इयत्ता ९ वी ते इ.१२ वी विषय योजना व मूल्यमापन योजनेचा पुर्नविचार करण्याकरिता शासन निर्णय दि. ९ जुलै, २०१९ अन्वये शिक्षण आयुक्त यांच्या अध्यक...
इयत्ता ९ वी ते इ.१२ वी विषय योजना व मूल्यमापन योजनेचा पुर्नविचार करण्याकरिता शासन निर्णय दि. ९ जुलै, २०१९ अन्वये शिक्षण आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली होती. समितीने सादर केलेल्या अहवालातील शिफारशी विचारात घेऊन इ.९ वी व इ. १० वी करिता या शासन निर्णयान्वये सन २०१९-२० पासून विषय योजना व सुधारित मूल्यमापन योजना करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णय सन २०१९-२० पासून इ.९ वी साठी विषय योजना व सुधारित मूल्यमापन योजना खाली नमूद केल्याप्रमाणे निश्चित करण्यात आली आहे.
- लेखी मूल्यमापनासोबत विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या क्षमतांचे मापन करण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे सातत्यपूर्ण मूल्यमापन होण्यासाठी अंतर्गत मूल्यमापन समाविष्ट करण्यात आला आहे.
- इ.९ वी करिता भाषा आणि सामाजिक शास्त्रे या विषयांकरिता लेखी परीक्षेव्दारे मूल्यमापन ८० गुणांचे व अंतर्गत मूल्यमापन २० गुणांचे आहे.
- अंतर्गत मूल्यमापनामध्ये विद्यार्थ्यांकरिता द्यावयाचे प्रकल्प हे समावेशित स्वरूपाचे असतील व हे प्रकल्प शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडून वर्गात करून घ्यावेत.
- इ.९ वीच्या अंतिम परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप व घटकनिहाय गुणभार राज्य मंडळ स्तरावर संबंधित विषयांच्या अभ्यास समितीच्या/अभ्यास गटाच्या सहायाने निश्चित केला आहे..
- इ.९ वी उत्तीर्ण होण्याकरिता विद्यार्थ्यास प्रत्येक विषयात लेखी व अंतर्गत मूल्यमापन मिळून किमान ३५ टक्के गुण प्राप्त करणे अनिवार्य आहे.
- राज्य मंडळाच्या प्रचलीत निकषाप्रमाणे सवलतीच्या गुणांची तरतूद (Grace Marks System) सुरू राहील तसेच शास्त्रीय कला, चित्रकला, लोककला व क्रीडा क्षेत्रात प्राविण्य मिळविणाऱ्या/सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना देण्यात येणारे सवलती अतिरिक्त गुण प्रचलीत निकषाप्रमाणे सुरू राहतील.
- इ.९ वी साठी विषय योजना, मूल्यमापन योजना खाली दिल्याप्रमाणे आहे.
इ. ९ वी साठी विषयनिहाय मूल्यमापन योजना :
- भाषा ' विषयांसाठी लेखी परीक्षा आणि अंतर्गत मूल्यमापनाची गुणविभागणी पुढीलप्रमाणे-
तोंडी परीक्षेकरिता पुढील २ कौशल्ये निवडण्यात यावीत.
श्रवण कौशल्य - (खालीलपैकी कोणतेही एक) (५ गुण)
१) परिच्छेद ऐकून त्यावर आधारित विचारलेल्या वस्तुनिष्ठ प्रश्नांची उत्तरे लिहिणे (किमान ५ प्रश्न)
२) ५ वाक्य किंवा १० शब्द ऐकून लिहिणे.
३) कविता ऐकून त्यावर आधारित वस्तुनिष्ठ प्रश्नांची उत्तरे लिहिणे (किमान ४.)
५) Audio Clip ऐकून त्यावर आधारित वस्तुनिष्ठ प्रश्नांची उत्तरे लिहिणे (किमान ५)
भाषण कौशल्य - (खालीलपैकी कोणतेही एक) (५ गुण)
१) वाचन केलेल्या कोणत्याही एका पुस्तकाविषयीचे स्वमत प्रकट करावे.
२) दिलेल्या विषयांवर विचार प्रकट करावे (सदर विषय विद्यार्थ्यांच्या अनुभव विश्वाशी सुसंगत
असावेत).
३) पाठ्यपुस्तकातील पाठ किंवा कविता यावर ८ ते १० वाक्यांमध्ये आपले विचार प्रकट करावेत.
भाषा विषयांच्या अंतर्गत मूल्यमापनातील तोंडी परीक्षेचे प्रत्येकविद्यार्थ्याचे (कौशल्यातील ज्या पर्यायाची
निवड केली आहे, त्याप्रमाणे) खालील अभिलेख शाळा स्तरावर जतन करणे अनिवार्य राहील.
१) श्रवण कौशल्य (उदा.श्रवण, आकलनाच्या उत्तरपत्रिका जमा करणे).
२) भाषण कौशल्य (उदा. वाचलेल्या पुस्तकाबद्दल विद्यार्थ्यांचे स्वमत).
भाषा विषय उत्तीर्णतेचे निकष -
✅ परीक्षा प्रथम सत्र- १०० गुण द्वितीय सत्र- १०० गुण = २०० / २ = १०० गुण सरासरी. याप्रमाणे ३ भाषांचे १०० प्रमाणे सरासरी ३०० गुण.
