Home English Grammar IMPORTANT PROVERBS_महत्वाच्या म्हणी

IMPORTANT PROVERBS_महत्वाच्या म्हणी

1209
0
Proverbs are traditional sayings that are particular to a certain country. They are short, wise sayings that usually offer some kind of advice, or capture an idea found in life.
 Native English speakers frequently use proverbs in their conversations, and they often do this without even realizing it. Proverbs sometimes reveal more about the culture of a country than any textbook can. The values of the population are reflected in its proverbs.

That’s why we put together this guide of the 178 most popular proverbs in English, so you can know them when you see them (and maybe dish a few of your own).
1. An apple a day keeps the doctor away. दररोज एक सफरचंद दवाखान्यात जाणे बंद.
2. Action speaks louder than words. उक्तीपेक्षा कृती श्रेष्ठ
3. A drawing man catches at a straw. बुडत्याला काढीचा आधार.
4. All that glitters is not gold, चकाकते ते सर्व सोने नसते.
5. As you make your bed so you must lie in it. जशी कृती तसे फळ.
6. A fig for the doctor when curd गरज सरो वैद्य मरो.
7. A figure among ciphers. वासरात लंगडी गाय शहाणी.
8. A burnt child dreads fire. पोळलेला मनुष्य अधिकच काळजीपूर्वक वागतो.
9. A fool and his money are soon parted. मुर्ख माणसाजवळ लक्ष्मी नांदणार नाही.
10.An empty vessel makes much noise. उथळ पाण्याला खळखळाट फार.
11.A thief always fancies that it is a moon light. चोराच्या मनात चांदणे..
12.A bad workman quarrel with his tools, नाचता येईना अंगण वाकडे.
13.A nod for the wise, a rod for the fool. शहाण्याला शब्दाचा मार..
14.A guilty conscience pricks the mind. चोराच्या मनात चांदणे.
15.A word is enough for the wise. शहाण्याला शब्दाचा मार…
16.Appearances are deceptive. दिसते तसे नसते.
17.A bird in hand is worth two in a bush. हातचे सोडून पळत्याच्या मागे लागू नये.
18.A friend in need is a friend indeed. गरजेच्या वेळी उपयोगी पडतो तोच खरा मित्र
19.A penny saved is a penny gained. वाचवलेला पैसा म्हणजे मिळवलेला पैसा.
20. A rolling stone gathers no moss. गडगडत जाणाऱ्या दगडाला शेवाळे.
21.A stitch in time saves nine. वेळीच केलेल्या उपायाने संभाव्य हानी टळते.
22. All is fair in love and war. प्रेमात आणि युध्दात सर्व काही क्षम्य असते.
23.All is well that ends well. ज्याचा शेवट गोड ते सारेच गोड,
24. A friend is easier lost than found. चांगला मित्र मिळवणे कठीण, घालवणे सोपे..
25.As you sow, so shall you reap करावे तसे भरावे.
26.Reap as you sow. पेरावे तेच उगवते..
27. A barking dog seldom bites. गरजेल तो पडेल काय?
28. As the king so are the subjects यथा राजा तथा प्रजा
29. Avoid extremes. Excess of everything is bad. अति तेथे माती.
30. A good appetite needs no sauce. भूकेले भूत थाली पिठाला राजी.
31.Absence makes the heart grow fonder. विरहाने स्नेहभाव दृढ होतो.
32.All work and no play makes Jack a dull boy. कामच काम नी नाही खेळ फुकट जातो सारा वेळ.

33.An angel when pleased, a devil when indignant वळले तर सूत नाही तर भूत.
34. Beggars cannot be choosers. अन्नछत्रात जाऊन मिरपूड मागू नये..
35. Birds of a feather flock together समानशीलं व्यसनेषु संख्यम. एकाच माळेचे मणी.
36. Blood is thicker than water. कातड्या पेक्षा आतड्याची ओढ अधिक असते.
37.Between two stools we come to the ground. दोन्ही दरडीवर धरला हात, तोटा पडला पदरात किंवा दोन्ही घरचा पाहुणा उपाशी.
