--> प्रसंग लेखन कसे करावे_how to write prasang lekhan | marathi study

प्रसंग लेखन कसे करावे_how to write prasang lekhan

प्रसंग लेखन कसे करावे, how to write prasang lekhan, prasang lekhan in marathi, class 10 prasang lekhan in Marathi, essay class 9 prasang lekhan


प्रसंग लेखन कसे करावे? – मार्गदर्शन आणि पायऱ्या

प्रसंग लेखन म्हणजे एखाद्या ठराविक घटनेचे सजीव आणि प्रभावी वर्णन करणे. यामध्ये त्या प्रसंगाची परिस्थिती, भावना आणि घडामोडी प्रभावीपणे मांडल्या जातात. परीक्षेत किंवा जीवनातील अनुभव मांडताना प्रसंग लेखनाचा उपयोग होतो.

स्वविचारांचे प्रकटीकरण ही क्षमता/कौशल्य आत्मसात करण्यासाठी निबंध लेखन या घटकाचा अभ्यास आवश्यक असतो. निबंध लेखन म्हणजे विचारांची विषयानुरूप केलेली मुद्देसूद मांडणी, आज आपण प्रसंगलेखन या निबंध लेखन प्रकाराचा अभ्यास करणार आहोत.


प्रसंगलेखन :

आपण अनुभवलेली, ऐकलेली, एखादी घटना, एखादा प्रसंग, एखादा विचार, एखादी समस्या आपल्याला नेहमीच विचारप्रवृत्त करीत असते. तो प्रसंग जर आपल्या बाबतीत घडला तर आपली प्रतिक्रिया काय असेल? असा विचार आपण केल्यास प्रसंगाचे विश्लेषण आपण तटस्थपणे करू शकतो. अशा विचारांना, भावनांना, संवेदनशीलतेची, भावनिकतेची जोड देऊन शब्दबद्ध केले, तर तो प्रसंग वाचणाऱ्याच्या मनाला भिडतो त्या प्रसंगाचे शब्दचित्र डोळ्यांसमोर उभे राहू शकते. आपल्या भावना प्रभावीपणे मांडण्याचे कौशल्यही व्यक्त होऊन लेखनकौशल्याचा, अभिव्यक्ती क्षमतेचा विकास साध्य होऊ शकतो.
पाहिलेल्या एखादया दृश्याचे, व्यक्तीचे किंवा प्रसंगाचे चित्र हुबेहुब शब्दांत रेखाटणे यालाच प्रसंगलेखन असे म्हणतात.
विद्यार्थ्याच्या अनुभव विश्वाला परिचित प्रसंग देऊन त्यांचे वर्णन करण्यास सांगितले जाते.


प्रसंग लेखनाचे स्वरूप व उद्दिष्ट

प्रसंग लेखन करताना वाचकाला त्या प्रसंगाची कल्पना यावी, तो जणू काही प्रत्यक्ष अनुभव घेत आहे, असे वाटावे, यासाठी स्पष्ट व प्रभावी शब्दांचा वापर करावा लागतो.

प्रसंग लेखनाचे प्रमुख उद्दिष्टे:

  • वास्तवदर्शी वर्णन – वाचकाला प्रसंगाची स्पष्ट कल्पना यावी.
  • भावना आणि भावना व्यक्त करणे – पात्रांच्या आनंद, दु:ख, आश्चर्य, भीती यांसारख्या भावना स्पष्ट करणे.
  • घटनाक्रमाचे सुसूत्र वर्णन – प्रसंगातील घटना क्रमाने सांगणे.

प्रसंग लेखनाच्या पायऱ्या

१. प्रसंगाचा विषय आणि मुद्दे लक्षात घेणे.

प्रसंग कोणता आहे आणि तो कसा लिहायला हवा , हे आधी ठरवावे. उदाहरणार्थ, शाळेतील स्नेहसंमेलन, उपक्रम, एखादा प्रेरणादायक प्रसंग किंवा कौटुंबिक समारंभ.
दिलेल्या प्रसंगात आपण हजर आहोत आणि त्यात आपला प्रत्यक्ष सहभाग आहे अशी कल्पना करून लेखन करणे अपेक्षित असतं

२. प्रसंगाचा वेळ आणि ठिकाण स्पष्ट करणे

प्रसंग कोणत्या ठिकाणी घडतो आणि त्याचा कालावधी काय आहे, हे नमूद करणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, "हा प्रसंग आमच्या शाळेतील ग्रंथालयात घडलेला आहे."

