ट्रॉन केंद्रकाकडे अधिक प्रमाणात ओढले जातात व त्यामुळे आकारमान कमी होते.
(ii) विद्युतपारेषणासाठी तांब्याच्या किंवा अॅल्युमिनिअमच्या तारांचा उपयोग करतात.
उत्तर :
(1) तांबे व अॅल्युमिनिअम उत्तम विद्युत वाहक आहेत.
(2) तांबे व अॅल्युमिनिअमची रोधकता खूप कमी असल्याने त्यांतून विद्युतधारेचे वहन होत असताना निर्माण होणाऱ्या उष्णतेचे प्रमाणही कमी असते. म्हणून विद्युत पारेषणासाठी तांब्याच्या किंवा अॅल्युमिनिअमच्या तारांचा उपयोग करतात.
(iii) काही देशांमध्ये पेट्रोलची कार्यक्षमता वाढविण्यासाठी त्यामध्ये ईथेनॉल एक समावेशी म्हणून मिसळतात.
उत्तर :
I) ऊसाच्या रसापासून साखर बनवताना जी मळी तयार होते तिचे किण्वन केल्यावर अल्कोहोल (ईथेनॉल) मिळते. पुरेशा हवेमध्ये ज्वलन झाल्यावर ईथेनॉलपासून केवळ कार्बन डायऑक्साइड व पाणी ही उत्पादिते तयार होतात
II) अशा प्रकारे ईथेनॉल हे एक स्वच्छ इंधन आहे. त्यामुळे काही देशांमध्ये पेट्रोलची कार्यक्षमता वाढवण्यासाठी त्यामध्ये हे एक समावेशी म्हणून मिसळतात. अशा इंधनाला गॅसोहोले म्हणतात.
(ब) खालील उपप्रश्न सोडवा (कोणतेही तीन) :
(i) पदार्थाच्या विशिष्ट उष्माधारकतेच्या मापनासाठी कोणत्या तत्त्वाचा वापर करतात ? ते तत्त्व लिहा.
उत्तर :
1. उष्णता विनिमयाचे तत्वाचा वापर करतात.
2. उष्ण वस्तू ने गमावलेली उष्णता = थंड वस्तू ने ग्रहण केलेली उष्णता.
(ii) लोखंडी दरवाज्यावर गंज चढू नये म्हणून तुम्ही काय कराल ?
उत्तर :
1.लोखंडी दरवाज्यावर एखाद्या पदार्थाचा थर बसवू, जेणेकरून हवेतील बाष्प आणि ऑक्सिजन यांचा धातूशी संपर्क रोखला जाऊन त्यांच्यातील अभिक्रिया होणार नाही.
2. लोखंडी दरवाज्यावर रंग, तेल, ग्रीस किंवा वॉर्निश यांचा थर लावू यामुळे क्षरण रोखता येते.
3. क्षरणकारी धातूवर अक्षरणकारी धातूचा थर बसवल्यामुळे सुद्धा क्षरण रोखता येते. यासाठी गॅल्व्हनायझिंग, कथिलीकरण, विदयुत विलेपन, धनाग्रीकरण आणि संमिश्रीकरण यांसारख्या पद्धतीचा वापर करू.
(iii) फरक स्पष्ट करा :
वस्तुमान आणि वजन
उत्तर :
वस्तुमान
1.एखादया वस्तूचे वस्तुमान म्हणजे त्या वस्तूमध्ये असणाऱ्या द्रव्यसंचयाचे मापन होय.
2. या राशीला परिमाण असते, पण दिशा नसते.
3.हे विश्वात सगळीकडे सारखे असते.
4.हे कधीही शून्य होऊ शकत नाही.
वजन :
1. एखादया वस्तूला पृथ्वी ज्या गुरुत्वीय बलाने आपल्या केंद्राच्या दिशेने आकर्षित करते त्याला त्या वस्तूचे वजन म्हणतात.
2. या राशीला परिमाण व दिशा दोन्ही असतात.
3.हे पृथ्वीसापेक्ष स्थानानुसार बदलते.
4. हे पृथ्वीच्या केंद्राशी शून्य होते.
(iv) 'दिवाळीच्या फटाक्यांमध्ये रॉकेट हा एक प्रकारचा फटाका असतो' यावरून खालील प्रश्नांची उत्तरे द्या :
(a) प्रक्षेपकाचे नाव सांगा.
उत्तर : PSLV
(b) त्याचे कार्य कोणत्या नियमानुसार चालते, ?
उत्तर :)न्यूटनच्या गतिविषयक तिसऱ्या नियमावर चालते.
( c) अपघटन अभिक्रिया म्हणजे काय ? साखरेच्या अपघटन अभिक्रियेचे समीकरण लिहा.
उत्तर :
ज्या अभिक्रियेमध्ये एकच अभिक्रियाकारक असतो व त्यापासून दोन किंवा अधिक उत्पादिते मिळतात त्या अभिक्रियेला अपघटन म्हणतात.
3. खालील उपप्रश्न सोडवा (कोणतेही पाच) :
(i) एक 3 kg वस्तुमानाचा लोहगोल 125 m उंचीवरून खाली पडला. '' चे मूल्य10 m/s2 आहे असे धरून खालील राशींचे मूल्य काढा :
(a) जमिनीपर्यंत पोहोचण्यासाठी लागलेला कालावधी.
(b) जमिनीपर्यंत पोहोचताना असलेला वेग
उत्तर : दिलेले : s = h = 125 m, a = g = 10 m/s, u = 0m/s, t = ?, v = ?
