--> SSC बोर्ड मार्च 2026 : दहावी विज्ञान व तंत्रज्ञान भाग 2 Answer Key | संपूर्ण उत्तरपत्रिका | मराठी स्टडी | Marathi study

SSC बोर्ड मार्च 2026 : दहावी विज्ञान व तंत्रज्ञान भाग 2 Answer Key | संपूर्ण उत्तरपत्रिका

SSC बोर्ड मार्च 2026 दहावी विज्ञान व तंत्रज्ञान भाग 2 (Science 2) Answer Key येथे पाहा. 13 मार्च 2026 च्या पेपरची संपूर्ण उत्तरपत्रिका,

 



प्र. 1. (अ) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यायाचा क्रमांक लिहा :

  • (i) अचानक घडणा-या बदलांमागील कार्यकारण भाव ह्युगो द व्हीस यांच्या ---------------सिद्धांतामुळे लक्षात आला.
        (अ) आंत्रपुच्छ             (ब) उत्परिवर्तन 
         (क) प्रतिलेखन        (ड) स्थानांतरण 
     
    उत्तर : अचानक घडणा-या बदलांमागील कार्यकारण भाव ह्युगो द व्हीस यांच्या उत्परिवर्तन सिद्धांतामुळे लक्षात आला.

    (ii) एका ग्लुकोज रेणूचे पूर्ण ऑक्सिडीकरण झाल्यावर ATP चे एकूण ----------  रेणू  मिळतात.
       
          (अ) 18   (ब) 28    (क) 38   (ड) 48

    उत्तर : एका ग्लुकोज रेणूचे पूर्ण ऑक्सिडीकरण झाल्यावर ATP चे एकूण   38   रेणू  मिळतात.

    (iii) ) वटवाघूळाचा समावेश ----------------------   वर्गात होतो.
             (अ) उभयचर         (क) सरीसृप 
              (ब) पक्षी              (ड) सस्तन 

    उत्तर : वटवाघूळाचा समावेश  सस्तन    वर्गात होतो.

     (iv) महाराष्ट्रातील ---------------- येथे प्रमुख जलविद्युत निर्मिती केंद्र आहे.
              (अ) चन्द्रपूर     (ब) कोयना     
              (क) परळी     (ड) तारापूर 
     
    उत्तर : महाराष्ट्रातील कोयना  येथे प्रमुख जलविद्युत निर्मिती केंद्र आहे.

    (v) सायबर गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र विभाग निर्माण करणारे देशातील --------------हे पहिले राज्य ठरले आहे.
               (अ) मध्यप्रदेश        (ब) महाराष्ट्र   
               (क) गुजरात           (ड) कर्नाटक  
      
    उत्तर : 
    सायबर गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र विभाग निर्माण करणारे देशातील  महाराष्ट्र  हे पहिले राज्य ठरले आहे.
Science 2 Answer Key | विज्ञान 2 संपूर्ण उत्तरपत्रिका

प्र. 1. (ब) खालील प्रश्नांची उत्तरे लिहा :

  • ( i) रिकाम्या चौकटीत योग्य शब्द लिहा :

     उत्तर : 



     (ii) जागतिक जैवविविधता दिन कधी साजरा करतात ?

     उत्तर :  जागतिक जैवविविधता दिन 22 मे रोजी  साजरा करतात 

    (iii) ओळखा पाहू मी कोण ?
         स्कॉटलंड येथे क्लोनिंग पद्धतीने निर्मिलेली मेंढी.
     उत्तर :  डॉली

    (iv) रेणुसूत्र लिहा :
              अॅसेटिक आम्ल.
     उत्तर :  CH3 COOH
      

    (v) चूक की बरोबर ते लिहा :
            राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष सरपंच असतात.
     उत्तर :   चूक 



प्र. 2. (अ) शास्त्रीय कारणे लिहा (कोणतीही दोन)