३. पात्रांचे वर्णन

प्रसंगात सहभागी असलेल्या व्यक्तींचे संक्षिप्त वर्णन द्यावे. त्यांची वय, स्वभाव, दिसणं, बोलण्याची शैली यांची माहिती द्यावी.

४. प्रसंगाचे वास्तवदर्शी आणि क्रमवार वर्णन

  • प्रसंगाची सुरुवात: प्रसंग कसा आणि का घडतो आहे, याची पार्श्वभूमी द्या.
  • मुख्य भाग: प्रसंगाच्या मधल्या भागात प्रमुख घटना आणि संवाद लिहा.
  • शेवट: प्रसंगातून घेतलेला अनुभव किंवा शिकवण स्पष्ट करा.
  • प्रसंगलेखन करताना तो प्रसंग वाचकाच्या मनाला भिडला पाहिजे  वाचकांच्या डोळ्यासमोर त्या प्रसंगाचे शब्दचित्रच उभे राहिले पाहिजे
  • भाषा प्रभावी चित्रदर्शी वर्णन करणारी असावी भाषा सोपी असावी अलंकारीक नसावी.

५. संवाद आणि भावना यांचा समावेश

संवादामुळे प्रसंग अधिक जिवंत आणि भावनाप्रधान वाटतो.
उदाहरण:
"आई, मी प्रथम क्रमांक मिळवला!" मी आनंदाने ओरडलो."

६. प्रसंगाचा प्रभाव किंवा शिकवण

प्रसंगातून काय शिकायला मिळाले किंवा त्याचा काय परिणाम झाला, हे शेवटी लिहावे.
लेखन प्रसंगानुरूप संवेदनशील असावे, प्रसंगाचे किंवा घटनेचे स्वरूप आपल्या लेखनात स्पष्ट झाले पाहिजे.  लेखनात सुरुवात मध्यभाग समारोप अशी रचना असावी,


उदाहरण: शाळेतील स्नेहसंमेलनाचा आनंददायी प्रसंग

प्रस्तावना:

आमच्या शाळेतील वार्षिक स्नेहसंमेलन हा विद्यार्थ्यांसाठी सर्वांत आनंदाचा दिवस असतो. यावर्षी २० फेब्रुवारीला आमच्या शाळेत स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते. मी त्यामध्ये वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतला होता.

मुख्य भाग:

स्नेहसंमेलनाच्या दिवशी संपूर्ण शाळा सुंदर सजवली होती. विद्यार्थी आणि शिक्षक आनंदाने कार्यक्रमाचा आनंद घेत होते. मी माझे भाषण सादर करताना थोडा घाबरलो होतो, पण प्रेक्षकांचा उत्साह बघून मला आत्मविश्वास मिळाला. माझे भाषण पूर्ण झाल्यावर टाळ्यांचा कडकडाट झाला!

शेवट:

कार्यक्रमाच्या शेवटी पारितोषिक वितरण समारंभ झाला. मला वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाल्याची घोषणा झाली आणि आनंदाने मी व्यासपीठावर गेलो. तो क्षण मी कधीच विसरणार नाही!


निष्कर्ष

प्रसंग लेखन करताना घटना स्पष्ट, रंजक आणि वास्तवदर्शी असाव्यात. योग्य क्रम, संवाद, भावना आणि वातावरणाचे वर्णन केल्यास लेखन अधिक प्रभावी होते. कोणत्याही प्रसंगाचा प्रभाव वाचकावर राहील, अशी मांडणी करणे हे चांगल्या प्रसंग लेखनाचे वैशिष्ट्य आहे.


महत्वाचे मुद्दे:

✅ प्रसंगाची स्पष्ट पार्श्वभूमी द्या.
✅ पात्रांचे स्वभाव आणि भावना मांडणे आवश्यक.
✅ संवादाचा समावेश करून लेखनाला जिवंतपणा द्या.
✅ प्रसंगातून मिळालेली शिकवण शेवटी लिहा.

