--> बोर्डाची मार्च 2024 ची प्रश्नपत्रिका | 2024 मराठी कुमारभारती प्रश्नपत्रिका उत्तरांसह | marathi study

बोर्डाची मार्च 2024 ची प्रश्नपत्रिका | 2024 मराठी कुमारभारती प्रश्नपत्रिका उत्तरांसह

दहावी मराठी कुमारभारती प्रश्नपत्रिका 2024 डाउनलोड,SSC मराठी प्रश्नपत्रिका मार्च 2024 PDF, दहावी मराठी बोर्ड परीक्षा प्रश्नपत्रिका 2024,प्रश्नपत्रिका

इयत्ता दहावी  मराठी कुमारभारती

इयत्ता दहावी बोर्डाची परीक्षा म्हणजे जीवनाला दिशा देणारी महत्त्वाची परीक्षा! यासाठी विदयार्थी विविध प्रकारे तयारी करून यशाची नवी उंची गाठण्याचा प्रयत्न नक्कीच करतात. अशा या बोर्डाच्या परीक्षेची परीक्षापूर्व उजळणी हा लेख उपयुक्त,  मार्च २०२४ कृतिपत्रिका !

बोर्डाच्या 2025 च्या परीक्षेसाठी नमुना उत्तर लेखनासाठी विद्यार्थ्यांना खूपच उपयुक्त ठरेल.

यात 'मराठी (कुमारभारती)' या विषयाची Mar-24 मध्ये घेण्यात आलेल्या बोर्ड परीक्षेची कृतीपात्रिका PdF प्रथम देण्यात आली आहे बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेचा/कृतिपत्रिकेचा आराखडा / कृतिपत्रिकेचे स्वरूप स्पष्टपणे लक्षात येईल.

विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनासाठी बोर्डाची मार्च 2024 ची प्रश्नपत्रिका / कृतिपत्रिका संपूर्ण विकल्प प्रश्नांच्या उत्तरांसह सोडवून देण्यात आली आहे. 

    ही प्रश्नपत्रिका/कृतिपत्रिका व त्यांची उत्तरे देताना, संबंधित प्रश्नप्रकारांत कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि त्यांची उत्तरे कशी लिहावीत, याची समज विद्यार्थ्यांना आपोआपच येईल. 

मराठी कुमारभारती बोर्डाची कृतिपत्रिका (मार्च 2024)

⇊    ⇊

इयत्ता दहावी  मराठी कुमारभारती 
 बोर्डाच्या कृतिपत्रिकेची उत्तरे (मार्च 2024)

पठित गद्य 

प्रश्न : 1 ( अ ) उताऱ्या च्या आधारे सूचनांनुसार कृती :

  1.    (i) म्हातारीच्या जगण्याचा एकमेव आधार -  शहरगावी राहणाऱ्या गुलाची पत्रं.
       (ii) आपल्या तरुण गुलाला 'माणसं' दाखवणारा  -  प्रौढ, समंजस पोस्टमन,
  2.       वाट पाहण्याशी निगडित असलेल्या भावना    
                                                ↓
         ————————————————————
       ↓                  ↓                ↓                 ↓                     ↓
    दुःख           तडफड      भीती          काळजी         अस्वस्थता 
  3.  स्वमत:
            'वाट पाहणं' हि गोष्ट एरवी सुखाची थोडीच असते ! या उदगाराविषयी तुमचे मत सविस्तर लिहा.: 
    ( नमुना स्वमत )
         'वाट पाहताना' या पाठात लेखिकेने जीवनाचा एक सुखमंत्रच सांगितला आहे. वाट पाहणे हा तो मंत्र होय. कोणत्याही गोष्टीसाठी वाट पाहायला शिकले पाहिजे, असे लेखिकेचे सांगणे आहे. वाट पाहणे हे तसे कधीच सुखाचे नसते.
        एखादी गोष्ट वाट न पाहता, चटकन मिळाली, तर ती गोष्ट आपली जिवाभावाची आहे की वरवरची आहे, हे कळायला मार्ग राहत नाही. इच्छा तत्काळ पूर्ण झाल्यास आपल्याला आनंद मिळेल, हे खरे आहे. पण आपण कदाचित वरवरच्या गोष्टींमध्ये बुडून जाण्याची शक्यता असते. अधिकाधिक वाट पाहिल्यामुळे आपली खरी ओळ कुठे आहे, हे कळते. म्हणजेच आपल्याला खरोखर काय हवे आहे, नेमकी कशाची गरज आहे, हे कळून चुकते. जे आपल्या दृष्टीने मोलाचे आहे, ते शोधण्याची दृष्टी या वाट पाहण्यातून मिळते. आपल्या दृष्टीने मोलाच्या असलेल्या गोष्टी मिळाल्या तर आपले जीवन समृद्ध होते. समृद्ध जीवन जगणे हेच तर प्रत्येक माणसाचे ध्येय असते. म्हणून वाट पाहणे त्रासाचे असले, तरी अनेक गोष्टींचे गोल ओळखण्यासाठी ते उपयोगी ठरते, हे खरे आहे.
प्रश्न : 1 ( आ ) उताऱ्या च्या आधारे सूचनांनुसार कृती :
  1.   कृती :
              सोनालीच्या झोपेची वैशिष्ट्ये    
                                 ↓
           i) थोपटून झोपवावे लागे
           ii) लहान मुलासारखे अस्ताव्यस्त झोपणे 
           iii) झोपेत लोळणे 
  2.    कोण ते लिहा :
        (i)सोनालीवर ताईगिरी करणारी - रुपाली .
       (ii) झोपायची वेळ झाली की उडी मारून बिछान्यात शिरणारी - सोनाली
  3. स्वमत:
            सोनाली व दिपाली यांच्यातील जिव्हाळा व्यक्त करणारा प्रसंग तुमच्या शब्दात लिहा.: 
    ( नमुना स्वमत )
         एकदा दीपाली सोनालीबरोबर खेळत बसली होती. तेवढ्यात एक पेशन्ट तिथे आला. त्याला ते दृश्य पाहून धक्काच बसला. दीपाली चुकून सिंहिणीकडे गेली असावी, या कल्पनेने तो धावला आणि त्याने दीपालीला चटकन उचलून घेतले. सोनालीला संताप आला. ती त्याच्यावर फिसकारली आणि चवताळून त्याच्यावर धावली.  तिचा तो अवतार पाहून त्याने दीपालीला तशीच टाकली. तेवढ्यात अण्णा बाहेर आले. त्यांना घडलेली हकिकत समजली. तो प्रसंग प्रत्यक्ष पाहण्यासाठी अण्णांनी त्या गृहस्थाला दीपालीला उचलायला सांगितले. त्या गृहस्थाने दीपालीला हात लावला, मात्र सोनाली चवताळून त्याच्या अंगावर धावली. लेखकाचे घर हे आता तिला स्वतःचे घर वाटत होते. घरातली माणसे ही आता तिची माणसे झाली होती. परक्या माणसांनी घरातल्या माणसांना हातसुद्धा लावणे तिला मंजूर नव्हते. सोनालीच्या मनातली प्रेमावी ही उत्कट भावना या प्रसंगातून व्यक्त होते.

