वाक्प्रचार व त्यांचे अर्थ आणि वाक्यात उपयोग | marathi vakprachar vakyat upyog | मराठी वाक्प्रचार व त्यांचे अर्थ marathi vakprachar vakprachar marathi
इयता : दहावी मराठी कुमारभारती _वाक्प्रचार त्यांचे अर्थ व वाक्यात उपयोग
कृतीचे स्वरूप :
- कृतिपत्रिकेतील प्रश्न ४ (अ) (३) ही कृती वाक्प्रचारांवर आधारित कृती असेल.
- यात वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यांत उपयोग करा ही कृती विचारली जाईल.
- या कृतीत चार वाक्प्रचार दिले जातील. यांपैकी कोणत्याही दोन वाक्प्रचारांचा अर्थ लिहून, त्यांचा वाक्यात उपयोग करायचा आहे.
- प्रत्येक अचूक अर्थास १ गुण व त्या वाक्प्रचाराच्या वाक्यातील अचूक उपयोगास १ गुण. एकूण ४ गुण.
विशेष लक्षात ठेवा :
- पाठ्यपुस्तकातील पाठांतील वाक्प्रचारांवर आधारित ही कृती आहे.
- प्रत्येक पाठातील दोन वाक्प्रचार अर्थासहित लक्षात ठेवा. तुम्हांला कठीण वाटणारे वाक्प्रचार अर्थासह पाठ करा.
- वाक्प्रचारांचा वाक्यांत उपयोग करणे आवश्यक, अर्थांचा नव्हे.
वाक्प्रचारांचा जर आपल्याला अर्थ माहित असेल तर त्यांचा वाक्यात उपयोग सहज करता येतो त्यासाठी वाक्प्रचारांचा अर्थ समजून घ्या
खाली इयत्ता दहावी मराठी कुमारभारती या पाठ्यपुस्तकातील पाठानुसार वाक्प्रचार त्यांचे अर्थ व नमुना वाक्यात उपयोग दिले आहेत परीक्षेत शक्यतो स्वतःच्या भाषेत वाक्यात उपयोग करण्याचा प्रयत्न करा...
(i) कंठस्नान घालणे - अर्थ : ठार मारणे.
वाक्य : भारतीय वीर जवानांनी सरहद्दीवर दहशतवाद्यांना कंठस्नान घातले.
(ii) खस्ता खाणे - अर्थ : खूप कष्ट करणे.
वाक्य : आपल्या मुलांसाठी माता नेहमी खस्ता खात असते.
(iii) कानोसा घेणे - अर्थ : अंदाज घेणे.
वाक्य : पाऊस पडणार की नाही, याचा आमचा मोती कान टवकारून कानोसा घेतो.
(iv) आनंद गगनात न मावणे - अर्थ : खूप आनंद होणे.
वाक्य : विजयला बोर्डाच्या परीक्षेत ९०% गुण मिळाल्यामुळे त्याच्या आईबाबांचा आनंद गगनात मावला नाही.
वाक्य : भारतीय सैन्य कारगिल युद्धात शत्रूवर तुटून पडले.
(ii) धीर चेपणे - अर्थ : हिंमत येणे.
वाक्य : सराव केल्यानंतर मोहकचा गिर्यारोहण करताना धीर चेपला.
(iii) फळ मिळणे - अर्थ : यश मिळणे.
वाक्य : खूप कष्ट केल्यानंतर त्या कष्टाचे कधी ना कधी फळ मिळते.
(iv) कान देऊन ऐकणे - अर्थ : लक्षपूर्वक ऐकणे.
वाक्य : आईने सांगितलेली गोष्ट लहानगा समीर कान देऊन ऐकत होता.
(i) झोपमोड होणे - अर्थ: मध्ये मध्ये जाग येणे.
वाक्य : बाहेर मुलांच्या कलकलाटामुळे दुपारी निवांत झोपलेल्या आईची झोपमोड झाली.
(ii) चेंदामेंदा करणे - अर्थ : कुटून काढणे.
वाक्य : अचानक शेतात शिरलेल्या सापाचा गण्याने दगडाने ठेचून चेंदामेंदा केला.
(iii) कित्ता गिरवणे - अर्थ : सराव करणे, अनुसरणे.
वाक्य : गुरुजींनी दिलेल्या गुरुमंत्राचा संकेत नेहमी कित्ता गिरवतो.
(iv) तोंडसुख घेणे - अर्थ : खूप बडबडणे.
वाक्य : घरात नवीन आलेल्या सुनेवर शेजारच्या रमाबाई नेहमी तोंडसुख घेतात.
(i) कसब दाखवणे - अर्थ : कौशल्य दाखवणे.
वाक्य : वीस फुटी शिल्प घडवताना मूर्तीकाराने आपले सर्व कसब दाखवले.
(ii) हातात हात असणे - अर्थ: सहकार्य करणे.
वाक्य : हातात हात घालून गावकऱ्यांनी एका दिवसात पडकी विहीर बांधून काढली.
(iii) गुडघे टेकणे - अर्थ : शरण येणे.
वाक्य : राजूच्या दररोजच्या खोड्यांनी व शेजाऱ्याच्या तक्रारींसमोर त्याच्या आईने गुडघे टेकले.
(iv) खनपटीला बसणे - अर्थ : सारखे विचारत राहणे.
वाक्य : बऱ्याच दिवसांनी गावावरून आलेली राधिका मावशीच्या खनपटीलाच बसली.
(i) निकाल लावणे - अर्थ : संपवणे.
वाक्य : बऱ्याच दिवसांपासून तुंबलेल्या कामांचा विश्रामभाऊंनी शेवटी एकदाचा निकाल लावला.
(ii) मनात घर करणे - अर्थ : कायम मनात राहणे.
वाक्य : शिक्षकांनी सांगितलेली त्यांच्या लहानपणच्या गरिबीची आठवण आमच्या मनात घर करून राहिली.
(iii) पचनी न पडणे - अर्थ : न पटणे.
वाक्य : वक्त्यांचे धीट विचार अनेकजणांच्या पचनी पडले नाहीत.
(iv) धीर न सुटणे - अर्थ : हिंमत न हारणे.
वाक्य : संकटात धीर न सुटणे हे खंबीर व्यक्तिमत्त्वाचे लक्षण आहे.
वाक्य : राजू उच्च शिक्षणासाठी परदेशी गेला, हे पाहून आईच्या आतापर्यंतच्या कष्टाचे सार्थक झाले.
(ii) थक्क होणे - अर्थ : चकित होणे.
वाक्य : तीन वर्षांचा छोटा राजू संगणकावर सराईतपणे काम करताना पाहून आई थक्क झाली.
(iii) विचारपूस करणे - अर्थ : चौकशी करणे.
वाक्य : आजारी पडलेल्या महादूची सरपंचांनी घरी जाऊन विचारपूस केली.
(iv) भान विसरणे - अर्थ : गुंग होणे.
वाक्य: चित्र काढताना शाल्मली स्वतःचे भान विसरते.
(i) वस्तुपाठ घालून देणे - अर्थ : आदर्श घालून देणे.
वाक्य: जनसेवा हीच ईश्वरसेवा याचा गाडगे महाराजांनी वस्तुपाठ घालून दिला.
(ii) मुहूर्तमेढ रोवणे - अर्थ : पाया घालणे.
वाक्य : गाडगेबाबांनी महाराष्ट्रात स्वच्छता मोहिमेची मुहूर्तमेढ रोवली.
(iii) ससेहोलपट होणे - अर्थ : खूप त्रास होणे.
वाक्य : रात्रीच्या वेळी रानातला रस्ता शोधताना प्रवाशांची खूप ससेहोलपट झाली.
(iv) लळा लावणे - अर्थ : खूप प्रेम करणे.
वाक्य : रमाबाईंनी दत्तक घेतलेल्या अनाथ मुलाला खूप लळा लावला.
(ⅰ) कपाळाला आठ्या पाडणे - अर्थ : नाराजी व्यक्त करणे.
वाक्य : कुठलेही काम सांगितले की महाद् कपाळाला आठ्या पाडत असे.
(ii) डोळ्यांतले पाणी पुसणे - अर्थ : अश्रू पुसणे, सांत्वन करणे.
वाक्य : दुःखितांच्या डोळ्यांतले पाणी पुसणे, हीच खरी समाजसेवा होय.
(iii) वाया जाणे - अर्थ : फुकट जाणे.
वाक्य : अवकाळी पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांची मेहनत वाया गेली.
(iv) गोंधळ घालणे - अर्थ : आरडाओरडा करीत गडबड करणे.
वाक्य: सर वर्गात न आल्यामुळे मुलांनी गोंधळ घातला.
(i) डोळे विस्फारून बघणे - अर्थ : आश्चर्याने बघणे.
वाक्य : समोरच्या बेफाट सुंदर दृश्याकडे मिताली डोळे विस्फारून बघत राहिली.
(ii) तगादा लावणे - अर्थ : पिच्छा पुरवणे, मागे लागणे.
वाक्य : 'सहलीला मला जाऊ दया' असा मोहकने वडिलांकडे तगादा लावला.
(iii) तुळशीपत्र ठेवणे - अर्थ : त्याग करणे.
वाक्य : संसाराचा त्याग करून संन्यास घेतलेल्या स्वामींनी घरादारावर तुळशीपत्र ठेवले.
(iv) गहिवरून येणे : अर्थ : मन दुःखाने दाटणे, ऊर भरून येणे.
वाक्य : बऱ्याच वर्षांनी माहेरी आलेल्या लेकीला पोटाशी धरताना माईंना गहिवरून आले.
(i) खांद्याला खांदा लावणे : अर्थ : सहकार्य करणे.
वाक्य : खांदयाला खांदा लावून गावकऱ्यांनी स्वच्छता अभियान पूर्ण केले.
(ii) माश्या मारणे - अर्थ : निरुदयोगी असणे.
वाक्य : काही कामधाम न करणारा आळशी मनोहर सध्या माश्या मारत बसला आहे.
(iii) शहानिशा करणे - अर्थ : संपूर्ण चौकशी करणे.
वाक्य : शाळेतून घरी आलो की बाबा नेहमी अभ्यासाची शहानिशा करायचे.
(iv) कडुस पडणे - अर्थ : अंधार होणे.
वाक्य : मावळतीला सूर्य गेला की हळूहळू कडुसं पडू लागते.
COMMENTS