प्रश्न:

  1. प्रसंग लेखन म्हणजे काय?
  2. प्रसंग लेखनाचे किती प्रकार असतात?
  3. प्रभावी प्रसंग लेखनासाठी कोणते घटक महत्त्वाचे आहेत?
  4. शाळेतील गटस्पर्धेचा प्रसंग कसा लिहाल?
  5. प्रसंग लेखन आणि निबंध लेखन यामध्ये काय फरक आहे?

प्रसंग लेखन हा लेखन कौशल्याचा महत्त्वाचा भाग आहे. योग्य पद्धतीने व क्रमाने लिहिल्यास, ते प्रभावी आणि संस्मरणीय ठरते. ✍️📖

prasang lekhan in Marathi | prasang lekhan in marathi 10th class| prasang lekhan in marathi language | prasang lekhan in marathi akasmat padlela paus | prasang lekhan in marathi format | pavsalyatil ek divas prasang lekhan in Marathi | prasang lekhan in marathi class 9 | prasang lekhan in marathi pdf | prasang lekhan in marathi example | mi pahileli jatra prasang lekhan in Marathi | akasmat padlela paus prasang lekhan in Marathi | nirop samarambh prasang lekhan in Marathi | how to write prasang lekhan in Marathi | prasang lekhan in marathi 9th class | prasang lekhan in marathi meaning | class 10 prasang lekhan in Marathi | maze balpan prasang lekhan in Marathi | what is prasang lekhan in Marathi | essay class 9 prasang lekhan in marathi language | prasang lekhan in marathi 10th

इयत्ता 10 वी मराठी कुमारभारती कृतिपत्रिकेतील प्रसंगलेखन कृती : 

इयत्ता 10 वी मराठी कुमारभारती कृतिपत्रिकेत विदयार्थ्याच्या अनुभवविश्वाला परिचित प्रसंग देऊन त्याचे वर्णन करण्यास सांगितले जाईल किंवा चित्र देऊन त्याचे वर्णन करण्यास सांगितले जाईल.एकूण 08 गुणांसाठी हि कृती विचारली जाते.

मूल्यमापन योजना :

नमुना कृती  :

  1.  प्रसंगलेखन :  ( Mar-24 )

    वरील प्रसंगी तुम्ही विद्यार्थी या नात्याने उपस्थित होतात अशी कल्पना करून प्रसंग लेखन करा.

    उत्तर :

    दहावीचा शुभेच्छा समारंभ

    धुळे जिल्हयातील आमच्या 'साधना विदयालया 'ने ४ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता आम्हां दहावीच्या विदयार्थ्यांसाठी शुभेच्छा समारंभाचे आयोजन केले होते.

    आम्हां दहावीच्या विदयार्थ्यांसाठी हा दिवस खास होता. मी पंधरा मिनिटे अगोदरच शाळेत पोहोचले. शाळेत लगबग सुरू होती. आमच्या शाळेच्या पटांगणात स्टेज उभारून कार्यक्रमाची व्यवस्था केली होती. नेहमीचीच शाळा आज जरा वेगळी भासत होती. शाळेत केलेली सजावट, प्रवेश‌द्वाराजवळ काढलेली रांगोळी, फुलांची सजावट, शिक्षकांचे प्रसन्न चेहरे, कार्यक्रमस्थळी केलेली व्यवस्था सारे काही आज डोळ्यांत साठवून घ्यावेसे वाटत होते.

    साड्या व छान छान ड्रेस घातलेल्या आम्ही मुली, तर सूटाबुटात वावरणारी मुले यांमुळे पटांगणात रंगीबेरंगी फुलांची बागच फुलल्यासारखी वाटत होती. या उत्साहाच्या वातावरणात भर पडली ती कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आमचे माजी मुख्याध्यापक मा. श्री. रमाकांत धुमाळ सर व प्रमुख पाहुणे शिक्षणतज्ज्ञ मा. श्री. अजय साठे यांच्या उपस्थितीमुळे.आमच्या विदयार्थी प्रतिनिधीने अध्यक्षांचे व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करून कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करतानाच आपले मनोगतही व्यक्त केले. त्याच्या मनोगतातून जणू आमच्या भावनांना त्याने वाट मोकळी करून दिली होती. हा शुभेच्छा समारंभ शाळेच्या लेखी आम्हां विदयार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसाठी, त्यापुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यासाठीचा असला, तरीही आमच्यासाठी  शाळेच्या निरोपाचा दिवस होता. त्यामुळे प्रत्येकाचे मन  भरून आले होते. लहानपणापासून ज्या शाळामाऊलीने आपले बोट धरून इथवर आणले होते, ते बोट सोडून पुढची वाटचाल आपली आपणय करायची होती. ओल्या डोळ्यांनी  दोन-तीन मनोगते व्यक्त झाली.

