संत नामदेव यांचा परिचय : संत नामदेव हे महाराष्ट्रातील अति प्रख्यात भक्तिसंतांपैकी एक होते. त्यांचा जन्म इ.स. १२७० च्या सुमारास नांदेड जिल्...
संत नामदेव यांचा परिचय :
संत नामदेव हे महाराष्ट्रातील अति प्रख्यात भक्तिसंतांपैकी एक होते. त्यांचा जन्म इ.स. १२७० च्या सुमारास नांदेड जिल्ह्यातील नरसी नामदेव या गावात झाला. ते विठोबा भक्तीसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्या वडिलांचे नाव दामाशेट आणि आईचे नाव गोणाई होते. ते शिंपी समाजातील होते.
🪔 कार्य व भक्तीमार्ग:
संत नामदेव हे वारी परंपरा आणि हरिपाठ यांचा प्रसार करणारे होते. त्यांनी आयुष्यभर भगवान विठोबाची भक्ती केली आणि भक्तीरसात रंगून गेले. त्यांच्या अभंगातून भक्ती, ज्ञान, आणि सामाजिक समतेचा संदेश दिला आहे.
📜 संत नामदेवांची रचनाशैली:
- त्यांनी अनेक अभंग आणि भक्तिपर रचना केली आहेत.
- त्यांच्या अभंगांतून सामाजिक समता, नैतिक मूल्ये आणि ईश्वरप्रेम व्यक्त होते.
- संत नामदेवांचे काही अभंग गुरुग्रंथसाहिब या शीख धर्मग्रंथातही समाविष्ट आहेत. यावरून त्यांची कीर्ती महाराष्ट्राबाहेरही पसरली होती.
🌍 सामाजिक दृष्टिकोन:
नामदेवांनी जात-पात, ऊंच-नीच या भेदभावांना विरोध केला आणि समाजप्रबोधनाचे कार्य केले. त्यांच्या अभंगांतून मानवतेचा आणि सर्वधर्मसमभावाचा संदेश दिसतो.
🧘 समाधी:
संत नामदेवांनी आपल्या जीवनातील काही वर्षे पंजाबमधील घुमण येथे घालवली. तेथेच त्यांची समाधी आहे. ही समाधी संतांचा एकतेचा संदेश आजही जपते.
संत नामदेव यांच्या विषयी अनेक भक्तिपर आणि अद्भुत अशा आख्यायिका प्रचलित आहेत. या आख्यायिका त्यांच्या भक्तीचा, परमेश्वरावरील दृढ विश्वासाचा आणि त्यांच्यातील चमत्कारिक घटकांचा परिचय करून देतात. खाली काही प्रसिद्ध आख्यायिका दिल्या आहेत:
१. विठोबाचे दर्शन
नामदेव लहान असताना एकदा त्याच्या आईने विठोबासाठी नैवेद्य (प्रसाद) ठेवायला सांगितले. नामदेवाने तो नैवेद्य (प्रसाद) विठोबाच्या मूर्तीपुढे ठेवला आणि देवाला म्हणाले, “हे विठोबा, माझ्या आईने तुझ्यासाठी नैवेद्य (प्रसाद) दिलाय तो आपण ग्रहण करावा.”
विठोबा मात्र गप्पच.
तेव्हा नामदेव रडायला लागला आणि म्हणाला, “जर तू नैवेद्य खाल्ला नाही, तर मीपण काही खाणार नाही.”
त्याच्या भक्तीने विठोबा प्रसन्न झाला आणि प्रत्यक्ष नैवेद्य खाल्ला !
ही घटना बघून त्याच्या घरच्यांना व गावकऱ्यांना आश्चर्य वाटलं.
२. मसणात अभंग गाणे
एकदा काही लोकांनी नामदेवांची परीक्षा घ्यायची ठरवली. त्यांनी नामदेवांना सांगितलं, “जर तू खराच संत असशील, तर मसणात (श्मशानभूमीत) जाऊन अभंग गा.”
नामदेवांनी कोणतीही भीती न बाळगता तेथे जाऊन अभंग गायला सुरुवात केली. काही वेळातच वातावरण बदललं, देवता प्रकट झाले आणि सर्वत्र संतत्वाची अनुभूती मिळाली.
तेव्हा सर्वांनी नामदेवांना वंदन केले.
३. देव मंदिरातून चालत आला
पंजाबमध्ये एकदा ब्राह्मण पुजाऱ्याने नामदेवांना मंदिराबाहेर थांबवले कारण ते शिंपी समाजाचे होते. नामदेव बाहेरच बसून विठोबाचा जप करू लागले.
त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन विठोबा मूर्तीने आपले स्थान सोडले आणि मंदिराच्या भिंतीतून चालत नामदेवाजवळ आला!
ही गोष्ट पाहून सर्वांना नामदेवांच्या भक्तीची ताकद पटली.
४. कुत्र्याने चपाती पळवली त्याला ती कोरडी खाऊ लागू नये म्हणून संत नामदेव महाराज, तुपाची वाटी घेऊन त्याच्यामागे लागले.
- जैसा- जसा.
- वृक्ष - झाड.
- नेणे - जाणत नाही
- मान -गौरव,सन्मान,
- अपमान - अवमान.
- तैसे - तसे.
- सज्जन - संत.
- वर्तताती - वागतात, वर्तन करतात.
- चित्ती - मनात.
- तया - त्यांना.
- अथवा - किंवा.
- छेदू नका - तोडू नका.
- निंदा--नालस्ती, अपमानकारक बोलणे.
- स्तुती - प्रशंसा.
- सम - समान, सारखे.
- धैर्यवंत - हिंमतवान, गंभीर, निश्चल.
- भेटी - गाठभेट. जीव - प्राण.
- शिव- परब्रह्म, परतत्त्व.
- गांठी -एकत्र येणे
- जाय - होते.
किंवा कोणी येऊन वृक्षाला तोडले, तरी तो त्या माणसांना 'तोहू नका' असे म्हणत नाही. तो अविचल राहतो. ।।३।।
तसे संतसज्जन निंदा आणि स्तुती यांना समान लेखतात. निंदा व स्तुती त्यांना सारखीच असते. असे हे साधुसंत पूर्णतः धैर्यवंत असतात. निश्चल असतात. निंदास्तुतीने त्यांचे मन विचलित होत नाही. ।।४।।
संत नामदेव म्हणतात, अशा संतांची जेव्हा गाठभेट होते, तेव्हा साक्षात जीवाशिवाची गाठ पडते. संतांच्या भेटीमुळे प्रत्यक्ष परब्रह्म भेटीचे सुख लागते. ।।५।।
(१) प्रस्तुत कवितेचे कवी/ कवयित्री - संत नामदेव.
(२) कवितेचा रचनाप्रकार - 'अभंग' या प्राचीन छंदात ही कविता आहे.
(३) कवितेचा काव्यसंग्रह - नामदेव महाराजांची अभंगगाथा. सकलसंतगाथा खंड पहिला संत
(४) कवितेचा विषय - या कवितेत संतसज्जनांची महती सांगितली आहे.
(५) कवितेतून व्यक्त होणारा (स्थायी) भाव - संताची थोरवी व्यक्त करताना भक्तिभाव.
(६) कवितेच्या कवींची/कवयित्रींची लेखनवैशिष्ट्ये : - सर्वसामान्य माणसांना कळेल असा अभंग हा लोकछंद या रचनेत वापरला आहे. वृक्षाचे रूपक वापरून साध्या, सुबोध भाषेत कवितेचा आशय पोहोचवला आहे. या रचनेत दुसऱ्या व तिसऱ्या चरणांत यमक साधलेले आहे. पहिल्या तीन चरणांत सहा अक्षरे व चौथ्या चरणात चार अक्षरे ही मोठ्या अभंगाची वैशिष्ट्ये आहेत. लोकमानसाला परमार्थाची शिकवण सहजपणे देण्याचे कौशल्य साधले आहे.
(७) कवितेची मध्यवर्ती कल्पना : संतसज्जन लोक हे झाडाप्रमाणे असतात. झाडाची पूजा केली किंवा त्याला तोडले तरी झाडाला मानअपमान वाटत नाही. या झाडांप्रमाणे सज्जनांची वागणूक असते. निंदास्तुती त्यांना समान वाटते. अशा संतांची गाठ पडणे म्हणजे जिवाशिवाची, म्हणजेच साक्षात परमेश्वराचीच भेट होणे होय.
(८) कवितेतून व्यक्त होणारा विचार : संताची भेट घ्यावी. जिवाशिवाचे नाते जोडावे.
(९) कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे :जीवन जगताना आपण स्थिरचित्त कसे असावे, हे या कवितेत झाडाच्या प्रतीकातून शिकवले आहे. संतांची थोरवी सांगणारी व जीवनमूल्यांची शिकवण देणारी ही अभंगरचना असल्यामुळे ती मला खूप आवडली.
- 'जैसा वृक्ष नेणे' या अभंगामध्ये संत नामदेव यांनी झाडाचे प्रतीक वापरून संत-सज्जनांची महती सांगितली आहे. संताचे वागणे मानापमान व निंदास्तुती यांच्या पलीकडचे असते. तशी आपली वागणूक ठेवावी स्थिर चित्ताने वर्तन करावे, हा संदेश या अभंगातून दिला आहे.
'अभंग' या प्राचीन लोकछंदात ही रचना आहे. पहिल्या तीन चरणात सहा व चौथ्या चरणात चार अक्षरे असा हा 'मोठा अभंग' छंद आहे. या रचनेत दुसऱ्या व तिसऱ्या चरणात यमक साधले आहे. झाडाचे सर्वमान्य प्रतीक वापरून साध्या, सुबोध भाषेत कवितेचा आशय पोहोचवला आहे. नेमके तत्त्व सांगून लोकमानसाला योग्य शिकवण सहजपणे देण्याची विलक्षण हातोटी शब्दांनी साधली आहे..
COMMENTS