(1) ) मथुरा शिल्पशैली -------------- काळात उदयाला आली.
(अ) कुशाण (ब) गुप्त
(क) राष्ट्रकूट (ड) मौर्य उत्तर : कुशाण
(2) ) महाबळेश्वरजवळील भिलार हे गाव ---------- म्हणून प्रसिद्ध आहे. केला.
(अ) पुस्तकांचे (ब) वनस्पतींचे
(क) आंब्याचे (ड) किल्ल्यांचे
उत्तर : पुस्तकांचे
(3) "मानवी इतिहास हा वर्गसंघर्षांचा इतिहास असतो," असे मत ------------या तत्त्वज्ञाने मांडले आहे.
(अ) व्हॉल्टेअर (ब) जॉर्ज विल्हेम फ्रेडरिक हेगेल
(क) लिओपॉल्ड व्हॉन रांके (ड) कार्ल मार्क्स
उत्तर : कार्ल मार्क्स
( उत्तर पत्रिकेत रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहावीत व योग्य पर्यायाला अधोरेखित करावे.)
इयत्ता दहावी इतिहास प्रश्नपत्रिका मार्च 2023 _ आदर्श उत्तरपत्रिका_ Class 10 History Question Paper March 2023 _ Model Answer Sheet
प्र. 1. (ब) पुढील प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखून लिहा : {1}
गट 'अ' गट 'ब'
(i) कुटियट्टम - केरळमधील संस्कृत नाट्यपरंपरा
(ii) रम्मन - पश्चिम बंगालमधील नृत्य
(iii) रामलीला - उत्तर भारतातील रामायणाचे परंपरागत सादरीकरण
(iv) कालबेलिया - राजस्थानचे लोकसंगीत आणि लोकनृत्य
उत्तर : रम्मन - पश्चिम बंगालमधील नृत्य
{2}
गट 'अ' गट 'ब'
(i) दशावतार
- त्यागराज
(ii) खंजिरी भजन - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
(iii) कीर्तन - संत नामदेव
(iv) भारूड - संत एकनाथ
उत्तर : दशावतार - त्यागराज
{3}
गट 'अ' गट 'ब'
(i) जेम्स मिल - स्त्रीवादी इतिहासकार
(ii) फ्रेडरिक मॅक्सम्युलर - प्राच्यवादी इतिहासकार
(iii) न्या. महादेव गोविंद रानडे - राष्ट्रवादी इतिहासकार
(iv) दामोदर कोसंबी - मार्क्सवादी इतिहासकार
उत्तर : जेम्स मिल - स्त्रीवादी इतिहासकार
प्र. 2. (अ) दिलेल्या सूचनांनुसार कृती करा :
[1] पुढील संकल्पना चित्रे पूर्ण करा :
उत्तर :
[2] पुढील कालरेषा पूर्ण करा :
उत्तर :
[3] पुढील तक्ता पूर्ण करा :
उत्तर :
इयत्ता दहावी इतिहास प्रश्नपत्रिका मार्च 2023 _ आदर्श उत्तरपत्रिका_ Class 10 History Question Paper March 2023 _ Model Answer Sheet
प्र. 2. (ब) थोडक्यात टिपा लिहा (कोणत्याही दोन)(1) स्थळ कोश :
उत्तर :
(१) भूप्रदेशाच्या आधारेच इतिहास घडत असतो, म्हणून इतिहासाच्या अभ्यासासाठी भूगोलही महत्त्वाचा आहे. या ऐतिहासिक स्थळांच्या संदर्भात माहिती देणारे कोश लिहिले जातात.
(२) महानुभाव पंथाचे प्रवर्तक श्रीचक्रधरस्वामी ज्या ज्या गावी गेले, त्या त्या गावांची तपशीलवार नोंद 'स्थानपोथी' या ग्रंथात त्या पंथातील मुनी व्यास यांनी केली आहे.
