मराठी व्याकरण अलंकार रूपक, व्यतिरेक, दृष्टांत व चेतनगुणोक्ती या अलंकारांचे अर्थ, उदाहरणे व उपयोग समजावणारी मराठी व्याकरणावर आधारित माहिती
रूपक, व्यतिरेक, दृष्टांत, चेतनगुणोक्ती अलंकार | अर्थालंकार मराठी व्याकरण
📑 अनुक्रमणिका (Table of Contents)
अलंकार म्हणजे काय?
'अलंकार'या शब्दाचा अर्थ 'दागिना' असा आहे. दागिने घातल्यावर माणसाच्या शरीराला शोभा येते. त्याच्या सौंदर्यात भर पडते. दागिन्याप्रमाणे तलम, रंगीबेरंगी कपड्यांनी कोणाच्या शरीराला शोभा येते तर कोणाचा चेहरा चष्म्यामुळे शोभून दिसतो. सुंदर कपडे,चष्मा हेदेखील एक अर्थाने अलंकारच आहेत.अलंकारात शरीराला शोभा आणण्याचा धर्म असतो.
जी गोष्ट व्यक्तीची तीच भाषेची. आपली भाषा अधिक परिणामकारक किंवा चांगली दिसावी म्हणून आपली नेहमीची साधी भाषा न वापरता आपण वेगळ्याच पद्धतीने सांगून ती अधिक आकर्षक करण्याच्या प्रयत्न करतो. 'तुझे चालणे मोहक आहे' असे न म्हणता,
'चांदणे शिंपीत जाशी चालता तू चंचले'
अशी शब्दरचना कवीने केल्यामुळे तीच कल्पना अधिक उठावदार वाटते व या चरणातील 'च' हे अक्षर वारंवार आल्यामुळे हे वाक्यही कानाला गोड वाटते.
बाळाला निजविताना आईला म्हणावयाचे असते: 'डोळे मिटून घे व झोप'; पण ही साधी कल्पना कवी कशा शब्दांत मांडतो पाहा :
'पापणिच्या पंखात झोपु दे डोळ्यांची पाखरे
डोळ्यांना पाखरे मानल्यामुळे साधा विचार कसा शोभून दिसतो.
ज्या ज्या गुणांमुळे भाषेला शोभा येते, त्या त्या गुणधर्माना भाषेचे अलंकार म्हणतात.
भाषेचे अलंकार प्रकार
भाषेचे अलंकार दोन प्रकारचे असतात:
शब्दालंकार
अर्थालंकार
कवितेमध्ये कधी कधी शब्दांच्या नादमधुर रचनेमुळे सौंदर्य प्राप्त होते, त्यास शब्दचमत्कृती म्हणतात; तर कधी कधी शब्दांतील वेगवेगळ्या अर्थांमुळे सौंदर्य प्राप्त होते, त्यास अर्थचमत्कृती म्हणतात.
अर्थालंकार
'सुरेशचे अक्षर चांगले आहे' हे आपल्याला सांगावयाचे आहे. म्हणून आपण अक्षरांची तुलना मोत्याशी ' करतो. आणि वाक्य तयार करतो. 'सुरेशचे अक्षर मोत्यासारखे सुंदर आहे'. येथे 'अक्षर' व 'मोती' यांच्यातील साम्य आपल्यासमोर येते.
- शाळा मातेप्रमाणे आहे.
- आमच्या गावातील पाटील हे कर्णासारखे दानशूर आहेत.
- आमच्या वर्गातील समीर प्रा.शिवाजीराव भोसले यांच्यासारखा चांगला वक्ता आहे.
- उपमेय - ज्याची तुलना करावयाची आहे, ते किंवा ज्याचे वर्णन करावयाचे आहे, तो घटक
- उपमान - ज्याच्याशी तुलना करावयाची आहे किंवा ज्याची उपमा दिली जाते तो घटक
- साधारणधर्म - दोन वस्तूंत असणारा सारखेपणा किंवा दोन वस्तूंत असणारा समान गुणधर्म
- साम्यवाचक शब्द - वरील सारखेपणा दाखविण्यासाठी वापरला जाणारा शब्द.
'सुरेशचे अक्षर मोत्यांप्रमाणे सुंदर आहे'.
या लेखात आपण अर्थालंकारांपैकी चार महत्वाचे अलंकार – रूपक, व्यतिरेक, दृष्टांत व चेतनगुणोक्ती – यांचा सविस्तर अभ्यास करूया.
1. रूपक अलंकार :
- बाई काय सांगो । स्वामीची ती दृष्टी।
अमृताची वृष्टी । मज होय ।। - ऊठ पुरुषोत्तमा । वाट पाहे रमा ।
दावि मुखचंद्रमा । सकळिकांसी ।। - लहान मूल म्हणजे मातीचा गोळा. आकार द्यावा तशी मूर्ती घडते.