अपठित गद्य 

प्रश्न : 1 ( इ ) उताऱ्या च्या आधारे सूचनांनुसार कृती :
  1.   कृती :
             आईजवळ क्षणभर मिळणाऱ्या गोष्टी    
                             ↓
             
i) फुलाची कोमलता 
            ii) गंगेची निर्मलता 
             iii) चंदनाची रमणीयता 
             iv) सागराची अनंतता 
            v) पृथ्वीची क्षमता 
            vi) पाण्याची रसता 

       2.    कधी ते लिहा :
                
(i)आई कावरीबावरी होते  - मुलांचे काही दुखले-खुपले की.
                 ii) आई थकणार नाही  - मुलांची सेवाचाकरी करताना.

दहावी मराठी कुमारभारती प्रश्नपत्रिका 2024 डाउनलोड,SSC मराठी प्रश्नपत्रिका मार्च 2024 PDF, दहावी मराठी बोर्ड परीक्षा प्रश्नपत्रिका 2024, 2024 मराठी कुमारभारती प्रश्नपत्रिका उत्तरांसह, दहावी मराठी प्रश्नपत्रिका नमुना 2024. महाराष्ट्र बोर्ड मराठी प्रश्नपत्रिका 2024, दहावी मराठी प्रश्नपत्रिका PDF डाउनलोड 2024, मराठी कुमारभारती प्रश्नपत्रिका 2024 उत्तरतालिका, दहावी मराठी प्रश्नपत्रिका 2024 सराव, SSC मराठी प्रश्नपत्रिका 2024 PDF फाईल

विभाग 2 :  पद्य 

प्रश्न : 2 ( अ ) कवितेच्या आधारे सूचनांनुसार कृती :

  1.    चौकटी पूर्ण करा .. 
       (i) डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी नाकारलेले गोष्ट  :    मळवाटेने जाणे .
       (ii) डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी स्वागत करणारे   :    खाचखळगे 
  2. आकृतिबंध पूर्ण करा.      
       डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले कार्य    
                                 ↓
                 
    i) परिस्थितीवर मात करून नवा इतिहास घडवला. 
                ii) मूक समाजाचे नेतृत्व केले.
                 iii) बहिष्कृत भारत जागा केला.
                 iv) चवदार तळ्याचा संग्राम केला.
                
  3.  पुढील काव्यपंक्तींचा सरळ अर्थ तुमच्या शब्दात लिहा.:
            'तु झालास परिस्थितीवर स्वार 
             आणि घडविलास नवा इतिहास'
      
         डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रस्थापित वर्णव्यवस्थेविरुद्ध महाड येथे चवदार तळयाचा संग्राम करून शोषितांवरील अन्यायाला वाचा फोडली. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून वर्णव्यवस्थेने ग्रासलेल्या समाजाला जागृत केले. त्यांना नवविचारांची प्रेरणा-देऊन नवीन इतिहास घडवला.

  4. काव्यसौदर्य :
        ' आज पन्नास वर्षांनी अनुभवतोय 
          सूर्यफुले तुझा ध्यास घेतायत
          बिगूल प्रतीक्षा करतोय 
           चवदार तळ्याचं पाणी, तेही आता थंड झालंय.'
                       या ओळींतील विचारसौदर्य स्पष्ट करा..

         'तू झालास मूक समाजावा नायक' या कवितेत कवी ज. वि. पवार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी वंचितांच्या उ‌द्धारासाठी पुकारलेल्या 'चवदार तळ्याच्या संग्रामा'स पन्नास वर्षे उलटून गेल्याच्या पार्श्वभूमीवर आताच्या परिस्थितीचे वर्णन केले आहे.
        'चवदार तळ्याचा लढा थंड झाल्याची खंत व्यक्त करताना सुख-समृद्धीचे प्रतीक असणाऱ्या सूर्यफुलांनी भूतकाळात पाठ फिरवली होती. ती सूर्यफुले आजही डॉ. आंबेडकर नावाच्या महामानवाचा ध्यास घेत आहेत. परिस्थितीत बदल न झाल्यामुळे संघर्षाला प्रवृत्त करणारा बिगूल  त्यांची वाट बघत आहे. संघर्ष मावळला असला, तरी चवदार तळयाचे पाणी पुन्हा पेटण्यासाठी आसुसलेले आहे.
          डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांमध्ये जागृत केलेले आत्मभान, तसेच आताच्या विदारक परिस्थितीशी झुंजताना त्यांच्या कार्याचा आदर्शवादी विचार या ओळींत मांडला आहे.
प्रश्न : 2 ( आ ) पुढील मुद्द्यांच्या आधारे खालीलपैकी कोणत्याही एका कवितेसंबंधी दिलेल्या कृती सोडवा :

मद्दे 'भरतवाक्य' किंवा 'आश्वासक चित्र '
(i) प्रस्तुत कवितेचे कवी / कवयित्री - ---------- ---------
(ii) प्रस्तुत कवितेचा विषय - --------- ---------
(iii) प्रस्तुत कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे - --------- ---------