    सारे वातावरण हळवे झाले असतानाच, 'अशी पाखरे येती, आणिक स्मृती ठेवुनी जाती' या मंगेश पाडगावकरांच्या कवितेने अध्यक्षांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. या अफाट जगात वावरताना काय करावे आणि काय करू नये यांबद्दल त्यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले. प्रमुख पाहुण्यांनी तर आम्हांला शुभेच्छा देताना करीअरच्या विविध क्षेत्रांची ओळख करून दिली. इयत्ता ९वीच्या विदयार्थ्यांनी आमच्यासाठी बनवलेल्या शुभेच्छा कार्डाच्या सभास्थानी केलेल्या सजावटीने तर आम्ही भारावूनच गेलो. या छोट्या दोस्तांनी आमच्यासाठी कविताही सादर केल्या. नवा विचार, नवी दिशा, नवे संकल्प, नवे आकाश यांची जाणीव करून देणाऱ्या या शुभेच्छा समारंभाने तर शाळेब‌द्दलच्या आदरात, प्रेमात अधिकच भर घातली. आणि या प्रेमळ निरोपासोबतच प्रेमाचा खाऊही शाळेने खायला दिला. मित्र-मैत्रिणी, शिक्षक यांच्याशी भावनिक संवाद साधून, खूप सारे फोटो, आठवणींची  खूप मोठी शिदोरी आम्ही या निमित्ताने आम्ही सोबत घेतली. शुभेच्छा समारंभाची सांगता झाली. मग आम्ही जड अंतःकरणाने शाळेच्या बाहेर पडलो.

  2. प्रसंगलेखन :  ( Mar -23 )
    'अकस्मात पडलेला पाऊस' या विषयावर खालील मुद्दे विचारात घेऊन लेखन करा.

    उत्तर :

    अकस्मात पडलेला पाऊस

      उन्हाळी सुट्टीमध्ये आम्ही सगळे एकत्र कुटुंब फिरायला गेलो होतो. पुणे, लोणावळा, कोकण असा कार्यक्रम आखलेला. बऱ्याच महिन्यांनी असं कुठेतरी एकत्र जात होतो. त्यामुळे सगळेच खूप उत्साहात होते. कोकणच्या उकाड्यातून महाबळेश्वरला पोहोचवल्यावर सगळेच सुखावलो. अंगाची काहिली जरा शमली होती. आम्ही राहण्यासाठी डोंगराच्या कुशीत असलेला एक बंगला भाड्याने घेतला होता. बंगल्याच्या समोर मस्त बाग होती. निरनिराळ्या प्रकारची फुलझाडे आणि बागेतला झोपाळा तो दिवस आम्ही बंगल्यावरच  घालवायचा असं ठरवून बागेतव गप्पा, गोष्टी आणि खेळांना सुरुवात केली. पण खेळता खेळता अचानक हवा बदलली आणि आभाळ दाटून आलं. तेव्हा तिथले व्यवस्थापक म्हणाले, "इथे अशीच हवा बदलत असते." त्यामुळे मग आम्ही आमची धम्माल सुरू ठेवली.

      थोड्या वेळाने गडगडायला लागलं, जोराचा वारा सुटला, झाडांची पानं सळसळायला लागली, हवेतला गारवा वाढला आणि अचानक धुवाधार पाऊस सुरू झाला. आमची तारांबळ उडाली खरी पण धावत आत जाण्यात काहीच अर्थ नव्हता. पावसाने आम्हांला आधीच चिंब भिजवून टाकलं होतं. अकस्मात आलेल्या या पावसाने मन आणि शरीर दोन्ही सुखावलं. मग काय, आम्ही अचानक आलेल्या या पाहुण्याच आनंदाने स्वागत केलं. आम्ही मुलांनी तर गवतावर लोळण घेतली. मातीचा नैसर्गिक सुगंध अनुभवला. पावसाचा वेग वाढला. आम्ही सगळे नाचत होतो. पावसाच्या थंड सरी अनुभवत होतो. अचानक आलेला हा पाऊस आणखीनच हवासा वाटू लागला.

