--> इयत्ता दहावीमराठी कुमारभारती प्रश्नपत्रिका मार्च 2023 _ आदर्श उत्तरपत्रिका | Maharashtra 10th Class Marathi Question Paper 2023 | marathi study

इयत्ता दहावीमराठी कुमारभारती प्रश्नपत्रिका मार्च 2023 _ आदर्श उत्तरपत्रिका | Maharashtra 10th Class Marathi Question Paper 2023

इयत्ता दहावीमराठी कुमारभारती प्रश्नपत्रिका मार्च 2023 _ आदर्श उत्तरपत्रिका , Maharashtra 10th Class Marathi Question Paper 2023


इयत्ता दहावी  मराठी कुमारभारती

इयत्ता दहावी बोर्डाची परीक्षा म्हणजे जीवनाला दिशा देणारी महत्त्वाची परीक्षा! यासाठी विदयार्थी विविध प्रकारे तयारी करून यशाची नवी उंची गाठण्याचा प्रयत्न नक्कीच करतात. अशा या बोर्डाच्या परीक्षेची परीक्षापूर्व उजळणी हा लेख उपयुक्त,  मार्च 2023 कृतिपत्रिका !

बोर्डाच्या 2025 च्या परीक्षेसाठी नमुना उत्तर लेखनासाठी विद्यार्थ्यांना खूपच उपयुक्त ठरेल.

यात 'मराठी (कुमारभारती)' या विषयाची Mar-23 मध्ये घेण्यात आलेल्या बोर्ड परीक्षेची कृतीपात्रिका PdF प्रथम देण्यात आली आहे बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेचा/कृतिपत्रिकेचा आराखडा / कृतिपत्रिकेचे स्वरूप स्पष्टपणे लक्षात येईल.

विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनासाठी बोर्डाची मार्च 2023 ची प्रश्नपत्रिका / कृतिपत्रिका संपूर्ण विकल्प प्रश्नांच्या उत्तरांसह सोडवून देण्यात आली आहे. 

    ही प्रश्नपत्रिका/कृतिपत्रिका व त्यांची उत्तरे देताना, संबंधित प्रश्नप्रकारांत कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि त्यांची उत्तरे कशी लिहावीत, याची समज विद्यार्थ्यांना आपोआपच येईल. 

मराठी कुमारभारती बोर्डाची कृतिपत्रिका (मार्च 2023)

⇊    ⇊

इयत्ता दहावी  मराठी कुमारभारती 
 बोर्डाच्या कृतिपत्रिकेची उत्तरे (मार्च 2023)

पठित गद्य 

प्रश्न : 1 ( अ ) उताऱ्या च्या आधारे सूचनांनुसार कृती :

  1.  आकृती पूर्ण करा.

          न्यू एज रोबो कंपनीने हॉटेल व्यवसायासाठी
                     तयार केलेले यंत्रमानव
                                      ↓
            ———————————————
           ↓                  ↓                 ↓                   ↓                    
         वेटर           आचारी          स्वीपर         मॅनेजर

         

    न्यू एज रोबो कंपनीचा एजंट आम्हांला लॅपटॉपवर माहिती सांगत होता. 'हॉटेल व्यवसायाच्या गरजा लक्षात घेऊन वेटर, आचारी, स्वीपर, मॅनेजर असे वेगवेगळे यंत्रमानव म्हणजेच रोबो आम्ही बनवले आहेत. आम्ही बनवलेले रोबो हुबेहूब माणसाप्रमाणे दिसतात आणि वागतातही. एका रोबोची किंमत एक लाख रुपये आणि दर दोन महिन्यांना सव्र्व्हिसिंगचे अडीच हजार रुपये.' लाखाची गोष्ट निघाल्याबरोबर सोमनाथ पटकन उठत मला म्हणाला, "राजाभाऊ, उठा आता, हे काही आपल्याला परवडणार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे रोबो वेटरची सर्व कामं करणं कसं शक्य आहे?" सोमनाथप्रमाणे माझाही त्या एजंटवर विश्वास बसत नव्हता. "फक्त पाच मिनिटं... माझं म्हणणं तुम्ही ऐकून घ्या. माझ्या सांगण्यावर तुमचा विश्वास बसत नाही; पण आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञानाचा हा चमत्कार आहे. मोठमोठ्या शहरांतील हॉटेलमध्ये अनेक रोबो काम करीत आहेत. आमच्या रोबोबाबत वेटरच्या खाण्यापिण्याचा, पगाराचा, कामचुकारपणाचा विचार करण्याची गरज नाही. आमचा रोबो वेटर मानवी वेटरपेक्षा दुप्पट काम करेल आणि तुम्हांला दुप्पट कमाई करून देईल याची मी खात्री देतो." एजंटच्या शेवटच्या वाक्याने आम्ही विचार करू लागलो.


  2.    उत्तरे लिहा.

       (i) रोबो वेटरचा सर्व्हीसिंगचा कालावधी  - 
             उत्तर :    
    दर दोन महिन्यांनी.

       (ii) रोबो वेटरबाबत न्यू एज कंपनीच्या एजंटने दिलेली खात्री तुमच्या शब्दात लिहा. 
              उत्तर : -  
    रोबो वेटर मानवी वेटरपेक्षा दुप्पट काम करील आणि दुप्पट कमाई करून देईल.

  3.  स्वमत:
            'रोबो व माणूस यांच्या वागण्यातील ठळक फरक तुमच्या शब्दांत लिहा. ( नमुना स्वमत )
    उत्तर : 

          हॉटेल हेरिटेजमध्ये काम करणारे चार रोबो वेटर हे यंत्र होते. अचानक एके दिवशी त्यांच्यात बिघाड झाला आणि विवित्र पद्धतीने वागून त्यांनी मोठा गोंधळ उडवून दिला. तिथे माणसे असती तर वेगळे वित्र दिसले असते. मानवी वेटरांनी परिस्थिती वघून स्वतःहून कामात योग्य ते बदल केले असते. रोबोंसारखी विवित्र कृती नक्कीच केली नसती. दुसऱ्या प्रसंगी तर झोपलेली बाई आणि बेशुद्ध पडलेली बाई यांच्यातला फरक रोबोंना कळलाच नाही. ती बाई बेशुद्ध पडलेली आहे. हे मनोजला कळले म्हणून योग्य ती उपाययोजना तातडीने केली गेली आणि त्या बाईचा प्राण वाचला रोबोला स्वतःची बुद्धी नसल्यामुळे तो स्वतंत्रपणे विचार करू शकला नाही. जिथे जिथे यंत्रमानव आहेत, तिथे तिथे हेच घडणार.
प्रश्न : 1 ( आ ) उताऱ्या च्या आधारे सूचनांनुसार कृती :
  1.   कृती करा :
             'नेहरू गिरिभ्रमण प्रशिक्षण
               केंद्रा 'तील अरुणिमाचे
                 खडतर अनुभव लिहा.

      उत्तर :    
                  (i) धोकादायक पर्वत चढणे,
                 (ii) मृत्यू येईल असे वाटायला लावणाऱ्या कृती करणे.
                 (iii) ध्येयापासून दूर लोटू पाहणारे प्रशिक्षणातील कष्ट.
                (iv) दीड वर्षासाठी खडतर प्रशिक्षण,

    पहिला टप्पा होता गिर्यारोहण प्रशिक्षणाचा. 'एम्स'मधून डिस्चार्ज मिळाला. साधारणपणे एखादा हात/पाय कापावा लागलेले पेशंटस् दिवसेंदिवस अगदी महिनोन् महिने उठत नाहीत. मी दोनच दिवसांत उभी राहिले. एका पायात घोट्याची हाडे तुटल्याने रॉड घातलेला, ज्याच्या हाडांची जुळणी अजून पुरी व्हायची होती. दुसरा पाय म्हणजे मांडीपासून खाली कृत्रिम पाय बसवलेला. असा माझा अवतार नि जोडीला भाईसाब आम्ही पोचलो ते थेट बचेंद्री पाल यांच्याकडे. बचेंद्रीजी म्हणजे एव्हरेस्ट सर करणारी पहिली महिला. त्याच एकमेव अशा होत्या, की ज्यांनी माझ्या ध्येयाचा आदर केला, मला प्रोत्साहन दिलं. त्या म्हणाल्या, "अरुणिमा, तू अशा परिस्थितीत इतका मोठा निर्णय घेतलास... तुला ठाऊक आहे, तुझ्या आतलं एव्हरेस्ट तू केव्हाच सर केलं आहेस. आता तुला एव्हरेस्ट सर करायचं आहे ते फक्त स्वतःला सिद्ध करायला, जगाला तू कोण आहेस हे दाखवून दयायला...!"

    'नेहरू गिरिभ्रमण प्रशिक्षण केंद्र' बहुधा आशिया खंडातील सर्वोत्तम असावं. इथे माझे दीड वर्षांसाठी खडतर प्रशिक्षण सुरू झाले. छोटे पण बऱ्यापैकी धोकादायक पर्वत चढणे, जवळपास मरणप्राय कठीण अनुभव, ध्येयापासून विचलित करू पाहणारे कष्टदायी प्रशिक्षण यांतून मी तावून सुलाखून निघत होते.


  2.       एका शब्दांत उत्तर लिहा :
          ( i) एव्हरेस्ट सर करणारी पहिली महिला.    → बचेंद्री पाल
           (ii) अरुणिमाबरोबर बचेंद्री पाल यांच्याकडे जाणारी व्यक्ती.  → भाईसाब.

  3. स्वमत:
            'प्रत्येकामध्ये एक जिद्दी अरुणिमा असते, याबाबत तुमचे विचार स्पष्ट करा.: 
    ( नमुना स्वमत )
         कोणतीही व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीसारखी नसते. एखादयाला नृत्य आवडते.
    एखाद्याला गायन आवडते. एखादयाला दुसऱ्याला मदत करायला आवडते. आपल्यातला असा वैशिष्ट्यपूर्ण गुण कोणता आहे. हे आपण शोधले पाहिजे. या गुणाची जोपासना केली पाहिजे. मग आपल्या हातून आपोआपच अलौकिक कामगिरी पार पडेल. अरुणिमाने नेमके हेच केले. खरे तर अपंग बनलेली अरुणिमा आयुष्यात काहीच करू शकली नसती. पण तिने जि‌द्दीने स्वतःमधला वेगळा गुण ओळखला. स्वतःचे सामर्थ्य शोधले आणि अशक्य वाटणारी कामगिरी पार पाडली. प्रत्येक व्यक्तीमध्ये अशी अरुणिमा असतेच. फक्त त्या अरुणिमाचा आपण शोध घेतला पाहिजे. जीवनाचा हाच  महामंत्र आहे.

अपठित गद्य 

प्रश्न : 1 ( इ ) उताऱ्या च्या आधारे सूचनांनुसार कृती :
  1.   आकृतिबंध पूर्ण करा :
                कर्मवीरांची आश्रयस्थाने 
                             ↓
                i) संस्थानिकांचे वाडे 
                ii) कर्मवीरांची आश्रयस्थाने
                iii) वारकऱ्यांच्या धर्मशाळा
             

माणूस, त्याचा सामाजिक परिसर व त्याच्या सभोवतालचा निसर्ग यांतील संवाद शिक्षणामुळे साधता आला पाहिजे, हा कर्मवीरांचा आग्रह होता. भारत हा खेड्यांचा आणि खेडूतांचा देश आहे. खेडी ही निसर्गाला अधिक जवळची आहेत. व्यक्तीचे पौरुष, प्रतिकारक्षमता व उपक्रमशीलता यांचा विकास होतो तो माणूस आणि निसर्ग यांच्या सहयोगातून.

कर्मवीरांनी हे जीवनरहस्य जाणले आणि शिक्षणाचा मोहरा खेड्याकडे वळवला. संस्थानिकांचे वाडे, वारकऱ्यांच्या धर्मशाळा, वाड्या आणि वस्त्यांवरची घरकुले हीच आपली आश्रयस्थाने समजून कार्याला आरंभकेला. पुढे-पुढे शाळांच्या वास्तू उभ्या राहिल्या. शक्य असेल तेथे शाळेला जोडून शेती संपादन करण्यात आली. शेतात विहिरी खोदण्यात आल्या. हे सर्व विद्यार्थ्यांच्या श्रमदानातून घडवून आणले.

अंगमेहनतच गरिबांची दौलत. 'कमवा आणि शिका' या शिक्षण क्षेत्रातील मंत्राचे द्रष्टे कर्मवीर हेच होते.

       2.    (2) चौकटी पूर्ण करा :
                (i) कर्मवीरांच्या मते गरिबांची दौलत     अंगमेहनत
               (ii) कर्मवीरांनी शिक्षण क्षेत्राला दिलेला मंत्र    कमवा आणि शिका
                 

दहावी मराठी कुमारभारती प्रश्नपत्रिका 2023 डाउनलोड,SSC मराठी प्रश्नपत्रिका मार्च 2023 PDF, दहावी मराठी बोर्ड परीक्षा प्रश्नपत्रिका 2023, 2023 मराठी कुमारभारती प्रश्नपत्रिका उत्तरांसह, दहावी मराठी प्रश्नपत्रिका नमुना 2023. महाराष्ट्र बोर्ड मराठी प्रश्नपत्रिका 2023, दहावी मराठी प्रश्नपत्रिका PDF डाउनलोड 2023, मराठी कुमारभारती प्रश्नपत्रिका 2023 उत्तरतालिका, दहावी मराठी प्रश्नपत्रिका 2023 सराव, SSC मराठी प्रश्नपत्रिका 2023 PDF फाईल

विभाग 2 :  पद्य 

प्रश्न : 2 ( अ ) कवितेच्या आधारे सूचनांनुसार कृती :

  1. कवितेच्या आधारे पुढील विधाने योग्य की अयोग्य ते लिहा :
         (i) सकारात्मक राहा.  योग्य 
         (ii) उतावळे व्हा.       →  अयोग्य 
        (iii) खूप हुरळून जा.   →  अयोग्य 
        (iv) संवेदनशीलता जपा.   →  योग्य 




  2. कवितेतील पुढील संकल्पना आणि त्यांचे अर्थ यांच्या जोड्या लावा :

     योग्य जोड्या जुळवा : 
    कवितेतील संकल्पनासंकल्पनेचा अर्थ
    (i) मूठ मिटून कशाला म्हणायचे भरलेली( i) मनातील सामर्थ्य व्यापक बनवावे.
    (ii) उघडून ओंजळीत घ्यावी मनातली तळी(ii) सगळे लोक फसवे नसतात.
             -(iii) भ्रामक खोट्या समजुती बाळगू नयेत.
    उत्तर :
    कवितेतील संकल्पनासंकल्पनेचा अर्थ
    (i) मूठ मिटून कशाला म्हणायचे भरलेली( i) भ्रामक खोट्या समजुती बाळगू नयेत.
    (ii) उघडून ओंजळीत घ्यावी मनातली तळी(ii) मनातील सामर्थ्य व्यापक बनवावे.
             ----

  3. पुढील पट्यपंक्तींचा सरळ अर्थ तुमच्या शब्दांत लिहा :
         खोद आणखी थोडेसे
        खाली असतेच पाणी खोटी नसतात नाणी.
        धीर सोडू नको, सारी
    उत्तर :
    प्रयत्मवादाणे परिस्थिती बदलते हे सांगताना कवयित्री म्हणते-निराश न होता प्रयत्नपूर्वक आणखी थोडे खोद, जमिनीस्वाली नक्की पाणी लागेल. धैर्य न सोडता जि‌द्दीने प्रयत्न कर, सर्व माणसे स्वार्थी नसतात. जगात काही प्रामाणिक माणसेही असतात, हा विश्वास ठेव.
  4. काव्यसौंदर्य :
       'झरा लागेलच तिथे, खोद आणखी जरासे', या ओळीतील विचारसौंदर्य स्पष्ट करा.
    उत्तर :
    'खोद आणखी थोडेसे' या कवितेमध्ये कवयित्रीने माणसाने प्रयत्नवादी होऊन उमेदीने जीवन जगावे, हा सकारात्मक विचार मांडला आहे.
      
    जगत असताना माणसाने कधीही निराश होऊ नये. स्वतःवर विश्वास ठेवून अथक प्रयत्न करावेत, प्रयत्नांनंतर यश हमखास मिळेलच । ओठ दाबून दुःख सहन करू नये. दुःख सरेल हा आशावाद बाळगावा. मनात सकारात्मक तळी असतात. ती खोदावीत. अखेर निर्गळ झरा लागतोच ही उमेद गणात हवी. जि‌द्दीने परिस्थितीवर मात करता येते. त्यासाठी आत्गवळ हवे. समृद्ध जगण्यासाठी सतत प्रयत्नवादी राहायला हवे.
     अशा प्रकारे या ओळींमधून कवयित्रीने जीवनातील सकारात्मक आशावादी विचार मांडला आहे.

प्रश्न : 2 ( आ ) पुढील मुद्द्यांच्या आधारे खालीलपैकी कोणत्याही एका कवितेसंबंधी दिलेल्या कृती सोडवा :

मद्दे 'भरतवाक्य' किंवा 'वस्तू '
(i) प्रस्तुत कवितेचे कवी / कवयित्री - ---------- ---------
(ii) प्रस्तुत कवितेचा विषय - --------- ---------
(iii) प्रस्तुत कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे - --------- ---------

  •      भरतवाक्य :
    (i) कवी    -   मोरोपंत
    (ii) कवितेचा विषय  -   सत्कर्मात व सज्जनांच्या सहवासात राहण्याची शिकवण.
    (iii) कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे -
    ही कविता मला आवडते. कारण लहानपणापासून मी ती ऐकत आलो आहे. लहानपणी ती पाठही केली होती. आता मोठा झाल्यावर कवितेचा अर्थ कळला आहे. कवितेत चांगले वागण्याचा सल्ला दिला आहे. पण चांगले म्हणजे काय, हे सोप्या पद्धतीने सांगितले आहे. सज्जन माणूस जसे वागतो, बोलतो, विचार करतो, तसे म्हणजे चांगले, इतकी सोपी कल्पना वापरून आपले म्हणणे सांगितले आहे. पण या कवितेतील संस्कृतप्रचुर शब्दांमुळे अर्थ कळण्यात अडचणी येतात. ही एक कवितेविषयी नावड निर्माण करणारी बाब आहे.
  • वस्तू :
    (i) कवयित्री   -   द. भा. धामणस्कर
    (ii) कवितेचा विषय   -    वस्तूंना भावना असतात हे समजून वस्तूंशी निगडित स्नेह जपावा.
    (iii) कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे  -
         ही कविता सुंदर आहे. आधुनिक जगात वावरणाऱ्या कोणालाही ही कविता आवडेल अशी आहे. एक वेगळाव चाकोरीबाहेरचा विचार कवीने या कवितेतूल मांडला आहे. सहसा आपण वस्तू व ती वापरणारा माणूस यांना वेगळे वेगळे मानतो. वापरकर्त्या व्यक्तीच्या मनाप्रमाणे वस्तूंवे स्वरूप घडते. म्हणजे वस्तूंवरून वापरकत्यचि गन कळते. आपण वस्तूंशी प्रेमाने वागतो. म्हणजे स्वतःशीच प्रेमाले वागत असतो, असा वेगळा नावीन्यपूर्ण भाव या कवितेतून व्यक्त होतो. म्हणून ही कविता मला आवडते.
प्रश्न : 2 ( इ ) पुढे दिलेल्या काव्यपंक्तीचे रसग्रहण करा  :

            ''घामातुन मोती फुलले
             श्रमदेव घरी अवतरले
               घर प्रसन्नतेने नटले
             हा योग जीवनी आला साजिरा'

  • आशयसौंदर्य: 'सुप्रसिद्ध मराठी गीतकार जगदीश खेबुडकर यांची 'आकाशी झेप घे रे ही मराठी चित्रपटातील एक गीतरचना आहे. स्वसामर्थ्यावर अदम्य विश्वास ठेवून कर्तृत्वाचे मोकळे आकाश ओळखावे आणि ध्येयाकडे उंच भरारी घ्यावी, परावलंबित्य सोडून स्वावलंबी व्हावे, ही या कवितेची मध्यवर्ती कल्पना आहे. स्वकर्तृत्वाने यशाचे शिखर गाठावे आणि उच्च ध्येयाकडे झोप घ्यावी. पारतंत्र्याचा त्याग करून स्वातंत्र्याचे मोल जाणावे, हा अमूल्य संदेश ही कविता देते.. 

     काव्यसौंदर्य :
    वरील ओळींमध्ये कवीने श्रमाचे महत्त्व सांगितले आहे. कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नाही. अविरत प्रयत्न व काबाडकष्ट करून जेव्हा शेतकरी शेतामध्ये खपतो, तेव्हा त्याला मोत्यांसारखे पीक मिळते. त्याच्या घामातून मोती फुलतात. ते धनधान्य त्याच्या घरी येते, तेव्हा त्याच्या श्रमावे सार्थक होते. जणू श्रमदेव त्याच्या घरी अवतरतो. घरात समृद्धी व प्रसन्नता येते. कष्टाचे सार्थक होऊन सुखाचा गोड, सुंदर प्रसंग आयुष्यात येतो.

    भाषिक वैशिष्ट्ये: ध्रुपद व कडवी अशी या गीताची सुटसुटीत रचना आहे. रसाळ शब्दकळा व नेमके मर्म सांगणारी भाषा हे या कवितेचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. 'पिंजरा' हे सुखलोलुपतेचे प्रतीक वापरले आहे आणि त्यात कैद झालेल्या मानवी मनाला 'पक्षी' म्हटले आहे. साध्या शब्दांत गहन आशय मांडला आहे. यमकप्रधान गेय रूपामुळे कविता मनात ठसते.
दहावी मराठी कुमारभारती प्रश्नपत्रिका 2024 डाउनलोड,SSC मराठी प्रश्नपत्रिका मार्च 2024 PDF, दहावी मराठी बोर्ड परीक्षा प्रश्नपत्रिका 2024, 2024 मराठी कुमारभारती प्रश्नपत्रिका उत्तरांसह, दहावी मराठी प्रश्नपत्रिका नमुना 2024. महाराष्ट्र बोर्ड मराठी प्रश्नपत्रिका 2024, दहावी मराठी प्रश्नपत्रिका PDF डाउनलोड 2024, मराठी कुमारभारती प्रश्नपत्रिका 2024 उत्तरतालिका, दहावी मराठी प्रश्नपत्रिका 2024 सराव, SSC मराठी प्रश्नपत्रिका 2024 PDF फाईल

विभाग 3 : स्थूलवाचन 

प्रश्न : 3 पुढीलपैकी कोणत्याही दोन कृती सोडवा  :

  1. व्युत्पत्ती कोशाचे कार्य लिहा.

    उत्तर : 
    व्युत्पत्ती कोशाचे कार्य : व्युत्पत्ती म्हणजे एखादया शब्दाच्या किंवा अर्थाच्या मुळावे ज्ञान होय. व्युत्पत्ती सांगणे म्हणजे एखादया शब्दाच्या मुळाविषयी माहिती देणे होय. अशा अनेक शब्दांच्या व्युत्पत्तींचा संग्रह म्हणजे व्युत्पत्ती कोश !
      व्युत्पत्ती कोशाचे कार्य पुढीलप्रमाणे चार प्रकारे चालते:
    (१) मराठी भाषेतील प्रमाण व बोली शब्दांचे मूळ रूप दास्ववणे.
     (२) विशिष्ट प्रदेशात व भौगोलिक परिसरात एकाच शब्दातील उच्चारांत बदल होत असतो. हा शब्दांच्या उच्चारांतील बदल व फरक दाखवणे,
      (३) भाषेमध्ये इतिहासाच्या दृष्टीने फरक होत असतात. भिन्न भिन्न काळात जे शब्दांत बदल होतात, त्या बदलांचे कारण स्पष्ट करणे.

  2.  'बालसाहित्यिका गिरिजा कीर' या पाठाच्या आधारे 'मधूचे कृत्य संवेदनशील मनाचे उत्तम लक्षण आहे; या विधानाबाबत तुमचे मत स्पष्ट करा.

      उत्तर : 

    आईवरील प्रेमापोटी कोणतीही कृती करायला मधू तयार होतो. तो एका गृहस्थाचे पाकीट मारतो.
    पुढे पाकिटातील चिठ्ठीवरून मधूला सत्य स्थिती कळते. आपण चोरलेल्या पैशांमुळे त्या गृहस्थाच्या आईला जीव गमवावा लागू शकतो, या विचाराने तो व्याकूळ होतो आणि पाकिटात असलेल्या पत्त्यावरून ताबडतोब पैसे परत करण्याचा तो निर्णय घेतो.
       त्याची ही कृती त्याच्या संवेदनशील मनाचे उदाहरण आहे. आपल्या कृतीमुळे कोणाचातरी मृत्यू ओढवणे हा क्रूरपणाच होय, ते त्याला जाणवते. आपली जशी आई आहे, तशीच दुसऱ्या व्यक्तीलासुद्धा आई असते. त्या व्यक्तीलासुद्धा स्वतःच्या आईविषयी प्रेम असणारच. आपण स्वार्थाने आंधळे होऊन फक्त स्वतःच्या आईवरील प्रेम लक्षात घेतो; दुसऱ्याच्या मनाचा विचारच करीत नाही, हे मधूच्या लक्षात येते. यातून त्याची तीव्र संवेदनशीलता प्रत्ययाला येते.


  3.  'प्रेम आणि आपुलकी' या गोष्टींमुळे भरकटलेली मुले पुन्हा स्वगृही जाण्यास तयार होतात, हे 'वीरांगना' या पाठाच्या आधारे स्पष्ट करा.

    उत्तर : 
    चुका करणाऱ्या माणसांकडे व गुलांकडे समाज, पोलीस नकारात्मक दृष्टीने पाहतात. पोलीससु‌द्धा अशी गुले समोर आली की, त्यांच्याकडून माहिती मिळवण्यासाठी पहिल्यांदा त्यांना मारपीट करतात. ही गुले गुन्हेगारी स्वरूपाचीच असतात, असा पोलिसांनी पूर्वग्रह करून घेतलेला असतो. साहजिकच, या मुलांचा सुधारण्याचा मार्गवच बंद होतो. श्रीमती रेखा यांनी मात्र आईच्या मायेने अशा मुलांकडे पाहिले. त्यांना जवळ घेतले. आपलेसे केले. त्यामुळे ही मुले पुन्हा घरी जाण्यास राजी झाली. चांगले आयुष्य सुरू करण्याची त्यांना संधी मिळाली. पहिल्याच केसमध्ये त्यांना सापडलेल्या १४ वर्षाच्या मुलाचे त्यांनी ममतेने मनपरिवर्तन केले. पोलिसी बडगा दाखवण्यापेक्षा त्यांनी त्यांच्याशी मैत्री केली. यामुळे ही मुले रेखाजींच्या जवळ आली. याचा अर्थच असा की मुलांशी प्रेमाने वागले तर ती स्वगृही जाण्यास तयार होतात.

दहावी मराठी कुमारभारती प्रश्नपत्रिका 2024 डाउनलोड,SSC मराठी प्रश्नपत्रिका मार्च 2024 PDF, दहावी मराठी बोर्ड परीक्षा प्रश्नपत्रिका 2024, 2024 मराठी कुमारभारती प्रश्नपत्रिका उत्तरांसह, दहावी मराठी प्रश्नपत्रिका नमुना 2024. महाराष्ट्र बोर्ड मराठी प्रश्नपत्रिका 2024, दहावी मराठी प्रश्नपत्रिका PDF डाउनलोड 2024, मराठी कुमारभारती प्रश्नपत्रिका 2024 उत्तरतालिका, दहावी मराठी प्रश्नपत्रिका 2024 सराव, SSC मराठी प्रश्नपत्रिका 2024 PDF फाईल

विभाग 4 : भाषाभ्यास 

प्रश्न : 4 ( अ ) व्याकरण घटकावर आधारित कृती :

  1. समास :

     योग्य जोड्या जुळवा : 
    समास समासाचे नाव
    (i) भाजीपाला  द्विगू समास 
    (ii) कमलनयन  समाहार द्वंद्व समास
             - कर्मधारय समास
    उत्तर :
    समास समासाचे नाव
    (i) भाजीपाला समाहार द्वंद्व समास
    (ii) कमलनयन कर्मधारय समास

  2. शब्दसिद्धी :
    पुढे दिलेल्या शब्दांचे वर्गीकरण करून तक्ता पूर्ण करा. :
     ( भरदिवसा , लाललाल, दुकानदार , खटपट  )

    प्रत्ययघटित शब्द उपसर्गघटित शब्द अभ्यस्त शब्द
    -------------- ---------- ------------
    ---------------- -------------- --------------
    उत्तर:
    प्रत्ययघटित शब्द उपसर्गघटित शब्द अभ्यस्त शब्द
    दुकानदार  भरदिवसा  लाललाल,
            ---      ----  खटपट

  3.  वाक्प्रचार : 
    पुढीलपैकी कोणत्याही दोन वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.:
     (
    i) कान देऊन ऐकणे  :  - अर्थ  - लक्षपूर्वक ऐकणे.
       वाक्य: शिक्षकांचे भाषण मी कान देऊन ऐकत होतो.

    (ii) कसब दाखवणे   :  अर्थ  - कौशल्य दाखवणे.
      वाक्य: पाच मिनिटात गाडी सुरु करून श्यामने आपले कसब दाखवले 

    (iii) आनंद गगनात न मावणे  :   अर्थ -  अतिशय आनंद होणे..
      वाक्य:    विजयला बोर्डाच्या परीक्षेत ९०% गुण मिळाल्यामुळे त्याच्या आईबाबांचा आनंद गगनात मावत नव्हता.

    (iv) तगादा लावणे   :  अर्थ - पुन्हा पुन्हा विचारणे.
        वाक्य: सहलीला जाण्यासाठी रमेशने बाबांजवळ तगादा लावला.
प्रश्न : 4 ( आ ) भाषिक  घटकावर आधारित कृती :
  1. शब्द संपत्ती :
    (1) पुढील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा.
         
    (i) डोळा  =  नयन ,नेत्र 
         (ii) वृक्ष  =  झाड, तरु. 

    (2 ) पुढील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा.
        
     (i) वास्तव   ×  अवास्तव  
          (ii) सोय    ×  गैरसोय  

    (3 ) पुढील शब्दांचे वचन ओळखा.
           (i) वह्या    -  अनेकवचन  
           (ii) मुलगा   -  एकवचन  

    (4 ) पुढील शब्दातील अक्षरांपासून दोन अर्थपूर्ण शब्द तयार करा.
           
    विचारसरणी  
                   सर , वार, रस , चार 

  2. लेखननियमांनुसार लेखन :
    पुढील वाक्यातील लेखननियमांनुसार चुकीचे शब्द ओळखून दुरुस्त करा.

    (i)  गीर्यारोहणाने मला खुप महत्त्वाचे धडे दिले.

          गिर्यारोहणाने मला खूप महत्त्वाचे धडे दिले.

    (ii) आलिकडे एक सुरेख परदेशी सीनेमा पाहिला.

           अलीकडे एक सुरेख परदेशी सिनेमा पाहिला.

    (iii) तीचं अवसान पाहून त्यानं दिपालीला तेथेच टाकलं.

           तिचं अवसान पाहून त्यानं दीपालीला तेथेच टाकलं.

    (iv) सरपण नीट नसलं, कि गड्यांची फजीती होते.

          सरपण नीट नसलं, की गड्यांची फजिती होते
  3.  
  4. पुढील वाक्यात योग्य विरामचिन्हे घालून वाक्य पुन्हा लिहा :

    मी एवढं सगळं सांगितलं कारण मी तुम्हांला खूप जवळून पाहिलंय

    मी एवढं सगळं सांगितलं, कारण मी तुम्हांला खूप जवळून पाहिलंय.

  5. पारिभाषिक शब्द :
    पुढील शब्दांना प्रचलित  मराठी भाषेतील शब्द लिहा.

    (i)     Workshop  →    कार्यशाळा 

    (ii)    Exchange   →    देवान-घेवाण / विनिमय 
दहावी मराठी कुमारभारती प्रश्नपत्रिका 2024 डाउनलोड,SSC मराठी प्रश्नपत्रिका मार्च 2024 PDF, दहावी मराठी बोर्ड परीक्षा प्रश्नपत्रिका 2024, 2024 मराठी कुमारभारती प्रश्नपत्रिका उत्तरांसह, दहावी मराठी प्रश्नपत्रिका नमुना 2024. महाराष्ट्र बोर्ड मराठी प्रश्नपत्रिका 2024, दहावी मराठी प्रश्नपत्रिका PDF डाउनलोड 2024, मराठी कुमारभारती प्रश्नपत्रिका 2024 उत्तरतालिका, दहावी मराठी प्रश्नपत्रिका 2024 सराव, SSC मराठी प्रश्नपत्रिका 2024 PDF फाईल

विभाग 5 : उपयोजित लेखन 

प्रश्न : 5 ( अ ) पुढील कृती सोडवा  :

  1.  पत्रलेखन :
    पुढील निवेदन वाचा व त्याखालील कोणतीही एक कृती सोडवा :


   : मागणीपत्र :

दिनांक : ०१-१२-२०२५

प्रति,
मा. व्यवस्थापक,
मनोज पुस्तकालय,
६९/३१४, आनंद नगर,
अकोला. XXX XXX

  विषय: पुस्तकांची मागणी करण्याबाबत...

महोदय,
    मी कु. श्रेयस इनामदार 'सर्वोदय विद्यालयात '  शिकत असून विदयार्थी प्रतिनिधी या नात्याने आमच्या शाळेतील ग्रंथालयासाठी आवश्यक पुस्तकांची मागणी करीत आहे. आपल्या निवेदनानुसार दि. ०८ डिसेंबर रोजी तुम्ही २०% सवलतीने पुस्तक विक्री करणार आहात, त्याचबरोबर ₹२०००/- च्या खरेदीवर एक पुस्तक मोफत असे जाहीर केले आहे. या संधीचा लाभ शाळेसाठी व्हावा, ही अपेक्षा ठेवून खाली यादीत दिलेली पुस्तके मी मागवत आहे:

(१) ययाती   लेखक - वि. स. खांडेकर    १० प्रती
(२) ऋतुचक्र  लेखिका - दुर्गा भागवत     ५ प्रती
(३) बोलकी पाने   लेखिका  -  डॉ. विजया वाड १० प्रती

    पुस्तकांसोबत बिल आणि आपल्या बँक खात्याचा तपशील पाठवावा, म्हणजे आपल्या खात्यात रक्कम  ऑनलाइन जमा करता येईल.
 हे पत्र मी मा. मुख्याध्यापकांच्या परवानगीने लिहीत आहे.
कळावे,

आपला नम्र,
श्रेयस इनामदार
विदयार्थी प्रतिनिधी,
सर्वोदय विदयालय, अकोला.
ई-मेल: adarshavidya@xxxx.com

किंवा 

: माहिती देणारे  पत्र :

दिनांक : ०१-१२-२०२५

प्रिय मैत्रीण ईशा,
सप्रेम नमस्कार,

आपण परवाच प्रत्यक्ष भेटलो आणि आज अचानक हे पत्र पाहून तू आश्चर्यचकित होशीलः पण तसंच महत्त्वाचं कारण असल्यामुळे मी पत्रा‌द्वारे संवाद साधत आहे.
    तुला आनंदाची बातमी दयायची म्हणजे आपल्या जिल्हयातील आनंदनगर येथील 'मनोज पुस्तकालय' या ग्रंथभांडाराचा वर्धापनदिन दि. ८ डिसेंबर रोजी संपन्न होत आहे. या निमित्ताने त्यांनी प्रत्येक पुस्तकावर २०% सवलत आणि ₹२००० च्या खरेदीवर एक पुस्तक मोफत अशी योजना आखली आहे. तुझी वाचनाची आवड आणि पुस्तकांची भूक मला चांगलीच ठाऊक आहे. या संधीचा तुला लाभ व्हावा अशी माझी इच्छा आहे. तेव्हा लगेच वरील ठिकाणी संपर्क साधावास आणि जास्तीत जास्त पुस्तके खरेदी करावीत, हीच अपेक्षा..   लवकरच पुन्हा भेटूया. घरातील सर्वांना माझा नमस्कार सांग.
स्वतःची काळजी घे.
कळावे,

तुझी मैत्रीण,
श्रेया इनामदार,
ममता निवास,
कर्वे रोड,अकोला.
ई-मेल: shreya@xxxx.com

किंवा 

  ( 2) सारांश लेखन :
          विभाग 1 : गद्य ( इ) [ प्रश्न क्र.1 ( इ )] मधील अपठित गद्य उताऱ्याचा एक - तृतीयांश एवढा सारांश तुमच्या शब्दात लिहा.
 

उत्तर : 

सारांशलेखन :

शिक्षण आणि स्वावलंबनाने माणसाला निसर्ग, मानव व सभोतालच्या परिसराशी संवाद साधता आला पाहिजे. भारत हा शेतीप्रधान देश आहे. निसर्ग आणि खेड्यांशी त्याचे अतूट नाते लक्षात घेऊन कर्मवीरांनी खेड्यांपासून श्रमदानाचे आणि ज्ञानदानाचे कार्य घडवून आणण्यावे प्रयत्न केले. यातूनच  'कमवा आणि शिका' हा कर्मवीरांचा विदयार्थ्यांसाठी मूलमंत्र दिला.


प्रश्न : 5 ( आ ) पुढीलपैकी कोणत्याही दोन कृती सोडवा  :

  1.   जाहिरात लेखन : 



    उत्तर : 


  2. बातमी लेखन :
    पुढील विषयावर बातमी तयार करा.

    '८ मार्च 'जागतिक महिला दिनानिमित्त' शाळेत 'माता-पालक मेळावा' व विविध स्पर्धांचे आयोजन. पालकांचा उदंड प्रतिसाद.

    जागतिक महिला दिन माता-पालक मेळावा
    ( आमच्या प्रतिनिधींकडून )

    धुळे, दि. ९ मार्च : विदयावर्धिनी हायस्कूल' मार्फत काल ८ मार्च  'जागतिक महिला दिन' म्हणून साजरा करण्यात आला. समस्त महिलांच्या सन्मानार्य शाळेत 'माता-पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
      उपस्थित माता पालकांपैकी प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. श्रीमती वसुधा कुलकर्णी यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन झाले. कार्यक्रमांतर्गत विदयार्थ्यांसाठी चित्रकला, वक्तृत्वस्पर्धा, काव्यगायन इत्यादी विविध स्पर्धा आयोजित केल्या गेल्या. सर्वच स्पर्धात विदयार्थी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले. स्पर्धेतील विजेत्या विदयार्थ्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली.
    शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती स्मिता देशपांडे  यांचे उत्तम सूत्रसंचालन आणि माता पालकांचा उदंड प्रतिसाद या कार्यक्रमाला लाभला. समाजात विशेष कामगिरी बजावलेल्या कर्तबगार महिलांचा या वेळी सत्कार करण्यात आला.

  3. कथालेखन :

    पुढील अपूर्ण कथा पूर्ण करून लिहा :
    ( दिलेली अपूर्ण कथा लिहून घेण्याची गरज नाही )
    पाडळी गावातील सखू आपल्या रानातला भाजीपाला घेऊन बाजाराला गेली. शेतातल्या कोवळ्या, ताज्या भाज्या विकताना दिवस कधी संपला तिला कळलेच नाही. अजूनही थोडी भाजी शिल्लक होती. भाव कमी करून तिने ती विकली व सर्व साहित्य गोळा करून लगबगीने घराकडे निघाली. अर्ध्या रस्त्यात जाईपर्यंत काळोख दाटून आला. एक हुरहुर तिच्या मनात दाटून आली; पण नेटाने ती चालत होती. पावले भरभर उचलत होती. एवढ्यात तिला काळोखात सायकलचा आवाज आला. ती थबकली आणि...

    साथ 

    .......ती थबकली आणि तिने आजूबाजूला पाहिलं. मागे कोणीच नव्हतं. सखु आणखी घाबरली. तशी ती अगदीच देवभोळी आणि अंधश्रद्‌धाळू होती. त्यामुळे तिच्या मनात भलतेसलते विचार येऊ लागले. ती जरा पुढे गेल्यावर पुन्हा सायकलचा आवाज आला. तशी ती थांबली. पुन्हा सगळीकडे पाहिले, तर काही अंतरावर एक माणूस सायकलवरून जात असलेला तिला दिसला. वेशावरून तरी तो गावकरीच वाटत होता. ती दिसताच  त्या सायकलस्वाराने तिला "ताई" अशी हाक मारली. सखू जरा घाबरलीच. अनोळखी माणसाबरोबर कशाला बोलायचं असा तिने विचार केला पण रस्त्याला कोणीच नव्हतं आणि एकटेपणा तिला सतत भीतीची जाणीव करून देत होता. शेवटी देवाचं नाव घेतलं आणि ती त्याच्याबरोबरीने चालू लागली.
       चालताना त्यांच्यात प्रश्नोत्तरांचा संवाद चालू होताच. अंधार हळूहळू वाढत चालला होता. हवेत गारवाही जाणवू लागला. वाटेत एक माळरान लागलं ते ओलांडलं की खालच्या बाजूला सखूच गाव होतं. सायकलस्वारही आता दमला होता. "ताई, जरा इथं झाडाखाली थोडी विश्रांती घेऊया का?" असे म्हणत तो तिथे जाऊन टेकलाच. सखूही बाजूला जाऊन विश्रांती घेऊ लागली. बसल्या बसल्या तिला केव्हा डोळा लागला ते समजलेच नाही.
       सखूला जाग आली तेव्हा पाहते तर काय सायकलवाला बाजूला नव्हताच. तो तर निघून गेला असावा; पण सखूची मात्र केवळ त्याच्या गायब होण्याच्या विचारानेच बोबडी वळली. ती घाबरून गावाच्या दिशेने पळत सुटली.

दहावी मराठी कुमारभारती प्रश्नपत्रिका 2024 डाउनलोड,SSC मराठी प्रश्नपत्रिका मार्च 2024 PDF, दहावी मराठी बोर्ड परीक्षा प्रश्नपत्रिका 2024, 2024 मराठी कुमारभारती प्रश्नपत्रिका उत्तरांसह, दहावी मराठी प्रश्नपत्रिका नमुना 2024. महाराष्ट्र बोर्ड मराठी प्रश्नपत्रिका 2024, दहावी मराठी प्रश्नपत्रिका PDF डाउनलोड 2024, मराठी कुमारभारती प्रश्नपत्रिका 2024 उत्तरतालिका, दहावी मराठी प्रश्नपत्रिका 2024 सराव, SSC मराठी प्रश्नपत्रिका 2024 PDF फाईल

प्रश्न : 5 (इ ) पुढील लेखनप्रकारापैकी कोणतीही एक कृती सोडवा  :
  1. प्रसंगलेखन :
    'अकस्मात पडलेला पाऊस' या विषयावर खालील मुद्दे विचारात घेऊन लेखन करा.

    उत्तर :

    अकस्मात पडलेला पाऊस

      उन्हाळी सुट्टीमध्ये आम्ही सगळे एकत्र कुटुंब फिरायला गेलो होतो. पुणे, लोणावळा, कोकण असा कार्यक्रम आखलेला. बऱ्याच महिन्यांनी असं कुठेतरी एकत्र जात होतो. त्यामुळे सगळेच खूप उत्साहात होते. कोकणच्या उकाड्यातून महाबळेश्वरला पोहोचवल्यावर सगळेच सुखावलो. अंगाची काहिली जरा शमली होती. आम्ही राहण्यासाठी डोंगराच्या कुशीत असलेला एक बंगला भाड्याने घेतला होता. बंगल्याच्या समोर मस्त बाग होती. निरनिराळ्या प्रकारची फुलझाडे आणि बागेतला झोपाळा तो दिवस आम्ही बंगल्यावरच  घालवायचा असं ठरवून बागेतव गप्पा, गोष्टी आणि खेळांना सुरुवात केली. पण खेळता खेळता अचानक हवा बदलली आणि आभाळ दाटून आलं. तेव्हा तिथले व्यवस्थापक म्हणाले, "इथे अशीच हवा बदलत असते." त्यामुळे मग आम्ही आमची धम्माल सुरू ठेवली.

      थोड्या वेळाने गडगडायला लागलं, जोराचा वारा सुटला, झाडांची पानं सळसळायला लागली, हवेतला गारवा वाढला आणि अचानक धुवाधार पाऊस सुरू झाला. आमची तारांबळ उडाली खरी पण धावत आत जाण्यात काहीच अर्थ नव्हता. पावसाने आम्हांला आधीच चिंब भिजवून टाकलं होतं. अकस्मात आलेल्या या पावसाने मन आणि शरीर दोन्ही सुखावलं. मग काय, आम्ही अचानक आलेल्या या पाहुण्याच आनंदाने स्वागत केलं. आम्ही मुलांनी तर गवतावर लोळण घेतली. मातीचा नैसर्गिक सुगंध अनुभवला. पावसाचा वेग वाढला. आम्ही सगळे नाचत होतो. पावसाच्या थंड सरी अनुभवत होतो. अचानक आलेला हा पाऊस आणखीनच हवासा वाटू लागला.

    थोड्या वेळाने पावसाचा जोर कमी झाला तसे आम्ही बंगल्यावर परतलो. फ्रेश झालो. तोवर आमच्यासमोर गरमागरम चहा आला. थंड वातावरणात गरमागरम चहा पिताना किती बरं वाटत होत, पण एकीकडे मुंबईच्या वडापावची आठवण आल्यावाचून राहिली नाही, त्यामुळे मग रात्रीचा बटाटेवडयांचा बेत ठरवला. बटाटेवडे तळतानाच पावसाची आणखी एक सर येऊन गेली. जेवणं आटोपेस्तोवर पाऊस थांबला होता. पण हवेतला गारवा आणखी वाढला होता. रात्री पुन्हा बागेत खुर्च्या टाकून शाल आणि स्वेटर अंगावर घेऊन गाण्याच्या भेंड्या खेळत बसलो.


  2. आत्मकथन : 
    'दिलेल्या मुद्द्याच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा:


    उत्तर :

    पुस्तकाचे आत्मकथन

       मी पुस्तक आहे. आज मी तुम्हांस माझे मनोगत सांगत आहे. माणसाच्या शिक्षणाची सुरुवात माझ्यापासूनच होते. तुम्ही लहानपणी माझ्यातल्या गोष्टी वाचून मोठे होता. त्यातून जगण्याची मूल्ये आणि माणसाच्या जाणिवा यांची तुम्हांला माहिती होते. पूर्वी कसं ऐकलेलं मुखोद्‌गत करून शिकण्याचा प्रघात होता; पण आता पुस्तकाशिवाय शिक्षणसंस्थेची कल्पनाही करू शकत नाही. मी शिक्षण आणि तुमच्यामधला दुवा आहे. तुम्ही मला जितके वाचता तितके समृद्ध होता. माझ्यात जे ज्ञान आहे ते भरभरून वाटण्यातच खूप समाधान मिळतं.

       पण आता तंत्रज्ञान आले. मोबाइल, टॅब्लेट, लॅपटॉप आले. या सगळ्यांच्या झगमगाटात तुम्ही तुमच्या पुस्तकाला विसरत चालला आहात. आतापर्यंत ग्रंथालयातले माझे स्थान खूप महत्त्वाचे होते. तरुण विद्यार्थ्यांपासून मोठमोठ्या वि‌द्वान मंडळींपर्यंत सगळेच ग्रंथालयात येत, आम्हांला भेटत, वाचत, संवाद साधत. पण आता 'गुगल' म्हणून कोणी आहे, त्याला म्हणे सगळी माहिती आहे. त्याला जे विचाराल ते अगदी सगळं सांगतो! पण त्यामुळे तुम्ही माणसं तुमच्या या जुन्या मित्राला विसरलात.

       आता ग्रंथालयात फारसं कोणी येत नाही. आम्हांला जवळ घेत नाही. आम्ही मात्र थांबलेले असतो तुमची वाट बघत. कधीतरी कोणीतरी आम्हांला वाचील: आम्ही तुमचं सगळ्यात आवडतं पुस्तक होऊ, अशी इच्छा बाळगतो. वर्षानुवर्षे तुमची वाट बघत कित्येक पुस्तके कपाटात स्वतःला कोंडून घेतात. वाळवी लागून आत्महत्या करतात; पण तुम्ही साधी विचारपूसही करीत नाही, याचं अपार दुःख होतं. ज्यांनी तुम्हांला वाचायला शिकवलं अशा पुस्तकांना सोडून आता तुम्ही गुगलच्या एकछत्री अमलाखाली वावरत आहात त्याने तुम्हांला गुलाम करून टाकलंय. पुस्तकं तुम्हांला घडवतात, सर्जनशील बनवतात, स्वतःची अशी भूमिका तयार करण्यासाठी मदत करतात. पण मी तर आता तुमच्या मनातही  नाही, याचं खूप खूप वाईट वाटतं.

       तुम्ही हल्ली तुमच्या मोबाइलमध्ये मला बंदिस्त केलंय पण पुस्तक म्हणून माझ्या मूळ रूपात जी मजा आहे ती तुमच्या मोबाइलमध्ये नाही. माझा स्पर्श, माझी पानं, नवीन पुस्तक आणल्यावर ते चाळणं, त्याचा वास हे तुम्हांला मोबाइलमध्ये मिळतं का? नाही ना? पुस्तक वाचणं म्हणजे फक्त अक्षर, त्यातला मजकूर वाचणं नाही. पुस्तक वाचणं हा एक अनुभव आहे. जे मला मनापासून आपलंसं करून वाचतात त्यांनाच तो अनुभव मिळतो आणि तेच खरे वाचक.

    निसर्गाच्या रक्षणासाठी कागद वाचवले पाहिजेत, कागद बनवण्यासाठी जी वृक्षतोड होते ती थांबवली पाहिजे; या तुमच्या तथाकथित 'इकोफ्रेंडली' विचारांमुळे तुम्ही मला मोबाइलमध्ये बंदिस्त केलंत खर पण म्हणून तुम्ही खरंच पर्यावरणाचा विचार केला का? माझं मूळ रूप बदलून कागद वाचवलेत पण खरंच वृक्षतोड थांबलीय का? एकदा नीट विचार करून बघा. समस्येवर तोडगा काढलात, की वाचनसंस्कृतीवर घाला घातलात हे स्वतःलाच विचारून बघा. उत्तर सापडलं तर कोण जाणे मला पुन्हा स्थान दयाल आणि 'ग्रंथ हेच खरे मित्र' हा सुविचार अजरामर कराल.

      ( 3 )  वैचारिक लेखन : 
 '            'प्रदूषण -एक समस्या'  या विषयावर तुमचे विचार लिहा.

प्रदूषण -एक समस्या

'दूषित हवेमुळे साथीचे रोग पसरले; अमुक नदीच्या पात्रात गेलेले मासे तरंगताना दिसले: अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान, या आणि अशा कितीतरी बातम्या पेपरांमधून, न्यूज चॅनलवर वाचायला, ऐकायला मिळतात. वाढतं प्रदूषण आणि पर्यावरण असमतोल यांमुळे हवामानावर, निसर्गावर वाईट परिणाम होत आहेत. प्रदूषण हे एक हळूहळू प्रभाव दाखवणारं विष आहे आणि प्रत्येक दिवसागणिक आपल्या जीवनाला नष्ट करीत आहे. प्रदूषण नैसर्गिक वातावरणाला दूषित करून पर्यावरणात अस्थिरता निर्माण करते.

   आजचे युग हे विज्ञानाचे आहे. पण जसजसे विज्ञान, तंत्रज्ञान प्रगत होत आहे तसतसे त्याचे दुष्परिणाम वाढत आहेत. 'प्रदूषण' हा असाच तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा आणि त्यामुळे माणसाच्या वाढलेल्या हव्यासाचा दुष्परिणाम आहे. आजकाल सगळं झटपट करण्याची आणि वस्तू अल्पावधीसाठी वापरण्याची सवय झाली आहे. त्यामुळेच 'युज अँड थ्रो' या संस्कृतीचा उदय झाला. पण त्यामुळे कचऱ्यात वाढ झाली आणि या कचऱ्यात मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक असतं. प्लास्टिकचे विघटन होत नाही. ते वर्षानुवर्षे तसंच राहून मातीची उपयोगिता कमी करतं. कचऱ्याचे योग्य विभाजन न होणे, कारखाने, यंत्रांचा अतिवापर, पॉवर प्लांट, वाहनांची वाढती संख्या, मोठ्या प्रमाणावर होणारे वस्तूंचे उत्पादन, खरेदी आणि त्यातून निर्माण होणारा कचरा इत्यादी प्रदूषण वाढण्यास कारणीभूत आहेत. प्रदूषणामुळे आणि बेसुमार वृक्षतोडीमुळे ऋतुचक्र बदललं आहे. नैसर्गिक संतुलन ढासळलं आहे. अति पाऊस, अति थंडी, अति उष्मा, दुष्काळ असे टोकाचे परिणाम दिसून येत आहेत. पाणी, हवा दूषित झाली आहे. त्यामुळे पूर्वी माहीतही नव्हते अशा जीवघेण्या आजारांनी आपल्याला वेढलं आहे.

  नैसर्गिक बदल हे काळानुरूप होतच असतात; पण त्याहीपेक्षा मानवनिर्मित बदलांमुळे प्रदूषणवाढ होऊन पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. त्याचा परिणाम ओझोन वायूचा थर नष्ट होत जाणे, जागतिक तापमानात वाढः परिणामतः बर्फ वितळून समुद्राची पातळी वाढणे, चक्रीवादळ, त्सुनामी अशा अनेक समस्या आ वासून उभ्या आहेत.

  हे सर्व टाळायचं असेल, तर व्यक्तिगत पातळीवर जितक्या गोष्टी करणे शक्य आहेत तितक्या व्हायला हव्यात आणि त्याची सुरुवात घराजवळच्या आवारात झाडं लावण्यापासून करता येईल. कमीत कमी इंधन जळेल याची काळजी घ्यायची असेल तर लहान अंतरासाठी पायी चालत जाणे योग्य. बस, रेल्वे यांसारख्या सार्वजनिक वाहनांचा उपयोग करून इंधन बचत करता येईल. घरातल्या कचऱ्याचे व्यवस्थापन करून त्याची योग्य विल्हेवाट लावणे, पाण्याचा योग्य वापर, विजेची  बचत इत्यादी लहानसहान उपायांनीसुद्धा प्रदूषण कमी करण्यात हातभार लावता येईल.

112

दहावी मराठी कुमारभारती प्रश्नपत्रिका 2024 डाउनलोड,SSC मराठी प्रश्नपत्रिका मार्च 2024 PDF, दहावी मराठी बोर्ड परीक्षा प्रश्नपत्रिका 2024, 2024 मराठी कुमारभारती प्रश्नपत्रिका उत्तरांसह, दहावी मराठी प्रश्नपत्रिका नमुना 2024. महाराष्ट्र बोर्ड मराठी प्रश्नपत्रिका 2024, दहावी मराठी प्रश्नपत्रिका PDF डाउनलोड 2024, मराठी कुमारभारती प्रश्नपत्रिका 2024 उत्तरतालिका, दहावी मराठी प्रश्नपत्रिका 2024 सराव, SSC मराठी प्रश्नपत्रिका 2024 PDF फाईल






      COMMENTS

      नाव

      इंग्रजी,3,इंग्रजी उपयोजित लेखन,3,इंग्रजी व्याकरण,2,प्रश्नपत्रिका,11,मराठी,1,मराठी उपयोजित लेखन,10,मराठी व्याकरण,7,शैक्षणिक Update,21,हिंदी रचना विभाग,3,हिंदी व्याकरण,4,
      ltr
      item
      marathi study : इयत्ता दहावीमराठी कुमारभारती प्रश्नपत्रिका मार्च 2023 _ आदर्श उत्तरपत्रिका | Maharashtra 10th Class Marathi Question Paper 2023
      इयत्ता दहावीमराठी कुमारभारती प्रश्नपत्रिका मार्च 2023 _ आदर्श उत्तरपत्रिका | Maharashtra 10th Class Marathi Question Paper 2023
      इयत्ता दहावीमराठी कुमारभारती प्रश्नपत्रिका मार्च 2023 _ आदर्श उत्तरपत्रिका , Maharashtra 10th Class Marathi Question Paper 2023
      https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgbW3MfpyOeiT9CK2v3x0ji_BQWAqSRyrl25EwTbXYMD5kB9oR6dHvptCdnEuVnUA0zXo5Bz39hhXHR3TWyssJ_x74HBnC0J1fjZKRLaT6ccWjaR1nq2NBCQR4y3PVWcwQDH3f1gaJgFxZQAeS731pfQLjl2jIGCptqC72xBn53XN5HfjYCaYmywZ0ndn_W/s16000/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80%20%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%20%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A8%E0%A5%A9.png
      https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgbW3MfpyOeiT9CK2v3x0ji_BQWAqSRyrl25EwTbXYMD5kB9oR6dHvptCdnEuVnUA0zXo5Bz39hhXHR3TWyssJ_x74HBnC0J1fjZKRLaT6ccWjaR1nq2NBCQR4y3PVWcwQDH3f1gaJgFxZQAeS731pfQLjl2jIGCptqC72xBn53XN5HfjYCaYmywZ0ndn_W/s72-c/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80%20%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%20%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A8%E0%A5%A9.png
      marathi study
      https://www.marathistudy.com/2025/02/Maharashtra%2010th%20Class%20Marathi%20Question%20Paper%202023%20.html
      https://www.marathistudy.com/
      http://www.marathistudy.com/
      http://www.marathistudy.com/2025/02/Maharashtra%2010th%20Class%20Marathi%20Question%20Paper%202023%20.html
      true
      5159341443364317147
      UTF-8
      Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read More Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content