  •      भरतवाक्य :
    (i) कवी    -   मोरोपंत
    (ii) कवितेचा विषय  -   सत्कर्मात व सज्जनांच्या सहवासात राहण्याची शिकवण.
    (iii) कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे -
    ही कविता मला आवडते. कारण लहानपणापासून मी ती ऐकत आलो आहे. लहानपणी ती पाठही केली होती. आता मोठा झाल्यावर कवितेचा अर्थ कळला आहे. कवितेत चांगले वागण्याचा सल्ला दिला आहे. पण चांगले म्हणजे काय, हे सोप्या पद्धतीने सांगितले आहे. सज्जन माणूस जसे वागतो, बोलतो, विचार करतो, तसे म्हणजे चांगले, इतकी सोपी कल्पना वापरून आपले म्हणणे सांगितले आहे. पण या कवितेतील संस्कृतप्रचुर शब्दांमुळे अर्थ कळण्यात अडचणी येतात. ही एक कवितेविषयी नावड निर्माण करणारी बाब आहे.
  • आश्वासक चित्र :
    (i) कवयित्री   -   नीरजा
    (ii) कवितेचा विषय   -    स्त्री-पुरुष समानता
    (iii) कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे  -
         ही कविता मला खूप आवडली आहे. ही आजची, आमच्या पिढीची कविता आहे.
     आमच्या मनातला भाव, आमचे विचार या कवितेतून व्यक्त होतात. आम्ही आपापसात वागतो, तेव्हा मुलगा-मुलगी असा भेदच आमच्या मनात नसतो. श्रेष्ठ-कनिष्ठ भाव न बाळगता आम्ही वावरत असतो. आमच्या मनातला हा भावच ही कविता व्यक्त करते.
प्रश्न : 2 ( इ ) पुढे दिलेल्या काव्यपंक्तीचे रसग्रहण करा  :

            'वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण ते 
            असल्यासारखे वागलो तर वस्तू 
             प्रचंड सुखावतात 
  •    आशयसौंदर्य: 'वस्तू' या कवितेत कवी द. भा. धामणस्कर यांनी निर्जीव वस्तूंनाही सजीव प्राणिमात्रांसारख्या भावना असतात, त्या संवेदनशील असतात, हे बिंबवले आहे. तसेच वस्तूंना सहानुभूतीने समजून घ्यायला हवे आणि त्यांना प्रेमाने वागवायला हवे, असे प्रतिपादन केले आहे.
          काव्यसौंदर्य : बहुतेक माणसे वस्तूंना निर्जीव समजतात आणि त्यांच्याशी निर्दयतेणे वागतात. त्यांना कसेही हाताळतात. माणसांच्या या कठोर कृत्यावर भाष्य करताना वरील ओळींत कवी म्हणतो की कदाचित वस्तूंना जीव नसेलही आणि मनही नसेल, म्हणून त्यांना आपण कठोरपणे वागवावे का? वस्तूंना मन आहे, असे समजून जर त्यांच्याशी आपण चांगले वर्तन केले तर वस्तूंना खूप आनंद होतो. त्या सुखावतात.
       आपल्या कुटुंबातील त्या घटक आहेत, अशी आपुलकी आपण दाखवली तर वस्तूही आपल्याला प्रेम व माया देतील.
        भाषिक वैशिष्ट्ये: मुक्तशैलीतल्या या रचनेमुळे कवीने या ओळींतून रसिकांशी थेट संवाद साधला आहे. अगदी साध्या पण आवाहक शब्दांत मोठे तत्त्व बिंबवले आहे. वस्तू व माणूस यांतील स्नेहबंध आत्मीयतेने जपायला हवा, हा संदेश अगदी हळुवार पद्धतीने कवीने दिला आहे.
दहावी मराठी कुमारभारती प्रश्नपत्रिका 2024 डाउनलोड,SSC मराठी प्रश्नपत्रिका मार्च 2024 PDF, दहावी मराठी बोर्ड परीक्षा प्रश्नपत्रिका 2024, 2024 मराठी कुमारभारती प्रश्नपत्रिका उत्तरांसह, दहावी मराठी प्रश्नपत्रिका नमुना 2024. महाराष्ट्र बोर्ड मराठी प्रश्नपत्रिका 2024, दहावी मराठी प्रश्नपत्रिका PDF डाउनलोड 2024, मराठी कुमारभारती प्रश्नपत्रिका 2024 उत्तरतालिका, दहावी मराठी प्रश्नपत्रिका 2024 सराव, SSC मराठी प्रश्नपत्रिका 2024 PDF फाईल

विभाग 3 : स्थूलवाचन 

प्रश्न : 3 पुढीलपैकी कोणत्याही दोन कृती सोडवा  :

  1. 'माणसे पेरा ! माणुसकी उगवेल !' या विधानाचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा.

       मातीत बीज पेरलं की, मातीच्या कष्टमय मायेतून त्याचे झाड होते. माती त्या बीजाला सगळ्या नैसर्गिक  आपत्तींपासून वाचवते. दुष्काळाशी लढते. चीजाची मायेने निगराणी करते. या सर्व प्रक्रियांतून बीजाचा वृक्ष होतो. त्याप्रमाणेच आजच्या मूल्यहीन समाजामध्ये चांगल्या संस्कारांच्या मातीत जर माणसांना पेरले, तर त्यातून मानवतेचा निकोप वृक्ष उभा राहील, अशी आशादायक भावना या विधानातून व्यक्त झाली आहे.
         नवविचारांच्या नवसमाजात माणुसकीला बहर येईल आणि मानवजात सुख्खी होईल, असा सर्जनशील आशय 'माणूस पेशा माणुसकी उगवेला' या विधानातून व्यक्त होतो.

  2. 'पती निधनानंतर आपण सैन्यात भरती व्हायचं ',स्वाती महाडिक यांच्या या निर्धारातून समाजाला काय संदेश मिळतो, ते तुमच्या शब्दांत लिहा.

         स्वाती महाडिक यांनी पतिनिधनाचे असीम दुःख झेलले. त्या दुःखात बुडून जाऊन त्या निष्क्रिय झाल्या नाहीत. आपल्या पतीचे देशाची सेवा करण्याचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करण्याचा त्यांनी निर्धार केला. एवढेच नव्हे; तर तो निर्धार त्यांनी पुरा केला. या घटनेचा समाजावर प्रभाव पडलाच. समाजाला त्यातून एक महत्त्वाचा संदेश मिळाला.
         आपल्या समाजात अजूनही पुरुषप्रधान संस्कृती आहे. पुरुषांनी सैन्यात भरती होण्याबाबत समाज अनुकूल असतो. हाच समाज स्त्रियांना सैन्यात पाठवण्यास मात्र तयार नसतो. स्त्रियांकडे शारीरिक-मानसिक बळ कमी असते, स्त्रिया सैनिकांचे काम करूच शकणार नाहीत, अशीच समाजाची धारणा असते.
      या पार्श्वभूमीवर, स्त्रिया पुरुषांइतक्याच सक्षम असून सैनिकांचे कामही करू शकतात, असा संदेश समाजाला मिळतो.

  3. व्युत्पत्ती कोशाचे कार्य लिहा.

