--> मराठी वाक्प्रचार त्यांचे अर्थ व वाक्यात उपयोग | marathi study

मराठी वाक्प्रचार त्यांचे अर्थ व वाक्यात उपयोग

मराठी वाक्प्रचार, त्यांचे अर्थ आणि वाक्यात उपयोग. वाक्प्रचारांच्या उदाहरणांसह तुमचे भाषिक ज्ञान वाढवा. सोप्या आणि प्रभावी मराठी शिकण्यासाठी वाचा

 


काही शब्दसमूहांचा भाषेत वापर करताना त्यांचा नेहमीचा प्रचलित अर्थ न राहता, त्यांना वेगळाच अर्थ प्राप्त होतो, त्यांना वाक्प्रचार म्हणतात.

वाक्प्रचार म्हणजे विशिष्ट शब्दसमूहांचा मूळ अर्थ (वाच्यार्थ) न राहता रूढीने प्रचलित असणारा वेगळा अर्थबंध होय.

उदाहरणार्थ,

(१) कान धरणे :

वाच्यार्थ : बोटांनी कान पकडणे.

वेगळा अर्थ : माफी मागणे.

वाक्य : आईने चूक समजावून सांगताच महेशने कान धरले.


(२) नाक मुरडणे :

वाच्यार्थ : नाक वाकडे करणे.

वेगळा अर्थ : नाराजी व्यक्त करणे.

वाक्य : शीतलने रूपाचा नटवेपणा बघून नाक मुरडले. म्हणून, 'कान धरणे' व 'नाक मुरडणे' हे वाक्प्रचार आहेत.


पुढील वाक्प्रचारांचा अर्थ व वाक्यांत उपयोग अभ्यासा :


✒ मनात अढी नसणे  : किल्मिष न ठेवणे, मनात डंख न ठेवणे..

वाक्य : स्पष्ट बोलणे झाल्यामुळे रघुरावांच्या मनात मनोहरबद्दल कोणतीही अढी नव्हती.


✒ अवहेलना करणे : अनादर करणे, अपमान करणे.

वाक्य : गुणवान माणसाची अवहेलना करू नये.


✒ अशुभाची सावली पडणे : विपरीत घडणे, अमंगल घडणे.

वाक्य : लग्नानंतर दोन महिन्यांत विधवा झालेल्या सुमनवर जणू अशुभाची सावली पडली.


✒ अंग चोरून घेणे : अंग (भीतीने) आक्सून घेणे.

वाक्य : गर्दीत घुसलेल्या प्रेक्षकांनी अंग चोरून घेतले.


✒ आटोक्यात नसणे - आवाक्याबाहेरचे काम असणे.

वाक्य : आटोक्यात नसलेले काम समीरने अतिशय कष्टाने पूर्ण केले.


✒ आण घेणे - शपथ घेणे.

वाक्य : कधीही दुष्कृत्य करणार नाही, अशी शिवरामने आण घेतली.


✒ आयुष्य गमावणे : जीवन संपवणे.

वाक्य : काही माणसे वाईट व्यसनांनी आपले आयुष्य गमावतात.


✒ आरती  ओवाळणे - खूप कौतुक करणे.

वाक्य : परीक्षेत जिल्ह्यात प्रथम आलेल्या शालिनीच्या यशाची सर्व गाव आरती ओवाळत होता.


✒  आवाहन करणे : चांगले काम करण्यासाठी बोलावणे.

वाक्य : प्रधानमंत्र्यांनी जनतेला स्वच्छता अभियानासाठी आवाहन केले.


✒ आव्हान देणे : प्रतिस्पर्ध्याला ललकारणे.

वाक्य : भैरू पहिलवानाने केरूला कुस्तीसाठी आव्हान दिले.


✒ उघड्यावर टाकणे : जबाबदारी झटकणे, निराधार करणे.

वाक्य : कर्मचाऱ्यांनी संप करून रस्ता दुरुस्तीचे काम उघड्यावर टाकले.


✒ उपकार फेडणे : कृतज्ञता दाखवणे, उतराई होणे.

