कवितांच्या ओळींचे रसग्रहण कसे करावे? रसग्रहण म्हणजे कवितेतील ओळींचा सखोल विचार करून त्याचा अर्थ समजावून घेणे. रसग्रहण करताना पुढील मुद्दे ...
कवितांच्या ओळींचे रसग्रहण कसे करावे?
रसग्रहण म्हणजे कवितेतील ओळींचा सखोल विचार करून त्याचा अर्थ समजावून घेणे. रसग्रहण करताना पुढील मुद्दे विचारात घ्यावेत:
१. कवीची ओळख:
- कवीचे नाव आणि त्यांच्या साहित्यिक योगदानाची थोडक्यात माहिती द्यावी.
२. कवितेचा संदर्भ:
- दिलेल्या ओळी कोणत्या कवितेतून घेतल्या आहेत, हे नमूद करावे.
- त्या कवितेतील मुख्य विषय किंवा आशय सांगावा.
३. ओळींचा अर्थ:
- ओळींचा साधा आणि सुलभ अर्थ लिहावा.
- शब्दशः अर्थ आणि त्यामागील गूढ अर्थ स्पष्ट करावा.
४. अलंकार व प्रतिमा:
- कवितेत वापरलेले विशेष अलंकार (उदा. अनुप्रास, उपमा, रूपक इ.) ओळखावेत.
- कोणत्या प्रतिमा किंवा दृश्यांची निर्मिती केली आहे, हे नमूद करावे.
५. भावना आणि विचार:
- कवितेतून कवी कोणती भावना किंवा संदेश देत आहे, हे स्पष्ट करावे.
- कविता वाचकाच्या मनावर काय प्रभाव टाकते, हे नमूद करावे.
६. व्यक्तिगत मत:
- ही कविता तुम्हाला कशी वाटली?
- तिचा तुमच्यावर झालेला प्रभाव काय?
इयत्ता नववी पाठ्यपुस्तकातील कवितेच्या ओळींचे रसग्रहण करतांना खालील मुद्द्यांचा विचार करावा.
आशयसौंदर्य :
यामध्ये कवीचे /कवितेचे नाव, कवितेचा विषय, मध्यवर्ती कल्पना, संदेश, उपदेश, मूल्य, कवितेतून मिळणारा एकत्रित अनुभव आदी मुद्द्यांना धरून माहिती लिहावी. प्रत्येक कवितेतील कोणत्याही दोन पंक्तींसाठी हे मुद्दे सर्वसाधारणपणे सारखेच राहतील.
काव्यसौंदर्य :
यामध्ये दिलेल्या पंक्तींतील अर्थालंकार, रस, विविध कल्पना, प्रतिमा, विविध भावना यांविषयी लिहावे. ही माहिती दिलेल्या पंक्तींना अनुसरून लिहावी लागणार आहे. त्यासाठी कवितेचा भावार्थ बारकाईने अभ्यासावा.
भाषिक वैशिष्ट्ये :
यामध्ये कवीची भाषाशैली कोणत्या प्रकारची आहे (ग्रामीण, बोलीभाषा, संवादात्मक, निवेदनात्मक, चित्रदर्शी यांपैकी कोणती), आंतरिक लय, नादमाधुर्य, अलंकार आदी मुद्द्यांना धरून माहिती यावी. हे मुद्देही कवितेतील कोणत्याही ओळींसाठी साधारणपणे सारखेच असतील.
खाली नमुना म्हणून इयत्ता नववी पाठ्यपुस्तकातील द्वितीय सत्रातील प्रत्येक कवितेतील काही ओळींचे रसग्रहण दिले आहे याप्रमाणे कवितेतील कोणत्याही ओळी दिल्या जातील त्यां ओळींचे रसग्रहण खालीलप्रमाणे करावे.
marathi kaviteche rasgrahan, इयत्ता नववी मराठी कुमारभारती कवितांच्या ओळींचे रसग्रहण _द्वितीय सत्र , कविता - महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया., कविता - निरोप., कविता - वनवासी.,कविता - आपुले जगणे... आपुली ओळख !