       व्युत्पत्ती कोशाचे कार्य : व्युत्पत्ती म्हणजे एखादया शब्दाच्या किंवा अर्थाच्या मुळावे ज्ञान होय. व्युत्पत्ती सांगणे म्हणजे एखादया शब्दाच्या मुळाविषयी माहिती देणे होय. अशा अनेक शब्दांच्या व्युत्पत्तींचा संग्रह म्हणजे व्युत्पत्ती कोश !
      व्युत्पत्ती कोशाचे कार्य पुढीलप्रमाणे चार प्रकारे चालते:
        (१) मराठी भाषेतील प्रमाण व बोली शब्दांचे मूळ रूप दास्ववणे.
       (२) विशिष्ट प्रदेशात व भौगोलिक परिसरात एकाच शब्दातील उच्चारांत बदल होत असतो. हा शब्दांच्या उच्चारांतील बदल व फरक दाखवणे,
      (३) भाषेमध्ये इतिहासाच्या दृष्टीने फरक होत असतात. भिन्न भिन्न काळात जे शब्दांत बदल होतात, त्या बदलांचे कारण स्पष्ट करणे.
दहावी मराठी कुमारभारती प्रश्नपत्रिका 2024 डाउनलोड,SSC मराठी प्रश्नपत्रिका मार्च 2024 PDF, दहावी मराठी बोर्ड परीक्षा प्रश्नपत्रिका 2024, 2024 मराठी कुमारभारती प्रश्नपत्रिका उत्तरांसह, दहावी मराठी प्रश्नपत्रिका नमुना 2024. महाराष्ट्र बोर्ड मराठी प्रश्नपत्रिका 2024, दहावी मराठी प्रश्नपत्रिका PDF डाउनलोड 2024, मराठी कुमारभारती प्रश्नपत्रिका 2024 उत्तरतालिका, दहावी मराठी प्रश्नपत्रिका 2024 सराव, SSC मराठी प्रश्नपत्रिका 2024 PDF फाईल

विभाग 4 : भाषाभ्यास 

प्रश्न : 4 ( अ ) व्याकरण घटकावर आधारित कृती :

  1. समास :
     योग्य जोड्या जुळवा : 
    समास समासाचे नाव
    (i) त्रिभुवन कर्मधारय समास
    (ii) पुरूषोत्तम द्विगू समास
             - इतरेतर द्वंद्व समास
    उत्तर :
    समास समासाचे नाव
    (i) त्रिभुवन द्विगू समास
    (ii) पुरूषोत्तम कर्मधारय समास

  2. शब्दसिद्धी :
    पुढे दिलेल्या शब्दांचे वर्गीकरण करून तक्ता पूर्ण करा. :
     ( बिनचूक, जमीनदार, तीळतीळ, आंबटचिंबट )

    प्रत्ययघटित शब्द उपसर्गघटित शब्द अभ्यस्त शब्द
    -------------- ---------- ------------
    ---------------- -------------- --------------
    उत्तर:
    प्रत्ययघटित शब्द उपसर्गघटित शब्द अभ्यस्त शब्द
    जमीनदार  बिनचूक  तीळतीळ,
            ---      ----  आंबटचिंबट

  3.  वाक्प्रचार : 
    पुढीलपैकी कोणत्याही दोन वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.:
     (
    i) कंठस्नान घालणे :  - अर्थ  - ठार मारणे.
       वाक्य: भारतीय वीर जवानांनी सरह‌द्दीवर दहशतवाद्यांना कंठस्नान घातले.

    (ii) हुकूमत गाजवणे  :  अर्थ  - अधिकार गाजवणे.
      वाक्य: स्वातंत्र्यपूर्व काळात जनतेच्या अज्ञानाचा फायदा घेत इंग्रजांनी बराच काळ भारतीयांवर हुकूमत गाजवली.

    (iii) व्यथित होणे :   अर्थ -  दुःखी होणे.
      वाक्य:    लहानसहान अपयशाने व्यथित होणे अयोग्य असते.

    (iv) आनंद गगनात न गावणे  :  अर्थ - अतिशय आनंद होणे.
        वाक्य: विजयला बोर्डाच्या परीक्षेत ९०% गुण मिळाल्यामुळे त्याच्या आईबाबांचा आनंद गगनात मावत नव्हता.
प्रश्न : 4 ( आ ) भाषिक  घटकावर आधारित कृती :
  1. शब्द संपत्ती :
    (1) पुढील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा.
         
    (i) मार्ग =  रस्ता ,पथ,वाट 
         (ii) जल =  पाणी, नीर, उदक 

    (2 ) पुढील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा.
        
     (i) सुपीक  ×  नापीक 
          (ii) ज्ञानी   ×  अज्ञानी 

    (3 ) पुढील शब्दांचे वचन बदला.
           (i) भिंती   -  भिंत 
           (ii) रस्ता  -  रस्ते 

    (4 ) पुढील शब्दातील अक्षरांपासून दोन अर्थपूर्ण शब्द तयार करा.
           
    रखवालदार 
                   खल, वार, रवा, दार 

  2. लेखननियमांनुसार लेखन :
    पुढील वाक्यातील लेखननियमांनुसार चुकीचे शब्द ओळखून दुरुस्त करा.

    (i)  महर्षि कर्वे यांजमध्ये स्थीतप्रज्ञाची लक्षणे होती.

          महर्षी कर्वे यांजमध्ये स्थितप्रज्ञाची लक्षणे होती

    (ii) पावसाळ्यात दीशा धुसर झालेल्या असतात.

           पावसाळ्यात दिशा धूसर झालेल्या असतात.

    (iii) महाराष्ट्र हि संतांची भुमी आहे.

           महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे.

    (iv) शनीवारी दूपारी साडेबाराची वेळ होती.

          शनिवारी दुपारी साडेबाराची वेळ होती.
  3.  
  4. पुढील विरामचिन्हे ओळखा :

    (i)     ,                  →       स्वल्पविराम 

    (ii)    "      "        →    दुहेरी अवतरणचिन्ह


  5. पारिभाषिक शब्द :
    पुढील शब्दांना प्रचलित  मराठी भाषेतील शब्द लिहा.

