SSC बोर्ड परीक्षा 18 मार्च 2026 दहावी भूगोल Answer Key पाहा. संपूर्ण उत्तरपत्रिका, सर्व उत्तरे, पेपर विश्लेषण आणि अपेक्षित गुणांची माहिती येथे मिळवा.
प्रश्न 1. दिलेल्या पर्यायापैकी योग्य ते पर्याय निवडून विधाने पूर्ण करा व उत्तरपत्रिकेत पुन्हा लिहा.
(1) वाहतुकीचे सर्वात स्वस्त साधन ----------- आहे.
(i) रस्तेमार्ग
(ii) जलमार्ग
(iii) हवाईमार्ग
(iv) रेल्वेमार्ग
उत्तर : जलमार्ग
(2) भारताच्या मध्यातून गेलेल्या ---------------------- पर्यंत सूर्य किरणे लंबरूप पडतात.
(i) विषुववृत्त
(ii) मकरवृत्त
(ii) कर्कवृत्त
(iv) रेखावृत्त
उत्तर : कर्कवृत्त
(3) ब्राझीलमधील -------------- वनांमुळे वातावरणात मोठ्या प्रमाणात प्राणवायू उपलब्ध होतो.
(i) पानझडी
(ii) काटेरी झुडपी
(iii) सदाहरित वर्षा
(iv) हिमालयीन
उत्तर : सदाहरित वर्षा
(4) भारताचे दरडोई उत्पन्न ब्राझीलपेक्षा कमी आहे, कारण ------------------------
(i) कमी राष्ट्रीय उत्पन्न
(ii) प्रचंड लोकसंख्या
(iii) मोठे कुटुंबासा
(iv) अन्नधान्य कमतरता
उत्तर : प्रचंड लोकसंख्या
(1) ब्राझीलमधील राज्ये :
(i) सावो पावलो
(ii) पाराना
(iii) बाहिया
(iv) उरुग्वे
उत्तर : उरुग्वे
(2) पठारी प्रदेश :
(i) महाराष्ट्र
(ii) पैंटानल
(iii) कर्नाटक
(iv) तेलंगना
उत्तर : पैंटानल
(3) भारतातील जास्त पर्जन्याची ठिकाणे :
(i) मौसिनराम
(ii) चेरापुंजी
(iii) जैसलमेर
(iv) महाबळेश्वर
उत्तर : जैसलमेर
(4) ब्राझीलचे प्रमुख व्यापारी भागीदार :
(i) चीन
(ii) जर्मनी
(iii) अमेरिकेची संयुक्त संस्थाने
(iv) कॅनडा
उत्तर : चीन
(1) नळदुर्ग किल्ला डोंगरी किल्ला आहे.
उत्तर : चूक
(2) ब्राझीलमध्ये जगातील सर्वाधिक वनस्पतींच्या प्रजाती आहेत.
उत्तर : बरोबर
(3) गोवा हे सर्वाधिक नागरीकरण झालेले राज्य नाही.
उत्तर : चूक
(4) ब्राझीलच्या आग्नेय किणाऱ्याजवळ मासेमारी व्यवसायाचे केंद्रीकरण झाले आहे.
उत्तर : बरोबर
(5) पर्यटन हा अदृश्य स्वरूपाचा व्यापार आहे.
उत्तर : बरोबर
प्रश्न 4.(अ) तुम्हास पुरविलेल्या ब्राझीलच्या नकाशा आराखड्यात पुढील घटक दाखवा व चिन्हांची सूची तयार करा (कोणतेही चार) : 4
उत्तर :
(आ) दिलेल्या नकाशाचे वाचन करून त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा (कोणतेही चार) :
(1) भारतातील अती उत्तरेकडील सरोवराचे नाव लिहा.
उत्तर : वुलर सरोवर
(2) मध्य भारतातील प्रमुख पश्चिम वाहिनी नया कोणत्या ?
उत्तर : नर्मदा व तापी
(3) कावेरी नदीचे उगमस्थान कुठे आहे ?
उत्तर : ब्रम्हगिरी डोंगरभाग
(4) मनास ही कोणत्या नदीची उपनदी आहे ?
उत्तर : ब्रम्हपुत्रा
(5) वरील नकाशा काय दर्शवितो ?
उत्तर : भारत प्रमुख नदया व सरोवरे
(1) ब्राझीलमध्ये नियमित हिमवर्षाव होत नाही.