कविता - महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया.
'महाराष्ट्र मंदिरापुढती । पाजळे याशीची ज्योती
सुवर्ण धरा खालती। निल अंबर भरले वरती
गड पुढे पोवाडे गाती। भूषवी तिला महारथी'
आशयसौंदर्य : महाराष्ट्र ही कर्तृत्वाची भूमी आहे. तिचे उपकार फेडण्यासाठी जीव कुर्बान करून टाका, असे आवाहन शाहीर अण्णा भाऊ साठे यांनी या कवितेत ओजस्वी शब्दांत केले आहे. महाराष्ट्राच्या गौरवशाली परंपरेचे स्मरण व मराठी मनाची दृढ एकजूट हा आशय प्रत्ययकारी शब्दांत मांडला आहे.
काव्यसौंदर्य : संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनासाठी मराठी मनाला जागृत करताना शाहीर आवाहन करताना म्हणतात - महाराष्ट्रभूमी एक पवित्र मंदिर आहे. या मंदिरापुढे वीरपुरुषांनी आहुती दिलेल्या यज्ञाची ज्योत जळत आहे. महाराष्ट्र ही सोन्याची भूमी व त्यावर निळ्या आकाशाचे छत धरले आहे. म्हणजे ही नररत्नांची खाण आहे आणि त्यावर तारकांची छाया आहे. सर्व किल्ले महाराष्ट्राच्या यशाचे पोवाडे (स्तुतिगीते) गात आहेत. या भूमीला रथीमहारथी देशभक्तांनी सजवले आहे.
भाषिक वैशिष्ट्ये : संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या पार्श्वभूमीवर हे महाराष्ट्राचे गौरवगीत ओजस्वी शब्दकळेत साकार केले आहे. बाहू स्फुरण पावतील, अशी आवाहनात्मक भाषेची वीण आहे. योग्य यमकांचा वापर करून गेयता आणली आहे. 'या सत्यास्तव मैदानि शिंग फुंकाया' अशा सुभाषितप्रचुर भाषेचा बाज कायम ठेवला आहे. वीरश्रीयुक्त शब्दरचनेतून संपूर्ण कवितेत वीररसाचे दर्शन होते. 'महाराष्ट्रास्तव लढण्याचे' आवाहन काळजाला भिडते.
marathi kaviteche rasgrahan, इयत्ता नववी मराठी कुमारभारती कवितांच्या ओळींचे रसग्रहण _द्वितीय सत्र , कविता - महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया., कविता - निरोप., कविता - वनवासी.,कविता - आपुले जगणे... आपुली ओळख !
marathi kaviteche rasgrahan, इयत्ता नववी मराठी कुमारभारती कवितांच्या ओळींचे रसग्रहण _द्वितीय सत्र , कविता - महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया., कविता - निरोप., कविता - वनवासी.,कविता - आपुले जगणे... आपुली ओळख !
कविता - निरोप.
'धन्य करी माझी कूस
येई विजयी होऊन,
पुन्हा माझिया हाताने
दूधभात भरवीन !'
आशयसौंदर्य: रणांगणावर शत्रूशी लढायला जाणाऱ्या आपल्या मुलामध्ये वीरश्री जागृत करणाऱ्या वीरमातेच्या मनातील विविध भावनांचे आर्त चित्रण कवयित्री पद्मा गोळे यांनी 'निरोप' या कवितेत केले आहे. वीरमाउलीच्या मनोगतातून कवयित्रींनी प्राणपणाने देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांना शौर्याची शिकवण दिली आहे. तसेच आईचे वात्सल्यपूर्ण मृदू हृदय प्रसंगी किती कणखर असते, या आशयाचीही अभिव्यक्ती केली आहे.