    थोड्या वेळाने पावसाचा जोर कमी झाला तसे आम्ही बंगल्यावर परतलो. फ्रेश झालो. तोवर आमच्यासमोर गरमागरम चहा आला. थंड वातावरणात गरमागरम चहा पिताना किती बरं वाटत होत, पण एकीकडे मुंबईच्या वडापावची आठवण आल्यावाचून राहिली नाही, त्यामुळे मग रात्रीचा बटाटेवडयांचा बेत ठरवला. बटाटेवडे तळतानाच पावसाची आणखी एक सर येऊन गेली. जेवणं आटोपेस्तोवर पाऊस थांबला होता. पण हवेतला गारवा आणखी वाढला होता. रात्री पुन्हा बागेत खुर्च्या टाकून शाल आणि स्वेटर अंगावर घेऊन गाण्याच्या भेंड्या खेळत बसलो.

prasang lekhan in Marathi | prasang lekhan in marathi 10th class| prasang lekhan in marathi language | prasang lekhan in marathi akasmat padlela paus | prasang lekhan in marathi format | pavsalyatil ek divas prasang lekhan in Marathi | prasang lekhan in marathi class 9 | prasang lekhan in marathi pdf | prasang lekhan in marathi example | mi pahileli jatra prasang lekhan in Marathi | akasmat padlela paus prasang lekhan in Marathi | nirop samarambh prasang lekhan in Marathi | how to write prasang lekhan in Marathi | prasang lekhan in marathi 9th class | prasang lekhan in marathi meaning | class 10 prasang lekhan in Marathi | maze balpan prasang lekhan in Marathi | what is prasang lekhan in Marathi | essay class 9 prasang lekhan in marathi language | prasang lekhan in marathi 10th





COMMENTS

नाव

इंग्रजी,3,इंग्रजी उपयोजित लेखन,3,इंग्रजी व्याकरण,2,प्रश्नपत्रिका,11,मराठी,1,मराठी उपयोजित लेखन,10,मराठी व्याकरण,7,शैक्षणिक Update,21,हिंदी रचना विभाग,3,हिंदी व्याकरण,4,
ltr
item
marathi study : प्रसंग लेखन कसे करावे_how to write prasang lekhan
प्रसंग लेखन कसे करावे_how to write prasang lekhan
प्रसंग लेखन कसे करावे, how to write prasang lekhan, prasang lekhan in marathi, class 10 prasang lekhan in Marathi, essay class 9 prasang lekhan
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgxelbbNFLWbwm02komBctDU4ZqQJa6phrZ79vQEEL01rSnmD79HCsaZDoReZOjRb-EnnmQgZ0RA_9UwjjHoKHQ4GZh_qT0YCjdKOpm3ldHfG6ESPsVQQW1wIvSsxYYYCQHakUYMIp8OpraDIdZIQ-mVzTF6V_l9nV7OWwlZpmFrIsWg2qc4nr-Suwre4kO/s16000/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%20%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96%E0%A4%A8%20%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F.png
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgxelbbNFLWbwm02komBctDU4ZqQJa6phrZ79vQEEL01rSnmD79HCsaZDoReZOjRb-EnnmQgZ0RA_9UwjjHoKHQ4GZh_qT0YCjdKOpm3ldHfG6ESPsVQQW1wIvSsxYYYCQHakUYMIp8OpraDIdZIQ-mVzTF6V_l9nV7OWwlZpmFrIsWg2qc4nr-Suwre4kO/s72-c/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%20%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96%E0%A4%A8%20%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F.png
marathi study
https://www.marathistudy.com/2025/02/prasang%20lekhan%20in%20.html
https://www.marathistudy.com/
http://www.marathistudy.com/
http://www.marathistudy.com/2025/02/prasang%20lekhan%20in%20.html
true
5159341443364317147
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read More Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content