वैचारिक लेखनाचे स्वरूप, वैचारिक लेखनाचे स्वरूप, vaicharik lekhan in marathi, वैचारिक लेखनाचे घटक, वैचारिक लेखनाचा एक नमुना, शिक्षण आणि त्याचे महत्त्व
वैचारिक लेखन – एक प्रभावी अभिव्यक्ती
लेखन ही एक प्रभावी कला आहे, जी लेखकाच्या विचारांना आकार देते. त्यापैकी वैचारिक लेखन हे एक महत्त्वाचे अंग आहे. समाजातील विविध विषयांवर आपले विचार मांडण्याचा हा एक प्रभावी मार्ग आहे. वैचारिक लेखनामध्ये लेखक एखाद्या विषयावर आपल्या दृष्टिकोनातून चिंतन करतो, तो विषय तर्कसंगत पद्धतीने मांडतो आणि त्यावर आधारित निष्कर्ष देतो.
वैचारिक लेखनाचे स्वरूप
वैचारिक लेखनामध्ये लेखकाला एखाद्या विषयाचा सखोल विचार करून त्याचे विविध पैलू विशद करावे लागतात. त्यात लेखकाची स्पष्ट भूमिका, तर्कशुद्ध विवेचन आणि योग्य उदाहरणे यांचा समावेश असतो. असे लेखन हे भावनात्मक नसून तर्कसंगत आणि मुद्देसूद असते.
वैचारिक लेखनाचे घटक
- परिचय: लेखाच्या सुरुवातीला निवडलेल्या विषयाचे महत्त्व आणि त्याची पार्श्वभूमी दिली जाते.
- मुख्य भाग: विषयाचा विविध अंगांनी ऊहापोह केला जातो, त्याचे सकारात्मक आणि नकारात्मक पैलू स्पष्ट केले जातात.
- उदाहरणे आणि तर्क: मांडलेल्या मुद्द्यांना आधार देण्यासाठी उदाहरणे आणि तर्कशुद्ध विचारांचा वापर केला जातो.
- समारोप: शेवटी विषयाचा सारांश देऊन लेखकाची भूमिका ठामपणे मांडली जाते.
वैचारिक लेखनाचा एक नमुना – "शिक्षण आणि त्याचे महत्त्व"
शिक्षण हे कोणत्याही देशाच्या प्रगतीचा कणा आहे. शिक्षणामुळे व्यक्तीला केवळ नोकरी मिळते असे नाही, तर त्याच्या विचारसरणीला एक दिशा मिळते. शिक्षणाने व्यक्तीचे जीवनमान उंचावते आणि समाजाच्या विकासास चालना मिळते.
आजच्या आधुनिक युगात शिक्षणाचा उपयोग केवळ पुस्तकी ज्ञानापुरता मर्यादित राहू नये. ते व्यावहारिक असावे, कौशल्याधारित असावे आणि विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर बनवणारे असावे. तंत्रज्ञानाच्या युगात ऑनलाइन शिक्षणासारखे पर्यायही महत्त्वाचे ठरत आहेत.
शिक्षणामुळे लोकशाही बळकट होते, समाजात जागरूकता वाढते आणि आर्थिक विकास साधता येतो. त्यामुळे प्रत्येकाने शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य द्यावे आणि समाजात त्याचा प्रसार करावा........ या प्रमाणे
निष्कर्ष
वैचारिक लेखन ही केवळ माहिती देण्याची प्रक्रिया नसून वाचकाला विचार करायला लावण्याची एक प्रभावी पद्धत आहे. योग्य संदर्भ, तर्कशुद्ध मांडणी आणि स्पष्ट विचार यामुळे ते प्रभावी ठरते. त्यामुळे विद्यार्थ्यांनीही वैचारिक लेखनाचा नियमित सराव करून आपली अभिव्यक्ती अधिक समृद्ध करावी.