38. Beauty is only skin deep. आकृतीपेक्षा कृती महत्वाची.
39. Better late than never कधाही न करण्यापेक्षाए उशिरा का होईना करणे श्रेयस्कर.
40. Between the devil and the deep sea. इकडे आड तिकडे विहीर.
41. Bones for the late comers. हाजिर तो वजीर.
42.Cross the stream where it is the shallowest. कृती जेवढी सहजतेने होईल तेवढे उत्तम.
43. Cowards may die many times before their death. भित्यापाठी ब्रम्हराक्षस.
44.Charity begins at home. चांगल्या कामाचा प्रारंभ स्वतःच्या घरापासून करावा.औदर्यांची सुरुवात आपल्याघरापासूनच करावी.
45. Contentment is happiness. संतोष हेच परमसुख.
46. Cut your coat according to your cloth. अंथरून पाहून पाय पसरावेत.
47. Courtesy costs nothing. सभ्यतेने वागण्यास पैसे पडत नाहीत.
48. Casting pearls before swine, गाढवापुढे वाचली गीता
49.Courage is the surest weapon in danger. संकटकाळी सर्वांना हमखास उपयोगी पडणारे हत्यार म्हणजे धैर्य होय.
50. Coming events cast their shadows before. मेघ गर्जती वर्षती आधी काळोख करती.
51. Don’t count your chickens before they are hatched. बाजारात तुरी आणि भट भट पिल्ले अंड्यातून बाहेर येण्यापूर्वीच त्यांची गणती काय कामाची.
52. Don’t cross bridge, until you come to it. संकटे येण्यापूर्वीच त्यांची चिंता करीत बसू नका.
53. Doctors after death वराती मागुन घोडे..
54. Every tide has its ebbs भरती नंतर ओहोटी येते / जीवनात चढ उतार असायचेच.
55. Every house has its skeleton. घरोघरी मातीच्या चुली.
56.Every dog has his days, चार दिवस सासूचे, चार दिवस सुनेचे.
57. Every light has its shadow. एक दिव्याखाली अंधार.
58. Early to bed and early to rise makes a man healthy, wealthy ans wise. लवकर निजे, लवकर उठे, तया ज्ञान, संपत्ती आरोग्य भेटे.
59. Easier said than done. बोलणे सोपे करणे अवघड.
60. Every cloud has a silver lining. प्रत्येक दुर्दैवी क्षणानंतर आनंदाचा क्षण येणारच. / संकटाच्या सागराला सुखाचा किनारा असतोच. / रात्रीच्या गर्भात उद्याचा उषःकाल.
61. Example is better than precept. उक्तीपेक्षा कृती श्रेष्ठ,
62. Experience is the best teacher. अनुभव हाच सर्वश्रेष्ठ गुरु होय.
63. Empty mind is devil’s workshop. रिकामे मन म्हणजे सैतानाचे घर.
64. Familiarity breeds contempt अतिपरिचयात अवज्ञा.
65. First come. first served. हाजीर तो वजीर.
66. Fortune favours the brave साहसे श्री प्रतिवसति
67. Failure is a stepping stone to success अपयश ही यशाची पहिली पायरी आहे.
68.Fine feathers make fine birds. ज्याची पीसे सुंदर तो सुंदर.
69. Forbidden fruit is the sweetest निसिध्द गोष्टीचे माणसाला सर्वात अधिक आकर्षण असते.
70. Gluttony kills more than the sword. अति खाणे आणि मसणात जाणे.
71. Guilty conscience is always suspicious चोराच्या मनात चांदणे.
72. Give every man thy ear but few thy voice. ऐकावे जनाचे करावे मनाचे.
73. God helps those who help प्रयत्नवादधाना देवही मदत करतो / कष्ट करणाऱ्यांना परमेश्वर सहाय्य करतो.
74. Give everyone his due. ज्याचे त्याला श्रेय दिलेच पाहिजे.
75. He plays well who wins. ज्याच्या हाती ससा तो पारधी.
76. Half a loaf is better than none. उपवास घडण्यापेक्षा अर्धी भाकरी बरी.
77. Health is wealth. आरोग्य हीच संपत्ती.
78. Honesty is the best policy. प्रामाणिकपणा हेच सर्वोत्तम धोरण.
79. Habit is second nature जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही.
80. Honey is sweet, but the bee stings. घी देखा लेकिन बड़गा नहीं देखा.
81.It is never too late to mend. चूक केव्हाही दुरुस्त करावी. उशीर झाला तरी सुधारणा करणे चांगले.
