इयत्ता ७ वी शिष्यवृत्ती परीक्षा तयारीसाठी बुद्धिमत्ता चाचणी, आकलन व भाषाज्ञान विषयांवरील ONLINE MCQ TEST SERIES.
शिष्यवृत्ती परीक्षा बुद्धिमत्ता चाचणी आकलन- भाषाज्ञान
ओळख :
भाषाज्ञान या उपघटकामध्ये शब्दसंग्रह, सामान्यज्ञान, मराठी भाषेवरील प्रभुत्व, व्याकरण यासंबं प्रश्न विचारलेले असतात. या उपघटकांत पुढील विविध घटकांवर आधारित प्रश्न असतात.
(i) मराठी व्याकरणातील नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद
(ii) समानार्थी / विरुद्धार्थी शब्द
(iii) लिंग, वचन
(iv) विरामचिन्हे
(v) शब्दसमूहासाठी एक शब्द
(vi) अक्षरसमूहापासून अर्थपूर्ण शब्द बनवणे.
(vii) इंग्रजी शब्दांसाठी पर्यायी मराठी शब्द / इंग्रजी शब्दातील अक्षरांपासून बनणारे शब्द
(viii) वाक्प्रचार व म्हणी, वर्णप्रकार - अनुनासिके
(ix) शब्दांचा अकारविल्हे क्रम
(x) साहित्यिक, त्यांची टोपणनावे, त्यांची पुस्तके/लेखन.
आहे. थोडक्यात या उपघटकातील प्रश्न सोडवण्यासाठी भाषेचे, त्यातील शब्दांचे व व्याकरणाचे ज्ञान आवश्यक

महत्त्वाचे मुद्दे :
- वर्णमाला, चौदाखडी, वर्षांचे प्रकार यांची उजळणी करा.
- पाठ्यपुस्तकांतील पाठांचे तसेच भाषेच्या व्याकरणाच्या पुस्तकाचे सखोल वाचन करा.
- पाठ्यपुस्तकातील (भाषा) साहित्यिकांची माहिती अभ्यासा.
- मराठी महिने, ऋतू, समूहदर्शक शब्द, प्राण्यांचे आवाज, प्राण्यांची पिल्ले वगैरेंचा अभ्यास करून शब्दसंपत्ती वाढवा.

नमुना प्रश्न :
- 'बालकवी' म्हणून ओळख असलेल्या कवीचे खरे नाव काय आहे?
(1) विं. दा. करंदीकर
(2) भा. रा. तांबे
(3) त्र्यंबक बापूजी ठोंबरे
(4) ग. दि. माडगूळकर
उत्तर : पर्याय - 3
स्पष्टीकरण : त्र्यंबक बापूजी ठोंबरे हे निसर्गकवी म्हणून प्रसिद्ध आहेत. 1907 साली जळगाव येथील कविसंमेलनात त्यांना 'बालकवी' म्हणून गौरवण्यात आले; म्हणून पर्याय (3) हे उत्तर.
बुद्धिमत्ता चाचणी_आकलन : भाषाज्ञान MCQ Test
इयत्ता 7 वी | शिष्यवृत्ती परीक्षा
25
एकूण प्रश्न
10
मिनिटे
25
एकूण गुण
चाचणी सूचना
- प्रत्येक प्रश्नासाठी चार पर्याय दिले आहेत.
- प्रत्येक प्रश्नाला एक गुण आहे.
- प्रश्नांचा क्रम प्रत्येक वेळी Random पद्धतीने बदलेल.
- उत्तर निवडल्यानंतर योग्य किंवा चुकीचे उत्तर लगेच दिसेल.
- दिलेल्या वेळेत चाचणी पूर्ण करा.

COMMENTS