वाक्य : ज्यांनी ज्यांनी आपणांस मदत केली, त्यांचे उपकार आपण फेडावेत.


✒ उंबरठा ओलांडणे - मर्यादा सोडणे.

वाक्य : आईला वाटेल तसे बोलून कार्तिकने उंबरठा ओलांडला.


✒ कटाक्ष असणे – खास लक्ष असणे, आग्रह असणे.

वाक्य : परीक्षेच्या कालावधीत मोहनचे आरोग्य नीट राहील यावर आईचा कटाक्ष असतो.


✒ कडी करणे - वरचढ ठरणे.

वाक्य : जुना रेकॉर्ड मोडून सरलाने धावण्याच्या शर्यतीत कडी केली.


✒ कपाळावरील कुंकू पुसले जाणे : पतीला मृत्यू येणे, विधवा होणे.

वाक्य : ऐन तारुण्यात मालतीच्या कपाळावरील कुंकू पुसले गेले.


✒ करी कंकण बांधणे : प्रतिज्ञा करणे, शपथ घेणे.

वाक्य : स्वराज्य स्थापन करण्याचे मावळ्यांनी करी कंकण बांधले.


✒ कस लागणे - गुणवत्ता सिद्ध होणे.

वाक्य : परीक्षेतच विद्यार्थ्यांच्या बुद्धीचा कस लागतो.


✒ कंबर बांधणे (कसणे) - दृढ निश्चय करणे.


वाक्य : नैसर्गिक संकटांना तोंड देण्यासाठी गावकऱ्यांनी कंबर कसली.

✒ कात टाकणे : जुन्या गोष्टींचा त्याग करून नवीन स्वरूप धारण करणे.

वाक्य : अंगी असलेल्या खोडकरपणाची कात टाकून अरुणने शिस्तीने वागण्याचे ठरवले.


✒ कानमंत्र देणे- गुप्त सल्ला देणे.

वाक्य : परीक्षेची तयार कशी करावी याचा काकांनी राजेशला कानमंत्र दिला.


✒  काया ओवाळून टाकणे : जीव कुर्बान करणे.

वाक्य : मावळ्यांनी शिवाजी महाराजांवर काया ओवाळून टाकली होती.


✒ कूस धन्य करणे :  जन्म सार्थकी लागणे.

वाक्य : उज्ज्वल यश मिळवून अमरने आईची कूस धन्य केली.


✒ कृतकृत्य होणे - धन्य धन्य होणे.

वाक्य : मुलाला नोकरी लागलेली पाहून रमाबाई कृतकृत्य झाल्या.


✒ कृतघ्न होणे - उपकार विसरणे.

वाक्य : सुरेशला मदत करणाऱ्यांशीच तो कृतघ्न झाला.


✒ कृतज्ञ असणे - उपकाराची जाणीव असणे.

वाक्य : सीमेचे रक्षण करणाऱ्या भारतीय जवानांबद्दल जनतेने कृतज्ञ असले पाहिजे.


✒ कोलमडून पडणे - मनाने ढासळणे.

वाक्य : अवेळी आलेल्या पावसाने पिकांची नासाडी झालेली पाहून शेतकरी कोलमडून गेले.


✒ खांदे पाडणे - निराश होणे, दीनवाणे होणे.

वाक्य : विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर येत नसल्यामुळे मधूने खांदे पाडले.


✒ खोडा घालणे - संकटे निर्माण करणे, विघ्न आणणे.

वाक्य : गावात येणाऱ्या चांगल्या प्रकल्पाला काही माणसांनी खोडा घातला.


✒ ख्याती मिळवणे : नाव कमावणे, प्रसिद्ध होणे.

वाक्य : सतत पाच वर्षे शंभर टक्के निकाल लावून आदर्श विदयालयाने ख्याती मिळवली.


✒ गाजावाजा होणे : प्रसिद्धी होणे.

वाक्य : महाराष्ट्र केसरी किताब मिळवल्यामुळे सुधीरचा जिल्ह्यात गाजावाजा झाला.