    (i)     Tax                 →       कर 

    (ii)    Exhibition       →    प्रदर्शन 
दहावी मराठी कुमारभारती प्रश्नपत्रिका 2024 डाउनलोड,SSC मराठी प्रश्नपत्रिका मार्च 2024 PDF, दहावी मराठी बोर्ड परीक्षा प्रश्नपत्रिका 2024, 2024 मराठी कुमारभारती प्रश्नपत्रिका उत्तरांसह, दहावी मराठी प्रश्नपत्रिका नमुना 2024. महाराष्ट्र बोर्ड मराठी प्रश्नपत्रिका 2024, दहावी मराठी प्रश्नपत्रिका PDF डाउनलोड 2024, मराठी कुमारभारती प्रश्नपत्रिका 2024 उत्तरतालिका, दहावी मराठी प्रश्नपत्रिका 2024 सराव, SSC मराठी प्रश्नपत्रिका 2024 PDF फाईल

विभाग 5 : उपयोजित लेखन 

प्रश्न : 5 ( अ ) पुढील कृती सोडवा  :

  1.  पत्रलेखन :
    पुढील निवेदन वाचा व त्याखालील कोणतीही एक कृती सोडवा :

   : मागणीपत्र :

दिनांक : १० जून २०२४

प्रति,
मा.व्यवस्थापक,
आम्रपाली रोपवाटिका,
यशवंतनगर,सांगली.
ई-मेल: amrapali06@gmail.com

 विषय : वृक्षारोपणासाठी रोपांची मागणी करण्याबाबात...

महोदय,

   मी मधुर कुलकर्णी, ज्ञानदीप विदयालयात शिकत असून विदयार्थी प्रतिनिधी या नात्याने मा. मुख्याध्यापकांच्या परवानगीने रोपांची मागणी करण्यासाठी हे पत्र लिहीत आहे. ५ जून या 'जागतिक पर्यावरण दिना' चे औचित्य साधून आमच्या शाळेत पर्यावरण पंधरवडा साजरा केला जाणार आहे. यातील एक उपक्रम म्हणून आम्ही वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबवणार आहोत. आपण आपल्या रोपवाटिकेतर्फे शाळांना फळे, फुले आणि उपयुक्त झाडांच्या रोपांचे मोफत वाटप १५ जून ते २० जून दरम्यान करणार आहात. आपण तशी जाहिरात वर्तमान पत्रात दिली आहे. वृक्षारोपणासाठी आमच्या शाळेलाही काही रोपे हवी आहेत. 'ती आम्हांला ५ ते १० जून दरम्यान मिळतील का?' जास्तीत जास्त रोपे नेऊन संवर्धन करणाऱ्यास बक्षीस'  या उपक्रमातही आम्ही सहभागी होऊ इच्छितो, याची नोंद घ्यावी. रोपे घेण्यासाठी प्रतिनिर्धाना तेथे यावे लागेल का? की आपण शाळेच्या पत्त्यावर पाठवू शकाल, याबाबत कळवल्यास सोयीचे होईल.

रोपांची यादी पुढे दिली आहे:
आंबा -  25 नग
पेरू  -  50 नग
सीताफळ - 25 नग
विविध फुलझाडे - 25 नग 

 तरी वरीलप्रमाणे रोपे पाठवण्याची कृपा करावी व आमच्या विद्यालयाला 'एक सुंदर उपक्रम व स्पर्धा'  यात  सहभागी होण्याची संधी द्यावी ही नम्र विनंती.
कळावे.

आपला कृपाभिलाषी,
मधुर कुलकर्णी,
(विद्यार्थी प्रतिनिधी)
ज्ञानदीप विदयालय,सांगली.
ई-मेल: dnyandeep@xxxx.com

किंवा 

: अभिनंदन पत्र :

दिनांक : २२ जून २०२४

प्रति,
मा. व्यवस्थापक,
आम्रपाली रोपवाटिका,
यशवंतनगर,सांगली.
ई-मेल: amrapali06@gmail.com

महोदय,

    मी मधुरा कुलकर्णी, ज्ञानदीप विदयालयाची विदयार्थी प्रतिनिधी या नात्याने हे पत्र लिहीत आहे.
सर्वप्रथम आमच्या शाळेतर्फे तुमचे मनापासून अभिनंदन करते. शाळां-शाळांमधून वृक्षारोपण कार्यक्रमास प्रोत्साहन देण्यासाठी आपल्या आम्रपाली रोपवाटिकेमार्फत दि. १५ जून ते २० जून दरम्यान मोफत रोपांचे वाटप केले गेले. हा खरोखरच स्तुत्य उपक्रम होता.
     वृक्षारोपणाबरोबरच वृक्षसंवर्धनाच्या जबाबदारीची जाणीव राहावी म्हणून तुम्ही बक्षीसही जाहीर केले होते. त्यामुळे जास्तीत जास्त शाळांनी या उपक्रमात सहभाग नोंदवला. आमच्या शाळेतही अधिक उत्साहपूर्ण वातावरणात वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला. लावलेल्या रोपांची विदयार्थी काळजीही घेत आहेत. पर्यावरण रक्षणाच्या कर्तव्याची जाणीव करून देत नवीन पिढीला निसर्गाशी जोडण्याची कल्पना वाखाणण्याजोगी आहे. या माध्यमातून आपण  एक पर्यावरण चळवळच राबवली आहे.
या सर्व गोष्टींसाठी आपले पुन्हा एकदा मनःपूर्वक अभिनंदन !

आपली नम्र,
मधुरा कुलकर्णी,
(विदयार्थी प्रतिनिधी)
ज्ञानदीप विद्यालय,सांगली.
ई-मेल: dnyandeepvid@gmail.com

किंवा 

  ( 2) सारांश लेखन :
          विभाग 1 : गद्य ( इ) [ प्रश्न क्र.1 ( इ )] मधील अपठित गद्य उताऱ्याचा एक - तृतीयांश एवढा सारांश तुमच्या शब्दात लिहा.

उत्तर : 

सारांशलेखन :

आईचा महिमा अपार आहे. त्यासाठी शब्दही अपुरे पडतील. आईचे संपूर्ण जीवनच मुलांसाठी असते. त्यांच्यासाठी  कष्टात  ती रमते. त्यांच्या सुख-दुःखात ती समरस होते. आई या अक्षरातच सारे विश्व सामावलेले आहे. अशा या महान आईला अनुभवायचे असेल तर तिच्याजवळ क्षणभर बसा. तिच्याकडे जे जे आहे ते सारे काही तुम्हांला मिळेल.


प्रश्न : 5 ( आ ) पुढीलपैकी कोणत्याही दोन कृती सोडवा  :

  1.   जाहिरात लेखन : 
    संगणक प्रशिक्षण वर्गाची आकर्षक जाहिरात करा.
    उत्तर :


  2. बातमी लेखन :
    पुढील विषयावर बातमी तयार करा.

