दहावी सराव प्रश्नपत्रिका 2025, दहावी सराव प्रश्नपत्रिका 2025 pdf download, नवनीत सराव प्रश्नपत्रिका व कृतिपत्रिका इयत्ता दहावी 2025 pdf...
दहावी सराव प्रश्नपत्रिका 2025, दहावी सराव प्रश्नपत्रिका 2025 pdf download, नवनीत सराव प्रश्नपत्रिका व कृतिपत्रिका इयत्ता दहावी 2025 pdf, सराव परीक्षा इयत्ता दहावी मराठी 2025, द्वितीय सत्र प्रश्नपत्रिका 2025ssc geography question paper 2025 with answers marathi medium
प्रश्न 1. दिलेल्या
पर्यायापैकी योग्य ते पर्याय निवडून विधाने पूर्ण करा व उत्तरपत्रिकेत पुन्हा
लिहा.
(1) भारताचे स्थान पृथ्वीवर -------- गोलार्धात आहे.
(i) उत्तर व पूर्व
(ii)
दक्षिण
व पश्चिम
(iii) उत्तर
व पश्चिम
(iv) दक्षिण
व पूर्व
उत्तर : उत्तर व पूर्व
(2) ब्राझीलमध्ये आग्नेय तसेच ईशान्य दिशेकडून
येणा-या-----------------वाऱ्यांपासून पाऊस पडतो.
(i) मान्सूनवारे
(ii) पूर्वीय (व्यापारी)
(iii) प्रतिव्यापारी
(iv) आवर्त
उत्तर : पूर्वीय (व्यापारी)
(3) भारत व ब्राझील या दोन्ही देशाची
अर्थव्यवस्था ------- ----- प्रकारची आहे.
(i) अविकसित
(ii) विकसित
(iii) अतिविकसित
(iv) विकसनशील
उत्तर : विकसनशील
(4) ब्राझीलचा सर्वाधिक भूभाग मैदानी प्रदेश
आहे
(i) मैदानी प्रदेश आहे.
(ii)
उच्चभूमीचा
आहे
(iii) पर्वतीय आहे
(iv) विखंडित टेकड्यांचा आहे
उत्तर : उच्चभूमीचा आहे
‘अ’
स्तंभ |
‘ब’
स्तंभ |
(1)
क्षेत्रभेट |
(i)
पर्यटन स्थळ |
(2)
पिको दी नेब्लीना |
(ii)
गोवा |
(3)
सर्वाधिक नागरीकरण |
(iii)
नमुना
प्रश्नावली |
(4) रिओ दी जनेरिओ |
(iv)
हिमाचल प्रदेश |
उत्तर :
(1) क्षेत्रभेट - नमुना प्रश्नावली
(2) पिको दी नेब्लीना -
(3) सर्वाधिक नागरीकरण -
(4) रिओ दी जनेरिओ -
(1) ब्राझीलमधील पर्जन्यछायेच्या
प्रदेशाला कोणत्या नावाने संबोधतात ?
उत्तर :
ब्राझीलमधील पर्जन्यछायेच्या प्रदेशाला कोणत्या अवर्षण चतुष्कोन या नावाने संबोधतात
(2)
ब्राझीलमधील लोकप्रिय खेळ कोणता ?
उत्तर :
फुटबॉल ब्राझीलमधील लोकप्रिय खेळ होय.
(3) भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने
सर्वात मोठे राज्य कोणते ?
उत्तर :
राजस्थान हे भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य होय.
(4)
भारताची प्रमाणवेळ कोणत्या रेखावृत्तावरून निश्चित केली जाते ?
उत्तर :
भारताची प्रमाणवेळ ८२ अंश ३०' पूर्व रेखावृत्त या रेखावृत्तावरून निश्चित केली जाते.
उत्तर :
भारतातील शेती ही मुख्खत्वे निर्वाह प्रकारची आहे.
प्रश्न 4.(अ) तुम्हास पुरविलेल्या भारताच्या नकाशा आराखड्यात पुढील घटक दाखवा तसेच त्यांचे नावे दया व चिन्हांची सूची दया (कोणतेही चार) :
(1) सिक्कीम
(2) लक्षद्वीप बेटे
(3) चेन्नई बंदर
(4) आसाममधील खनिज तेलक्षेत्र- दिग्बोई
(5) दक्षिण भारतातील सर्वाधिक लोकसंख्या घनतेचे
राज्य
(6) कर्कवृत्त.