✒ गुण गाणे : स्तुती करणे,

वाक्य : आई आपल्या लहानग्या सरिताचे नेहमी गुण गाते.


✒ धाम गाळणे : खूप कष्ट करणे,

वाक्य : शेतकरी आपल्या शेतामध्ये दिवस-रात्र घाम गाळतात.


✒ चार पैसे गाठीला बांधणे : पैशांची बचत करणे.

वाक्य : शहरात राब राब राबून रामभाऊंनी गावी असलेल्या कुटुंबासाठी चार पैसे गाठीला बांधले.


✒ चारी मुंड्या चीत करणे : पूर्ण पराभव करणे.

वाक्य : भैरू पहिलवानाने कुस्तीत प्रतिस्पर्ध्याला चारी मुंड्या चीत केले.


✒ चूर होणे : मग्न होणे, गुंगणे,

वाक्य : समोरचे अप्रतिम निसर्गदृश्य बघण्यात मुले चूर झाली.


✒  चेहरा पांढरा फटफटीत पडणे : चेहऱ्यावर भीती पसरणे.

वाक्य : पोलिसांना समोर पाहताच चोराचा चेहरा पांढरा फटफटीत पडला.


✒  चोख असणे : व्यवस्थित असणे.

वाक्य : व्यावसायिकाने आपल्या व्यवसायात अत्यंत चोख असायला हवे.


✒  जप करणे : एकच बाब पुन्हा पुन्हा बोलणे.

वाक्य : आपले जीवन सुधारणाऱ्या गुरूंचा महेश सतत जप करीत असतो


✒  जवळीक साधणे : सलगी निर्माण करणे.

वाक्य : सुरेशची हुशारी पाहून रमेशने त्याच्याशी सलगी साधली.


✒  जिवाचा कान करणे : मन लावून ऐकणे.

वाक्य : पाहुण्यांचे भाषण विद्यार्थी जिवाचा कान करून ऐकत होते.


✒  जिवाची उलघाल होणे : मनाची तगमग होणे.

वाक्य : सहलीला जायला न मिळाल्यामुळे रमाच्या जिवाची उलघाल होत होती.


✒  जीव तोडून काम करणे : पराकोटीचे कष्ट करणे.

वाक्य : शेतकरी शेतात चांगले पीक येण्यासाठी दिवसरात्र जीव तोडून काम करतो.


✒  ज्योत तेवत ठेवणे : चांगले प्रयत्न सतत सुरू ठेवणे.

वाक्य : प्रत्येकाने पराकोटीच्या प्रयत्नांची ज्योत तेवत ठेवली पाहिजे.


✒  टकळी चालणे : एकसारखी बडबड करणे.

वाक्य : गावावरून आल्यापासून आजीची सारखी टकळी चालली होती.


✒ टाकून बोलणे : आडवे-तिडवे बोलणे, अपमानित करणारे शब्द बोलणे.

वाक्य : नम्रता येता-जाता सुशीलाला टाकून बोलते.


✒ डोळ्यातले अश्रू पुसणे : दुःख दूर करणे.

वाक्य : मदर तेरेसा यांनी गरिबांच्या डोळ्यांतले अभू पुसले,


✒ डोळे पाणावणे : रडू येणे.

वाक्य : राधा सासरी निघाल्यामुळे आईचे डोळे पाणावले.


✒ डोळे भरून येणे : डोळ्यात अश्रू दाटणे

वाक्य : मुलाचे यश पाहून आनंदाने यशोदाबाईचे डोळे भरून आले.


✒ तकार करणे – गाऱ्हाणे मांडणे,

वाक्य : सदाशिवरावांनी परिसरातील अस्वच्छतेविषयी आरोग्य खात्याकडे तक्रार केली.


✒ तडजोड करणे - समझोता करणे.

वाक्य : माधवने नाइलाजाने स्वत: च्या तत्त्वाशी तडजोड केली.


✒  तंद्री लागणे : गुंग होणे.

वाक्य:  गाणे म्हणताना राधाची तंद्री लागते.


✒  तारेवरची कसरत करणे : एकाच वेळी अनेक कामे सांभाळणे.

वाक्य : मोलकरीण रजेवर असल्यामुळे राधिकाला तारेवरची कसरत करावी लागत होती.


✒ ताव मारणे : पोटभर खाणे.

वाक्य : स्वातीच्या लग्नात सुधाकरने जिलेबीवर यथेच्छ ताव मारला.


✒ तोंड उघडणे :  थोडेसे बोलणे.

वाक्य : खोदून खोदून विचारल्यावर अखेर आपल्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध सदाशिवने तोंड उघडले.


✒ दम धरणे - धीर धरणे.

वाक्य : उत्तुंग यशासाठी माणसाने दम धरला पाहिजे.


✒ दम निघून जाणे : धीर सुटणे, हतबल होणे.

वाक्य : नदीला आलेल्या पुराचा सामना करता करता गावकऱ्यांचा दम निघून गेला.


✒  दुःखाची किंकाळी फोडणे :  खूप दुःख व्यक्त करणे, दुःख अनावर होणे.

वाक्य : तरुण मुलगा निवर्तल्याची वार्ता ऐकून आईने दुःखाची किंकाळी फोडली.


✒  दुरावत जाणे : लांब जाणे.

 वाक्य : आजची पिढी भावनिक गोष्टींपासून दुरावत चालली आहे.


✒  धूम ठोकणे : जोरात पळून जाणे.

वाक्य : पोलिसांची चाहूल लागताच चोरांनी धूम ठोकली.


✒ नजर खिळून राहणे : एकाग्रतेने पाहत राहणे.

वाक्य : प्रदर्शनातील सुंदर चित्रांवर प्रेक्षकांची नजर खिळून राहिली.


✒ नजर लागणे : काहीतरी वाईट घडने, विघ्न येणे.

वाक्य : नवीन इमारत कोसळली, तेव्हा राधाबाईंना वाटले, कुणाची तरी नजर लागली.


✒ नवी पालवी फुटणे : नवे स्वरूप मिळणे

वाक्य : या कंपनीत आपल्याला जरूर नोकरी मिळेल. या आशेने चंद्रकांतच्या मनात नवी पालवी फुटली.


✒ नाचक्की होणे : अबू जाणे, बदनामी होने.

वाक्य : परीक्षेत नापास होऊन मनूने स्वतःची नाचक्की करून घेतली.


✒ नाळ तुटणे : संबंध दुरावणे.

वाक्य : ज्या माणसांनी आपल्या सहकार्य केलेले असते, त्यांच्याशी कधी तोडू नये


✒ निरोप देणे - जाण्यासाठी परवानगी देणे.

वाक्य : गावाला जायला निघालेल्या आजीला बाबांनी आनंदाने निरोप दिला.


✒ निंदा करणे : एखाद्याच्या पश्चात वाईट बोलणे.

वाक्य :  कुणाचीही निंदा करणे हे गैर कृत्य आहे.


✒ पदार्पण करणे : (कोणत्याही क्षेत्रात / कोणत्याही बाबतीत) पहिले पाऊल टाकणे.

वाक्य : शालेय स्नेहसंमेलनात प्राचीने रंगमंचावर पदार्पण केले.


✒ पर्वणी असणे : आनंददायी गोष्ट असणे.

वाक्य : गावची जत्रा म्हणजे गावकऱ्यांना आनंदाची पर्वणी असते.


✒ पळता भुई थोडी होणे - फजिती होणे..

वाक्य : महाराजांनी हल्ला करताच मोगल सैन्याची पळता भुई थोडी झाली,


✒ पाठ थोपटणे- शाबासकी देणे.

वाक्य : वर्गात पहिल्या नंबरने पास झालेल्या प्रभाकरची सरांनी पाठ थोपटली.


✒ पाठीशी उभे राहणे : आधार होणे, धीर देणे,

वाक्य : भर संकटात बापू हा रामूच्या पाठीशी उभा राहिला.


✒ पापांचा घडा भरणे : सर्वनाशाचा क्षण जवळ येणे.