    'ज्ञानज्योत विद्यालय' वर्धा येथे 15 ऑगष्ट रोजी स्वातंत्र्यदिन साजरा झाला.

    ज्ञानज्योत विदयालयात स्वातंत्र दिन उत्साहात साजरा
     (आमच्या  प्रतिनिधीकडून)

    वर्धा, दि. १६ ऑगस्ट : 'ज्ञानज्योत विदयालय' ही वर्धा या शहरातील एक नामवंत शाळा. दरवर्षीप्रमाणे या वर्षींही शाळेत स्वातंत्र्यदिन  उत्साहात साजरा झाला.

       या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पर्यावरणतज्ज्ञ प्रा. डॉ. शामराव  जोशी  यांना निमंत्रित करण्यात आले होते. शाळेच्या बॅण्ड पथकाकडून निमंत्रितांना मानवंदना देण्यात आली. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते तिरंगा फडकवण्यात आला. विदयार्थ्यांनी या सोहळ्यात समूहगीते सादर केली. तसेच विविध देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम विद्यार्थ्यांनी सादर केला.

        प्रमुख पाहुण्या पाहुणे यांनी परिसरातील वृक्षसंवर्धन, स्वच्छता यांबद्दल मार्गदर्शन केले. 10 वी च्या विदयार्थ्यांनी या वेळी पर्यावरण संवर्धनासंबंधी पथनाट्य सादर केले. सर्वांनी या विदयार्थ्यांचे विशेष कौतुक केले.


  3. कथालेखन :

    पुढील अपूर्ण कथा पूर्ण करून लिहा :
    ( दिलेली अपूर्ण कथा लिहून घेण्याची गरज नाही )
    शाळेची घंटा वाजली. शाळा सुटल्याच्या आनंदात सर्व विद्यार्थी गडबडीने बाहेर पडू लागले. वरच्या मजल्यावरून श्रेया आणि नेहा धावतच बाहेर पडल्या. सिटीबसमध्ये जागा मिळत नव्हती म्हणून त्या भरभर चालत होत्या. शेवटी त्या बस थांब्याजवळ पोहोचल्या आणि ........

    मानव सेवा हीच ईश्वर सेवा.

    .......आणि बसच्या रांगेत उभ्या राहिल्या. आज सिटीबसला यायला जरा उशीरच झाला होता. रोजची वेळ टळून गेली होती. तरीही बसवा काही पत्ताच  नव्हता. इतक्यात नेहाच्या मागे उभ्या असणाऱ्या आजी खाली कोसळल्या आणि त्यांची शुद्ध हरपली. श्रेयाने लगेचच दप्तरातील पाण्याची बाटली काढून त्यांच्यावर पाणी शिंपडले. त्यांना शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला. नेहाने त्यांचे डोके अलगद आपल्या मांडीवर घेतले आणि ती त्यांना वारा घालू लागली. हे सगळं घडत असतानाच बघ्यांची गर्दी वाढू लागली. इतक्यात सिटीबस आली. नेहाने व श्रेयाने बसचालकाला आजीची परिस्थिती सांगितली. आजीला तातडीने वैदयकीय मदत मिळणे गरजेचे आहे, हे बसचालकाच्या लक्षात आले. मग त्याने व वाहकाने इतर प्रवाशांच्या मदतीने आजीला बसमध्ये चढवले आणि बस रुग्णालयाच्या दिशेने वळवली.
     बसमध्ये नेहा व श्रेया आजींची काळजी घेत होत्या. बस रुग्णालयाकडे पोहोचताय आजींवर औषधोपचार सुरू झाले. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार आजीच्या उपचारातजरासादेखील  विलंब झाला असता, तर आजीच्या  जीवावर बेतले असते. या दोन शाळकरी मुलीनी प्रसंगावधान राखून  मदतीचा हात दिला. याब‌द्दल सर्व प्रवाशांनी त्यांचे कौतुक केले. आजीच्या कुटुंबीयांना झाला प्रकार कळला. नेहा व श्रेया यांच्या रूपाने आपल्या आईवे प्राण वाचवणाऱ्या त्या मुलींचे त्यांनी मनापासून आभार मानले.

दहावी मराठी कुमारभारती प्रश्नपत्रिका 2024 डाउनलोड,SSC मराठी प्रश्नपत्रिका मार्च 2024 PDF, दहावी मराठी बोर्ड परीक्षा प्रश्नपत्रिका 2024, 2024 मराठी कुमारभारती प्रश्नपत्रिका उत्तरांसह, दहावी मराठी प्रश्नपत्रिका नमुना 2024. महाराष्ट्र बोर्ड मराठी प्रश्नपत्रिका 2024, दहावी मराठी प्रश्नपत्रिका PDF डाउनलोड 2024, मराठी कुमारभारती प्रश्नपत्रिका 2024 उत्तरतालिका, दहावी मराठी प्रश्नपत्रिका 2024 सराव, SSC मराठी प्रश्नपत्रिका 2024 PDF फाईल

प्रश्न : 5 (इ ) पुढील लेखनप्रकारापैकी कोणतीही एक कृती सोडवा  :
  1.  प्रसंगलेखन :

    वरील प्रसंगी तुम्ही विद्यार्थी या नात्याने उपस्थित होतात अशी कल्पना करून प्रसंग लेखन करा.

    उत्तर :

    दहावीचा शुभेच्छा समारंभ

    धुळे जिल्हयातील आगच्या 'साधना विदयालया 'ने ४ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता आम्हां दहावीच्या विदयार्थ्यांसाठी शुभेच्छा समारंभाचे आयोजन केले होते.

    आम्हां दहावीच्या विदयार्थ्यांसाठी हा दिवस खास होता. मी पंधरा मिनिटे अगोदरच शाळेत पोहोचले. शाळेत लगबग सुरू होती. आमच्या शाळेच्या पटांगणात स्टेज उभारून कार्यक्रमाची व्यवस्था केली होती. नेहमीचीच शाळा आज जरा वेगळी भासत होती. शाळेत केलेली सजावट, प्रवेश‌द्वाराजवळ काढलेली रांगोळी, फुलांची सजावट, शिक्षकांचे प्रसन्न चेहरे, कार्यक्रमस्थळी केलेली व्यवस्था सारे काही आज डोळ्यांत साठवून घ्यावेसे वाटत होते.