  • (i) प्रोबायोटीक्स उत्पादने लोकप्रिय होत आहेत. 
    उत्तर :  
    1) प्रोबायोटिक्स क्रियाशील जीवाणू असणारे दुग्धजन्य पदार्थ आहेत. त्यांचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत.
    (2) उदा., प्रोबायोटिक्समुळे आपल्या अन्नमार्गात उपयुक्त सूक्ष्मजीवांच्या वसाहती होतात.
    (3) क्लॉस्ट्रिडीअमसारख्या इतर घातक सूक्ष्मजीवांवर हे चांगले जीवाणू नियंत्रण ठेवतात. तसेच अशा जीवाणूंच्या चयापचयक्रियांवर देखील नियंत्रण ठेवतात.
    (4) प्रोबायोटिक्समुळे शरीराची प्रतिकारक्षमता वाढते.
    (5) चयापचयक्रियेत निर्माण झालेल्या घातक पदार्थांचे दुष्परिणाम कमी करतात.


    (ii)  सरीसृप प्राण्यांच्या शरीराचे तापमान अस्थिर असते.
    उत्तर :

    (1) सरिसृप हे शीतरक्ती प्राणी असतात.
    (2) त्यांच्या शरीरात तापमान नियंत्रण करण्याची सोय नसते.
    (3) परिसराचे तापमान जसे वरखाली होते त्याप्रमाणे सरिसृप प्राण्यांचे तापमानही वरखाली होते. त्यामुळे त्यांच्या शरीराचे तापमान अस्थिर असते.


    (iii) आजचा शेतकरी मोठ्या प्रमाणावर सेंद्रिय शेतीकडे वळू लागला आहे.

    उत्तर : 
    1) शेती करीत असताना रासायनिक खतांचा व कीडनाशकांचा अनिर्बंध वापर झाल्यामुळे ही विषारी रसायने अन्न व पाण्यावाटे माणसांपर्यंत परत येऊन पोहोचतात.
    2)यामुळे मानवावर व पर्यावरणावर अनेक दुष्परिणाम होतात. जमिनीची सुपीकता कमी होते. पिकांवर किडीचा प्रादुर्भाव होतो. हे सर्व टाळण्यासाठी सेंद्रिय शेती हा योग्य पर्याय आहे.

Science 2 Answer Key | विज्ञान 2 संपूर्ण उत्तरपत्रिका

प्र. 2. (ब) पुढील प्रश्न सोडवा (कोणतेही तीन)

  • (i) कार्बनी वयमापनाची व्याख्या लिहून त्याचा एक उपयोग लिहा. 
    उत्तर :
    1) कार्बनी वयमापन ही कालमापनाची पद्धत आहे. प्राणी अथवा वनस्पती जिवंतपणी सतत कार्बन ग्रहण करीत असतात. मृत झाल्यावर हे कार्बन ग्रहण करणे थांबते. त्या क्षणापासून त्यांच्या शरीरातील C-14 चा रहास ही एकच प्रक्रिया सतत चालू राहते. C-12 हा किरणोत्सारी नसतो. त्यामुळे मृत वनस्पती किंवा प्राणी यांच्यातील C-14 आणि C-12 यांचे गुणोत्तर सतत बदलत असते.
    2.) कार्बनी वयमापन पद्धतीचा उपयोग पुरातन अवशेषशास्त्र व मानववंशशास्त्रामध्ये मानवी अवशेष अथवा जीवाश्म व हस्तलिखिते यांचा काळ ठरवण्यासाठी होतो.

    (ii) खालील तक्ता पूर्ण करा
       

    उत्तर :



    (iii) खाली दिलेला परिच्छेद वाचून प्रश्नांची उत्तरे लिहा :

    दक्षिण भारतामध्ये विविध राज्यांत मोठ्या प्रमाणात भात शेती केली जाते. तेथील भात पिकांवर अन्नासाठी मोठ्या प्रमाणावर नाकतोडे येतात. त्याचबरोबर तेथील शेतीमधील चिखलात नाकतोडे यांचा भक्ष्य म्हणून उपयोग करण्याकरीता बेडकांची संख्यासुद्धा मोठ्या प्रमाणात असते आणि आवडते खादय म्हणून बेडकांच्या भक्षणासाठी सापही तेथे असतात. परंतु जर अचानक तेथील बेडकांची संख्या कमी झाली तर.

    (अ) भाताच्या पिकांवर काय परिणाम होईल ?
    उत्तर : उत्पादन कमी होईल.

