विज्ञान भाग : II : बोर्डाची कृतिपत्रिका (मार्च 2024) ( आदर्श उत्तरे ) [ एकूण गुण 40 , वेळ : 2.00 तास ] प्र. 1. (अ) दिलेल्या ...
विज्ञान भाग : II : बोर्डाची कृतिपत्रिका (मार्च 2024)
(आदर्श उत्तरे ) [ एकूण गुण 40 , वेळ : 2.00 तास ]
प्र. 1. (अ) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यायाचा क्रमांक लिहा :
- (i) पुनर्जनन पद्धती ------------ या प्राण्यात आढळते.
(अ) अमिबा (ब) पॅरामेशिअम
(क) युग्लीना (ड) प्लॅनेरिया
उत्तर : पुनर्जनन पद्धती प्लॅनेरिया या प्राण्यात आढळते.
(ii) लॅक्टोबॅसिलस ब्रुईस या सूक्ष्मजीवांच्या मदतीने ------------ हे पेय तयार केले जाते.
(अ) कोको (ब) कॉफी (क) वाइन (ड) सिडार
उत्तर : लॅक्टोबॅसिलस ब्रुईस या सूक्ष्मजीवांच्या मदतीने कॉफी हे पेय तयार केले जाते.
(iii) जनुकातील एखादे न्युक्लिओटाइड अचानक आपली जागा बदलते, यामुळे जो लहानसा बदल घडून येतो, त्या बदलाला ------------- असे म्हणतात.
(अ) प्रतिलेखन (क) उत्परिवर्तन
(ब) स्थानांतरण (ड) भाषांतरण
उत्तर : जनुकातील एखादे न्युक्लिओटाइड अचानक आपली जागा बदलते, यामुळे जो लहानसा बदल घडून येतो, त्या बदलाला उत्परिवर्तन असे म्हणतात.
(iv) महाराष्ट्रात -------------- हे प्रमुख अणू ऊर्जानिर्मिती केंद्र आहे.
(अ) चंद्रपूर (ब) कोयना (क) तारापूर (ड) अंजनवेल
उत्तर : महाराष्ट्रात तारापूर हे प्रमुख अणू ऊर्जानिर्मिती केंद्र आहे.
(v) संधिपाद संघाचे उदाहरण --------- हे आहे.
(अ) विंचू (ब) तारामासा (क) गांडूळ (ड) हायड्रा
उत्तर : संधिपाद संघाचे उदाहरण विंचू हे आहे.
प्र. 1. (ब) पुढील प्रश्न सोडवा :
- ( i) गटातील वेगळा शब्द ओळखा :
डकबिल प्लॅटिपस, पापलेट, लंगफिश, पेरीपॅटस.
उत्तर : पापलेट
(ii) सहसंबंध लिहा :
त्वचा : मेलॅनिन :: स्वादुपिंड : ---------
उत्तर : त्वचा : मेलॅनिन :: स्वादुपिंड : इन्सुलिन /ट्रीप्सीन.
(iii) पुढील विधान सत्य किंवा असत्य ते लिहा :
पाण्याचा वापर करून उपयोगी जीवांची निर्मिती करणे म्हणजे नीलक्रांती होय.
उत्तर : सत्य
(iv) W.H.0. या संक्षिप्त रूपाचे विस्तारित नाव लिहा.
उत्तर : World Health Organization - वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (जागतिक आरोग्य संघटना)
(v) योग्य जोडी जुळवा :
' अ ' गट ' ब ' गट
पुरुष (अ) 44+XX
(ब ) 44+XY
(क ) 44+YY
उत्तर : पुरुष - 44+XY
प्र. 2. (अ) शास्त्रीय कारणे लिहा (कोणतीही दोन)
- (i) कासव जमिनीवर आणि पाण्यातही राहते, तरीही त्याचा उभयचर या वर्गामध्ये समावेश करता येत नाही.
उत्तर : (I) उभयचर प्राणी जमिनीवर फुप्फुसांच्या साहाय्याने आणि पाण्यात त्वचेच्या साहाय्याने श्वसन करतात. तसेच या प्राण्यांच्या अंगावर बाहयकंकाल नसते.
(II) कासव सरीसृप असते. ते जमिनीवर राहते त्या वेळी फुप्फुसाने श्वसन करते व ते पाण्यात पोहते तेव्हाही प्रत्येक श्वासाला नाक पाण्याबाहेर काढून प्रवासोच्छ्वास करते.
(III) या दोन्ही अधिवासांत त्याला फुप्फुसानेव श्वसन करता येते.
(IV तसेच कासवाच्या अंगावर बाहयकंकालही असते.
म्हणून उभयवर या वर्गामध्ये कासवाचा समावेश करता येत नाही.
(ii) जलविद्युत ऊर्जा, सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा यांना नूतनीकरणक्षम ऊर्जा म्हणतात.
उत्तर :
(1) जलविद्युत ऊर्जा, सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा या अनुक्रमे वाहते पाणी, सूर्यप्रकाश आणि वारा यांच्या मदतीने तयार केल्या जातात.
(2) हे ऊर्जास्रोत, म्हणजेच जलसाठा, वेगात वाहणारा वारा, सूर्यप्रकाश शाश्वत आहेत म्हणजेच कधीही न संपणारे आहेत. या ऊर्जा परत मिळवता येतात.
म्हणून त्यांना नूतनीकरणक्षम ऊर्जा म्हणतात.
(iii) व्यायाम केल्यानंतर आपल्याला थकल्यासारखे वाटते.
उत्तर :
(1) आपण जास्त व्यायाम करतो तेव्हा आपल्याला ऑक्सिजनची कमतरता भासते. अशा वेळी आपले स्नायू व मांसपेशी विनोक्सिश्वसन करतात.
(2) विनॉक्सिश्वसन प्रक्रियेत लेक्टिक आग्ल तयार होते. तसेच ATP चे रेणूदेखील खूपच कमी प्रमाणात तयार होतात. त्यामुळे आपल्या शरीरात कमी ऊर्जा तयार होऊन लॅक्टिक आम्ल साठते.
म्हणून आपल्याला थकल्यासारखे वाटते.
प्र. 2. (ब) पुढील प्रश्न सोडवा (कोणतेही तीन)
- (i) किरणोत्सारी प्रदूषणाचे मानवी शरीरावर होणारे कोणतेही चार दुष्परिणाम लिहा.
उत्तर :
किरणोत्सारी प्रदूषणाचे मानवी शरीरावर होणारे दुष्परिणाम पुढीलप्रमाणे आहेत:
(1) क्ष-किरणांच्या (X-ray) उच्च प्रारणांमुळे कॅन्सरकारी अल्सर निर्माण होतात.
(2) प्रारणांच्या परिणामामुळे शरीरातील ऊर्तीचा नाश होतो.
(3) प्रारणांमुळे जनुकीय बदल घडून येतात.
(4) दृष्टीवर हानिकारक परिणाम होतात.
(ii) पुढील तक्ता पूर्ण करा:
उत्तर :
(iii) आपत्तीच्या व्याप्तीचा विचार करता, विचारात घ्याव्या लागणाऱ्या चार महत्त्वाच्या बाबी लिहा.
उत्तर :
आपत्तीच्या व्याप्तीचा विचार करता, विचारात घ्याव्या लागणाऱ्या महत्त्वाच्या बाबी पुढीलप्रमाणे आहेत (1)आपत्तीपूर्वीचा काळ (2) इशारा काळ (3) आणीबाणीचा काळ (4) पुनर्वसनाचाकाळ (5) प्रतिशोधनाचा काळ (6) पुनर्निर्माणाचा काळ.
(iv) का सूक्ष्मजैविक गरजेचे आहे प्रक्रियेद्वारा ते सांगा. मिळवण्यात येणाऱ्या दोन इंधनांची नावे लिहा व या इंधनांचा वापर वाढवणे का गरजेचे आहे ते सांगा.
उत्तर :
(1) सूक्ष्मजैविक प्रक्रियांनी मिथेन, इशॅनॉल, हायड्रोजन वायू ही इंधने मिळवता येतात.(2) सूक्ष्मजैविक प्रक्रियांनी मिळवलेल्या इंधनांचा वापर वाढवणे गरजेचे आहे; कारण --
(अ) ही इंधने स्वच्छ (घूररहित) आहेत, त्यामुळे यांचा वापर केल्यास कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होणार नाही.
(ब) भविष्यकाळात पर्यावरणपूरक इंधने वापरण्याला पर्याय नाही.
(क) ही इंधने सहज व मुबलक प्रमाणात उपलब्ध होतात.
