--> विषय निहाय प्रकल्प यादी (इयत्ता ५ वी. ते ८ वी ) | marathi study

विषय निहाय प्रकल्प यादी (इयत्ता ५ वी. ते ८ वी )

विषय निहाय प्रकल्प यादी: शैक्षणिक प्रकल्पांसाठी विविध विषयांवरील कल्पना आणि मार्गदर्शक यादी. विज्ञान, इतिहास, भूगोल, आणि अन्य विषयांसाठी उपयुक्त

 

आकारिक मूल्यमापन परिचय

सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन पध्दतीत आकारिक व संकलित मूल्यमापन असे दोन प्रकारचे मूल्यमापन अपेक्षित आहे. सर्व प्रथम आकारिक मूल्यमापन मध्ये वापरावयाची तंत्रे व साधने याचा परिचय आपण करून घेऊया...

आकारिक मूल्यमापन तंत्रे व साधने

1. दैनंदिन निरीक्षण

2. तोंडी काम

3. प्रात्यक्षिक / प्रयोग

4. उपक्रम / कृती

5. प्रकल्प

6. स्वाध्याय / वर्गकार्य

7. चाचणी

8. इतर साधने

अशा प्रकारच्या आठ तंत्र साधनांपैकी कोणत्याही किमान 5 तंत्र साधनाचा वापर मूल्यमापनासाठी करावयाचा आहे. (भाषा, गणित, इंग्रजी, हिन्दी, प.अ. सा.विज्ञान, सा.शास्त्र इ.साठी) तर उर्वरीत विषयासाठी (कला, कार्यानुभव, शा.शिक्षण) किमान 3 तंत्र व साधने वापरावयाची आहेत. सोप्या भाषेत सांगायचे तर, आपल्या वर्गाची गरज लक्षात घेउन आपण या तंत्र साधनाचा वापर करावयाचा आहे. आकारिक मूल्यमापनासाठी वापरावयाची त्या त्या सत्राच्या कालावधीत दैनंदिन अध्ययन अध्यापनाच्या वेळी वापरावयाची आहेत. ( त्यासाठी वेगळा वेळ देउन किंवा मुद्दामहून परिक्षा म्हणून ही साधने वापरण्याची गरज नाही ) विदयार्थ्यांच्या नकळतच वर्गात तोंडी काम सांगणे, प्रयोग प्रात्यक्षिक करतांना लक्षपूर्वक पाहणे, तसेच इतर उपक्रम कृती कसा करतो, हयांच्या अध्यापन करतांनाच लक्ष ठेवून नोंदी घ्यावयाच्या आहेत.

________________________________________

प्रकल्प -

प्रत्येक विदयार्थ्याने संपूर्ण वर्षभरात कोणत्याही एका विषयाचा किमान एक प्रकल्प करणे अपेक्षित आहे. प्रकल्पाची कार्यवाही एका सत्रात पूर्ण होईल असे पाहावे. प्रकल्पामध्ये विदयार्थ्यांचा सहभाग व त्यातून मिळालेली माहिती, साहित्याचे संकलन नाविन्य, माहितीची मांडणी व सादरीकरण अशा बाबींचे निकष लक्षात घेउन गुणदान करा व तशी नोंद घ्यावी.


प्रकल्पाच्या वैशिष्टपूर्ण नोंदी :

 1. प्रकल्पाची मांडणी व रचना खूपच आकर्षक आहे.

2. प्रकल्प विषयानुसार चित्रांचा संग्रह उत्तम आहे.

3. प्रकल्प विषय व माहिती अगदी सुसंगत आहे.

4. प्रकल्पातील प्रत्येक बाबीची माहिती उल्लेखनीय आहे.

5. प्रकल्पातून इतरांना नविन नविन माहिती मिळते.

6. प्रकल्पात समस्या मांडून त्यांची उकल मांडली आहे.

________________________________________

प्रकल्पाच्या अडथळे / अडचणी नोंदी

1. प्रकल्पाचा विषय व माहिती सुसंगत नाही.

2. चित्रे संग्रह चांगला पण माहिती अपूरी आहे.

3. माहिती व्यवस्थित पण आवश्यक ती चित्रे नाही

4. प्रकल्पाचे शीर्षक व विषयात विसंगती आहे.

5. प्रकल्पाची रचना व मांडणी चूकीच्या पध्दतीने केली आहे.

6. अशा प्रकारे प्रकल्पा संदर्भाने विशेष प्रकल्पाच्या व अडचणीच्या नोंदी घेउन गूणदान करता येईल.

________________________________________

शिक्षकांकरिता विद्यार्थ्यासाठी सर्व विषयानुसार इ. 5 वी ते 8 वी साठी उपयुक्त काही  प्रकल्प यादी उपलब्ध करून देण्यात येत आहे. जे विद्यार्थ्यांना प्रकल्प देण्याकरिता सोयीस्कर होईल


: प्रकल्प - भाषा :

• पाठ्यपुस्तकातील चित्रांना अनुसरुन चित्रे जमविणे.

• चित्रे रंगविणे

• चित्रे दाखवून ओळखण्यास सांगणे.

• पाने, फुले, फळे जमविणे.

• परिसरातील प्राणी व पक्ष्यांची नांवे सांगणे.

• बडबडगीते तोंडपाठ करणे.

• परिसरातील प्राणी व पक्ष्यांची नावे सांगणे.

• पाठ्यपुस्तकातील घटकास अनुसरुन चित्रे जमविणे.

• बडबडगीते तोंडपाठ करणे.

• चित्रे दाखवून ओळखण्यास सांगणे.  चित्रावर आधारित गोष्ट तयार करणे.

• उपयोगी परिसरातील प्राणी चित्रे व उपयोग

• परिसरातील विविध स्थळांची माहिती.

• वाढदिवस, सहल प्रसंगाचे वर्णन .

• कथा व कवितांचा संग्रह करणे.

• सार्वजनिक ठिकाणे, दुकाने इ.ठिकाणच्या नामफलकावरील सुचनांचा संग्रह

• वृत्तपत्र कात्रणांचा संग्रह करणे. .

• नेहमी चुकणारे शब्द व त्यांचा संग्रह करणे.

• निवडक उतार्यांचा संग्रह करणे.

• भाषिक खेळ व शब्द कोडी तयार करणे.

• स्वातंत्र्य लढ्यातील नेत्यांचे फोटो जमविणे.

• शहर व खेडे येथील जीवनावर आधारित चित्रे जमवा.

• गावातील पुढीलपैकी एका व्यक्तीची भेट घेऊन माहिती मिळवा. शेतकरी, दुकान तलाठी, शिक्षिका

• देशभक्तीपर गीतांचा संग्रह करा.

• पाठयपुस्तकातील पाठाखाली देण्यात आलेले "वाचा" संग्रह करणे.

• आपल्या परीसरातील विविध प्राणी व मानवाला उपयोग याची माहिती.

'आश्रम पध्दतीची अधिक माहिती मिळवा.

• परिसरातील स्थळाला भेट देऊन पक्ष्यांची माहिती मिळवा.

• प्रादेशिक शब्दांची यादी करा व त्याचा तक्ता वर्गात लावा.

• आईच्या प्रेमाची महती सांगणाऱ्या कवितांचा संग्रह करा.

• संत गाडगेबाबांच्या कार्याची माहिती व फोटो मिळवा.

• वेगवेगळया पाठात आलेल्या म्हणींचा संग्रह

• पोस्ट मनची मुलाखत घ्या व ती लिहून ठेवा.

• गोबरगॅस प्लॅट व सूर्यचूल याबाबत माहिती मिळवा.

• सुईचे उपयोग - तक्ता तयार करा.

• नदीला आलेला महापूरबाबत चित्रे व बातमीच्या कात्रणांचा संग्रह

• वेगवेगळया पत्रांचे नमुने संग्रह

• तुम्हाला माहित असलेल्या वृत्तपत्रांची यादी करा.

• पाच देशभक्तीपर गीतांचा संग्रह.

• विरुद्धार्थी व समानार्थी शब्दांचा संग्रह करणे.

• विविध पत्राचे नमुने जमा करणे.

• अवांतर वाचन करून नवे शब्द संकलित करणे.

• पाऊस विषयावरील कविता / चित्रांचा संग्रह करणे.

• शेतीबद्दलच्या गाण्यांचा संग्रह करणे.

• पाळीव प्राणी व त्यांचे उपयोग तक्ता /चित्रसंग्रह. तुळस व अन्य औषधी वनस्पतींची माहिती मिळवा.

• आपल्या गावातील पोळा सणाचे वर्णन करा.

• आईच्या प्रेमाची महती सांगणाऱ्या कवितांचा संग्रह करा..

• वेगवेगळ्या पाठात आलेल्या म्हणींचा संग्रह करा.

: प्रकल्प - गणित  :

• दिलेल्या वस्तूतून लहान-मोठा ठरविणे.

• तराजूच्या सहाय्याने जड-हलके ओळखणे.

• आधी व नंतर घटनांची यादी करणे.

• कमी जास्त ओळखणे.

• चित्रांच्या सहाय्याने स्थान ओळखता येणे.

• परिसरातील वस्तूंचे प्रकारानुसार वर्गीकरण.

• सारखे रुप असणाऱ्या वस्तूंच्या जोड्या.

• नाण्यांचा व नोटांचा संग्रह करणे.

• पुठ्याचे विविध आकार तयार करणे .अर्धा , पाव

• दुकानास भेट देऊन व्यवहार करणे .

• आलेख कागदावर विविध आकार रेखाटा.

• बिलाच्या विविध पावत्यांचा संग्रह करणे

• विविध भौमितिक आकृत्यांची प्रतीकृती बनविणे.

• व्याख्या, सुत्र व नियमांचे संकलन करणे.

• भौमितिक आकृत्यांचा संग्रह

• भौमितिक आकृत्यांची नावे व माहिती

• अपूर्णांक संदर्भाने आकृत्या नाणी व नोटा चित्रे संग्रह

• दिनदर्शिका नमूने संग्रह

• घडयाळांची विविध चित्रे संग्रह वस्तूमान परिमाणे नावे व माहिती

• दिनविशेष माहिती संग्रह

• रंगीत कागदापासून भौमितिक आकृत्या संग्रह

•  उदा. तयार करून सोडविलेले उदा. संग्रह

• भास्कराचार्य

• गणित आणि आपण

• आर्यभट्ट (जन्म- सुमारे इ. स. ४७६ मृत्यू - अज्ञात)

• भूमितीय उपकरणांचा वापर करणे.

• गणित भास्कर रामानुजन यांच्या बद्दल माहितीचा तक्ता.

• गुंतवणूक, व्याज, मुद्दल, ठेव, मुदत याबाबतचा चार्ट तयार करणे.

• भूमितीय (कंपासपेटीतील) उपकरणे व त्यांचा उपयोग.

• विविध संख्या व चिन्हांचा तक्ता.

: प्रकल्प - सामान्य विज्ञान :

• परिसरातील सजीव व निर्जीव यादी करणे चित्रे जमविणे.

• परिसरातील सजीव प्राणी चित्रे जमविणे व वैशिष्ठे जमविणे.

• परिसरातील वृक्ष व त्यांचे अवयव.

• परिसरातील प्राणी व पक्षी यांचे निवासस्थान,

• कोण काय खातो ?

• आपले शरीर संबंधित चित्रे व अवयवांचे उपयोग,

• आपल्या अन्नातील पोषक घटक.

• परिसरातील सजीव व निर्जीव यादी करणे -चित्रे जमविणे.

• परिसरातील वृक्ष व त्यांचे अवयव.

• आपले शरीर -संबंधित चित्रे व अवयवांचे उपयोग

• चांगल्या सवयींची यादी

• पाण्यात विरघळणारे व न विरघळणारे पदार्थ यांची यादी.

• प्राण्यांचे अवयव व त्यांचे उपयोग  चित्रासह

• ज्ञानेंद्रिये - चित्रे व त्यांचे कार्य

• वनस्पतींच्या विविध अवयवांची कार्य

• बियांचा संग्रह व त्यांचे निरीक्षण

• परिसरातील औषधी वनस्पतींची यादी व उपयोग .

• उपयुक्त प्राण्यांच्या चित्रांचा संग्रह व उपयोग

• मातीचे प्रकार व नमुने संग्रह ,

• घरातील व शाळेतील स्वच्छता विषयक सवयींची यादी.

• शाळेचा परिसर स्वच्छ राहण्यासाठी उपक्रमांची यादी करा

• पारंपारिक व अपारंपारिक ऊर्जास्त्रोतांची माहिती

• शास्त्रज्ञांची नावे व लावलेले शोध तक्ता

• वीस अन्नपदार्थांची यादी करा.त्यांचे चव व अवस्था नोंदवा.

• पदार्थाची स्थायू ,द्रव ,वायू गटात विभागणी

• गावातील पाणीपुरवठा केंद्राला भेट देऊन माहिती गोळा करा.

• पृष्ठवंशीय व अपृष्ठवंशीय प्राण्यांची चित्रे जमवा.

• हवा प्रदुषण व पाणी प्रदुषण याविषयी माहिती संकलित करा

• शेतीच्या औजारांची माहिती व उपयोग यांची माहिती संकलित करा.

• परिसरातील विविध वनस्पतींचे निरीक्षण करून साम्य व फरक लिहा.

• परिसरातील प्राण्यांचे निरीक्षण करा.

• तक्ता वनस्पती / प्राणी, अनुकुलन उपयोग चार्ट वनस्पतीवर आढळणारे किटक, प्राणी यांचे निरीक्षण

• गहू व घेवड्याच्या अंकुराचे निरीक्षण प्राणी व परिसराशी अनुकूलन यांची यादी करा

• पाठाखालील 'ओळखा पाहू' यांचा संग्रह. आपल्या शरीरातील अवयव व त्यांचे उपयोग.

• जीवनसत्व' यादी तक्ता.

• आहार संतुलित आहे का ? ' तक्ता भरणे पुस्तकातील शब्द कोडे सोडवून त्यांचा संग्रह करणे.

• शाळेच्या आसपास विक्रीसाठी असलेले खाद्यपदार्थांची यादीकरुन झाकलेले न झाकलेले असे वर्गीकरण करा.

• रोगप्रतिबंधक लसीकरण कार्डची माहिती मिळवा.

'आदर्श गांव' संकल्पना साठी यादी करा.

• शाळेचा परिसर स्वच्छ राहण्यासाठी उपक्रमांची यादी करा.

• नैसर्गिक साधन संपत्ती तक्ता

• शास्त्रज्ञांची नांवे व लावलेले शोध तक्ता. वीस अन्नपदार्थांची यादी करा. त्यांचे चव अवस्था नोंदवा

• मापनाचे साधने किंवा चित्रे जमवा. कांही वस्तूंच्या चाली - तक्ता तयार करा.

• परिसरात कप्पीचा उपयोग कोठे होतो - माहिती मिळवा.

• दैनंदिन जीवनात हवेचा उपयोग उदाहरणे लिहा.

• प्राण्यांचे वर्गीकरण करा प्राणी व आयुमर्यादा तक्ता

• गुलमोहरांच्या फुलांतील वेगवेगळे भाग दाखवा.

• पृष्ठवंशीय व अपृष्ठवंशीय प्राण्यांची चित्रे जमवा.

• औषधी उपयोग

• फुलांची माहिती

• मोगरावर्गीय फुले :

• आहारातील अन्नघटकांची माहीती मिळविणे

• परिसरातील विविध वनस्पतींचे निरीक्षण करून साम्य व फरक लिहा.

• परिसरातील प्राण्यांचे निरीक्षण करा.

• तक्ता - वनस्पती / प्राणी, अनुकुलन उपयोग चार्ट 18. प्राणी व परिसराशी अनुकूलन यांची यादी करा.

• प्राणी व परिसराशी अनुकूलन यांची यादी करा.

• पाठाखालील 'ओळखा पाहू' यांचा संग्रह

: प्रकल्प - इतिहास व ना.शास्त्र :

• दळणवळणाच्या साधनांची नावे व चित्रे

• ग्रामपंचायतीस भेट देऊन कारभाराची माहिती घेणे

• संतांची चित्रे व माहिती

• शिवरायांच्या बालपणातील घटनांचा संग्रह

• विविध देशांच्या राजमुद्रा व ध्वजांच्या चित्रांचा संग्रह

• अश्मयुगीन हत्यारांची यादी करा,चित्रे मिळवा.

• शेतीच्या आधुनिक पद्धतीची माहिती .

• जहाजांची चित्रे जमवा.

• गड व किल्ले यांची चित्रे जमवा.माहिती संकलित करा.

• देशात बोलल्या जाणाऱ्या प्रमुख भाषा व राज्ये यांची यादी करा.

• हक्क व कर्तव्य यांचा तक्ता तयार करा.

• समाजसुधारकांची चित्रे व त्यांच्या कार्याची माहिती संकलित करा.

• वेरूळच्या कैलास मंदिराचे चित्र मिळवा. त्या मंदिराच्या रचनेत तुम्हाला आढळणाऱ्या महत्वाच्या गोष्टी नोंदवा

• भारतातील कांही संताची चित्रे मिळवा व त्यांची शिकवण लिहा.

• गोलघुमट (विजापूर), सूर्यमंदिर (कोणार्क) यांची चित्रे तयाबद्दल थोडक्यात माहिती लिहा. जमवून

• मुघलकालीन भारतातील सांस्कृतिक देवाण-घेवाण याचा तक्ता तयार करा.

• मुघलकालीन वास्तूंच्या चित्रांचा संग्रह

• विविध राजमुद्रांच्या चित्रांचा संग्रह.

• जहाजांची चित्रे जमवा.

• गड व किल्ले यांची चित्रे जमवा व माहिती संग्रहित करा.

'मराठी सत्तेचे आधारस्तंभ यांची चित्रे व माहिती संग्रह करा.

• संविधानाच्या उद्देशपत्रिकेचा तक्ता मोठया अक्षरात लिहून वर्गात लावा.

• देशात बोलणाऱ्या प्रमुख भाषा व राज्ये यांची यादी करा

• हक्क व कर्तव्य यांचा तक्ता तयार करा.

• शाळाबाहय मुला-मुलींसाठी शासन योजनांची माहिती मिळवा.

• भारताच्या स्वातंत्र्यापासून आजपर्यंत राष्ट्रपतीपदी प्रधानमंत्रीपदी आलेल्या व्यक्तींची छायाचित्रे मिळवून संग्रह करा

: प्रकल्प - भूगोल  :

• आपल्या परिसरातील विविध भूरुपांची माहिती

• ऋतू ,महिने व पिके यांचा तक्ता .

• परिसर भेट - नदी ,कारखाना .

• गावातील पाणीपुरवठा योजनेची माहिती

• परिसरातील पिके व त्यांचा हंगाम

• शेतीस भेट व कामाचे निरीक्षण

• गावाजवळील धरणाला भेट देऊन माहिती संकलित करणे

• खनिज व खडकांचे नमुने गोळा करणे

• विविध धान्यांचे नमुने जमवा.

• परिसरातील प्रदुषणाची कारणे - यादी करा.

• गावच्या बाजाराला भेट द्या .वस्तूंची यादी करा.

• विविध देशांचे नकाशे संग्रहीत करा

• नकाशा वाचन जिल्हा तालुका गांव.

• आपल्या परिसरातील विविध भूरूपांची माहिती.

• विविध भूरूपे प्रतिकृति व चित्रे. ओढा व नदीचे निरीक्षण,

• ऋतू, महिने व पिके याचा तक्ता.

• पृथ्वीवरील वायुदाबपट्टयाची आकृती मोठा तक्ता

• जगाच्या नकाशातील सागरी प्रवाहाचे मार्ग अभ्यासा,

• विविध देशातील लोकजीवन, प्राणीजीवन, पशु-पक्षी याबाबत चित्रे व माहिती संग्रह करा.

• वेगवेगळया प्रदेशातील जलचर, भूचर, उभयचर, उभयचर प्राण्यांची चित्रे जमवा.

• विविध देशाच्या नकाशात वेगवेगळ्या गोष्टी दाखवा.

• महासागर तळरचना - प्रतिकृती तयार करा.

• विविध प्रदेशातील लोक व त्यांची घरे प्रतिकृती.

• नकाशात विविध प्रदेश दाखवा

• विविध प्रदेशातील प्राणी जीवनाची माहिती.

• विविध प्रदेशातील वनस्पतींची माहिती

• चीनच्या भिंतीची प्रतिकृती / तक्ता (चित्र)

• विविध देशांचे नकाशे संग्रहीत करणे.

• देश आणि महत्वाच्या नद्या यांचा तक्ता तयार करा.

 

: प्रकल्प - इंग्रजी  :

Pandit Jawaharlal Nehru

Republic Day

Independence Day

Indian scientist

Indian women


: प्रकल्प - हिंदी  :

• प्रकल्प- भारतीय त्योहार,

• महात्मा गांधी.

• भारत के प्रधान मंत्री,

• आदर्श व्यक्तीयों का परिचय






COMMENTS

नाव

इंग्रजी उपयोजित लेखन,3,इंग्रजी व्याकरण,1,मराठी उपयोजित लेखन,6,मराठी व्याकरण,6,शैक्षणिक Update,13,हिंदी रचना विभाग,1,
ltr
item
marathi study : विषय निहाय प्रकल्प यादी (इयत्ता ५ वी. ते ८ वी )
विषय निहाय प्रकल्प यादी (इयत्ता ५ वी. ते ८ वी )
विषय निहाय प्रकल्प यादी: शैक्षणिक प्रकल्पांसाठी विविध विषयांवरील कल्पना आणि मार्गदर्शक यादी. विज्ञान, इतिहास, भूगोल, आणि अन्य विषयांसाठी उपयुक्त
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgyqdBsWQQ5OgNqS-58t0vwvnpeir7FqK2k5bDem37OVddroylY9OqTa027ARiuXx3H4xpDYIlDfsRwi_70OAhTl4kuu4HKzYjIb2wrZBuhY5szdpYbHcZVv8DiS2NRV12QfcrKlYlFzx9wctizhX7P_4V6dqRsOIQYEaQmVrMu44Hv1AfLsQbieHspznFM/s16000/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA%20%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80.png
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgyqdBsWQQ5OgNqS-58t0vwvnpeir7FqK2k5bDem37OVddroylY9OqTa027ARiuXx3H4xpDYIlDfsRwi_70OAhTl4kuu4HKzYjIb2wrZBuhY5szdpYbHcZVv8DiS2NRV12QfcrKlYlFzx9wctizhX7P_4V6dqRsOIQYEaQmVrMu44Hv1AfLsQbieHspznFM/s72-c/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA%20%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80.png
marathi study
https://www.marathistudy.com/2025/01/prakalp%20yadi.html
https://www.marathistudy.com/
http://www.marathistudy.com/
http://www.marathistudy.com/2025/01/prakalp%20yadi.html
true
5159341443364317147
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read More Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content