(३) सिद्देश्वरशास्त्री चित्राव यांनी प्राचीन भारतीय स्थळकोशा'ची रचना केली. या कोशात वैदिक साहित्य, महाकाव्ये, पाणिनीचे व्याकरण, कौटिलीय अर्थशास्त्र, बौद्ध व जैन साहित्य, चिनी-फारसी-ग्रीक साहित्य या ग्रंथांतील भौगोलिक स्थळांची माहिती दिलेली आहे.
(४) स्थळ कोशांमुळे प्राचीन नगरांची नावे, त्यांचा इतिहास कळतो.
स्थळ कोश हे इतिहासलेखनाचे महत्त्वाचे साधन आहे.
(प्रत्येक मुद्द्यास 1 गुण; एकूण 2 गुण)
2) ' प्राच्यवादी इतिहासलेखन. :
उत्तर :
(१) अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात युरोपातील अभ्यासकांमध्ये पूर्वेकडील संस्कृती आणि देश यांच्याबद्दल कुतूहल निर्माण झाले होते. या कुतूहलापोटी भारतीय संस्कृतीचा अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांना 'प्राच्यवादी अभ्यासक' असे म्हणतात.
(२) या प्राच्यवादी अभ्यासकांनी भारतीय संस्कृती, इतिहास,येथील विविध भाषा व धर्म यांचा अभ्यास करून इतिहासलेखन केले. या लेखनाला प्राच्यवादी इतिहासलेखन असे म्हणतात.
(३) प्राच्यवादी अभ्यासकांनी संस्कृत आणि युरोपीय भाषांमधील साधर्म्याचा अभ्यास करून 'या भाषांची जननी प्राचीन इंडो-युरोपीय भाषा होती, अशी कल्पना मांडली.
(४) या प्राच्यवादी अभ्यासकांत छुपी साम्राज्यवादी वृत्ती दडलेली असल्याने त्यांनी पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन ठेवूनच भारताच्या इतिहासाचे लेखन केले.
(3) वर्तमानपत्रांचे भारतीय स्वातंत्र्यसंग्रामातील कार्य. :
उत्तर : भारतीय स्वातंत्र्यसंग्रागाच्या काळात वर्तमानपत्रांनी पुढील कार्य केले
(१) वर्तमानपत्रांनी लोकजागृती व लोकशिक्षण केले. भारतीय संस्कृतीची व इतिहासाची थोरवी वर्णन केली.
(२) सामाजिक, धार्मिक व राजकीय चळवळींना पाठिबा देऊन साम्राज्यवादी धोरणांला विरोध केला.
(३) पाश्चात्य विदया व शिक्षण जनतेपर्यंत पोहोचवूल समाजप्रबोधनाचे काम केले
(४) तत्कालीन सामाजिक आणि राजकीय प्रश्नांना वाचा फोडली. त्याच बरोबर समाजसुधारक, नेते व संघटना यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवले.
(प्रत्येक मुद्दद्यास 1/2 गुण; प्रत्येक टिपेस
2 गुण; एकूण 4 गुण)
प्र. 3. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा: (कोणतीही दोन)
(1) ) मायकेल फुको त्यांच्या लेखनपद्धतीला 'ज्ञानाचे पुरातत्त्व' असे म्हणत असत.
उत्तर :
(१) मायकेल फुको यांनी कालक्रमानुसार इतिहासाची अखंड मांडणी करण्याची पद्धती
चुकीची ठरवली.
(२) त्यांच्या मते, अंतिम सत्यापर्यंत पोहोचणे, हे पुरातत्त्वाचे उद्दिष्ट नसते.
(३) भूतकाळातील स्थित्यंतरांचे, म्हणजेच बदलांचे स्पष्टीकरण देण्याचा पुरातत्त्चाचा प्रयत्न असतो.
(४) फुको यांनी इतिहासातील स्थित्यंतरांचे स्पष्टीकरण देण्यावर अधिक भर दिला
म्हणून त्यांच्या लेखनपद्धतीला ज्ञानाचे पुरातत्त्व'असे म्हटले आहे.
(2) ) चित्रकथीसारख्या नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या परंपरेचे पुनरुज्जीवन करणे गरजेचे आहे.
उत्तर :
(१) कठपुतळ्या किंवा चित्रांच्या साहाय्याने रामायण-महाभारतातील कथा सांगण्याची परंपरा म्हणजे चित्रकथी परंपरा होय.
(२) या परंपरा आपल्या संस्कृतीच्या घटक असून, तो आपला वैभवशाली वारसा आहे.
(३) ठाकर, आदिवासी, वारली अशा जमातींनीचित्रकथी परंपरा पिढ्यापिढ्या टिकवून ठेवली आहे.
(४) चित्रकथी कुटुंबांमध्ये जतन करून ठेवलेल्या पोथ्या आता जीर्ण झाल्या आहेत. म्हणून नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या चित्रकथीसारख्या या परंपरेचे पुनरुज्जीवन करणे गरजेचे आहे.
(3) ) खेळण्यांदवारे इतिहासावर प्रकाश पडू शकतो.
उत्तर : मनोरंजनासाठी विविध प्रकारची खेळणी तयार करण्याची प्रथा प्राचीन काळापासून चालू आहे. त्यामुळे खेळणी ही इतिहासलेखनाचे महत्त्वाचे भौतिक साधन आहे.
(१) खेळण्यांमुळे त्या काळातील धार्मिक व सांस्कृतिक परंपरा समजतात.
(२) मातीचे किल्ले व त्यावर शिवकालीन देखावा उभा करण्यासाठी मातीच्या प्रतिमा ठेवतात. त्यावरून किल्ल्यांच्या रचनेचा अभ्यास होतो.
(३) उत्खननात पाँपई शहरात सापडलेल्या भारतीय हस्तिदंती बाहुलीवरून भारत व रोम यांच्यातील प्राचीन संबंधांवर प्रकाश पडतो.
(४) मोहेंजोदडो येथील उत्खननात सापडलेल्या खेळण्यांवरून तत्कालीन खेळण्याव्या पद्धती, पोशाख, खेळांचे प्रकार आणि तंत्रज्ञान यांची माहिती होते. म्हणून खेळण्यांद्वारे इतिहासावर प्रकाश पडतो.
(4) ) जागतिक वारशाच्या पदास पात्र ठरणारी स्थळे, परंपरा यांची यादी युनेस्कोद्वारे जाहीर केली जाते.
उत्तर :
(१) पूर्वजांनी निर्माण केलेल्या कलाकृती, परंपरा हा आपला सांस्कृतिक वारसा असून त्यांविषयी आपल्या मनात आपुलकी असते.
(२) हा वारसा पुढील मानवी पिढ्यांच्या हितासाठी जपणे व त्याचे संवर्धन होणे गरजेचे असते.
(३) काळाच्या ओघात हा ठेवा नामशेष होता कामा नये.
(४) यासाठी त्याचे जतन कसे करावे, याच्या दिशादर्शक तत्त्वांच्या आधाराने जागतिक वारशाच्या पदास पात्र ठरणारी स्थळे व परंपरा यांची यादी 'युनेस्को' या जागतिक संघटनेकडून जाहीर केली जाते.
प्र. 4. पुढील परिच्छेद काळजीपूर्वक वाचून त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा :
- मेजर ध्यानचंद हे हॉकीचे महान खेळाडू आणि भारतीय हॉकी संघाचे संघनायक होते. त्यांच्या नेतृत्वाखाली १९३६ साली भारतीय हॉकी संघाने बर्लिन ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले. त्यापूर्वी १९२८ आणि १९३२ मध्येही भारतीय हॉकी संघाने सुवर्णपदके जिंकली होती. तेव्हा ध्यानचंद हे भारतीय संघाकडून खेळले होते. २९ ऑगस्ट हा त्यांचा जन्मदिवस 'राष्ट्रीय क्रीडा दिवस' म्हणून साजरा केला जातो. त्यांना 'हॉकीचे जादूगार' असे म्हणतात. १९५६ मध्ये त्यांच्या हॉकीतील कामगिरीबद्दल त्यांना 'पद्मभूषण' या सन्मानाने विभूषित करण्यात आले.
प्रश्न :
(1) 'हॉकीचे जादूगार' कोणाला म्हणतात ?
उत्तर : मेजर ध्यानचंद यांना हॉकीचे जादूगार उसे म्हटले जाते.
(2) भारतात मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस काय म्हणून साजरा केला जातो?
उत्तर : मेजर ध्यानचंद यांचा २९ ऑगस्ट हा जन्मदिवस भारतात राष्ट्रीय क्रीडा दिवस' म्हणून साजरा केला जातो.
(3) ) मेजर ध्यानचंद यांची ऑलिम्पिक स्पर्धेमधील कामगिरी थोडक्यात लिहा.
उत्तर :
(१) मेजर ध्यानचंद हे त्या वेळच्या भारतीय हॉकी संघाचे मुख्य खेळाडू व संघनायक होते.
(२) त्यांनी १९२८, १९३२ आणि १९३६ अशा सलग तीन ऑलिम्पिक स्पर्धात भारताचे प्रतिनिधित्व करून भारताला हॉकीची सुवर्णपदके मिळवून दिली.
(३) १९३२च्या ऑलिम्पिकमध्ये त्यांनी अमेरिका व जपानविरुद्ध २५ गोल केले.
(४) आपल्या संपूर्ण कारकिर्दीत त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धात अनेक गोल
केले.म्हणून, त्यांच्या हॉकीतील या देदीप्यमान कामगिरीमुळे त्यांना हॉकीचे जादूगार' असे म्हटले जाते.
इयत्ता दहावी इतिहास प्रश्नपत्रिका मार्च 2023 _ आदर्श उत्तरपत्रिका_ Class 10 History Question Paper March 2023 _ Model Answer Sheet
प्र. 5. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा (कोणतेही दोन)
(1) 'स्त्रीवादी इतिहासलेखन' म्हणजे काय ?
उत्तर :
(१) स्त्रीवादी इतिहासलेखन म्हणजे स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची
पुनर्रचना होय.
(२) इतिहासाच्या लेखनात पुरुषवादी दृष्टिकोनाचाच प्रभाव अधिक होता.
(३) त्यावर पुनर्विचार करावा आणि त्यात स्त्रियांचा अंतर्भाव करावा, अशी भूमिका फ्रेंच विदुषी सीमाँ-द-बोव्हा हिने मांडली.
(४) त्यानंतर स्त्रीवादी इतिहासलेखन हा विचार स्वीकारला गेला.
(५) स्त्रियांशी संबंधित नोकऱ्या, रोजगार, ट्रेड युनियन्स, स्त्रियांचे कौटुंबिक जीवन,स्त्री संस्था या सर्वांवर सविस्तर संशोधन सुरू झाले.
(६) १९९० नंतर 'स्त्री' हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग मानून इतिहास लिहिण्यावर
भर दिला जाऊ लागला. या दृष्टिकोनालाच 'स्त्रीवादी इतिहासलेखन' असे
म्हणतात.
(2) ) ग्रंथालय व्यवस्थापन का महत्त्वाचे आहे?
उत्तर :
ग्रंथालय म्हणजे केवळ ग्रंथांचा संग्रह करणे नव्हे. संग्रह केलेल्या ग्रंथांचे व्यवस्थापन होणे महत्त्वाचे असते.
(१) ग्रंथांच्या पद्धतशीर आयोजनामुळे वाचकांना हवी ती पुस्तके लगेच मिळू शकतात.
(२) कोणते पुस्तक नेमके कोठे ठेवले आहे, ते त्वरित सांगता येऊ शकते. त्यामुळे पुस्तकांचा शोध घेण्यात ग्रंथालय व्यवस्थापनाचा आणि वाचकांचा दोन्हींचाही वेळ फुकट जात नाही.
(३) उत्तम व्यवस्थापनामुळे ग्रंथांचे जतन व संवर्धनही चांगल्या प्रकारे होते. पुस्तकांचा विध्वंस होत नाही.
(४) व्यवस्थापक जाणकार असेल; तर ग्रंथालयात उत्तम दर्जाच्या ग्रंथांचे संकलन केले जाते. त्यामुळे चोखंदळ वाचकांना उत्तम दर्जाची पुस्तके मिळू शकतात.
(५) एकाच प्रकारच्या विषयाच्या पुस्तकांचा संग्रह न होता विविध प्रकारच्या पुस्तकांना ग्रंथालयात स्थान मिळते. उत्तम व्यवस्थापनामुळे ग्रंथांची सूची, संगणकीय प्रणाली, अन्य आधुनिक सोयी वाचकांना उपलब्ध होऊ शकतात.
(६) कल्पक व्यवस्थापक हे ग्रंथालयाचा वाचकवर्ग वाढवण्यासाठी ग्रंथांचे प्रदर्शन
भरवणे, जाहिरात करणे अशा विविध मार्गाचा अवलंब करून ग्रंथालयाचा विस्तार
करतात. यासाठी ग्रंथालय व्यवस्थापन उत्तम असणे महत्त्वाचे असते.
(3) ) कलाक्षेत्रात व्यवसायाच्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत, हे स्पष्ट करा.
उत्तर :
विविध कलाक्षेत्रांत व्यवसायाच्या पुढील संधी उपलब्ध असतात.
(१) कलेच्या अभ्यासकांना संग्रहालये, अभिलेखागारे,ग्रंथालये, पुरातत्त्वीय संशोधन पत्रकारिता आणि भारतीय विद्या या ठिकाणी व्यवसाय मिळू शकतात. (२) औदयोगिक आणि जाहिरात क्षेत्रांत तरोध कलावस्तूंच्या खरेदी-विक्रीव्यवसायांत कलांच्या जाणकारांची आवश्यकता असते.
(३) चित्रपट आणि नाटक निर्मितीसाठी नेपथ्य, कलाकार,दिग्दर्शक, छायाचित्रकार प्रकाशयोजनाकार इत्यादी कलाकारांची आवश्यकता असते.
(४) मुद्रणक्षेत्रात तसेच घरसजावटीच्या साहित्यनिर्मितीत कलाक्षेत्रातील जाणकारांची गरज असते.
(९) दागदागिने, धातूंच्या वा लाकडी शोभेच्या वस्तू बनवणे या क्षेत्रांत अनेक
व्यावसायिक संधी आहेत.
(६) बांबू, काव, कापड, माती वा दगडी कलापूर्ण वस्तू, शिल्पे बनवणे या क्षेत्रांतही व्यवसायाच्या अनेक संधी उपलब्ध असतात.
(4) ) दशावतारी नाटकांविषयी माहिती लिहा.
उत्तर : शेतीत पीकपाणी आल्यावर सुगीच्या दिवसांत कोकण व गोवा येथे दशावतारी नाटकांचे प्रयोग गावोगावी केले जातात. त्याचे स्वरूप पुढीलप्रमाणे असते-
(१) दशावतारी नाटक हे विष्णूच्या दहा अवतारांवर आधारित असते.
(२) पात्रांचा अभिनय, रंगभूषा, वेशभूषा यांच्या साहाय्याने ही नाटके सादर केली
जातात.
(३) देवांसाठी लाकडी मुखवटे वापरतात. नाटकाची सुरुवात विघ्नहर्त्या गणपतीच्या आवाहनाने होते.
(४) नाटकाचा शेवट हंडी फोडून दहीकाला वाटणे व आरती करणे या कृतींनी होतो.
(५) नाटकातील बहुतेक भाग पदयमय असून, काही संवाद पात्रे स्वयंस्फूर्तीने बोलतात.
(६) दशावतारी नाटके हा महाराष्ट्रातील लोकनाट्याचाच एक प्रकार आहे.
प्र. 6. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा :
(1) ७३ व्या व ७४ व्या संविधान दुरुस्तीने --------- च्या अधिकारांत खूप मोठी वाढ झाली.
(अ) विधानसभा (ब) स्थानिक शासनसंस्था
(क) लोकसभा (ड) राज्यसभा
उत्तर : स्थानिक शासनसंस्था
(2) ) जगातील सर्वच लोकशाही राष्ट्रांपुढील मोठे आव्हान म्हणजे-------------
(अ) धार्मिक संघर्ष
(ब) नक्षलवादी कारवाया
(क) लोकशाहीची पाळेमुळे आणखी खोलवर नेणे
(ड) गुंडगिरीला महत्त्व
उत्तर : लोकशाहीची पाळेमुळे आणखी खोलवर नेणे
प्र. 7. पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा (कोणतीही दोन)
(1) विशिष्ट प्रसंगी निवडणूक आयोग एखादया मतदारसंघात पुन्हा निवडणुका घेतात.
उत्तर : हे विधान बरोबर आहे. कारण
(१)काही वेळा विधानसभेचाकिंवा लोकसभेचा एखादा सदस्य आपल्या प्रतिनिधित्वाचा राजीनामा देतो,
(२) एखादया प्रतिनिधीचे अकस्मात निधन होते.
(३) निर्वाचित सदस्याने पक्षांतर केले, तर पक्षांतरबंदी कायद्या प्रमाणे त्याचे सदस्यत्व रद्द होते. अशा वेळी त्या मतदारसंघाची कामे कोण करणार हा प्रश्न निर्माण होतो; म्हणून निवडणूक आयोग त्या जागेसाठी पोटनिवडणूक घेतो.
(2) आघाडी शासनातून अस्थिरता निर्माण होते.
उत्तर : हे विधान चूक आहे. कारण -
(१) १९८९ च्या निवडणुकीनंतर कोणत्याही पक्षाला बहुमत न मिळाल्याने केंद्रात व राज्यात आघाडी सरकारे अधिकारावर आली.
(२) पक्षांनी आपापला कार्यक्रम बाजूस ठेवून समान कार्यक्रमावर, भूमिकेवर एकत्र येऊन हे पक्ष सरकार चालवू लागले.
(३) १९७७ चा जनता पक्षाचा प्रयोग फसल्यानंतर आता केंद्र व राज्य पातळीवर
आघाडी शासन चांगल्या प्रकारे काम करीत आहेत.
म्हणून आघाडी शासनातून अस्थिरता निर्माण होते, हा समज खोटा ठरला आहे.
3) ग्राहक चळवळ अस्तित्वात आली.
उत्तर : हे विधान बरोबर आहे; कारण -
(१) अर्थव्यवस्थेतील बदलांचा आणि बदललेल्या समाजव्यवस्थेचा ग्राहकांवर परिणाम होत असतो.
(२) भेसळ, वस्तूंच्या वाढवलेल्या किमती,वजन मापातील फसवणूक, वस्तूंचा कमी दर्जा पण अधिक किमती इत्यादींसारख्या अनेक समस्यांना ग्राहकांना तोंड दयावे लागते.
(३) अशा फसवणुकीपासून ग्राहकांचे संरक्षण करण्यासाठी १९८६ साली ग्राहक संरक्षण कायदा अस्तित्वात आला. त्यानंतर ग्राहकांना आपल्या हक्कांची जाणीव व्हावी व त्यांचे संरक्षण व्हावे, यासाठी 'ग्राहक चळवळ'अस्तित्वात आली.
प्र. 8 (अ) पुढील संकल्पना स्पष्ट करा (कोणतीही एक)
(1) राजकारणाचे गुन्हेगारीकरण.
उत्तर :
(१) राजकीय व्यवस्थेत गुन्हेगारी प्रवृत्तींचा समावेश होणे, म्हणजेय राजकारणावे गुन्हेगारीकरण होय. हे गुन्हेगारीकरण विविध मार्गानी होत असते.
(२) पैसा आणि गुंडगिरी यांच्या जोरावर पक्ष किंवा उमेदवार मतदारांमध्ये दहशत निर्माण करतात.
(३) निवडणुकांच्या काळात हिंसाचार घडवून आणतात. राजकीय पक्ष अशा प्रभावशाली व्यक्तींना निवडणुकीचे तिकीट देतात.
(४) असे उमेदवार निवडून आल्यावर पुन्हा हीच कामे करतात. आर्थिक घोटाळे करतात विरोधकांना त्रास देतात. काही वेळा त्यांचा जीवही घेतात. राजकारणावे गुन्हेगारीकरण झाले की, लोकशाही कमकुवत होते.
(2) हक्काधारित दृष्टिकोन.
उत्तर :
(१) स्वतंत्र भारताने लोकशाही शासन पद्धतीचा स्वीकार केला. ही पद्धती देशात अधिकाधिक रुजावी, प्रगल्भ व्हावी, यासाठी सत्तेवर आलेल्या प्रत्येक शासनाने प्रयत्न केले.
(२) लोकशाहीकरणासाठी सुधारणा करताना नागरिकांकडे केवळ 'लाभार्थी' म्हणून पाहण्याचा सुरुवातीला या सरकारांचा दृष्टिकोन होता.
(३) इ.स. २००० नंतरच्या काळात मात्र 'नागरिकांचा हक्क' ही भूमिका घेऊन या सुधारणा होऊ लागल्या.
(४) म्हणून प्रत्येक नागरिकाला माहितीचा, शिक्षणावा तसेच अन्नसुरक्षेचा केवळ लाभ व्हावा, म्हणून कायदे केले गेले नाहीतः तर ते नागरिकांचे हक्क मानले गेले. या भूमिकेलाव 'हक्काधारित दृष्टिकोन' असे म्हणतात.
प्र. ४ (ब) पुढील सूचनांनुसार कृती करा (कोणतेही एक)
(1) पुढील ओघतक्ता पूर्ण करा :
निवडणूक प्रक्रिया
(2) पुढील संकल्पनाचित्रे पूर्ण करा :
प्र. 9. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा (कोणताही एक)
(1) सामाजिक न्याय प्रस्थापित करणे म्हणजे काय ?
उत्तर : सामाजिक न्याय प्रस्थापित करणे, म्हणजे
(१) ज्या सामाजिक बार्बीमुळे, विचारांमुळे व्यक्तींवर वा काही लोकसमूहांवर अन्याय होतो, त्या बाची वा ते विचार नष्ट करणे.
(२) व्यक्त्ती म्हणून सर्वांचा दर्जा समाज मानणे व तशी घोरणे आखणे
(3) जात, धर्म, भाषा, लिंग, वंश, जन्मस्थान, संपत्ती इत्यादींवर आधारित श्रेष्ठ- कनिष्ठ असा भेद न करता समान वागणूक देणे.
(४) सर्वांना विकासाची सगान संपी देणे.
(2) मध्यावधी निवडणुका म्हणजे काय?
उत्तर :
(१) लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभा यांचा कालावधी पाच वर्षे असतो. परंतु काही कारणांमुळे जेव्हा या सभागृहांच्या मुदतपूर्व निवडणुका घ्याव्या लागतात, तेव्हा त्यांना 'मध्यावधी निवडणुका' असे म्हणतात.
(२) बहुमताने अधिकारावर आलेले सरकार मुदतीआधीच पक्षफुटीमुळे अल्पमतात येऊ शकते.
(३) काही वेळा एका पक्षाला बहुमत मिळाले नसल्यास, दोन किंवा अनेक पक्षांची आघाडी करून सरकार स्थापन केले जाते. परंतु मुदतीआधीच आघाडीत फूट पडून सरकार अल्पमतात येते.
(४) अल्पमतात आलेल्या सरकारला राजीनामा दयावा लागतो. अशा वेळी पर्यायी सरकार स्थापन करण्याची शक्यता नसल्यास लोकसभा वा विधानसभा मुदतपूर्व बरखास्त करावी लागते.
अशा परिस्थितीत निवडणूक आयोगाला 'मध्यावधी निवडणुका' घ्याव्या लागतात.
इयत्ता दहावी इतिहास प्रश्नपत्रिका मार्च 2023 _ आदर्श उत्तरपत्रिका_ Class 10 History Question Paper March 2023 _ Model Answer Sheet
COMMENTS