(v) डी.एन.ए.फिंगरप्रिंटिंग म्हणजे काय? या तंत्राचा वापर प्रामुख्याने कोणत्या क्षेत्रात केला जातो?
उत्तर :
(1) जसे प्रत्येक व्यक्तीच्या हाताचे ठसे निरनिराळे आणि ठरावीकच असतात, त्याचप्रमाणेप्रत्येकाच्या डी.एन.ए. रेणूतील न्युक्लिओटाइडची क्रमवार रचना ठरावीकच असते. या रचनेमुळे कोणत्याही व्यक्तीची नेमकी ओळख पटवता येते. या तंत्राला डी.एन.एफिंगरप्रिंटिंग असे म्हणतात.
(2) या तंत्राचा मुख्य वापर गुन्हेनिदान शास्त्रामध्ये गुन्हेगाराची ओळख पटवण्यासाठी केला जातो.
(3) तसेच बालकाच्या अचूक पालकांची ओळख पटवण्यासाठी आई, वडील व बालक या तिघांच्याही डी.एन.ए.च्या नमुन्यांची तपासणी करण्यात येते.
प्र. 3. पुढील प्रश्न सोडवा: (कोणतेही पाच)
- (i) (अ) जीवनसत्त्वे म्हणजे काय ?
उत्तर : जीवनसत्त्वे ही वैविध्यपूर्ण रासायनिक पदार्थांचा गट आहेत. यांची आहारात आवश्यकता असते. शरीरातील निरनिराळी कार्ये यांच्यामुळे सुरळीत पार पाडली जातात.
(ब) विद्राव्यतेच्या आधारे त्यांचे वर्गीकरण करा.
उत्तर :
(1) पाण्यात विरघळणारी जीवनसत्त्वे.
(2) मेदामध्ये (स्निग्धाम्लात) विद्राव्य असणारी जीवनसत्त्वे
(क) वरील वर्गीकरणानुसार प्रत्येकाचे एक-एक उदाहरण लिहा.
उत्तर :
पाण्यात विरघळणारी जीवनसत्त्वे: B व C ही जीवनसत्त्वे.
मेदामध्ये विद्राव्य जीवनसत्त्वे: A, D E व K ही जीवनसत्त्वे.
(ii) व्याख्या लिहा :
(अ) मूलपेशी :
उत्तर :
(1) मूलपेशी या अविभेदित, प्राथमिक स्वरूपाच्या, स्वतःची पुनरावृत्ती करण्याची क्षमताआणि बहुविधता असलेल्या पालकपेशी असतात. या बहुपेशीय सजीवांत आढळतात.
(2) स्रोताच्या आधारावर मूलपेशीच भ्रूणीय मूलपेशी आणि वयस्क मूलपेशी हे दोनप्रमुख प्रकार आहेत.
(ब) क्लोनिंग
उत्तर :
(1) एखादी पेशी किंवा अवयव किंवा संपूर्ण शरीरावी हुबेहूब प्रतिकृती तयार करणेम्हणजे क्लोनिंग होय.
(2) क्लोलिंगवे दोन प्रकार आहेत : (1) प्रजननात्मक क्लोनिंग आणि (ii) उपचारात्मक क्लोनिंग.
(क) जनुकीयदृष्ट्या उन्नत पिके.
उत्तर :
(1) पिकांच्या प्रजातीत नसलेल्या अशा बाहेरच्या जनुकाला एखादया पिकाच्या जनुकीयसाच्यात टाकून मिळवण्यात आलेल्या इच्छित गुणधर्माच्या पिकांना जनुकीयदृष्ट्याउन्नत पिके असे म्हणतात.
(2) उदाहरणे: बीटी कापूस, बीटी चांगे, गोल्डन राईस
iii) दिलेल्या उताऱ्यातील गाळलेल्या जागा योग्य पर्याय निवडून पूर्ण करा
(ऑक्सिजन, पिरिडिन्स, यांत्रिक, CO, पेट्रोलिअम, घातक, पॉलिस्टर, नॉर्कार्डिया)
समुद्रात विविध कारणांनी -------------तेलाची गळती होते. हे तेल जलचरांसाठी ------------------विषारी ठरू शकते. पाण्यावर आलेला तेलाचा तवंग -----------------------पद्धतीने दूर करणे सोपे नाही. पण अल्कॅनिव्होरॅक्स बॉरक्युमेन्सिस व स्युडोमोनास जीवाणूंमध्ये ----------------------- व इतर रसायने नष्ट करण्याची क्षमता आहे. त्यामुळे तेलाचे तवंग नष्ट करायला या जीवाणूंच्या समूहाचा वापर केला जातो. त्यांना HCB म्हणतात. HCB हे हायड्रोकार्बनचे अपघटन करून त्यातील कार्बनचा ----------------शी संयोग घडवून आणतात. या अभिक्रियेत -------------------- व पाणी तयार होते.
उत्तर :
समुद्रात विविध कारणांनी पेट्रोलिअम तेलाची गळती होते. हे तेल जलचरांसाठी घातक विषारी ठरू शकते. पाण्यावर आलेला तेलाचा तवंग यांत्रिक पद्धतीने दूर करणे सोपे नाही. पण अल्कॅनिव्होरॅक्स बॉरक्युमेन्सिस व स्युडोमोनास जीवाणूंमध्ये पिरिडिन्स व इतर रसायने नष्ट करण्याची क्षमता आहे. त्यामुळे तेलाचे तवंग नष्ट करायला या जीवाणूंच्या समूहाचा वापर केला जातो. त्यांना HCB म्हणतात. HCB हे हायड्रोकार्बनचे अपघटन करून त्यातील कार्बनचा ऑक्सिजन शी संयोग घडवून आणतात. या अभिक्रियेत CO2 व पाणी तयार होते
(iv) दिलेल्या आकृतीचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा :
प्रश्न :
अ) दिलेली आकृती कशाची आहे, ते ओळखा.
उत्तर : दिलेली आकृती पवनचक्कीच्या आराखड्याची आहे.
(ब) या प्रकल्पात ऊर्जेचा स्रोत कोणता ?
उत्तर : पवन ऊर्जा / वाऱ्याची गतिज ऊर्जा हा या प्रकल्पात ऊर्जेचा स्रोत आहे.
(क) या स्रोतास 'पर्यावरणस्नेही स्रोत' का म्हणतात ?
उत्तर : या स्रोतास पर्यावरणस्नेही स्रोत' म्हणतात. कारण यात कोणत्याही प्रकारच्याइंधनाचे ज्वलन होत नाही. त्यामुळे प्रदूषण होत नाही. ही ऊर्जा हरित ऊर्जा असून,कधीही न संपणारी अशी विपुल आहे.
v) पुढील तक्ता पूर्ण करा:
उत्तर :
(vi) प्रथमोपचार पेटीसाठी आवश्यक असणाऱ्या कोणत्याही सहा साहित्यांची नावे लिहा.
उत्तर :
प्रथमोपचार पेटीसाठी आवश्यक असणारे साहित्य: (1) निरनिराळ्या आकाराच्या बँडेज पट्टया (2) जखमेवर बांधण्यासाठी जाळीची पट्टी(3) औषधोपचारासाठी वापरला जाणारा कापूस (4) रबराचे हातमोजे (5) स्वच्छ व कोरडे कापडाचे तुकडे (6) साबण (7) अँटिसेप्टिक (डेटॉल किंवा सॅव्हलॉन) (8) सेफ्टी पिना (9)ब्लेड (10) सुई (11) बैंड-एड (पट्टया) (12) कात्री (13) शर्मामीटर (ज्वरमापी) (14) पेट्रोलिअम जेली.
(vii) (अ) अवशेषांगे म्हणजे काय ?
उत्तर :
अवशेषांगे हे सजीवांच्या शरीरातील अवयव व्हास पावलेल्या किंवा अपूर्ण वाढ झालेल्या अवस्थेत असून ते निरुपयोगी असतात.
(ब) मानवी शरीरातील कोणत्याही दोन अवशेषांगांची नावे लिहा.
उत्तर :
मानवी शरीरातील अवशेषांगांची नावे : आंत्रपुच्छ, माकडहाड, कानांचे स्नायू, अक्कलदाढा, अंगावरील केस.
(क) तीच अवशेषांगे इतर कोणत्याही प्राण्यांसाठी कशी उपयुक्त आहेत ते लिहा.
उत्तर :
आंत्रपुच्छ हे मानवासाठी अवशेषांग आहे. पण रवंथ करणाऱ्या प्राण्यांसाठी ते आवश्यक व कार्यक्षम अवयव आहे. मानवाला अवशेषांगांच्या स्वरूपातील निरुपयोगी असणारे कानांचे स्नायू माकडांमध्ये व गायी-म्हशींमध्ये मात्र कान हलवण्याकरिता उपयुक्त आहेत.
(viii) पुढील विधाने वाचून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा :
(अ) माझ्या त्वचेवर कॅल्शिअम कार्बोनेटचे काटे आहेत. मी प्रचलनासाठी व अन्न पकडण्यासाठी नलिकापादांचा उपयोग करतो. माझा प्राणीसंघ ओळखा व एक उदाहरण लिहा.
उत्तर :
प्राणीसंघ - कंटकचर्मी
उदाहरणे - सी अर्विन, तारामासा,ब्रिटलस्टार, सी-ककुंबर इत्यादी.
(ब) मी तुमच्या लहान आतड्यात राहतो. माझ्या धाग्यासारख्या शरीरामध्ये आभासी देहगुहा आहे. माझा समावेश कोणत्या संघात होतो ते सांगून एक उदाहरण लिहा.
उत्तर :
प्राणीसंघ - गोल कृमी.
उदाहरणे - पोटातील जंत, हत्तीपाय रोगाचा जंत, डोळ्यातील जंत इत्यादी.
(क) माझे शरीर दोन्ही टोकांना निमुळते आहे. मी कल्ल्यांद्वारे श्वसन करतो. माझा वर्ग ओळखून एक उदाहरण लिहा.
उत्तर :
वर्ग - मत्स्य प्राणीवर्ग
उदाहरणे - रोह, पापलेट, समुद्रघोडा, शार्क, इलेक्ट्रिक रे, स्टिंग रे इत्यादी
प्र. 4. पुढील प्रश्न सोडवा: (कोणताही एक)
- (i) पुरुष प्रजनन संस्थेवर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा:
(अ) पुरुषांमध्ये कोणत्या अवयवात शुक्राणूंची निर्मिती होते ?
उत्तर : पुरुषांमध्ये शुक्राणूंची निर्मिती वृषणामध्ये होते.
(आ) एका शुक्राणूची लांबी किती असते ?
उत्तर : एका शुक्राणूची लांबी 60 मायक्रोमीटर एवढी असते.
(इ) शुक्रवाहिनीचे कार्य लिहा.
उत्तर : शुक्रवाहिनीतून शुक्रपेशींचे वहन होते.
(ई) शुक्रपेशी कोणत्या पेशीविभाजन पद्धतीद्वारे तयार होतात ?
उत्तर : शुक्रपेशी अर्धसूत्री पेशीविभाजन पद्धतीद्वारे तयार होतात.
(ड) पुरुष प्रजनन संस्थेतील जोडी नसणाऱ्या कोणत्याही दोन अवयवांची नावे लिहा.
उत्तर : पुरुष प्रजनन संस्थेत जोडी नसणारे अवयव :
मूत्र-जननवाहिनी, पुरस्थग्रंथी,वृषण कोष व शिश्न.
(ii) पर्यावरण संवर्धन आणि जैवविविधतेवर आधारित पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा :
(अ) तक्ता पूर्ण करा :
उत्तर :
(ब) जैवविविधतेचे संवर्धन कसे करता येईल? कोणतेही चार मुद्दे लिहा.
उत्तर :
पुढील उपायांनी जैवविविधतेचे संवर्धन करता येईल
(1) दुर्मीळ जातींच्या सजीवांचे संरक्षण करणे.
(2) राष्ट्रीय उद्याने व अभयारण्ये यांची निर्मिती करणे.
(3) काही क्षेत्र राखीव जैवविभाग म्हणून घोषित करणे,
(4) विशिष्ट प्रजातींच्या संवर्धनासाठी खास प्रकल्प सुरू करणे
(5) प्राणी व वनस्पतींचे संवर्धन करणे.
(6) पर्यावरणविषयक कायदयांचे पालन करणे.
(7) पारंपरिक ज्ञानाची नोंद करून ठेवणे,
(क) तक्ता पूर्ण करा :
धोक्यात आलेल्या वन्यजीव प्रजातींची यादी (रेड लिस्ट) च्या पृष्ठाचे रंग.
उत्तर :
COMMENTS