मराठी कुमारभारती हा इयत्ता 10 वी च्या विद्यार्थ्यांसाठी जास्तीत जास्त गुण मिळवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण विषय आहे. याबरोबरच या विषयाच्या ...
मराठी कुमारभारती हा इयत्ता 10 वी च्या
विद्यार्थ्यांसाठी जास्तीत जास्त गुण मिळवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण विषय आहे. याबरोबरच या विषयाच्या माध्यमातून
विद्यार्थ्यांना मराठी भाषेचे सखोल ज्ञान मिळते,
जे त्यांच्या सांस्कृतिक आणि शैक्षणिक
विकासासाठी अत्यावश्यक आहे. बोर्ड परीक्षेत उत्कृष्ट गुण मिळवण्यासाठी अंतिम पेपरची संपूर्ण तयारी करणे अत्यावश्यक आहे,
त्यासाठी या You Tube Live च्या माध्यमातून कृतिपत्रिकेचे स्वरूप परिचित करून देऊन पेपर कसा सोडवावा याचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
तज्ज्ञ मार्गदर्शक,
डॉ.व्ही.बी. शिंदे
M.A.Bed, Set, Ph.D.
सहशिक्षक,
इंदिरा गांधी हायस्कूल सिडको नवीन नांदेड.
* परीक्षेचे
स्वरूप आणि वेळापत्रक
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च
माध्यमिक शिक्षण मंडळाने 2025 च्या
दहावी बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यंदा, नेहमीपेक्षा 8 ते 10 दिवस आधीच परीक्षा
आयोजित केल्या जाणार आहेत
. मराठी
कुमारभारती पेपरचे स्वरूप खालीलप्रमाणे आहे:
- एकूण गुण:
80
- पेपरची कालावधी:
3 तास
- विभाग: पठित गद्य, पद्य , अपठित गद्य, स्थुल्वाचन, भाषाभ्यास, उपयोजित लेखन (लेखन कौशल्ये )
अंतिम
स्पर्श पेपर म्हणजे काय? (
अंतिम स्पर्श पेपर हे विद्यार्थ्यांच्या
अंतिम तयारीसाठी तयार केलेले प्रश्नपत्रिकांचे संच आहेत. या पेपरांच्या माध्यमातून
विद्यार्थ्यांना परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपाची कल्पना येते आणि त्यांना
आपल्या तयारीची चाचणी घेता येते. अंतिम स्पर्श पेपरचे काही फायदे:
- परीक्षेच्या स्वरूपाशी परिचय: प्रश्नांच्या
प्रकारांशी ओळख होते.
- वेळेचे व्यवस्थापन: उत्तर
लिहिण्यासाठी आवश्यक वेळेचे नियोजन करता येते.
- कमकुवत क्षेत्रांची ओळख: कोणत्या विषयांवर अधिक लक्ष द्यावे लागेल, हे समजते
COMMENTS