(आ) दिलेल्या नकाशाचे वाचन करून त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा (कोणतेही चार) :

(1) ब्राझीलमधील कोणतेही दोन वनप्रकार सांगा.
उत्तर : विषुवृत्तीय वने , उष्ण पानझडी वने
(2) नकाशात दर्शविलेले बेट कोणते ?
उत्तर : माराजॉ बेट
(3) नकाशात मगर कोठे आढळते ?
उत्तर : नकाशात मगर पॅराग्वे नदीच्या खोऱ्यात कोठे आढळते.
(4) तामरिन हा प्राणी कोठे आढळून येतो ?
उत्तर : तामरिन हा प्राणी अॅमेझॉन नदीच्या खोऱ्यात आढळून येतो.
(5) नकाशातील दक्षिणेकडील गवताळ प्रदेश कोणता ?
उत्तर : नकाशातील दक्षिणेकडील गवताळ प्रदेश पंपास होय.
(1) भारतात पानझडी वने आढळतात.
उत्तर :
(१) १००० मिमी ते २००० मिमी पर्जन्याच्या
प्रदेशांत पानझडी वने आढळतात.
(२) भारताच्या बहुतांश भागात पर्जन्याचे प्रमाण १००० मिमी ते २००० मिमी आहे.
(३) उन्हाळ्यात बाष्पीभवनाने पाणी कमी होऊ नये म्हणून भारताच्या बहुतांश भागात
कोरड्या ऋतूत (उन्हाळ्यात) वनस्पतींची पाने गळून पडतात. परिणामी भारतात पानझडी वने
आढळतात.
(2) ब्राझीलमध्ये पर्यावरणस्नेही पर्यटनाचा
अधिक विकास केला जात आहे.
(१) पांढऱ्याशुभ्र वाळूच्या पुळणी, स्वच्छ सागरी किनारे, विसर्गरम्य बेटे, ॲमेझॉन नदीखोऱ्यातील
सदाहरित घनदाट अरण्ये, प्राण्यांच्या व पक्ष्यांच्या विविध प्रजाती, विविध उद्याने इत्यादी आकर्षणांमुळे ब्राझीलमधील
पर्यटन व्यवसायाचा जलद गतीने विकास होत आहे.
(२) पर्यटन व्यवसायातील वाढीमुळे निर्माण
होणारे प्रदूषण, पर्यावरणास होणारी हानी इत्यादी दुष्परिणाम रोखणे
अत्यावश्यक आहे.
(३) पर्यावरणस्नेही पर्यटनाच्या विकासाने पर्यटन व्यवसायास अधिक
चालना देणे व पर्यावरणाचे संतुलन टिकवून ठेवणे शक्य होणार आहे. म्हणून, ब्राझीलमध्ये पर्यावरणस्नेही पर्यटनाचा अधिक विकास
केला जात आहे.
(3) भारताच्या अर्थव्यवस्थेत मत्स्य व्यवसायाची
भूमिका महत्त्वाची आहे..
1) भारत हा खाऱ्या पाण्यातील व गोड्या पाण्यातील मासेमारीत अग्रेसर आहे.
2) आहारातील घटक, रोजगारनिर्मिती, पोषणस्तर वाढवणे, परकीय चलनप्राप्ती या कारणांसाठी भारतात मासेमारी व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो.
(4) ब्राझीलच्या अंतर्गत भागातील खाणकाम व्यवसायाच्या विकासावर मर्यादा आल्या
आहेत.
(१) ब्राझीलमधील उत्तरेकडील भागात खाणकाम
व्यवसाय विकसित झालेला नाही.
(२) ब्राझीलमधील उत्तरेकडील भाग विषुववृत्ताजवळ आहे.
या भागात पर्जन्याचे व तापमानाचे प्रमाण अधिक आहे.
(३) या भागातील ॲमेझॉन
नदीखोऱ्याच्या प्रदेशात घनदाट व सदाहरित वर्षावने आहेत व त्यामुळे हा प्रदेश
दुर्गम आहे.
(४) या भागात वाहतुकीच्या सोईसुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाहीत.
