--> SSC बोर्ड मार्च 2026 : दहावी विज्ञान 1 Answer Key | पूर्ण उत्तरे आणि सोल्यूशन | मराठी स्टडी | Marathi study

SSC बोर्ड मार्च 2026 : दहावी विज्ञान 1 Answer Key | पूर्ण उत्तरे आणि सोल्यूशन

SSC बोर्ड मार्च 2026 दहावी विज्ञान व तंत्रज्ञान भाग 1 (Science 1) Answer Key येथे पाहा. सर्व प्रश्नांची पूर्ण उत्तरे, पेपर विश्लेषण

 

1. (अ) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यायाचा क्रमांक लिहा :

  1.  
  2. आधुनिक आवर्तसारणीत अधातू खंडात --------------------   आहेत.
      (अ)     s
      
    (ब)     p
      
    (क)    d
      
    ( ड)    f

     उत्तर :     p  

  3. एका तारेचा रोध 100 Ω आहे. त्या तारेतून 1 A विद्युतधारा 10 सेकंद प्रवाहीत
    केल्यास निर्माण झालेली उष्णता  ---------------  असेल.
    (अ) 10 J
    (ब) 10000 J
    (क) 0.1 J
    (ड) 1000 J

    उत्तर :  1000 J

  4. हिन्याचा अपवर्तनांक  -----------------------  आहे.
      (अ)     2.42
      
    (ब)    1.54
      
    (क)    1.36
      
    ( ड)    1.50

     उत्तर :   
     2.42  

  5. निरोगी मानवी डोळ्याचे सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर  -----------------------  आहे.
      (अ)     50 सेमी 
      
    (ब)     75 सेमी 
      
    (क)    25 सेमी 
      
    ( ड)    22 सेमी 

     उत्तर :     25 सेमी 
(ब) खालील प्रश्नांची उत्तरे लिहा  :
    (i) गटात न बसणारे घटक लिहा :
          अन्न शिजणे, फळ परिपक्व होणे, दुधाचे दह्यात रूपांतर होणे, बर्फाचे पाण्यात  रूपांतर होणे.

    उत्तर : बर्फाचे पाण्यात  रूपांतर होणे.

   (ii)  पहिला सहसंबंध विचारात घेऊन दुसरा सहसंबंध पूर्ण करा : 
                     वस्तुमान : किलोग्रॅम : वजन :  --------------
   
         उत्तर :      N


    (iii) खालील विधान चूक की बरोबर ते सांगा :
            पाण्याचे आकारमान 4°C ला सर्वात जास्त असते.
     
           उत्तर :  चूक 


    (iv) योग्य जोडी जुळवा : ,
 
     'अ' स्तंभ                                        'ब' स्तंभ
       थर्मामीटर                           (a) यांत्रिक उर्जा 
                                                (b) तापमान मोजणे 
                                                (c) विद्युतधारा मोजणे 

    उत्तर :  थर्मामीटर-  तापमान मोजणे 


(v) प्रकाशाच्या अपस्करणात जांभळ्या किरणांची तरंगलांबी किती असते ?

 उत्तर :   400 NM


2. (अ) शास्त्रीय कारणे लिहा (कोणतीही दोन) :
   
   (i) ध्रुवीय प्रदेशाच्या अभ्यासासाठी भू-स्थिर उपग्रह उपयोगी पडत नाही.
   उत्तर :
 (1) भूस्थिर उपग्रहांची भ्रमणकक्षा ही विषुववृत्ताच्या प्रतलात असते. पृथ्वीची दैनिक परिवलन गती आणि या उपग्रहांची भ्रमणगती यांची दिशा एकच असते. तसेच या उपग्रहांच्या भ्रमणगतीचा आवर्तकाल हा पृथ्वीच्या दैनिक परिवलन गतीच्या आवर्तकालाएवढा असतो. त्यामुळे त्यांची समोरासमोरील सापेक्ष स्थितीही स्थिर राहते.
(2) हे उपग्रह कधीही ध्रुवीय प्रदेशांवरून जात नाहीत, तर विषुववृत्तावरील एकाच ठिकाणासमोर स्थिर राहतात. त्यामुळे भूस्थिर उपग्रह हे ध्रुवीय प्रदेशांच्या अभ्यासासाठी उपयुक्त ठरत नाहीत.
    
    (ii) वनस्पतीजन्य तेलापासून वनस्पती तूप बनविताना निकेल हा उत्प्रेरक वापरतात.
 उत्तर :
  1) वनस्पती तेलाच्या रेणूंमध्ये लांब व असंपृक्त कार्बन शृंखला असतात. कार्बन-कार्बन बहुबंध हा क्रियात्मक गट असलेली असंपृक्त संयुगे समावेशन अभिक्रिया देतात व तयार होणारे उत्पादित हे संपृक्त संयुग असते.
(2) वनस्पती तेलांचे निकेल उत्प्रेरक वापरून हायड्रोजनीभवन करतात. हायड्रोजनीभवनामुळे समावेशन अभिक्रिया होते व त्याचे रूपांतर संपक्क शृंखलेमध्ये होते, त्यामुळे वनस्पती तूप तयार होते
     
    (iii) गणामध्ये वरून खाली जाताना अणुत्रिज्या वाढत जाते.
उत्तर :
(1) अणूच्या त्रिज्येवरून अणूचा आकार ठरवला जातो.
(2) गणात वरून खाली जाताना नव्या कवचाची भर पडून अणुकेंद्रक व संयुजा- इलेक्ट्रॉन यांच्यातील अंतर वाढते. त्यामुळे परिणामी केंद्रकीय प्रभार कमी होऊन संयुजा-इलेक्ट्रॉनवरील आकर्षणबल कमी होते, म्हणून गणामध्ये वरून खाली जाताना अणुत्रिज्याही वाढत जाते व आकारमानही वाढते.


  (ब) खालील उपप्रश्न सोडवा (कोणतेही तीन) : 
     (i) संमिश्रे म्हणजे काय ? त्यांची दोन उदाहरणे दया.
      उत्तर : 
एका धातू मध्ये ठराविक प्रमाणात इतर धातू किंवा अधातू मिसळून तयार होणाऱ्या एकजिनसी मिश्रणास संमिश्र म्हणतात.
उदा: ब्राँझ, पितळ, स्टील

      (ii)  फरक स्पष्ट करा :
                   ऑक्सिडीकरण आणि क्षपण.
         उत्तर :
ऑक्सिडीकरण
  1. ज्या रासायनिक अभिक्रियेत, अभिक्रियाकारक ऑक्सिजन स्वीकारतो, त्याला ऑक्सिडी-करण म्हणतात.
  2. ऑक्सिडीकरण अभिक्रियेत हायड्रोजन निघून जातो.
  3. या अभिक्रियेत धातू किंवा आयन इलेक्ट्रॉन गमावतात.
क्षपण.
    1. ज्या रासायनिक अभिक्रियेत, अभिक्रियाकारक हायड्रोजन -स्वीकारतो, त्याला क्षपण म्हणतात.
    2. क्षपण अभिक्रियेत ऑक्सिजन निघून जातो.
    3. या अभिक्रियेत धातू किंवा आयन इलेक्ट्रॉन स्वीकारतात.
     
   (iii) बेन्झिनचे रेणुसूत्र लिहा व रचनासूत्र काढा.
    उत्तर :
 



   (iv)  विजेचा एक टंगस्टन दिवा घरी परिपथात बसविला आहे. घरगुती विद्युतपुरव 220 V इतक्या विद्युतविभवांतरावर चालतो. चालू केल्यावर जर 0.45 A इतकी विद्युतधारा दिव्यातून वाहात असेल तर दिवा किती W विद्युतशक्तीचा असला पाहिजे ? हा दिवा 10 तास चालू ठेवला तर किती युनिट वीज खर्च होईल ?


  उत्तर :  

दिलेली माहिती : विभवांतर = 220 V
विद्युतधारा = 0.45 A

विद्युतशक्ती (W) = विभवातर (V) x विद्युतधारा (I)
= 220 x 0.45 W
= 99 W
म्हणून दिवा 99W चा असला पाहिजे.
10 तासात
99W x 10 h = 990 Wh
= 0.99 kWh
= 0.99 unit इतकी वीज खर्च होईल.


 ( v ) इंद्रधनुष्य हे प्रकाशाचे अपस्करण, अपवर्तन आणि आंतरिक परावर्तन ह्या तीनही नैसर्गिक
घटनांचे एकत्रीकरण आहे. हे विधान स्पष्ट करा.
    उत्तर : 
(1) पाऊस थांबल्यावर, वातावरणातील पाण्याच्या थेंबांमुळे सूर्यप्रकाशाचे अपवर्तन, अपस्करण, आंतरिक परावर्तन व पुन्हा अपवर्तन झाल्यामुळे आकाशात इंद्रधनुष्य दिसते.

(ii) पाण्यातून हवेत शिरताना प्रकाशाचे अपवर्तन होते.
(2) सूर्यप्रकाश म्हणजे जांभळा, पारवा, निळा, हिरवा, पिवळा, नारिंगी व तांबडा अशा सात रंगांचे मिश्रण होय. पाऊस थांबल्यावर वातावरणात पाण्याचे असंख्य लहान थेंब असतात सूर्यप्रकाश पाण्याच्या थेंबांवर पडला असता :
    (i) हवेतून पाण्यात शिरताना प्रकाशाचे अपवर्तन व अपस्करण होते.
    (ii) पाण्याच्या थेंबांमध्ये प्रकाशाचे आंतरिक परावर्तन होते.
(3) पाण्याचा अपवर्तनांक वेगवेगळ्या रंगांच्या प्रकाशासाठी वेगवेगळा असतो, जांभळ्या रंगासाठी तो सर्वांत जास्त, तर तांबड्या रंगासाठी तो सर्वात कमी असतो. त्यामुळे हवेतून पाण्यात शिरताना प्रकाशाचे अपस्करण होते.
(4) वातावरणात पाण्याचे असंख्य थेंब असतात व ते छोट्या लोलका प्रमाणे कार्य करतात त्यांच्या एकत्रित परिणामाने इंद्रधनुष्य तयार होते. यात तांबडा रंग बाहेरच्या बाजूला, तर जांभळा रंग आतल्या बाजूला असतो. इतर पाच रंग या रंगांच्यादरम्यान असतात.
   इंद्रधनुष्य दिसण्यासाठी सूर्य निरीक्षकाच्या मागच्या बाजूला असला पाहिजे, तर पाण्याचे थेंब  निरीक्षकाच्या पुढच्या बाजूला असले पाहिजेत.

3. खालीलपैकी कोणतेही पाच प्रश्न  सोडवा  :

 (i)  पृथ्वीचे वस्तुमान तिचे आहे त्या वस्तुमानापेक्षा चार पट असते तर 35780 किमी. उंच कक्षेत फिरणाऱ्या उपग्रहाला पृथ्वीभोवती 1 प्रदक्षिणा करण्यास किती कालावधी लागला असता ?

उत्तर : 



(ii) खालील आकृतीचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा :



 (अ) मोठ्या परीक्षानळीत फसफसून येणारा वायू कोणता आहे ?
उत्तर :   CO2

(ब) चुन्याच्या निवळीच्या रंगात काय बदल होतो ?
उत्तर :  पांढरी होते किंवा दुधाळ होते 

(क) संबंधित रासायनिक समीकरण लिहा.
उत्तर :    


(iii) खालील उताऱ्याचे वाचन करा व विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा :
    उष्ण व थंड वस्तूंमध्ये उष्णतेची देवाणघेवाण झाल्यास उष्ण वस्तूचे तापमान कमी होत जाते व थंड वस्तूचे तापमान वाढत जाते. जोपर्यंत दोन्ही वस्तूंचे तापमान सारखे होत नाही तोपर्यंत तापमानातील हा बदल होत राहतो. या क्रियेत गरम वस्तू उष्णता गमावतो तर थंड वस्तू उष्णता ग्रहण करते. दोन्ही वस्तू फक्त एकमेकांमध्ये ऊर्जेची देवाणघेवाण करू शकतात. अशा स्थितीत असल्यास म्हणजेच जर दोनही वस्तूंची प्रणाली वातावरणापासून वेगळी केल्यास प्रणालीमधून उष्णता आतही येणार नाही किंवा बाहेरही जाणार नाही.

(अ) उष्णता स्थानांतरण कोठून कोठे होते ?
उत्तर :  उष्ण वस्तूकडून थंड वस्तू कडे होते.

(ब) अशा स्थितीत आपणास उष्णतेच्या कोणत्या तत्त्वाचा बोध होतो ?
उत्तर :  उष्णता विनिमयाच्या तत्त्वाचा बोध होतो.

(क)  ते तत्त्व थोडक्यात कसे सांगता येईल ?
उत्तर :    उष्ण वस्तूने गमावलेली उष्णता = थंड वस्तूने ग्रहण केलेली उष्णता 


 (iv) विद्युतचलित्राची सुबक नामनिर्देशित आकृती काढून तत्त्व लिहा.
    उत्तर :

विद्युतधारा वाहून नेणारा वाहक चुंबकीय क्षेत्राशी लंब दिशेत असेल, तर त्यावर जास्तीत जास्त बल प्रयुक्त होते. विद्युतचलित्राच्या विद्युतधारा प्रवाहित केलेल्या कुंडलावर चुंबकीय क्षेत्रामुळे प्रयुक्त झालेल्या बलांमुळे कुंडल स्वतःच्या आसाभोवती फिरत राहते.

 (v)








COMMENTS

नाव

१० वी इतिहास,1,इंग्रजी,6,इंग्रजी उपयोजित लेखन,4,इंग्रजी व्याकरण,3,इतर,1,इतिहास,2,इयत्ता नववी,5,दहावी मराठी कुमारभारती,3,प्रश्नपत्रिका,19,मराठी,3,मराठी उपयोजित लेखन,13,मराठी कुमारभारती,1,मराठी व्याकरण,8,महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHA-TET),1,शैक्षणिक Update,30,हिंदी रचना विभाग,3,हिंदी व्याकरण,10,
ltr
item
मराठी स्टडी | Marathi study: SSC बोर्ड मार्च 2026 : दहावी विज्ञान 1 Answer Key | पूर्ण उत्तरे आणि सोल्यूशन
SSC बोर्ड मार्च 2026 : दहावी विज्ञान 1 Answer Key | पूर्ण उत्तरे आणि सोल्यूशन
SSC बोर्ड मार्च 2026 दहावी विज्ञान व तंत्रज्ञान भाग 1 (Science 1) Answer Key येथे पाहा. सर्व प्रश्नांची पूर्ण उत्तरे, पेपर विश्लेषण
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhjQHs_r5R0RxaBPPEt0synLkYaQoFmzS5oIJPMG_9nCRoJwvpDh3a-hc9zFR_LcbhsBKN3dLFKDwnrH9cBRmnVn4jNMfw0myPa6oTPwi8xWCJbX96taKHXfRtXIs3S5Uyw9BbQwK5-9alXWhMi2T1iBKwTs7R9fPVwjJja2qtPVHpJEOJUp6GUCERxLW13/s16000/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A8%20%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97%201%20mar-26.png
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhjQHs_r5R0RxaBPPEt0synLkYaQoFmzS5oIJPMG_9nCRoJwvpDh3a-hc9zFR_LcbhsBKN3dLFKDwnrH9cBRmnVn4jNMfw0myPa6oTPwi8xWCJbX96taKHXfRtXIs3S5Uyw9BbQwK5-9alXWhMi2T1iBKwTs7R9fPVwjJja2qtPVHpJEOJUp6GUCERxLW13/s72-c/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A8%20%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97%201%20mar-26.png
मराठी स्टडी | Marathi study
https://www.marathistudy.com/2026/03/ssc-board-march-2026-10th-science-1-answer-key.html
https://www.marathistudy.com/
https://www.marathistudy.com/
https://www.marathistudy.com/2026/03/ssc-board-march-2026-10th-science-1-answer-key.html
true
5159341443364317147
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy