इयत्ता ७ वी शिष्यवृत्ती परीक्षा बुद्धिमत्ता चाचणीतील इंग्रजी अक्षरमाला घटकावर आधारित २५ महत्त्वपूर्ण MCQ प्रश्नांची ऑनलाइन सराव चाचणी सोडवा.
इंग्रजी अक्षरमाला (वर्णमाला) या घटकामध्ये दोन अक्षरांमधील अंतर, गटातील अक्षरे, किंवा डाव्या व उजव्या बाजूने विशिष्ट क्रमांकाचे अक्षर शोधणे यावर आधारित प्रश्न विचारले जातात. यामध्ये अक्षरांचे अनुक्रमांक अतिशय महत्त्वाचे ठरतात.
या अक्षरमालेची रचना आणि त्यासंबंधीचे महत्त्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे आहेत:
१. अक्षरमालेची रचना व अनुक्रमांक
• ५/५ अक्षरांचे ५ गट: अक्षरमालेत एकूण २५ अक्षरे असून त्यांची विभागणी ५-५ अक्षरांच्या ५ गटांमध्ये केली जाते.
- गट १ : A, B, C, D, E
- गट २ : F, G, H, I, J
- गट ३ : K, L, M, N, O
- गट ४ : P, Q, R, S, T
- गट ५ : U, V, W, X, Y
• दोन्ही बाजूंनी क्रमांक: अक्षरांचे डावीकडून उजवीकडे आणि उजवीकडून डावीकडे असे दोन्ही बाजूंचे क्रमांक लक्षात ठेवणे आवश्यक असते.
- डावीकडून मोजल्यास: 'A' चा क्रमांक १ ला आणि 'Y' चा क्रमांक २५ वा येतो.
- उजवीकडून मोजल्यास: 'Y' चा क्रमांक १ ला आणि 'A' चा क्रमांक २५ वा येतो.
२. प्रश्न सोडवण्यासाठी महत्त्वाचे नियम व मुद्दे
- 'दोन अक्षरांच्या दरम्यान': असा उल्लेख असल्यास, ती दोन अक्षरे वगळून त्यांच्यामध्ये असणारी सर्व अक्षरे मोजावीत.
- 'एका अक्षरापासून दुसऱ्या अक्षरापर्यंत': असे म्हटले असल्यास, ती दोन्ही अक्षरे धरून (मोजण्यात समाविष्ट करून) त्यांच्यामधील सर्व अक्षरे मोजावीत.
- 'अक्षरापासून' मोजणे: प्रश्नामध्ये एखाद्या विशिष्ट 'अक्षरापासून' मोजण्यास सांगितले असल्यास, मोजताना त्या मूळ अक्षराचा क्रमांक १ धरावा.
- अक्षराच्या 'उजवीकडे/डावीकडे' मोजणे: असा उल्लेख असल्यास, मोजताना त्या अक्षराच्या पुढील किंवा मागील लगतच्या अक्षराचा क्रमांक 'पहिले' (अर्थात क्रमांक १) धरावा.
- 'मधोमध/मध्यभागी येणारे अक्षर' शोधणे: दोन अक्षरांच्या अगदी मध्यभागी येणारे अक्षर शोधण्यासाठी, त्या दोन अक्षरांचे अनुक्रमांक मिळवून (बेरीज करून) ती संख्या निम्मे (अर्धी) करावी. येणाऱ्या संख्येतक्या क्रमांकाचे अक्षर हे त्यांच्या मधोमध येणारे अक्षर असते.
बुद्धिमत्ता चाचणी : इंग्रजी अक्षरमाला MCQ TEST
इयत्ता 7 वी | शिष्यवृत्ती परीक्षा
25
एकूण प्रश्न
10
मिनिटे
25
एकूण गुण
चाचणी सूचना
- प्रत्येक प्रश्नासाठी चार पर्याय दिले आहेत.
- प्रत्येक प्रश्नाला एक गुण आहे.
- प्रश्नांचा क्रम प्रत्येक वेळी Random पद्धतीने बदलेल.
- उत्तर निवडल्यानंतर योग्य किंवा चुकीचे उत्तर लगेच दिसेल.
- दिलेल्या वेळेत चाचणी पूर्ण करा.

COMMENTS