काव्यसौंदर्य : युद्धाला निघालेल्या आपल्या बाळाचे औक्षण करताना व त्याची वीरश्री जागृत करताना त्याला गतकालीन वीरांचे व महाराष्ट्रकन्यांचे स्मरण देते. या उज्ज्वल परंपरेचा तू पाईक आहेस. तुझ्या शस्त्रांना भवानीमाय शक्ती देईल, अशा भावपूर्ण उद्गाराने बाळाची आई त्याचे मन ओजस्वी करते. शेवटी माउली म्हणते - तू विजयी होऊन ये. माझ्यापोटी तू जन्म घेतलास याची धन्यता मला वाटेल; त्या वेळी मी प्रेमाने माझ्या हाताने तुला दूधभात भरवीन. प्रस्तुत ओळींमध्ये वीरश्री व ममता यांचा अनोखा संगम आपल्या प्रत्ययास येतो.
भाषिक वैशिष्ट्ये : प्रत्येक ओळीत आठ अक्षरे असलेल्या या कवितेचा अष्टाक्षरी छंद हा वीरमातेच्या भावना यथार्थपणे प्रकट करण्यास पूरक ठरला आहे. या कवितेची रचना यमकप्रधान असून, त्यामुळे या कवितेतून गेयता व नादानुकूलता दिसून येते. शब्दकळा वीररसात्मक असल्यामुळे या कवितेत वीररसाला प्राधान्य आहे. शेवटच्या कडव्यात आईची ममता व वात्सल्य ओतप्रोत भरले आहे. भावनांची आंदोलने टिपणारी ओजस्वी भाषा कवितेला लाभली आहे.
marathi kaviteche rasgrahan, इयत्ता नववी मराठी कुमारभारती कवितांच्या ओळींचे रसग्रहण _द्वितीय सत्र , कविता - महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया., कविता - निरोप., कविता - वनवासी.,कविता - आपुले जगणे... आपुली ओळख !
marathi kaviteche rasgrahan, इयत्ता नववी मराठी कुमारभारती कवितांच्या ओळींचे रसग्रहण _द्वितीय सत्र , कविता - महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया., कविता - निरोप., कविता - वनवासी.,कविता - आपुले जगणे... आपुली ओळख !
कविता - वनवासी.
'आम्ही डोंगरराजाची
पोऱ्हं कळसू आईची
आम्ही उघडी बोडकी
बाळं परवरा माईची.'
पोऱ्हं कळसू आईची
आम्ही उघडी बोडकी
बाळं परवरा माईची.'
आशयसौंदर्य : सह्याद्रीच्या डोंगररांगांतील कळसूबाई शिखराच्या पायथ्याशी प्रवरा नदीच्या खोऱ्यातील आदिवासी जीवनाचे वास्तव चित्रण कवी तुकाराम धांडे यांनी 'वनवासी' या कवितेत केले आहे. डोंगरदऱ्यांत आनंदाने व मुक्तपणे नैसर्गिक जीवन जगणाऱ्या वनवासी मुलांच्या भावनांचे चित्रण करणे हा या कवितेचा आशय आहे.
काव्यसौंदर्य : डोंगरदऱ्यांत, उघड्या निसर्गात मुक्तपणे व निर्भयपणे निसर्गाचेच घटक होऊन राहणाऱ्या वनवासी लेकरांचे अनोखे विश्व उपरोक्त ओळींमध्ये साकारले आहे. निसर्गातील वन्य प्राण्यांप्रमाणे जगणारी ही मुले आत्मविश्वासाने सांगतात की, डोंगर आमचा राजा आहे. आम्ही डोंगरराजाची मुले आहोत. कळसूबाई शिखराच्या भवतालचा प्रदेश आमची आई आहे. उघडीबोडकी स्वच्छंदपणे बागडणारी आम्ही प्रवरा नदीची बाळे आहोत. भयमुक्तता व नैसर्गिक जीवनाची ओढ या भावनांचे चित्रण उपरोक्त ओळींत केले आहे.