त्यामुळे ब्राझीलमधील उत्तरेकडील भागात खाणकाम व्यवसाय विकसित झालेला नाही.
ब्राझील
नागरी लोकसंख्येची टक्केवारी
(1960 ते 2010)
वर्षे
|
नागरी
लोकसंख्येची टक्केवारी |
1960 |
47.1 |
प्रश्न :
(2) कोणत्या दशकात नागरीकरणाचा वेग कमी झालेला
दिसतो ?
(3) 1980 ते 1990 या दशकात नागरी लोकसंख्येत
किती टक्क्याने वाढ झाली आहे ?
आ) दिलेल्या आलेखाचे वाचन करून त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा :
प्रश्न
(1) 2016 ला भारतातील सरासरी आयुर्मान किती ?
(2) 1990 मध्ये ब्राझीलमधील सरासरी आयुर्मान भारतापेक्षा कितीने जास्त आहे ?
(3) 1980 मधील भारतातील सरासरी आयुर्मान
हे ब्राझीलमध्ये कोणत्या वर्षी होते ?
उत्तर : 1960 या वर्षी.
(4) 2010 ते 2016 या कालावधीत सरासरी
आयुर्मानातील वाढ कोणत्या देशात जास्त आहे ?
उत्तर : 2010 ते 2016 या कालावधीत सरासरी आयुर्मानातील वाढ ब्राझील देशात जास्त आहे.
(5) कोणत्या देशात सरासरी आयुर्मान जास्त आहे ?
उत्तर : ब्राझील
(6) 1960 मध्ये भारताचे आयुर्मान ब्राझीलपेक्षा किती वर्षांनी कमी होते ?
उत्तर : 1960 मध्ये भारताचे आयुर्मान ब्राझीलपेक्षा 13 वर्षांनी कमी होते.
(1) तुम्ही क्षेत्रभेटीत सहभागी होणार असाल तर
कशी तयारी कराल ? वन क्षेत्रास भेट देण्यासाठी प्रश्नावली तयार
करा.
क्षेत्रभेटीची तयारी/तपशीलवार नियोजन पुढील
प्रकारे करू :
(१) ठिकाणनिश्चिती :
(१) क्षेत्रभेटीचे नेमके ठिकाण ठरवणे व त्या
ठिकाणी पोहोचण्यासाठी लागणारा कालावधी व उपलब्ध असलेली वाहतुकीची साधने इत्यादी
बाबींचा आढावा घेणे.
(२) उदा. वन क्षेत्र, नदीकिनारा, शेत,समुद्रकिनारा,
पर्वत,
किल्ला,
पठार,
थंड
हवेचे ठिकाण, कारखाना, रेल्वे स्थानक
इत्यादी. शेत,
(२) हेतूनिश्चिती :
(१) क्षेत्रभेटीचा नेमका हेतू व अध्ययन
निष्पत्ती निश्चित करणे.
(२) उदा. वनक्षेत्रास भेट देऊन या वनांतील
प्राणी वनस्पती यांचा अभ्यास करणे इत्यादी.
(३) अत्यावश्यक कागदपत्रांची पूर्तता :
(१) क्षेत्रभेटीसाठी अत्यावश्यक नकाशे, महत्त्वाची माहिती, परवानगी
पत्रे इत्यादी बाबींचे संकलन करणे.
(२) उदा. वनक्षेत्रास भेट
देण्यासाठी वनक्षेत्रपालाने दिलेले परवानगी पत्र इत्यादी.
(४) प्रश्नावली निर्मिती :
(१) क्षेत्रभेटीच्या हेतूनुसार व निवडलेल्या ठिकाणानुसार प्रश्नावली तयार करणे.
उदा. वनक्षेत्रास भेट देताना वनक्षेत्रपालाकडून माहिती मिळवण्यासाठी पुढील स्वरूपाची
प्रश्नावली तयार करणे :
(१) वनक्षेत्राचे नाव काय ?
(२) वनक्षेत्राचा प्रकार कोणता?
(३) वनक्षेत्रात कोणकोणते प्राणी आढळतात ?
(४) वनक्षेत्रात कोणकोणते वृक्ष आढळतात ?
(अशा प्रकारचे कोणतेही प्रश्न तयार करावेत).