82.It is no use crying over spilt milk. गत न शोचयेत. गतकाळयाचा शोक फुका
83.It never rains but it pours. संकटे ही एकटी दुकटी येत नसतात.
84.It takes two to make a quarrel एका हाताने टाळी वाजत नाही.
85.III gotten, ill spent हपापाचा माल गपापाला.
86.It is better said than done. बोलणे सोपे करणे अवघड.
87.Jack of all trades and master of none. एक ना धड भाराभर चिंध्या.
88.knowledge is power. ज्ञान हेच सामर्थ्य.
89.Listen to people but obey your conscience. ऐकावे जनाचे करावे मनाचे.
90. Little things please little minds. कोल्हा काकडीला राजी.
91. Look before you leap पूर्ण विचार केल्याशिवाय कृती करु नये.
92. Let bygones be bygones. झाले गेले विसरुन जा.
93.Like father like son like mother like daughter. बाप तसा बेटा, (खान तशी माती) आई तशी बेटी.
94. Love is blind प्रेम आंधळ असतं.
95. Life is love, enjoy it. जीवनावर प्रेम करण्यातच खरा आनंद आहे..
96.Much display but no substance बड़ा घर पोकळ वासा
97. Many a little makes a mickle थेंबे थेंबे तळे साचे.
98. Many drops make a shower. थेंबे थेंबे तळे साचे.
99.Make hay while the sun shines तापल्या तव्यावर पोळी भाजून घा. / वाहत्या गंगेत हात धूवून घ्या.
100. Man proposes God disposes. मनुष्य योजतो एक देवाच्या मनात असते निराळेच.
101. Many hands make work light. अनेकांच्या सहकार्याने काम सोपे बनते.
102. Might is right. बळी तो कान पिळी.
103. Money makes the mare go. आडला नारायण गाडवाचे पाय धरी. पैशाभेवती फिरते दुनिया.
104. More haste, less speed. घाई उपयोगाची नाही.
105. Man is known by his company. मानसाची ओळख त्याच्या सभोवतालच्या व्यक्ति वरुन कळते.
106. Money begets money. पैशाकडे पैसा ओढला जातो..
107. Money is the root of all evil अनर्थ कारणम् वित्तम्/ पैसा हेच सर्व अनर्थाचे मूळ कारण आहे.
108. No pain no gain. कष्टाविना फळ नाही.
109. Necessity is the mother of invention गरज ही शोधाची जननी आहे.
110. No smoke without fire. विस्तवाशिवाय धूर नाही.
111. No rose without a thorn. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही. काट्या शिवाय गुलाब नाही.
112. Nothing venture, nothing have. साहसाशिवाय यश नाही.
113. Never judge by appearances. दिसते तसे नसते.
114. New lord, new laws. नवी विटी, नवे राज्य.
115. One nail drives out another. नाक दाबले की तोंड उघडते.
116. One swallow does not make a summer. एखादया उदाहरणावरुन नियम सिध्द होते नाही.
117.One man’s meat is another man’s poison. एखद्याला ज्याचे आमिष, तेच दुसऱ्यासाठी विष.
118. Out of frying fan into the fire. अग्नीतून फुफाट्यात. एका संकटातून दुसऱ्या संकटात.
119. Old is gold. जुने ते सोने.
120. Once bit, twice shy. दुध पोळलेला ताकही फुंकून पितो..
121. One good turn deserve another. उपकाराची फेड उपकारानेच करावी.
122. Out of sight out of mind दृष्टीआड तो सृष्टीआड.
123. Old wine in a new bottle. नव्या बाटलीत जुनी दारु.
124. One man’s fault is another man’s lesson. पुढच्यास ठेस मागचा शहाणा.
125. One man’s loss is another man’s gain. पंत मेले, राव चढले.
126. Pride has a fall. गर्वाचे घर खाली.
127. Practice makes a man perfect. सरावाने मानुस परिपूर्ण होतो.
128. Prevention is better than cure. उपचारापेक्षा प्रतिबंधक उपाय बरा.
129. Physician heal thyself. लोकासांगे ब्रम्हज्ञान आपण कोरडा पाषाण.
130. Practice what you preach बोलाचे तसे चालावे.
131. Pen is mightier than sword. तलवारीपेक्षा लेखणी श्रेष्ठ.
132. Passion leads to poverty. अतिराग, भीक माग.

133. Penny wise, pound foolish. विळा मोडून खिळा करणारा…
134. Rome was not built in a day. चांगले काम एका दिवसात होत नाही.
135.Strike while iron is hot. तवा तापलेला आहे तोवर पोळी भाजून घ्या. / मिळालेल्या संधिचा लाभ घ्या.