वाक्य : भुरट्या चोऱ्या करणाऱ्या रामूने आपल्या मालकाच्या घरची तिजोरी फोडली, तेव्हा त्याच्या पापांचा घडा भरला.


✒ पिकले पान गळणे - मृत्यू पावणे.

वाक्य : वयाच्या नव्वदाव्या वर्षी अखेर रामभाऊंचे पिकले पान गळले.


✒  पुनर्जीवित करणे : बंद पडलेले कार्य पुन्हा सुरू करणे,

वाक्य : गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान सरकारने पुनर्जीवित केले.


✒ प्रशंसा करणे : स्तुती करणे.

वाक्य : चित्रकलेत प्रथम आलेल्या शीतलची मुख्याध्यापकांनी भरपूर प्रशंसा केली.


✒ प्रेरणा देणे- स्फूर्ती देणे.

वाक्य : सचिन तेंडुलकरने विराट कोहलीला क्रिकेटची प्रेरणा दिली.


✒ बचत करणे - काटकसर करणे.

वाक्य : मासिक पगारातून उदयने नेहमी थोड्या पैशांची बचत केली होती.


✒ बेगमी करणे - भविष्यासाठी संग्रह करणे.

वाक्य : उद्योगी मुंग्या कण कण गोळा करून पावसाळ्यासाठी बेगमी करतात.


✒ भडाभडा बोलणे - मनात साचलेले एकदम बोलणे.

वाक्य : आपले दुःख रमाबाई भडाभडा बोलून टाकतात.


✒ भविष्याचा वेध घेणे - पुढच्या काळाचा अंदाज बांधणे.

वाक्य : तंत्रज्ञानात प्रगती करून शास्त्रज्ञांनी भविष्याचा वेध घेतला.


✒ भान हरपणे – मग्न होणे.

वाक्य : सनसेट पॉइंटवर मुले भान हरपून सूर्यास्त पाहत होती.


✒ भेदरून जाणे - घाबरणे.

वाक्य : अचानक संकट कोसळल्यामुळे महादू अगदी भेदरून गेला...


✒ भ्रांत असणे - विवेचना (काळजी असणे.

वाक्य : हातावर पोट असणाऱ्या मजुरांना उदद्याची प्रांत असते.


✒ मात करणे - विजयी होणे.

वाक्य - टी-२० च्या फायनलमध्ये भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियावर मात केली,


✒ मातीचे देणे फेडणे - मातृभूमीचे उपकार फेडणे.

वाक्य : आपण ज्या भूमीत जन्म घेतला त्या मातीचे देणे फेडायला हवे.


✒ मातीला मिळणे - नाश होणे, विध्वंस होणे.

वाक्य : माणसाचा देह नश्वर आहे. शेवटी तो मातीला मिळतो.


✒ मानवंदना देणे - आदरपूर्वक सन्मान करणे,

वाक्य : स्वातंत्र्यदिनी विदद्यालयातील सर्व विदयार्थ्यांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.


✒ मुखर करणे - भावना शब्दांत व्यक्त करणे.

वाक्य : आपल्या मनात उमटलेल्या भावना नेहमी कागदावर मुखर कराव्यात.


✒ मुद्रा उमटणे : ठसा उमटणे.

वाक्य : मितालीने पोहण्याच्या स्पर्धेत पहिला क्रमांक पटकवून स्पर्धेमध्ये स्वतःची मुद्रा उमटवली.


✒ रया जाणे - मूळ रुबाब निघून जाणे.

वाक्य : शंभर वर्षांनंतर इनामदारांच्या वाड्याची रया गेली.


✒ रंगात येणे - तल्लीन होणे, आनंदाने गुंग होणे.

वाक्य : नाटकातील भूमिका करताना नीलेश अगदी रंगात आला.


✒ ऱ्हास होणे - नाश होणे.

वाक्य : जुन्या बुरसटलेल्या रुढींचा -हास होणे आवश्यक आहे.


✒ लुप्त होणे - नाहीसे होणे.

वाक्य : सूर्यप्रकाश पसरताच नदीवर पडलेले धुके लुप्त झाले.