(2) भारत व ब्राझील या देशातील हवामानाची तुलना करा.
भारत व ब्राझील या देशांमधील हवामानातील फरक
पुढीलप्रमाणे आहे:
(१) भारतात मान्सून प्रकारचे हवामान आढळते. याउलट, ब्राझील
देशात उष्ण कटिबंधीय स्वरूपाचे हवामान आढळते.
(२) सर्वसाधारणपणे भारताच्या दक्षिण
भागात तुलनेने जास्त तापमान व उत्तर भागात तुलनेने कमी तापमान आढळते. याउलट,
ब्राझील
देशाच्या उत्तर भागात तुलनेने जास्त तापमान व दक्षिण भागात तुलनेने कमी तापमान
आढळते.
(३) सर्वसाधारणपणे भारताच्या दक्षिण भागात पर्जन्याचे प्रमाण तुलनेने अधिक
व उत्तर भागात पर्जन्याचे प्रमाण तुलनेने कमी असते. याउलट, ब्राझीलच्या
उत्तर भागात पर्जन्याचे प्रमाण तुलनेने अधिक व दक्षिण भागात पर्जन्याचे प्रमाण
तुलनेने कमी असते.
(४) सर्वसाधारणपणे भारताच्या किनारपट्टीच्या प्रदेशात उष्ण व
दमट हवामान आढळते. याउलट, ब्राझीलच्या पूर्व किनारपट्टीच्या
प्रदेशात तुलनेने सौम्य व समशीतोष्ण हवामान आढळते.
(3) भारताच्या मैदानी प्रदेशाची वैशिष्ट्ये कोणती ?
भारताच्या मैदानी प्रदेशाची वैशिष्ट्ये
पुढीलप्रमाणे आहेत :
(१) भारतात उत्तर भागात विस्तीर्ण मैदानी प्रदेश आढळतो. हा
प्रदेश उत्तर भारतीय मैदान म्हणून ओळखला जातो.
(२) हिमालयाच्या दक्षिण पायथ्यापासून
भारतीय द्वीपकल्पाच्या उत्तर सीमेपर्यंत आणि पश्चिमेकडील राजस्थान पंजाबपासून
पूर्वेकडे आसामपर्यंत उत्तर भारतीय मैदान या प्राकृतिक विभागाचा विस्तार आढळतो. हा
प्रदेश बहुतांशी सखल व सपाट आहे.
(३) उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाचे प्रामुख्याने
तीन विभाग केले जातात.
(४) अरवली पर्वताच्या पूर्वेकडील गंगा नदीच्या खोऱ्याचा
प्रदेश गंगेचे मैदान म्हणून ओळखला जातो. या मैदानी प्रदेशाचा उतार पूर्वेकडे आहे.
(५) भारताच्या पश्चिम बंगाल राज्याच्या बहुतांश भागात व बांग्लादेशात गंगा व
ब्रह्मपुत्रा या नदयांच्या मुखांशी त्रिभुज प्रदेश आढळतो. या प्रदेशास सुंदरबन'
म्हणतात.
हा जगातील सर्वांत मोठा त्रिभुज प्रदेश आहे.
(६) उत्तर भारतीय मैदानाच्या पश्चिम
भागात वाळवंट आहे. हा मैदानी प्रदेश 'थरचे वाळवंट' किंवा 'मरुस्थळी'
या
नावाने ओळखला जातो. राजस्थानचा बहुतांश भाग या वाळवंटाने व्यापला आहे. थरच्या
वाळवंटाच्या उत्तरेकडील भाग पंजाबचा मैदानी प्रदेश म्हणून ओळखला जातो.
(७) अरवली
पर्वत व दिल्ली डोंगररांगा यांच्या पश्चिमेकडे पंजाबचा मैदानी प्रदेश पसरलेला आहे.
या प्रदेशाची निर्मिती सतलज व तिच्या उपनद्यांनी वाहून आणलेल्या गाळाच्या
संचयनातून झाली आहे.
(८) पंजाब मैदानाचा सर्वसाधारण उतार पश्चिमेकडे आढळतो. या
मैदानी प्रदेशातील सुक असल्याने येथे शेती व्यवसायाचा मोठ्या प्रमाणावर विकास
झाल्याचे आढळून येते.
COMMENTS