Home लेखन कौशल्य Letter writing in marathi_मराठी पत्रलेखन

Letter writing in marathi_मराठी पत्रलेखन

2426
0

Letter writing in marathi | मराठी पत्रलेखन | उपयोजित लेखन

 पत्रलेखन ही एक कला मानली जाते. Letter writing in marathi आपल्या मनातील भाव किंवा विचार दुसऱ्यापर्यंत पोहोचवण्याचे तसेच आपल्या भावना किंवा विचारांना चांगल्या भाषेत संक्रमित करण्याचे पत्र हे एक उत्तम लिखित साधन आहे.
आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात संगणक, भ्रमणध्वनी, इंटरनेट, ई-मेल यांचा वापर करणे सहज शक्य झाल्याने प्रत्यक्ष पत्रलेखनाची गरज बऱ्याच प्रमाणात कमी झालेली असली तरी पत्रलेखनाकरता नव्या तंत्रज्ञानाचा वापर करणे ही आता काळाची गरज बनली आहे. Letter writing in marathi
अनौपचारिक पत्राद्वारे आपल्या भावना प्रभावीपणे व्यक्त करता येणे तसेच औपचारिक पत्राद्वारे आपले म्हणणे, विचार, मागणी, विनती इत्यादी बाबी योग्य व कमीत कमी शब्दांत संबंधित व्यक्तीपर्यंत पोहोचवणे हे अत्यंत महत्त्वाचे लेखन कौशल्य आहे. हे कौशल्य आत्मसात करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानानुसार, ई-मेल पाठवण्याच्या पद्धतीनुसार पत्रलेखन करणे आवश्यक आहे. 

आज आपण पुढील पत्रांचा अभ्यास करणार आहोत.
• मागणीपत्र
• विनंतीपत्र
• अभिनंदनपत्र
कृतिपत्रिकेत पत्रलेखन प्रकारात निवेदन जाहिरात, बातमी, सूचनाफलक, यासारख्या शालेय स्तरावरील कार्यक्रमासंबंधी माहिती देऊन त्या आधारे पत्र लिहिण्यास सांगितले जाते.
Letter writing in marathi

: मागणी पत्र :

: मागणी पत्र :
मागणी पत्राचा अभ्यास करताना मागणीपत्रात खालील मुद्द्यांचा समावेश असावा.
i) मागणी कोणत्या वस्तूची? (यादी देणे आवश्यक)
ii) संख्या पुरेशी व योग्य लिहिली आहे का ?
iii)दिनांक काळजीपूर्वक लिहावा
iV)वस्तूची उपयुक्तता / आवश्यकता.
V)वस्तूंच्या दर्जा व सवलत याविषयी विचारणा करावी.
Vi) भावाचे दरपत्रक व बील देण्यासंदर्भात माहिती.

Letter writing in marathi

: विनंती पत्र :

: विनंती पत्र :
विनंती पत्राचा अभ्यास करताना विनंतीपत्रात खालील मुद्द्यांचा समावेश असावा.
(i)कोणत्या विषयाच्या संदर्भात विनंती.
(ii) विनंती पत्रासाठी योग्य मायना.
(iii) समस्येचे गांभीर्य.
iv) समस्या निवारणासाठी विनंती.
Letter writing in marathi

: अभिनंदन पत्र :

: अभिनंदन पत्र :
अभिनंदन पत्र : व्यक्तीचा उल्लेख योग्य / नात्याप्रमाणे/ सन्मानपूर्वक करावे. व्यक्तीचे क्षेमकुशल विचारावे, भावना प्रभावी शब्दांत माडावी. नात्यातील जिव्हाळ्यानुसार विस्तृत लेखन करावे. या पत्रामध्ये पत्राचा विषय लिहिण्याची गरज नाही. पत्रात शेवटी डावीकडे पत्र पाठवणाऱ्याचा पत्ता लिहिणे आवश्यक.
Letter writing in marathi

:  पत्र लिहिताना घ्यावयाची दक्षता :

:  पत्र लिहिताना घ्यावयाची दक्षता :
१) कृतीत दिलेला मजकूर कंटाळा न करता वाचावा व नीट समजावून घ्यावा.
२) दिलेल्या माहितीत विषय काय आहे. आयोजक कोण ते शोधा त्याचा तपशील पहावा, नाव, पत्ता इ.
३)यामध्ये कोण पत्र लिहितो, कशासाठी, (विषय) व कोणाला याचा शोध घ्यावा,
४) दिलेल्या विषयाच्या रोधाने साध्या व सुटसुटीत वाक्यात सहज समजेल अशा शब्दांत लेखन करा.
५)मुख्य मजकूरात तीन परिच्छेद करावेत
६) ई-मेल प्रारुपात पत्राचे लेखन करताना, दिनांक- प्रति – मायना-विषय – महोदय – मुख्य मजकूर – समारोप – पत्र लिहिणाऱ्याचा पत्ता. असा आराखडा असावा.
७) प्रेषक, प्रति यांचे पत्ते कृतिपत्रिकेत दिलेले असतील तेच लिहावे.
८) पत्राच्या समारोपात आपला विश्वासू , आपला कृपाभिलाषी या शब्दांनी शेवट करून आवश्यकतेप्रमाणे अ.ब.क. किंवा कृतिपत्रिकेत असणारे नाव व पत्ता लिहावा,
९) पत्राच्या शेवटी पत्र लिहिणाऱ्याचे नाव, पत्ता व काल्पनिक ई-मेल आय डी लिहावा.
या सर्व मुद्यांचा पत्रलेखनात विचार करावा.

Letter writing in marathi

: औपचारिक ई – पत्राचा आराखडा  :

: औपचारिक ई – पत्राचा आराखडा  :

: अनौपचारिक ई – पत्राचा आराखडा  :

: अनौपचारिक ई – पत्राचा आराखडा  :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here