भाषिक वैशिष्ट्ये : सैल अष्टाक्षरी छंदात ही कविता आहे. ग्रामीण बोलीभाषेतील जिवंत चैतन्य या कवितेच्या शब्दकळेत भारलेले दिसते. कळसूआई व प्रवरामाई यांची ही बाळे, हातात भाकरी-भाजी घेऊन खडकावर बसून खाणारी ही मुले, वाऱ्याच्या संगतीत खेळणारी व आभाळ पांघरणारी, सूर्याचंद्राशी बोलणारी आणि पक्ष्यांची बोली कंठात असणारी व चांदण्या हातात आणण्याची जिद्द असणारी ही पोरे या सर्व नवीन व ताज्या प्रतिमांनी ही कविता सजलेली आहे. सहज जीवनशैलीची सहज भाषा उत्कटपणे कवींनी कवितेत मांडली आहे. वाघाचे लवण, वांदार नळी, उंबरमाळी, तिंकिड्या हे नक्षत्र असल्या अपरिचित पण जिवंत संकल्पना नव्याने कवितेत आल्या आहेत.
marathi kaviteche rasgrahan, इयत्ता नववी मराठी कुमारभारती कवितांच्या ओळींचे रसग्रहण _द्वितीय सत्र , कविता - महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया., कविता - निरोप., कविता - वनवासी.,कविता - आपुले जगणे... आपुली ओळख !
कविता - आपुले जगणे... आपुली ओळख !
'कर्तृत्वाचे घडवी वेरुळ, कर्तव्याला मुकु नको
मातेसह मातीचे देणे फेडायाला चुकु नको!'
मातेसह मातीचे देणे फेडायाला चुकु नको!'
आशयसौंदर्य : तरुण पिढीने आपली वागणूक कशी ठेवावी व कोणत्या सकारात्मक गोष्टी कराव्यात नि कोणत्या गोष्टी टाळाव्यात याचे डोळस मार्गदर्शन कवी संदीप खरे यांनी 'आपुले जगणे... आपुली ओळख!' या कवितेत केले आहे. आपले जगणे मूल्यवान असावे. माणुसकी जपावी. कर्तृत्वाचे शिखर उभारून आदर्शवत पवित्र जीवन जगण्याची शिकवण ही कविता देते.
काव्यसौंदर्य : कवितेत नवीन तरुण पिढीला नेमके व सखोल मार्गदर्शन करताना कवी म्हणतात- आपले जीवन मूल्यवान व अर्थपूर्ण करून स्वाभिमानाने जगावे. उपरोक्त ओळीत त्यांनी वेरूळच्या लेण्याचा संदर्भ दिला आहे. वेरूळचे लेणे हे महाराष्ट्राचे भूषणावह शिल्प आहे. अशा प्रकारे आयुष्यात कर्तृत्वरूपी वेरूळची लेणी घडवावी. उत्तुंग कर्तृत्व करावे. कर्तव्याला कधी नाकारू नये. या मातृभूमीचे अनंत उपकार आपल्यावर आहेत. त्या उपकारांची परतफेड करायला चुकू नये.
भाषिक वैशिष्ट्ये : या कवितेत 'फटका' हा पूर्वापार चालत आलेला छंदप्रकार वापरला आहे. काय करावे व काय करू नये, याचे थेट संवादात्मक वर्णन फटक्यात केलेले असते. उपदेशात्मक गाभा असतो, जो या कवितेत तंतोतंत पाळला आहे. कुठेही प्रतीकांच्या व प्रतिमांच्या जंजाळात ही कविता अडकलेली नाही. थेट संवाद साधण्याची विलक्षण हातोटी यात आहे. भाषा परखड व ओघवती असल्यामुळे हृदयाला सहज जाऊन भिडते. यमकप्रधान कविता असूनही एकसंघ , लांबलचक अंतर्गत लय कवितेला पोषक ठरली आहे.

COMMENTS