(a) जमिनीपर्यंत पोहोचण्यासाठी लागलेला कालावधी. = 5 सेकंद
(b) जमिनीपर्यंत पोहोचताना असलेला वेग = 10 m/s
(ii) वर्णनावरून मूलद्रव्याचे नाव व संज्ञा लिहा :
(a) सर्वाधिक विद्युतऋण अणु
उत्तर : फ़्ल्युओरिन - F
(b) सर्वात कमी अणुवस्तुमानाचा अणु
उत्तर : हायड्रोजन - H
(c) सर्वात कमी अणुत्रिज्या असलेला राजवायू
उत्तर : हेलिअम - He
(iii) (a) तांब्याची संहत नायट्रिक आम्लाबरोबर अभिक्रिया केली असता. मुक्त होणारा वायू कोणता ? त्याचा रंग सांगा.
उत्तर : मुक्त होणारा वायू हायड्रोजन आहे. तो रंगहीन आहे.
(b) अभिक्रियेचे संतुलित रासायनिक समीकरण लिहा.
उत्तर :
(c) अभिक्रियाकारके व उत्पादिते यांची रासायनिक नावे लिहा.
उत्तर :
अभिक्रीयाकारके : तांबे, संहत नायट्रिक आम्ल उत्पादिते : कॉपर नायट्रेट, नायट्रोजन डाय ओक्साइड
(vi) आकृत्यांना नावे देऊन संकल्पना स्पष्ट करा :
उत्तर :
अ.) फ्लेमिंगचा उजव्या हाताचा नियम : आपल्या उजव्या हाताचा अंगठा, तर्जनी आणि मधले बोट एकमेकांस लंब राहतील अशी ताणा जर तर्जनी चुंबकीय क्षेत्राच्या दिशेत आणि अंगठा विदयुत वाहकाच्या गतीच्या दिशेत असेल, तर मधले बोट प्रवर्तित विदयुतधारेची दिशा दर्शवते.
ब )
फ्लेमिंगचा डाव्या हाताचा नियम : आपल्या डाव्या हाताची तर्जनी, मधले बोट आणि अंगठा एकमेकांना लंब राहतील अशी ताठ धरल्यास, जर तर्जनी चुंबकीय क्षेत्राच्या दिशेत असेल आणि मधले बोट विदयुतधारेच्या दिशेत असेल, तर अंगठ्याची दिशा ही विदयुतवाहकावरील बलाची दिशादर्शक असते.
(v) इंद्रधनुष्यनिर्मिती या नैसर्गिक सुंदर घटनेसंबंधी खालील प्रश्नांची उत्तरे द्या :
(a) इंद्रधनुष्यनिर्मितीची शास्त्रीयदृष्ट्या अचूक व नामनिर्देशित आकृती काढा.
उत्तर :
(b) यात अंतर्भाव असणाऱ्या कोणत्याही दोन नैसर्गिक घटना सांगा.
उत्तर :
अपवर्तन, अपस्करण, आंतरिक परावर्तन
(c) पाण्याचे अगदी लहान थेंब कशाप्रमाणे कार्य करतात.
उत्तर :
प्रिझम / लोलकाप्रमाणे कार्य करतात.
(vi) नावे लिहा :
(a) सुरीने सहज कापता येतील असे दोन धातू.
उत्तर : Na, K
(b) काही धातूवर आघात केला की त्यांच्यापासून ध्वनी निर्माण होतो. त्या गुणधर्माचे नाव.
उत्तर : नादमयता.
(c) विद्युतधारेचा सुवाहक असणारा अधातुयुक्त पदार्थ.
उत्तर : ग्रॅफाइट
(vii) खालील आकृतीचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा :
(a) वरील आकृतीवरून कोणत्या प्रक्रियेचा बोध होतो
उत्तर : विद्युत विलेपन
(b) ही प्रक्रिया कशी घडते ?
उत्तर : पद्धतीमध्ये विद्युत अपघटनाद्वारे कमी अभिक्रियाशील धातूचा जास्त अभिक्रियाशील धातू वर थर देण्यात येतो.
(c) या प्रक्रियेचा वापर करून बनविलेल्या दोन वस्तू
उत्तर : चांदी विलेपित चमचे, सोने विलेपित दागिने
(viii) खालील सारणी पूर्ण करा :
उत्तर :
4. कोणत्याही एका उपप्रश्नाचे उत्तर लिहा :
(i) (a) मानवी डोळ्याची शास्त्रीयदृष्ट्या अचूक व नामनिर्देशित आकृती काढा.
उत्तर :
(b) निरोगी मानवी डोळ्यासाठी सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर किती आहे ?
उत्तर : 25 cm
(c) नाभीय अंतर आवश्यकतेनुसार बदल करण्याच्या नेत्रभिंगाच्या क्षमतेला काय म्हणतात ?
उत्तर : समायोजन शक्ती
(d) कोणत्या दृष्टिदोषांमध्ये वयानुरूप भिंगाची नाभीय अंतर बदलण्याची क्षमता कमी होते ?
उत्तर : वृध्दृष्टीता
(ii) क्लोरीन या मूलद्रव्याचा अणुअंक 17 आहे. तर यावरून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा :
(a) क्लोरीनचे इलेक्ट्रॉन संरूपण लिहा.
उत्तर : 2,8,7
(b) क्लोरीन अणुच्या संयुजा कवचातील इलेक्ट्रॉन संख्या सांगा.
उत्तर : 7
(c) क्लोरीनचे रेणूसूत्र सांगा.
उत्तर : CI2
(d) क्लोरीनचा रेणू निर्माण होताना कोणत्या प्रकारचा बंध निर्माण होतो ?
उत्तर : एकेरी सहसंयुज बंध
(e) क्लोरीन रेणूची इलेक्ट्रॉन ठिपका संरचना (वर्तुळविरहित) रेखाटन करा.
उत्तर : Cl:CI
COMMENTS