इयत्ता 9 वी मराठी भाषा विषय तोंडी परीक्षा प्रश्नपत्रिका / अंतर्गत मूल्यमापन Std 9 th marathi Language Subject Oral Exam Sample Question ...
इयत्ता 9 वी मराठी भाषा विषय तोंडी परीक्षा प्रश्नपत्रिका / अंतर्गत मूल्यमापन
Std 9 th marathi Language Subject Oral Exam Sample Question Paper / Internal Evaluation
इ. 9 वी विषय- भाषा :
अ) श्रवण कौशल्य : ०५ गुण
आ) भाषण कौशल्य : ०५ गुण
इ) स्वाध्याय : १० गुण
अ) श्रवण कौशल्य :
श्रवण कौशल्याची चाचणी 'श्रवण व लेखन' स्वरुपात घेणे अपेक्षित आहे. विद्यार्थी संख्या आणि उपलब्ध वेळ यानुसार विद्यार्थ्यांचे गट करावेत. सोबत दिलेल्या प्रश्नपत्रिकेतील कोणत्याही पाच सूचना श्रवण कौशल्यासाठी निवडाव्यात.
गुणदान संबधी सूचना :
- पाच सूचना अचूकरीत्या लिहिल्यास ५ गुण दयावेत.
- चार सूचना अचूकरीत्या लिहिल्यास ४ गुण दयावेत.
- तीन सूचना अचूकरीत्या लिहिल्यास ३ गुण द्यावेत.
- दोन सूचना अचूकरीत्या लिहिल्यास २ गुण ट्यावेत.
- एक सूचना अचूकरीत्या लिहिल्यास १ गुण दयावा.
एकूण गुण पाचपैकी दयावेत.
विद्यार्थ्याच्या तपासलेल्या उत्तरपत्रिका व गुणपत्रक शालेय स्तरावर जपून ठेवावे.
आ) भाषण कौशल्य : ०५ गुण
इयत्ता नववी मराठीच्या पाठ्यपुस्तकातील तुला आवडलेला पाठ किंवा कविता यावर ८ ते १० वाक्यात तुझे विचार सांग. अशा प्रकारे विद्यार्थ्याचे मते विचारात घ्यावे.
गुणदान संबधी सूचना :
- ८ ते १० वाक्ये सांगितल्यास ५ गुण ट्यावेत.
- ६ ते ७ वाक्ये सांगितल्यास ४ गुण द्यावेत.
- ४ ते ५ वाक्ये सांगितल्यास ३ गुण द्यावेत.
- २ ते ३ वाक्ये सांगितल्यास २ गुण दयावेत.
- विषयाशी सुसंगत एक वाक्य सांगितल्यास १ गुण यावा.
PAT 3 चाचणी (2024-2025) शिक्षक मार्गदर्शिका, उत्तरसूची
टीप : pat -3 चाचणी उत्तरसूची ही ज्या दिवशी चाचणी असेल त्या दिवशी सायं.5 वा प्रदर्शित केली जाईल..
COMMENTS