इयत्ता 10 वी मराठी कुमारभारती कृतिपत्रिकेतील वैचारिक कृती :
इयत्ता 10 वी मराठी कुमारभारती कृतिपत्रिकेत विदयार्थ्याना एखादा विषय दिला जातो त्या विषयावर वैचारिक लेखन करण्यास सांगितले जाते एकूण 08 गुणांसाठी हि कृती विचारली जाते.
नमुना कृती : ( Mar-24 )
वैचारिक लेखन :
' जलप्रदूषण - समस्या व उपाय' या विषयावर तुमचे विचार लिहा.
जलप्रदूषण समस्या व उपाय
हवा, पाणी ही निसर्गाने मानवाला दिलेली मुक्त देणगी आहे. माणसाच्या मूलभूत गरजांपैकी या महत्त्वाच्या गरजा आहेत. पाण्याला तर 'जीवन' म्हटले जाते. आपल्याला स्वच्छ व शुद्ध पाणी मिळणे, हे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. मानवी कृती व अन्य कारणांमुळे पाण्याची गुणवत्ता खालावते म्हणजेच पाणी दूषित होते, यालाच 'जलप्रदूषण' असे म्हणतात. वाढती लोकसंख्या, औदयोगिकीकरण व शहरीकरण यांमुळे पाण्याचे साठे दूषित होऊ लागले आहेत.
प्रदूषित पाण्यामुळे पोटाचे विकार आणि इतर बरेच रोग होतात. जलीय जीवांवरही त्याचा परिणाम होतो. तसेच इतर प्राणी, वनस्पती यांनाही अपाय होतो. जगातील बहुतेक देशांत जलप्रदूषण ही गंभीर समस्या बनली आहे. पाणी हा नैसर्गिक स्रोत असून भविष्यातील पिढ्यांसाठी त्याचे जतन करणे आवश्यक आहे. पाण्यावर अवलंबून असणाऱ्या व्यवसायांवरही याचे दुष्परिणाम दिसून येतात. उदा., मासेमारी, शेती.
प्रदूषण ही एक भीषण समस्या आहे. यावर जर उपाययोजना करायच्या असतील, तर औदयोगिक परिसरातून येणाऱ्या सांडपाण्याचे शुद्धीकरण होणे गरजेचे आहे. पाण्याच्या गुणवत्तेची नियमित चाचणी होणेही आवश्यक आहे. शेतीव्यवसायात रासायनिक खते व कीटकनाशकांची फवारणीही जलप्रदूषणास कारणीभूत आहे. त्यामुळे सेंद्रिय घटकांचा वापर शेतीव्यवसायात करावा.
शहरांतून तसेच गावांतून बाहेर पडणारे सांडपाणी जलाशयात सोडण्यापूर्वी त्यातील प्रदूषके काढून टाकण्यात यावीत किंवा या पाण्याचा पुनर्वापरासाठी विचार करावा. हल्ली शहरांमध्ये अशा प्रकारची सांडपाणी प्रक्रिया केंद्रे उभारून पाण्याच्या पुनर्वापरावे प्रकल्प राबवले जात आहेत. त्याचबरोबर वाहते पाणी अडवणे, ते झिरपवणे, बंधारे बांधणे, तळी खोदणे यांसारख्या उपक्रमांतून नैसर्गिक जलाचा साठा करता येईल. वृक्षारोपणासारख्या कार्यक्रमांतून झाडांमुळे जमिनीखालील पाण्याचे झरे वाहते राहतील, याबद्दल जनजागृती करणे आवश्यक आहे.
खरे पाहता आज २१ व्या शतकात मानवाने खूप प्रगती केली आहे, पण जलसाक्षरतेशिवाय मानवी जीवन सुखी होऊ शकत नाही, हे सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे, जलप्रदूषण दूर झाल्याशिवाय मानवी जीवन विकसित होऊ शकत नाही, हे सत्य प्रत्येकाने जाणले पाहिजे.
नमुना कृती : ( Mar-24 )
वैचारिक लेखन :
' 'प्रदूषण -एक समस्या' या विषयावर तुमचे विचार लिहा.