136. Set a thief to catch a thief. चोराच्या वाटा चोरालाच माहित.
137.Speech is silver, silence is Golden. बोलण्यापेक्षा मौन श्रेष्ठ..
138. Saying is one thing doing another. बोलणे सोपे करणे अवघड.
139. Sound mind in a sound body. शरीर निरोगी तर मन निरोगी.
140. Service to man is service to God मानव सेवा हिच खरी ईश्वर सेवा.
141. Silence is golden झाकली मूठ सव्वा लाखाची.
142. Self help is the best help. स्व:ताच केलेली मदत ही चांगली मदत असते.
143. Slow and steady wins the race सावकाश आणि सातत्याने काम केल्यास यश मिळते.
144. Seeing is believing. हातच्या कंकणाला आरसा कशाला.
145. Spare the rod and spoil the child. छडीलागे छमछम विद्या येई घम घम.
146. Still waters run deep. संथपाणी खोलवर वाहत असते. खरा विद्वान व्यर्थ बडबड करत नाही.
147. Too many cooks spoil the broth. सतरा सुगरणी स्वयंपाक आळणी.
148. The child is the father of the man. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात…
149. Tit for tat. जशास तसे.
150. The exception proves the rule. प्रत्येक नियमाला अपवाद असतोच.
151. Time and tide wait for none. काळ आणि वेळ कोणासाठी थांबत नाही.
152. To err is human माणूस हा चुकीचा पुतळा आहे.
153. Two is a company, three is a crowd तीन तिघाड काम बिघाड.
154. Time is money. वेळ मौल्यवान आहे.
155. The wearer best knows where the shoe pinches. जावे ज्याच्या वंशा तेव्हा कळे / ज्याचे जळते त्यालाच कळते.
156. The early bird catches the worm हाजीर तो वजीर.
157. To lock the stable door when the steed is stolen बैल गेला नि झोपा केला. / वरातीमागून घोडे.
158. To rob Peter to pay Paul हलवायाच्या घरावर तुळशीपत्र. / एखाद्याला तुटून दुसऱ्याची भर करणे…
159. Two heads are better than one एक से दो भले.
160. Truth needs no evidence, हातच्या कंकणाला आरसा कशाला.
161. Truth will be out. खातीचे गाल, न्हातीचे बान झाकत नाहीत..
162. Union is strength. ऐक्य हेच सामर्थ्य / एकी हेच बळ.
163. United we stand, divided we fall ऐकी हेच बळ, बेकी हाच नाश
164. Why cast pearls before swine. गाढवाला गुळाची चव काय?
165. Work is worship. एक परिश्रम हीच देवपूजा.
166. Well begun is half done. चांगली सुरुवात म्हणजे अर्धे काम झाल्यात जमा.
167. Walls have ears. भिंतीला कान असतात.
168, Where there is a will, there is a way. इच्छा असेल तर मार्ग दिसेल.
169. What’s done cannot be done. एकदा जे घडले ते घडले.
170. When in Rome do as the Ramans do. जसा देश तसा वेश.
171. We don’t need a candle to see the sun. स्पष्ट असलेल्या गोष्टीला पुराव्याची गरज नसते. हातच्या कंकणाला आरसा कशाला.
172. When good cheer is lacking, friends are packing. असतील शिते तर जमतील भूते..
173. Friend are many when pockets are full. असतील शिते तर जमतील भूते.
174. When the cat’s away the mice will play मांजराच्या अनुपस्थित उंदराचे राज्य.
175. You scratch my back, and I will scratch yours. एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ.
176. You cannot make an omelet without breaking the eggs. त्यागाशिवाय भोग नाही.
177. You cannot have a cake and eat it too. झाड हवे तर लाकूड कसे मिळेल.
178. An army marches on stomach सैन्य चालते पोटावरती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here