✅ ३०० गुणांच्या तीन भाषा विषयांचा गट उत्तीर्णतेसाठी एकत्रित असेल. या तीन भाषा विषयांच्या एकत्रित गटामध्ये उत्तीर्णतेसाठी किमान १०५ गुण आवश्यक राहील. त्यापैकी १०० गुणांच्या भाषा विषयांमध्ये किमान २५ व दोन्ही संयुक्त भाषा विषयांमध्ये मिळून किमान २५ गुण प्राप्त होणे आवश्यक राहील.
- विज्ञान व तंत्रज्ञान विषयासाठी लेखी आणि अंतर्गत मूल्यमापनाची गुणविभागणी पुढीलप्रमाणे-
✅ प्रथम सत्र परीक्षा - १०० गुण + द्वितीय सत्र परीक्षा - १०० गुण = २०० / २ = १०० गुण सरासरी.
✅ उत्तीर्णतेसाठी गणित व विज्ञान विषयांचा एक गट असेल. दोन्ही विषयांच्या एकत्रित गटामध्ये उत्तीर्णतेसाठी २०० गुणांपैकी किमान ७० गुण प्राप्त होणे आवश्यक आहे व त्यापैकी प्रत्येक विषयात किमान २५ गुण प्राप्त होणे आवश्यक राहील.
- सामाजिक शास्त्रे विषयासाठी लेखी आणि अंतर्गत मूल्यमापनाची गुणविभागणी पुढीलप्रमाणे-
✅ प्रथम सत्र परीक्षा - १०० गुण + द्वितीय सत्र परीक्षा - १०० गुण = २०० / २ = १०० गुण सरासरी.
✅ इ.९ वीमध्ये सराव चाचण्या, गृहपाठ व अन्य लेखी कार्य प्रचलित पध्दतीप्रमाणे सुरू राहील.
तोंडी परीक्षेकरिता पुढील २ कौशल्ये निवडण्यात यावीत.
श्रवण कौशल्य - (खालीलपैकी कोणतेही एक) (५ गुण)
१) परिच्छेद ऐकून त्यावर आधारित विचारलेल्या वस्तुनिष्ठ प्रश्नांची उत्तरे लिहिणे (किमान ५ प्रश्न)
२) ५ वाक्य किंवा १० शब्द ऐकून लिहिणे.
३) कविता ऐकून त्यावर आधारित वस्तुनिष्ठ प्रश्नांची उत्तरे लिहिणे (किमान ४.)
५) Audio Clip ऐकून त्यावर आधारित वस्तुनिष्ठ प्रश्नांची उत्तरे लिहिणे (किमान ५)
भाषण कौशल्य - (खालीलपैकी कोणतेही एक) (५ गुण)
१) वाचन केलेल्या कोणत्याही एका पुस्तकाविषयीचे स्वमत प्रकट करावे.
२) दिलेल्या विषयांवर विचार प्रकट करावे (सदर विषय विद्यार्थ्यांच्या अनुभव विश्वाशी सुसंगत असावेत).
३) पाठ्यपुस्तकातील पाठ किंवा कविता यावर ८ ते १० वाक्यांमध्ये आपले विचार प्रकट करावेत.
भाषा विषयांच्या अंतर्गत मूल्यमापनातील तोंडी परीक्षेचे प्रत्येकविद्यार्थ्याचे (कौशल्यातील ज्या पर्यायाची निवड केली आहे, त्याप्रमाणे) खालील अभिलेख शाळा स्तरावर जतन करणे अनिवार्य राहील.
१) श्रवण कौशल्य (उदा.श्रवण, आकलनाच्या उत्तरपत्रिका जमा करणे).
२) भाषण कौशल्य (उदा. वाचलेल्या पुस्तकाबद्दल विद्यार्थ्यांचे स्वमत).
भाषा विषय उत्तीर्णतेचे निकष -
✅ परीक्षा प्रथम सत्र- १०० गुण द्वितीय सत्र- १०० गुण = २०० / २ = १०० गुण सरासरी. याप्रमाणे ३ भाषांचे १०० प्रमाणे सरासरी ३०० गुण.
✅ ३०० गुणांच्या तीन भाषा विषयांचा गट उत्तीर्णतेसाठी एकत्रित असेल. या तीन भाषा विषयांच्या एकत्रित गटामध्ये उत्तीर्णतेसाठी किमान १०५ गुण आवश्यक राहील. त्यापैकी १०० गुणांच्या भाषा विषयांमध्ये किमान २५ व दोन्ही संयुक्त भाषा विषयांमध्ये मिळून किमान २५ गुण प्राप्त होणे आवश्यक राहील.
✅ प्रथम सत्र परीक्षा - १०० गुण + द्वितीय सत्र परीक्षा - १०० गुण = २०० / २ = १०० गुण सरासरी.
✅ प्रथम सत्र परीक्षा - १०० गुण + द्वितीय सत्र परीक्षा - १०० गुण = २०० / २ = १०० गुण सरासरी.
✅ इ.९ वीमध्ये सराव चाचण्या, गृहपाठ व अन्य लेखी कार्य प्रचलित पध्दतीप्रमाणे सुरू राहील.
सामाजिक शास्त्र अंतर्गत मूल्यमापन बहुपर्यायी चाचणी
- इतिहास राज्यशास्त्र :
- भूगोल :
COMMENTS