    (ब) कुठल्या भक्षकांची संख्या वाढेल ?
    उत्तर : प्राथमिक भक्षकांची संख्या वाढेल ( नाकतोडा )

    (iv) जल-विद्युत निर्मितीचे दोन फायदे लिहा.
    उत्तर : 
        (1) इंधनाचे ज्वलन होत नसल्याने हवा प्रदूषण होत नाही.
        (2) पाहिजे तेव्हा वीजनिर्मिती करणे शक्य असते.
         (3) धरणातून पाणी पुरवठा करता येतो. अखंड वीजनिर्मिती होऊ शकते.



    (v) खाली काही आपत्तीची चित्रे दिली आहेत. त्यानुसार,समजा तुमच्यावर आपत्ती ओढवल्या तर आपत्तीनंतरचे तुमचे व्यवस्थापन कसे असेल ?

      उत्तर : 
      (अ )  विषारी वायूगळती 
          गॅस सिलिंडर गळतीने विषारी वायू पसरला गेला असेल, तर त्या घरातील व्यक्ती आणि पाळीव प्राणी यांना त्वरित घराबाहेर काढून सुरक्षित जागी घेऊन जाऊ.

     (ब ) महापूर 
    अशा वेळी शक्य तितकी मदत दुसऱ्यांना करू. साचलेले पाणी निचरा होण्यासाठी मदत करता येईल. अशा वेळी गटारे उघडतात. त्या ठिकाणी मोठ्यांच्या मदतीने सावधगिरीसाठी काही उपाय करू. उगाचच साठलेल्या पाण्यात खेळण्यापेक्षा ज्यांना मदतीची गरज आहे अशांना मदत करू.


Science 2 Answer Key | विज्ञान 2 संपूर्ण उत्तरपत्रिका

प्र. 3. पुढील प्रश्न सोडवा: (कोणतेही पाच)

  • (i)लॅमार्कवाद सिद्धांत लिहून तो दोन उदाहरणांद्वारे स्पष्ट करा.
        उत्तर : 
     उत्क्रांती होत असताना सजीवांच्या शरीररचनेत बदल होतात व या बदलांमागे त्या जीवाने केलेला प्रयत्न वा केलेला आळस कारणीभूत असतो असा सिद्धांत जीन बाप्टीस्ट लॅमार्कयांनी मांडला. याला त्यांनी इंद्रियांचा वापर व न वापरांचा सिद्धांत असे म्हटले|
    उदाहरणे :
    1. पिढ्या‌ न पिढ्या‌ जिराफ आपली मान ताणत झाडांवरची पाने खात असल्यामुळे लांब मानेचे झाले.
    2. तसेच लोहाराचे खांदे घणाचे घाव घालून बळकट झाले.
    3. शहामृग, इमू,
    इत्यादी पक्ष्यांचे पंख न वापरल्यामुळे कमकुवत झाले.
    4. हंस, बदकाचे पाय पाण्यात राहून पोहण्यायोग्य झाले अथवा सापाने बिळात जाण्यायोग्य शरीररचना करताना आपले पाय गमावले.


    (ii) सूत्री विभाजन कोणत्या पेशमध्ये घडून येते ? प्रकलविभाजनाच्या चार पायऱ्या लिहा.
    उत्तर : 
          सूत्री विभाजन कायिक पेशमध्ये घडून येते.
           1) पूर्वावस्था 
          2) मध्यावस्था 
          3) पश्चावस्था 
           4) अंत्यावस्था 



    iii) खालील धोक्यात आलेल्या प्रजातींची प्रत्येकी दोन उदाहरणे लिहा.
           (अ) संकटग्रस्त प्रजाती
            (ब) दुर्मिळ प्रजाती
            (क) संवेदनशील प्रजाती.

