Marathi Mahiti Marathi Grammar, सामान्य व्याकरण, शब्दसमूहाबद्दल एक शब्द , One word substitution In Marathi, Shabd Samuhabadal Ek Shabd,
शब्दसमूहाबद्दल एक शब्द_ Shabd Samuhabadal Ek Shabd
कृतीचे स्वरूप :
|
शब्द म्हणजे काय ?
उदाहरणार्थ : -
शब्दसमूहाबद्दल एक शब्द म्हणजे काय ?
- खाली काही शब्दसमूहाबद्दल एक शब्द दिलेले आहेत.
🅞 पाच पेंढयाचा समूह ➜ पाचुंदा
🅞 अपेक्षा नसताना ➜ अनपेक्षित
🅞 अस्वलाचा खेळ करणारा ➜ दरवेशी
🅞 आठवड्यातून एकदा प्रसिद्ध होणारे ➜ साप्ताहिक
🅞 कधीही नाश न पावणारा ➜ अविनाशी
🅞 जन्मतःच श्रीमंत असलेला ➜ गर्भश्रीमंत
🅞 जाणून घेण्याची इच्छा असलेला ➜ जिज्ञासू
🅞 जुन्या मतांना चिकटून राहणारा ➜ पुराणमतवादी
🅞 ज्याचा तळ लागत नाही असा ➜ अथांग
🅞 तीन महिन्यांतून एकदा प्रकाशित होणारे ➜. त्रैमासिक
🅞 तीन रस्ते एकवटतात ती जागा ➜ तिठा
🅞 दररोज प्रकाशित होणारे ➜ दैनिक
🅞 पंधरवड्यातून एकदा प्रसिद्ध होणारे ➜ पाक्षिक
🅞 फुकट पाणी मिळण्याची केलेली सोय ➜ पाणपोई
🅞 महिन्यातून एकदा प्रसिद्ध होणारे ➜ मासिक
🅞 मागाहून जन्मलेला ➜ अनुज
🅞 लहान मुलाला झोपण्यासाठी गायिलेले गाणे ➜ अंगाईगीत
🅞 स्वतःविषयी वाटणारा अभिमान ➜ स्वाभिमान
🅞 अर्थ न समजता केलेली पाठांतर ➜ पोपटपंची
🅞 इच्छिलेली वस्तू देणारी गाय ➜ कामधेनू
🅞 ईश्वर आहे असे मानणारा ➜ आस्तिक
🅞 ईश्वर नाही असे मानणारा ➜ नास्तिक
🅞 ऐकायला व बोलायला न येणारा ➜ मूकबधिर
🅞 कधीही जिंकला न जाणारा ➜ अजिंक्य
🅞 कमी वेळ टिकणारे ➜ क्षणभंगुर
🅞 कविता करणारा ➜ कवी
🅞 कविता करणारी ➜ कवयित्री
🅞 कुठलीही अपेक्षा न ठेवता ➜ निरपेक्ष
🅞 केलेले उपकार जाणणारा ➜ कृतज्ञ
🅞 केलेले उपकार न जाणणारा ➜ कृतघ्न
🅞 केवळ स्वतःचा फायदा पाहणारा ➜ स्वार्थी
🅞 गाणे गाणारा ➜ गायक
🅞 जमिनीवर राहणारे प्राणी ➜ भूचर
🅞 ज्याचा विसर पडणार नाही असा ➜ अविस्मरणीय
🅞 ज्याची किंमत होऊ शकत नाही असा ➜ अनमोल
🅞 ज्याचे आकलन होत नाही असा ➜ अनाकलनिय
🅞 ज्याला कोणीही शत्रू नाही असा ➜ अजातशत्रू
🅞 ज्याला मरण नाही असा ➜ अमर
🅞 ठरावीक काळाच्या अंतराने प्रसिद्ध होणारे ➜ नियतकालिक
🅞 दगडावर कोरलेले कोरीव काम ➜ शिल्प
🅞 दररोज प्रसिद्ध होणारे ➜ दैनिक
🅞 दीर्घोदयोगी सतत काम करणारा ➜ दीर्घोदयोगी
🅞 दुसऱ्याच्या मनातील जाणणारा ➜ मनकवडा
🅞 दुसऱ्यावर अवलंबून असलेला ➜ परावलंबी
🅞 दुसऱ्यावर उपकार करणारा ➜ परोपकारी
🅞 देशासाठी आपल्या प्राणाची आहुती देणारा ➜ हुतात्मा
🅞 नृत्य करणारा ➜ नर्तक
🅞 पसरवलेली खोटी बातमी ➜ अफवा
🅞 पाण्यात राहणारे प्राणी ➜ जलचर
🅞 पायात पादत्राणे न घालता ➜ अनवाणी
🅞 पाहण्यासाठी आलेले ➜ प्रेक्षक
🅞 पिकांच्या रक्षणासाठी केलेली उंच जागा ➜ माचा
🅞 भाषण ऐकणारा ➜ श्रोता
🅞 भाषण देणारा ➜ वक्ता
🅞 मूर्ती बनवणारा ➜ मूर्तिकार / शिल्पकार
🅞 रोग्यांची शुश्रूषा करणारी ➜ परिचारिका
🅞 लिहिता-वाचता न येणारा ➜ निरक्षर
🅞 लिहिता-वाचता येणारा ➜ साक्षर
🅞 वर्षातून एकदा प्रसिद्ध होणारे ➜ वार्षिक
🅞 वादय वाजवणारा ➜ वादक
🅞 विनामूल्य पाणी मिळण्याचे ठिकाण ➜ पाणपोई
🅞 शत्रूकडील बातमी काढून आणणारा ➜ हेर
🅞 शत्रूला सामील झालेला ➜ फितूर
🅞 संपादन करणारा ➜ संपादक
🅞 समाजाची सेवा करणारा ➜ समाजसेवक
🅞 सर्वस्वी दुसऱ्यावर अवलंबून असणारा ➜ परावलंबी
🅞 स्वतः श्रम न करता खाणारा ➜ ऐतखाऊ
🅞 हळूहळू घडून येणारा बदल ➜ उत्क्रांती
COMMENTS