how to write saransh lekhan in Marathi, saransh lekhan in marathi with answer, saransh lekhan in marathi examples, saransh lekhan in marathi format
आजच्या धकाधकीच्या युगात आपले म्हणणे मोजक्या आणि नेमक्या शब्दांत सांगणे नितांत गरजेचे बनले आहे. एखादया विस्तृत लेखनाला त्यातील संपूर्ण आशय कळेल अशा पद्धतीने संक्षिप्त स्वरूपात मांडता येणे हे महत्त्वाचे कौशल्य आहे. हे कौशल्य विकसित व्हावे, म्हणून सारांशलेखन हा घटक अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आला आहे.
सारांश
'सारांश' या शब्दाची फोड 'सार+अंश' अशी आहे. 'सार' म्हणजे त्या उताऱ्याचा गाभा, मुख्य विचार, मध्यवर्ती असा विचार त्या उताऱ्यातील सार अंशरूपाने मांडणे, थोडक्यात मांडणे, मूळ उताऱ्यातील मुख्य विचार, उपविचार, सारांशात यावेत, त्यात द्विरुक्ती, पाल्हाळपणा नको. मूळ विचाराचे स्पष्टीकरण, दाखले व त्याचे स्पष्टीकरण, अलंकारण वजा करून मुख्य विचार सांगता येणे ही कला आहे. मूळ लेखकाचा तो विचार सांगण्याचा हेतू आपल्याला समजणेही महत्त्वाचे आहे. सारांशलेखन करताना मूळ उतारा पुनःपुन्हा वाचणे, त्यावर विचार करणे, तो विचार पचविणे महत्त्वाचे असते.
दिलेल्या उताऱ्यातून लेखकाचे विचार थोडक्यात मुद्देसूद व आपल्या भाषेत मांडणे म्हणजे सारांश लेखन होय.
सारांश लेखनाच्या पायऱ्या
१) दिलेल्या परिच्छेदाचे वाचन,
२) परिच्छेदातील आशयाचे आकलन होणे.
३) मध्यवर्ती विचार जाणून घेणे.
४) समजलेला विचार स्वतःच्या शब्दांत थोडक्यात मांडणे.
(टीप : कमीत कमी शब्दांत सारांश लिहिणे व त्यातून परिच्छेदातील आशयाचा पूर्ण अर्थ प्रतिबिंबित होणे महत्त्वाचे आहे.)
सारांशलेखन यामध्ये पाठयपुस्तकाबाहेरील (अपठीत) उतारा दिला जातो. उताऱ्यातील आशय विद्यार्थ्यांनी आपल्या शब्दांत मूळ उताऱ्यातील विचाराला बाधा न आणता एक तृतीयांश शब्दांत लिहायचा असतो.
सारांशलेखनासाठी सूचना
- सारांशलेखन करण्यापूर्वी दिलेला उतारा शांत व काळजीपूर्वक वाचावा.
- उताऱ्यात लेखकाने कोणता विचार मांडला तो समजावून घ्या व महत्वाच्या मुद्द्यांखाली (विचार) अधोरेखित करा.
- मूळ उताऱ्यातील अनावश्यक भाग विस्तार, उदाहरणे, म्हणी, वाक्प्रचार, आलंकारिक शब्द रचना यांना वगळण्यात यावे.
- मुद्दे (विचार) एकत्रित करा विचारांची गुंफण करा.
- मुद्दयांच्या आधारे विचार शक्य तितके स्वतःच्या भाषेत मांडावेत.
- सारांश लेखन थोडक्यात मुद्देसूद परंतु महत्वाचे या स्वरुपाचे असावे.
- लेखकाच्या मूळ विचारांशी प्रामाणिकपणा राखावा. आपले विचार मांडू नये.
- आपले सारांश लेखन दिलेल्या उताऱ्याच्या तिसऱ्या हिश्याइतके असावे. अगदीच मोजमाप लावू नये.
- तुम्ही लिहीलेल्या सारांशात मूळ उताऱ्यातील सर्व मुद्दे घेणे गरजेचे आहे.
- सारांशाला उचित योग्य असा शीर्षक द्यावा.
Saransh
Lekhan In Marathi
सारांशलेखनाचे फायदे :
सारांशलेखन हे फक्त परीक्षेतच उपयोगी असते, असे नाही तर प्रत्यक्ष जीवनातही अनेक ठिकाणी त्याचा उपयोग होत असतो.
- पाठ्यपुस्तकातील एखादया पाठात किंवा इतिहास-विज्ञान यांसारख्या विषयांच्या पुस्तकांतील प्रकरणात काय सांगितले आहे. हे थोडक्यात सांगता येते.
- वर्गात शिक्षकांनी काय शिकवले, ते थोडक्यात सांगता येते.
- एखादया ऐकलेल्या भाषणाचे सार सांगता येते.
- एखादी मालिका किंवा चित्रपट पाहिल्यावर त्याचे कथानक थोडक्यात सांगता येते.
- पाहिलेल्या किंवा ऐकलेल्या प्रसंगाचे थोडक्यात अचूक वर्णन करता येते.
- भविष्यात कार्यालयात काम करताना अनेक कामांचे थोडक्यात अहवाल किंवा टिप्पणी लिहिता येते.
- आपल्या कोणत्याही अनुभवाचे संक्षिप्त वर्णन करता येते. अशा प्रकारे, सारांशलेखन हे कौशल्य आयुष्यभर वेळोवेळी उपयोगी पडते.
saransh lekhan in Marathi | 10th saransh lekhan in Marathi |class 9 saransh lekhan in Marathi | what is saransh lekhan in Marathi,| saransh lekhan in marathi 10th class,| saransh lekhan in marathi meaning,| how to write saransh lekhan in Marathi,| saransh lekhan in marathi 9th class,| class 9 saransh lekhan in marathi with answer,| saransh lekhan in marathi short,| 9th class 10th saransh lekhan in Marathi,| saransh lekhan in marathi 8th class,| shyamchi aai saransh lekhan in Marathi,| saransh lekhan in marathi with answer,| saransh lekhan in marathi examples,| saransh lekhan in marathi 12th class,| saransh lekhan in marathi format,| pustak saransh lekhan in Marathi,| saransh lekhan in marathi meaning in English,| marathi language saransh lekhan in marathi
नमुना कृती : 01
खालील गद्य उतारा वाचा व त्याचा एक - तृतीयांश एवढा सारांश तुमच्या शब्दात लिहा.
उत्तर :
नमुना कृती : 02 ( Mar-24 )

COMMENTS