✒ वठणीवर आणणे - योग्य मार्ग दाखवणे.

वाक्य : कानउघडणी करून रामरावांनी महादूला वठणीवर आणले,


✒ वाखाणणी करणे - प्रशंसा करणे.

वाक्य : वक्तृत्व स्पर्धेत पहिल्या आलेल्या गणेशची मॅडमनी वर्गात वाखाणणी केली.


✒ शिंग फुंकणे - लढा देण्यास सुरुवात करणे.

वाक्य : पारतंत्र्याविरुद्ध उठाव करण्यासाठी क्रांतिवीरांनी शिंग फुंकले.


✒ संजीवनी मिळणे - जीवदान देणे.

वाक्य : सरकारच्या निर्णयामुळे जुन्या सामाजिक हिताच्या योजनांना संजीवनी मिळाली.


✒ संसार फुलणे- संसारात सुखसमृद्धी येणे.

वाक्य : मुले नोकरीला लागल्यावर सीताबाईंचा संसार फुलला.


✒ स्वप्न साकार करणे - स्वप्न प्रत्यक्षात येणे,

वाक्य : भारतीय क्रिकेट संघाने वन-डेमध्ये विश्वविजेते होण्याचे स्वप्न साकार केले.


✒ स्तिमित होणे - थक्क होणे, आश्चर्यचकित होणे,

वाक्य : दिव्यांग मुलांची प्रदर्शनातील चित्रे पाहून प्रमुख पाहुणे स्तिमित झाले.


✒ हद्दपार होणे - सीमेबाहेर जाणे (जीवनातून निघून जाणे).

वाक्य : मालकाशी बेइमानी केल्यामुळे लज्जित होऊन पिकू गावातून हद्दपार झाला.


COMMENTS

नाव

इंग्रजी उपयोजित लेखन,2,इंग्रजी व्याकरण,1,मराठी उपयोजित लेखन,2,मराठी व्याकरण,5,शैक्षणिक Update,8,
ltr
item
marathi study : मराठी वाक्प्रचार त्यांचे अर्थ व वाक्यात उपयोग
मराठी वाक्प्रचार त्यांचे अर्थ व वाक्यात उपयोग
मराठी वाक्प्रचार, त्यांचे अर्थ आणि वाक्यात उपयोग. वाक्प्रचारांच्या उदाहरणांसह तुमचे भाषिक ज्ञान वाढवा. सोप्या आणि प्रभावी मराठी शिकण्यासाठी वाचा
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEh8JfNu0PLH978O3NLLN8kAdPf1ZzJxgp3Zx60Gl93JTp3UaXS0c_xJZCMZP2nyNccY0gYW_7lM-0PjXHGFqHZ2775e86y9JLPwFNCdr_sUHXDn9fMasrDathfnW-zWePSAyEnQtVhd_aQcOTu_2z5y9_hkhIjueqy1xRVBDcAHLlv46sVOTjGLin4NNMfR/s16000/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80%20%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%20%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87%20%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%20%E0%A4%B5%20%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%20%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97.png
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEh8JfNu0PLH978O3NLLN8kAdPf1ZzJxgp3Zx60Gl93JTp3UaXS0c_xJZCMZP2nyNccY0gYW_7lM-0PjXHGFqHZ2775e86y9JLPwFNCdr_sUHXDn9fMasrDathfnW-zWePSAyEnQtVhd_aQcOTu_2z5y9_hkhIjueqy1xRVBDcAHLlv46sVOTjGLin4NNMfR/s72-c/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80%20%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%20%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87%20%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%20%E0%A4%B5%20%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%20%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97.png
marathi study
https://www.marathistudy.com/2025/01/marathi%20vakprachar%20tyanche%20arth%20v%20vaakyaat%20upyog.html
https://www.marathistudy.com/
https://www.marathistudy.com/
https://www.marathistudy.com/2025/01/marathi%20vakprachar%20tyanche%20arth%20v%20vaakyaat%20upyog.html
true
5159341443364317147
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read More Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content