उत्तर :
(१) सर्वसाधारणपणे शीत कटिबंधातील देशांत ध्रुवीय वाऱ्यांमुळे नियमित बर्फवृष्टी होते. त्याचप्रमाणे एखाद्या देशातील समुद्रसपाटीपासून अतिउंच असणाऱ्या पर्वतीय अतिथंड प्रदेशात हिमवर्षाव होतो.
(२) ब्राझील या देशाचे स्थान शीत कटिबंधात नसून, ते उष्ण कटिबंधात आहे.
(३) याशिवाय ब्राझील देशात अतिउंच पर्वतीय प्रदेश नाहीत. त्यामुळे ब्राझीलमध्ये नियमित हिमवर्षाव होत नाही.
(2)भारताच्या लोकसंख्येची सरासरी घनता जास्त आहे.
उत्तर :
(१) पृथ्वीच्या एकूण भूभागापैकी केवळ २.४१ टक्के भूभाग भारताने व्यापला आहे.
(२) याउलट, जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी सुमारे १७.५ टक्के लोकसंख्या भारतात आढळते.
(३) भारतात तुलनेने कमी भूभाग व तुलनेने अधिक लोकसंख्या आहे. त्यामुळे भारताच्या लोकसंख्येची सरासरी घनता जास्त आहे.
(3) पाण्याची उपलब्धता हा लोकवस्तीस चालना देणारा प्रमुख घटक आहे.
उत्तर :
(१) मानवास दैनंदिन जीवनात पिण्यासाठी व इतर अनेक कारणांसाठी पाण्याची नितांत आवश्यकता असते. शेती व इतर अनेक उद्योगांसाठी पाणी अत्यावश्यक असते.
(२) पाण्याची उपलब्धता नसल्यास शेतीचा व परिणामी इतर व्यवसायांचा विकास होत नाही. अशा प्रदेशात मानवी वस्तीचा विकास होत नाही.
(३) पाण्याच्या उपलब्धतेमुळे शेतीचा व परिणामी इतर व्यवसायांचा विकास होतो व मानवी वस्तीचा विकास होतो. अशा प्रकारे, पाण्याची उपलब्धता हा लोकवस्तीस चालना देणारा प्रमुख घटक आहे.
(4) भारत व ब्राझील या दोन्ही देशांमध्ये मिश्र अर्थव्यवस्था आहे.
उत्तर :
(१) मिश्र अर्थव्यवस्थेत सार्वजनिक व खासगी क्षेत्रांचे सहअस्तित्व असते.
(२) भारतात व ब्राझीलमध्ये रेल्वे, विदयुतनिर्मिती, लोह व पोलाद उद्योग इत्यादी क्षेत्रांतील साधनांची मालकी व व्यवस्थापन यांवर प्रामुख्याने शासनाचे नियंत्रण आहे.
(३) भारतात व ब्राझीलमध्ये बँका, विमान वाहतूक, आरोग्य, शिक्षण, दूरसंचार इत्यादी क्षेत्रांतील साधनांची मालकी व व्यवस्थापन खासगी उदयोजक व शासन यांत विभागलेले आहे. अशा प्रकारे, भारत व ब्राझील या दोन्ही देशांमध्ये मिश्र अर्थव्यवस्था आहे.
प्रश्न 6. (अ) खालील सांख्यिकीय माहितीच्या आधारे रेषालेख तयार करा व खालील प्रश्नांची उत्तरे
लिहा :

प्रश्न :
(1) 2011 साली साक्षरतेचे प्रमाण किती आहे ?
उत्तर : 69.3 %
(2) 1991 ते 2001 या काळात साक्षरता किती टक्क्यांनी वाढली ?
उत्तर : 12.8 %
(3) 40.8% साक्षरतेचे प्रमाण कोणत्या वर्षी होते ?
उत्तर : 1981 वर्ष
(आ) खालील आलेखाचे वाचन करून त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा :
प्रश्न
(1) वरील आलेखाचा प्रकार कोणता ?
(2) या आलेखात कोणत्या बाबी दाखविल्या आहेत ?
योगदान
(3) कोणत्या देशाच्या एकूण राष्ट्रीय उत्पादनात पर्यटन व्यवसायाचे योगदान जास्त आहे ?
(4) भारतात पर्यटन व्यवसायात गुंतलेली लोकसंख्या किती टक्के आहे ?
(5) भारत व ब्राझीलमधील पर्यटन व्यवसायात गुंतलेल्या लोकसंख्येत किती टक्क्यांचा फरक आहे ?
(6) एकूण राष्ट्रीय उत्पादनाच्या तुलनेत पर्यटन व्यवसायात गुंतलेली लोकसंख्या जास्त असलेला देश कोणता ?
(1) ब्राझील व भारताला कोणत्या पर्यावरणीय समस्यांना तोंड दयावे लागते ?
उत्तर :
ब्राझीलला व भारताला पुढील पर्यावरणीय समस्यांना तोंड दयावे लागत आहे
(१) वाढत्या लोकसंख्येच्या निवासासाठी, इंधनासाठी व स्थलांतरित शेतीसाठी दोन्ही देशांत मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात येत आहे. त्यामुळे दोन्ही देशांना निर्वनीकरण समस्येला सामोरे जावे लागत आहे.
(२) दोन्ही देशांतील वाढत्या नागरीकरणामुळे प्रद्वणाच्या समस्येत वाढ झाली आहे.
(३) वाढते प्रक्षण, निर्वनीकरण इत्यादी कारणांमुळे दोन्ही देशांना पर्यावरणाच्या हासाच्या समस्येला तोंड दयावे लागत आहे.
(४) पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे दोन्ही देशांतील विविध प्रजातींच्या वनस्पती, प्राणी व पक्षी यांचे अस्तित्त्व धोक्यात आले आहे.
(2) भारत व ब्राझील यांचा अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय विस्तार सांगा.
(3) ऐतिहासिक स्थळांचे संवर्धन करण्यासाठी तुम्ही कोणते उपाय सुचवाल ?
उत्तर :
ऐतिहासिक स्थळांचे संवर्धन करण्यासाठी उपाय
(१) जनजागृती करणे: लोकांना ऐतिहासिक स्थळांचे महत्त्व पटवून देण्यासाठी शाळा, महाविद्यालये आणि सामाजिक संस्थांमार्फत मोहिमा राबवणे. नागरिक जेव्हा या स्थळांचा आदर करतील, तेव्हाच त्यांचे खऱ्या अर्थाने रक्षण होईल.
(२) तोडफोड आणि विद्रुपीकरणाला प्रतिबंध: अनेक लोक ऐतिहासिक भिंतींवर नावे कोरतात किंवा कचरा टाकतात. हे रोखण्यासाठी कडक नियम आणि दंडाची तरतूद असायला हवी. तसेच, परिसरात कचराकुंडीची सोय असावी.
(३) नियमित देखभाल आणि दुरुस्ती: पुरातत्व विभागामार्फत या स्थळांची वेळोवेळी वैज्ञानिक पद्धतीने स्वच्छता आणि दुरुस्ती केली पाहिजे. पावसामुळे किंवा प्रदूषणामुळे होणारी झीज रोखण्यासाठी रासायनिक संवर्धन (Chemical Conservation) करणे आवश्यक आहे.
(४) सुरक्षा व्यवस्था: महत्त्वाच्या ऐतिहासिक ठिकाणी सीसीटीव्ही (CCTV) कॅमेरे बसवणे आणि सुरक्षा रक्षकांची नेमणूक करणे, जेणेकरून चोरी किंवा हानी टाळता येईल.
(५) डिजिटलायझेशन (Digitalization): प्रत्येक ऐतिहासिक स्थळाची माहिती, नकाशे आणि छायाचित्रे डिजिटल स्वरूपात जतन करून ठेवावीत. क्यूआर कोड (QR Code) द्वारे पर्यटकांना त्या स्थळाचा इतिहास अचूकपणे समजावा.
(६) स्थानिक सहभाग: स्थानिक नागरिकांना या प्रक्रियेत सामील करून घेणे. मार्गदर्शक (Guides) म्हणून स्थानिकांना प्रशिक्षण दिल्यास ते या स्थळांची अधिक चांगल्या प्रकारे काळजी घेऊ शकतील.
(७)पर्यटन शिस्त: पर्यटकांची संख्या मर्यादित ठेवणे आणि त्यांच्यासाठी विशिष्ट नियमावली तयार करणे, ज्यामुळे वास्तूवर अतिरिक्त ताण येणार नाही.
.png)

COMMENTS