    साड्या व छान छान ड्रेस घातलेल्या आम्ही मुली, तर सूटाबुटात वावरणारी मुले यांमुळे पटांगणात रंगीबेरंगी फुलांची बागच फुलल्यासारखी वाटत होती. या उत्साहाच्या वातावरणात भर पडली ती कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आमचे माजी मुख्याध्यापक मा. श्री. रमाकांत धुमाळ सर व प्रमुख पाहुणे शिक्षणतज्ज्ञ मा. श्री. अजय साठे यांच्या उपस्थितीमुळे.आमच्या विदयार्थी प्रतिनिधीने अध्यक्षांचे व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करून कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करतानाच आपले मनोगतही व्यक्त केले. त्याच्या मनोगतातून जणू आमच्या भावनांना त्याने वाट मोकळी करून दिली होती. हा शुभेच्छा समारंभ शाळेच्या लेखी आम्हां विदयार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसाठी, त्यापुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यासाठीचा असला, तरीही आमच्यासाठी  शाळेच्या निरोपाचा दिवस होता. त्यामुळे प्रत्येकाचे मन  भरून आले होते. लहानपणापासून ज्या शाळामाऊलीने आपले बोट धरून इथवर आणले होते, ते बोट सोडून पुढची वाटचाल आपली आपणय करायची होती. ओल्या डोळ्यांनी  दोन-तीन मनोगते व्यक्त झाली.

    सारे वातावरण हळवे झाले असतानाच, 'अशी पाखरे येती, आणिक स्मृती ठेवुनी जाती' या मंगेश पाडगावकरांच्या कवितेने अध्यक्षांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. या अफाट जगात वावरताना काय करावे आणि काय करू नये यांबद्दल त्यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले. प्रमुख पाहुण्यांनी तर आम्हांला शुभेच्छा देताना करीअरच्या विविध क्षेत्रांची ओळख करून दिली. इयत्ता ९वीच्या विदयार्थ्यांनी आमच्यासाठी बनवलेल्या शुभेच्छा कार्डाच्या सभास्थानी केलेल्या सजावटीने तर आम्ही भारावूनच गेलो. या छोट्या दोस्तांनी आमच्यासाठी कविताही सादर केल्या. नवा विचार, नवी दिशा, नवे संकल्प, नवे आकाश यांची जाणीव करून देणाऱ्या या शुभेच्छा समारंभाने तर शाळेब‌द्दलच्या आदरात, प्रेमात अधिकच भर घातली. आणि या प्रेमळ निरोपासोबतच प्रेमाचा खाऊही शाळेने खायला दिला. मित्र-मैत्रिणी, शिक्षक यांच्याशी भावनिक संवाद साधून, खूप सारे फोटो, आठवणींची  खूप मोठी शिदोरी आम्ही या निमित्ताने आम्ही सोबत घेतली. शुभेच्छा समारंभाची सांगता झाली. मग आम्ही जड अंतःकरणाने शाळेच्या बाहेर पडलो.


  2. आत्मकथन : 
    दिलेल्या मुद्द्याच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा:


     मी  आरसा बोलतोय

    वा! वा! किती छान गुंग  झाला आहेस ! तुम्हां माणसांना स्वप्न दाखवण्यासाठीच  तर माझा जन्म झाला आहे! अरे, असा गोंधळून इकडे तिकडे बघू नकोस. मी तुझ्यासमोरचा आरसा बोलतोय !

       हे बघ, प्रत्येक माणसाचं स्वतः वरच सर्वात  जास्त प्रेम असतं. आपण इतरांपेक्षा वेगळं दिसावं म्हणून प्रत्येक जण काहीतरी वेगळी कृती करण्याच्या प्रयत्नात असतो. या धडपडीतूनच  माणसाने या पृथ्वीतलावर अनंत पराक्रम गाजवले आहेत. म्हणून तर माणूस आज सर्व प्राण्यांचा राजा, या पृथ्वीता राजा म्हणून वावरतोय या पराक्रमी माणसांनी आपल्या प्रत्येक पराक्रमानंतर आरशात स्वतःला पाहिले असणारच आणि पाहता पाहता मुठी आवळून, हात उंचावून माझा विजय असो अशी मोठ्याने मनातल्या  मनात घोषणा देत स्वतःचा जयजयकार केला असणारच, हे लक्षात ठेव तुमच्या मनातल्या या प्रेरणेचा निर्माता मीच आहे मीच तुमची प्रगती घडवून आणतो.

         आठवते का रे? जत्रेत आपली भेट झाली होती! किती विविध रूपांत मी त्या आरसे महालात अवतरलो होतो. तू तर नुसता लोटपोट हसत होतास तुझ्याच किती भन्नाट प्रतिमा पाहायला मिळाल्या होत्या !  गोलगरगरीत, हडकुळी, एकदम बुटकी किती प्रतिमा! एका आरशातली प्रतिमा आठवते? डोकं मो‌ठं भोपळयाएवढं बाकीचा देह दोनअडीच फूट फक्त काय हसत होता तुम्ही सगळेजण !

           लक्षात ठेव ही गाझी रूपं केवल विनोद करण्यासाठी निर्माण झालेली नाहीत. ड्रायव्हरला पाठीमागून येणाऱ्या गाडया दाखवण्यासाठी मीच तर गाडीच्या कडेवर बसतो. वेगवेगल्ली भिंगे ही माझीच  रूपे आहेत प्रयोगशाळेतल्या सूक्ष्मदर्शकापासून अवकाशातल्या ग्रहगोलांचे निरीक्षण करणाऱ्या दुर्बिणी पर्यंत  सर्वत्र मीच असतो घरात, दारात, कपड्यांवर, दुकानांत, रस्त्यांवर, भाडयांमध्ये, जत्रांमध्ये, इथे तिथे सर्वत्र मीच असतो. पण लक्षात ठेव. मी कधी स्वतःच्या मिजाशीत राहिलो नाही.

           पाणी पिण्यासाठी माणूस प्रथम नदीत वाकला तेव्हा त्याला स्वतःलाच  स्वतःचे दर्शन घडले असणार तेव्हापासून मी त्याच्यासोबत आहे. मी स्वतःला बाजूला ठेवून माणसाला मदत केली आहे तूसु‌द्या अशीच मदत करीत सहा. पाहा, केवढा मोठा होशील तू!

      ( 3 )  वैचारिक लेखन : 
 '            जलप्रदूषण - समस्या व उपाय' या विषयावर तुमचे विचार लिहा.