प्रदूषण -एक समस्या
'दूषित हवेमुळे साथीचे रोग पसरले; अमुक नदीच्या पात्रात गेलेले मासे तरंगताना दिसले: अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान, या आणि अशा कितीतरी बातम्या पेपरांमधून, न्यूज चॅनलवर वाचायला, ऐकायला मिळतात. वाढतं प्रदूषण आणि पर्यावरण असमतोल यांमुळे हवामानावर, निसर्गावर वाईट परिणाम होत आहेत. प्रदूषण हे एक हळूहळू प्रभाव दाखवणारं विष आहे आणि प्रत्येक दिवसागणिक आपल्या जीवनाला नष्ट करीत आहे. प्रदूषण नैसर्गिक वातावरणाला दूषित करून पर्यावरणात अस्थिरता निर्माण करते.
आजचे युग हे विज्ञानाचे आहे. पण जसजसे विज्ञान, तंत्रज्ञान प्रगत होत आहे तसतसे त्याचे दुष्परिणाम वाढत आहेत. 'प्रदूषण' हा असाच तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा आणि त्यामुळे माणसाच्या वाढलेल्या हव्यासाचा दुष्परिणाम आहे. आजकाल सगळं झटपट करण्याची आणि वस्तू अल्पावधीसाठी वापरण्याची सवय झाली आहे. त्यामुळेच 'युज अँड थ्रो' या संस्कृतीचा उदय झाला. पण त्यामुळे कचऱ्यात वाढ झाली आणि या कचऱ्यात मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक असतं. प्लास्टिकचे विघटन होत नाही. ते वर्षानुवर्षे तसंच राहून मातीची उपयोगिता कमी करतं. कचऱ्याचे योग्य विभाजन न होणे, कारखाने, यंत्रांचा अतिवापर, पॉवर प्लांट, वाहनांची वाढती संख्या, मोठ्या प्रमाणावर होणारे वस्तूंचे उत्पादन, खरेदी आणि त्यातून निर्माण होणारा कचरा इत्यादी प्रदूषण वाढण्यास कारणीभूत आहेत. प्रदूषणामुळे आणि बेसुमार वृक्षतोडीमुळे ऋतुचक्र बदललं आहे. नैसर्गिक संतुलन ढासळलं आहे. अति पाऊस, अति थंडी, अति उष्मा, दुष्काळ असे टोकाचे परिणाम दिसून येत आहेत. पाणी, हवा दूषित झाली आहे. त्यामुळे पूर्वी माहीतही नव्हते अशा जीवघेण्या आजारांनी आपल्याला वेढलं आहे.
नैसर्गिक बदल हे काळानुरूप होतच असतात; पण त्याहीपेक्षा मानवनिर्मित बदलांमुळे प्रदूषणवाढ होऊन पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. त्याचा परिणाम ओझोन वायूचा थर नष्ट होत जाणे, जागतिक तापमानात वाढः परिणामतः बर्फ वितळून समुद्राची पातळी वाढणे, चक्रीवादळ, त्सुनामी अशा अनेक समस्या आ वासून उभ्या आहेत.
हे सर्व टाळायचं असेल, तर व्यक्तिगत पातळीवर जितक्या गोष्टी करणे शक्य आहेत तितक्या व्हायला हव्यात आणि त्याची सुरुवात घराजवळच्या आवारात झाडं लावण्यापासून करता येईल. कमीत कमी इंधन जळेल याची काळजी घ्यायची असेल तर लहान अंतरासाठी पायी चालत जाणे योग्य. बस, रेल्वे यांसारख्या सार्वजनिक वाहनांचा उपयोग करून इंधन बचत करता येईल. घरातल्या कचऱ्याचे व्यवस्थापन करून त्याची योग्य विल्हेवाट लावणे, पाण्याचा योग्य वापर, विजेची बचत इत्यादी लहानसहान उपायांनीसुद्धा प्रदूषण कमी करण्यात हातभार लावता येईल.
.gif)
COMMENTS