दुसऱ्या वाक्यातील उपमेय (मुख) व उपमान (चंद्र) ही एकरूप मान्न 'मुखचंद्रमा' असा शब्दप्रयोग केला आहे.
तिसंऱ्या वाक्यात लहान मूल हे मातीच्या गोळ्या सारखे आहे.
वैशिष्ट्ये:
उपमेय व उपमान यांत एकरूपता.
साम्य दर्शविणारे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष शब्द.
कल्पनेतून निर्माण झालेले सौंदर्य
- परिभाषा: जेव्हा वाक्यात उपमेय व उपमान यांत एकरूपता आहे.ती भिन्न नाहीत असे वर्णन केले जाते तेव्हा रूपक अलंकार होतो.
उदाहरण
लहान मूल म्हणजे मातीचा गोळा. आकार द्यावा तशी मूर्ती घडते.
2. व्यतिरेक अलंकार :
परिभाषा: जेव्हा कोणत्याही काव्यात वा वाक्यात उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे, असे मानले जाते तेव्हा तिथे व्यतिरेक अलंकार होतो.
हे आधिक्य दोन प्रकारांनी दाखविता येते:
(१) उपमेयाच्या उत्कर्षाने व
(२) उपमानाच्या अपकर्षाने.
उदाहरणे:
अमृताहुनीही गोड । नाम तुझे देवा ॥
पाणियाहूनि पातळ । कल्लोळ प्रेमाचा ।।
कामधेनुच्या दुग्धाहुनिही ओज हिचे बलवान
तू माउलीहून मयाळ । चंद्राहून शीतळ ।
पाणियाहूनि पातळ । कल्लोळ प्रेमाचा ।।
वैशिष्ट्ये:
उपमेयाचे उपमानावर आधिक्य दाखवले जाते.
उत्कर्ष किंवा अपकर्ष या पद्धतीने सादरीकरण.
3. दृष्टांत अलंकार :
परिभाषा: जेव्हा एखादी गोष्ट पटवून देण्यासाठी त्याच अर्थाचे समर्पक उदाहरण दिले जाते, तेव्हा दृष्टांत अलंकार होतो.
उदाहरणे:
ऐरावत रत्न थोर । त्यासी अंकुशाचा मार ।
तुकारामहाराज परमेश्वराजवळ लहानपण मागतात. मोठेपणात यातना सहन कराव्या लागतात, हे पटवून देण्यासाठी क्षुद्र अशा मुंगीला साखरेचा रवा खायला मिळतो तर ऐरावताला अंकुशाचा मार खावा लागतो, ही उदाहरणे दिली आहेत.
न कळता पद अग्निवरी पडे । न करि दाह असे न कधी घडे ।
अजित नाम वदो भलत्या मिसे । सकल पातक भस्म करीतसे ।।
वैशिष्ट्ये:
एखाद्या विचाराला पुष्टी देण्यासाठी उदाहरणांचा वापर.
उपमेसारखी सादृश्यता पण साम्यवाचक शब्दांशिवाय.
4. चेतनगुणोक्ती अलंकार :
परिभाषा: जेव्हा निर्जीव वस्तूंना सजीवांचे गुण दिले जातात, म्हणजेच त्या वस्तूंना मानवी भावनांनी सजवले जाते, तेव्हा चेतनगुणोक्ती अलंकार होतो.
उदाहरणे:
आला हा दारि उभा वसंत फेरीवाला
कटिखांद्यावर घेउनि बाळे । फणस कुशल मुलांचे ।
वैशिष्ट्ये:
अचेतन वस्तूंना चेतनपणा प्राप्त करून देणे.
निसर्गाचे मानवीकरण.
चेतनगुणोक्ती अलंकाराची वैशिष्ट्ये :
- अचेतन वस्तूंना चेतन बनविले जाते.
- त्या वस्तू सजीव प्राण्यांप्रमाणे किंवा माणसांप्रमाणे वागतात
- जेव्हा निसर्गातील निर्जीव वस्तू सजीव आहेत अशी कल्पना करून ती मनुष्याप्रमाणे वागतात किंवा कृती करतात असे जेथे वर्णन असते तेथे 'चेतनगुणोक्ती' हा अलंकार असतो.
निष्कर्ष:
मराठी व्याकरणातील हे चार अर्थालंकार — रूपक, व्यतिरेक, दृष्टांत व चेतनगुणोक्ती — केवळ काव्यसौंदर्य वाढवत नाहीत, तर अभिव्यक्ती अधिक प्रभावी व भावनाप्रधान करतात. लेखनात किंवा वाचनात या अलंकारांचा ओळख आणि उपयोग केल्यास भाषा अधिक जिवंत वाटते.
COMMENTS