जलप्रदूषण समस्या व उपाय

हवा, पाणी ही निसर्गाने मानवाला दिलेली मुक्त देणगी आहे. माणसाच्या मूलभूत गरजांपैकी या महत्त्वाच्या गरजा आहेत. पाण्याला तर 'जीवन' म्हटले जाते. आपल्याला स्वच्छ व शुद्ध पाणी मिळणे, हे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. मानवी कृती व अन्य कारणांमुळे पाण्याची गुणवत्ता खालावते म्हणजेच पाणी दूषित होते, यालाच 'जलप्रदूषण' असे म्हणतात. वाढती लोकसंख्या, औदयोगिकीकरण व शहरीकरण यांमुळे पाण्याचे साठे दूषित होऊ लागले आहेत.

  प्रदूषित पाण्यामुळे पोटाचे विकार आणि इतर बरेच रोग होतात. जलीय जीवांवरही त्याचा परिणाम होतो. तसेच इतर प्राणी, वनस्पती यांनाही अपाय होतो. जगातील बहुतेक देशांत जलप्रदूषण ही गंभीर समस्या बनली आहे. पाणी हा नैसर्गिक स्रोत असून भविष्यातील पिढ्यांसाठी त्याचे जतन करणे आवश्यक आहे. पाण्यावर अवलंबून असणाऱ्या व्यवसायांवरही याचे दुष्परिणाम दिसून येतात. उदा., मासेमारी, शेती.

     प्रदूषण ही एक भीषण समस्या आहे. यावर जर उपाययोजना करायच्या असतील, तर औदयोगिक परिसरातून येणाऱ्या सांडपाण्याचे शुद्धीकरण होणे गरजेचे आहे. पाण्याच्या गुणवत्तेची नियमित चाचणी होणेही आवश्यक आहे. शेतीव्यवसायात रासायनिक खते व कीटकनाशकांची फवारणीही जलप्रदूषणास कारणीभूत आहे. त्यामुळे सेंद्रिय घटकांचा वापर शेतीव्यवसायात करावा.

     शहरांतून तसेच गावांतून बाहेर पडणारे सांडपाणी जलाशयात सोडण्यापूर्वी त्यातील प्रदूषके काढून टाकण्यात यावीत किंवा या पाण्याचा पुनर्वापरासाठी विचार करावा. हल्ली शहरांमध्ये अशा प्रकारची सांडपाणी प्रक्रिया केंद्रे उभारून पाण्याच्या पुनर्वापरावे प्रकल्प राबवले जात आहेत. त्याचबरोबर वाहते पाणी अडवणे, ते झिरपवणे, बंधारे बांधणे, तळी खोदणे यांसारख्या उपक्रमांतून नैसर्गिक जलाचा साठा करता येईल. वृक्षारोपणासारख्या कार्यक्रमांतून झाडांमुळे जमिनीखालील पाण्याचे झरे वाहते राहतील, याबद्दल जनजागृती करणे आवश्यक आहे.

   खरे पाहता आज २१ व्या शतकात मानवाने खूप प्रगती केली आहे, पण जलसाक्षरतेशिवाय मानवी जीवन सुखी होऊ शकत नाही, हे सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे, जलप्रदूषण दूर झाल्याशिवाय मानवी जीवन विकसित होऊ शकत नाही, हे सत्य प्रत्येकाने जाणले पाहिजे.

112

दहावी मराठी कुमारभारती प्रश्नपत्रिका 2024 डाउनलोड,SSC मराठी प्रश्नपत्रिका मार्च 2024 PDF, दहावी मराठी बोर्ड परीक्षा प्रश्नपत्रिका 2024, 2024 मराठी कुमारभारती प्रश्नपत्रिका उत्तरांसह, दहावी मराठी प्रश्नपत्रिका नमुना 2024. महाराष्ट्र बोर्ड मराठी प्रश्नपत्रिका 2024, दहावी मराठी प्रश्नपत्रिका PDF डाउनलोड 2024, मराठी कुमारभारती प्रश्नपत्रिका 2024 उत्तरतालिका, दहावी मराठी प्रश्नपत्रिका 2024 सराव, SSC मराठी प्रश्नपत्रिका 2024 PDF फाईल



COMMENTS

नाव

इंग्रजी,3,इंग्रजी उपयोजित लेखन,3,इंग्रजी व्याकरण,2,प्रश्नपत्रिका,11,मराठी,1,मराठी उपयोजित लेखन,10,मराठी व्याकरण,7,शैक्षणिक Update,21,हिंदी रचना विभाग,3,हिंदी व्याकरण,4,
ltr
item
marathi study : बोर्डाची मार्च 2024 ची प्रश्नपत्रिका | 2024 मराठी कुमारभारती प्रश्नपत्रिका उत्तरांसह
बोर्डाची मार्च 2024 ची प्रश्नपत्रिका | 2024 मराठी कुमारभारती प्रश्नपत्रिका उत्तरांसह
दहावी मराठी कुमारभारती प्रश्नपत्रिका 2024 डाउनलोड,SSC मराठी प्रश्नपत्रिका मार्च 2024 PDF, दहावी मराठी बोर्ड परीक्षा प्रश्नपत्रिका 2024,प्रश्नपत्रिका
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgXMO_GlRTK-N53alrPFbX2kHlZlInL8odDgbtnjq_Pcs5CTjM-T-rKiy_7sFKySUQkfvoHibHUfYHU2WdfYV7aO0J8BlxYP3LWhhSUX6gylWIT7KHkEvHd5eDqQq4tp6S1V4ZWa-9vDsNMB7Qqpp-IMeqPetSlHrM2ywp7fiUVPFeDk1zm6dPuQZ75npGR/s16000/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80%20%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%201.png
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgXMO_GlRTK-N53alrPFbX2kHlZlInL8odDgbtnjq_Pcs5CTjM-T-rKiy_7sFKySUQkfvoHibHUfYHU2WdfYV7aO0J8BlxYP3LWhhSUX6gylWIT7KHkEvHd5eDqQq4tp6S1V4ZWa-9vDsNMB7Qqpp-IMeqPetSlHrM2ywp7fiUVPFeDk1zm6dPuQZ75npGR/s72-c/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80%20%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%201.png
marathi study
https://www.marathistudy.com/2025/02/marathi%20question%20paper%202024%20model%20answer.html
https://www.marathistudy.com/
http://www.marathistudy.com/
http://www.marathistudy.com/2025/02/marathi%20question%20paper%202024%20model%20answer.html
true
5159341443364317147
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read More Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content