    उत्तर :
           (अ) संकटग्रस्त प्रजाती  -  लायन - टेल्ड वानर, तणमोर 
            (ब) दुर्मिळ प्रजाती    -    रेडपौडा, कस्तुरीमृग 
            (क) संवेदनशील प्रजाती.   -  पट्टेरी वाघ, गीरचे सिंह 


    (iv) औष्णिक विद्युत निर्मितीमुळे कोणते इंधन वापरतात ? या विद्युतनिर्मितीमुळे निर्माण होणाऱ्या कोणत्याही दोन समस्या स्पष्ट करा.
    उत्तर : 
    कोळसा हे इंधन वापरतात.
    1. कोळशाच्या ज्वलनाने होणारे हवेचे प्रदूषणः कोळशाच्या ज्वलनाने कार्बन डायऑक्साइड आणि सल्फर ऑक्साइड, नायट्रोजन ऑक्साइड्स यांसारखे आरोग्यास घातक वायू वातावरणात उत्सर्जित होतात.
    2. कोळशाच्या ज्वलनाने उत्सर्जित वायूसह इंधनाचे सूक्ष्म कणसुद्धा वातावरणात सोडले जातात. यामळे श्वसनसंस्थेचे गंभीर विकार उद्भवू शकतात.

    v) 
     खाली दिलेल्या चित्रात दर्शविलेल्या प्राण्यांचे शारीरिक सममितीचे प्रकार ओळखा :


    उत्तर : 
             ( अ) असमित 
             ( ब )अरिय 
              ( क ) द्विपार्श्व



    (vi) उपयोगाच्या अनुषंगाने पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा :

    उत्तर :



    (vii) कीडनाशक फवारणीसाठी तुम्ही कोणती काळजी घ्याल ?
    उत्तर : 
    1) कीडनाशके हे एक प्रकारचे रासायनिक विष आहे. त्याचा अनिर्बंध वापर केल्यामुळे ही रासायनिक विषे पाणी व अन्न यांमार्फत अन्नजाळ्यांमध्ये पसरतात.
     (2)
    D.D.T., मेलॅथिऑन, क्लोरोपायरिफॉस अशी कीडनाशके जैविक विषवृद्धीने अन्नसाखळीत पसरतात. अशी कोणतीही कीडनाशके फवारणार नाही.
    (3) कीडनाशक फवारणीसाठी केवळ सेंद्रिय कीडनाशके वापरू.
    (4) फवारणीच्या वेळी आपले नाक
    , डोळे आणि त्वचा यांचेसंरक्षण करू.
    (5) जनावरांच्या आणि लहान मुलांच्या संपर्कात कीडनाशके
    , येणार नाहीत याची काळजी घेऊ.
    (6) अतिप्रमाणातील वापर टाळावा.


    (viii) प्रथमोपचार पेटीमध्ये असलेल्या सहा साहित्यांची नांवे लिहा.

    उत्तर : 
             1) बँडेज , 2) डेटोल,
             3) अॅटीसेप्टिक  मलम, 4) कापूस
              5) मेडिकल टेप, 6) कात्री 
               7) सेप्टी पिन    8) साबण

Science 2 Answer Key | विज्ञान 2 संपूर्ण उत्तरपत्रिका

प्र. 4. पुढील प्रश्न सोडवा: (कोणताही एक)

  • (i) ( अ)   सामाजिक आरोग्यावर परिणाम करणारे सहा घटक लिहा.
        उत्तर : 
    1) व्यक्तीच्या मूलभूत गरजांची पूर्तता अन्न, वस्त्र, निवारा, औषधोपचार
    (2) निवासाचे ठिकाण
    (3) शिक्षण व नोकरीसाठीमिळणाऱ्या संधी
    (4) परिवहन सुविधा
    (5) सामाजिक सुरक्षितता
    (6) शिक्षण  (7) समाजाकडून मिळणारी वागणूक
    (8) आजूबाजूचीसामाजिक व भौतिक परिस्थिती
    (9) परिसराचे सामाजिक वातावरण
    (10) मैदाने (11) उदयाने (12) पाणी (13) स्वच्छतागृह
     (14) आर्थिक स्तर (15) राजकीय वातावरण (दृष्टिकोन).


    (आ) तुम्ही काय कराल ? का ?
            बारावीत असणाऱ्या तुमच्या भावाला अभ्यासाचा खूप ताण आला आहे.
        उत्तर : 
    1. बारावीचा अभ्यास जास्त असतो आणि ज्यांनी वर्षभर अभ्यासाकडे विशेष लक्ष दिले नाही अशांना ताण येणे स्वाभाविक असते. यासाठी त्याने वेळेचे योग्य नियोजन करावे, एकेक विषयाचा एकाच वेळी विचार करावा, अभ्यासाच्या मध्ये थोडा वेळ विश्रांती घ्यावी. घरातल्या लोकांशी मनमोकळे बोलावे.

    2. ताण हलका होईल अशा पद्धतीने घरचे वातावरण ठेवावे. 'तुझ्यासाठी अभ्यास आहे, अभ्यासासाठी तू नाहीस' हे सत्य त्याला पटवून दयावे.


    (ii)  खाली दिलेल्या आकृतीचे निरीक्षण करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा :
        


    (1) आकृतीमध्ये दर्शविलेल्या प्रजननसंस्थेचे नांव लिहा.
       उत्तर : मानवी पुरुष- प्रजनन संस्था 
    (2) या प्रजननसंस्थेतील दोन ग्रंथींची नांवे लिहा.
       उत्तर : शुक्राशय व पूरस्थ ग्रंथी 
    (3) या प्रजननसंस्थेतील एका नलिकेचे नांव लिहा.
       उत्तर : शुक्रवाहिनी
    (4) एका शुक्राणूची लांबी किती असते ?
       उत्तर : 60 मायक्रोमीटर 
    (5) वृषणाद्वारे कोणते संप्रेरक तयार होते ?
       उत्तर : टेस्टेस्टेरॉन



COMMENTS

नाव

१० वी इतिहास,1,इंग्रजी,6,इंग्रजी उपयोजित लेखन,4,इंग्रजी व्याकरण,3,इतर,1,इतिहास,2,इयत्ता नववी,5,दहावी मराठी कुमारभारती,3,प्रश्नपत्रिका,19,मराठी,3,मराठी उपयोजित लेखन,13,मराठी कुमारभारती,1,मराठी व्याकरण,8,महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHA-TET),1,शैक्षणिक Update,30,हिंदी रचना विभाग,3,हिंदी व्याकरण,10,
ltr
item
मराठी स्टडी | Marathi study: SSC बोर्ड मार्च 2026 : दहावी विज्ञान व तंत्रज्ञान भाग 2 Answer Key | संपूर्ण उत्तरपत्रिका
SSC बोर्ड मार्च 2026 : दहावी विज्ञान व तंत्रज्ञान भाग 2 Answer Key | संपूर्ण उत्तरपत्रिका
SSC बोर्ड मार्च 2026 दहावी विज्ञान व तंत्रज्ञान भाग 2 (Science 2) Answer Key येथे पाहा. 13 मार्च 2026 च्या पेपरची संपूर्ण उत्तरपत्रिका,
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEi-Zn0jLJUjRv_Eb94ZZnJSKSts0VGP_7r6sEd6HOnv8d02Eoa0QECw6aFjaq1KeVWbCTi_k2PUm2sxiz-yY2BqG1NdR9FtgK_m-Teq-LGizIsI2gA79Wwa59YiJEztJXlQk3DiggBp3IaCcPVI5HzOYrI72EK4aKRT-1c3wB8Q9EhakzR9FSatmbRE935k/s16000/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A8%20%E0%A4%B5%20%E0%A4%A4%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A8%20%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97-2-1%20(1).png
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEi-Zn0jLJUjRv_Eb94ZZnJSKSts0VGP_7r6sEd6HOnv8d02Eoa0QECw6aFjaq1KeVWbCTi_k2PUm2sxiz-yY2BqG1NdR9FtgK_m-Teq-LGizIsI2gA79Wwa59YiJEztJXlQk3DiggBp3IaCcPVI5HzOYrI72EK4aKRT-1c3wB8Q9EhakzR9FSatmbRE935k/s72-c/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A8%20%E0%A4%B5%20%E0%A4%A4%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A8%20%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97-2-1%20(1).png
मराठी स्टडी | Marathi study
https://www.marathistudy.com/2026/03/ssc-board-2026-10th-science-2-answer-key-13-march.html
https://www.marathistudy.com/
https://www.marathistudy.com/
https://www.marathistudy.com/2026/03/ssc-board-2026-10th-science-2-answer-key-13-march.html
true
5159341443364317147
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy