ज्या शब्दांचा अर्थ एकसारखा असतो, त्यांना समानार्थी शब्द म्हणतात.
कृतीचे स्वरूप :
|
ज्या शब्दांचा अर्थ एकसारखा असतो, त्यांना समानार्थी शब्द म्हणतात. समानार्थी शब्दांचा वापर करून वाक्यात शब्द बदलले जाऊ शकतात.
समानार्थी शब्दांची काही उदाहरणे:
माता, जननी, माय, जन्मदा या सर्व शब्दांचा अर्थ 'आई' असा होतो.
घर या शब्दाचे समानार्थी शब्द - सदन, गृह, निकेतन, आलय, भवन, निवास, धाम, आवास, गेह, निलय, वास-स्थान.
काही समानार्थी शब्दांची यादी
🅞 कमळ ➜ पद्म, कुमुद, पंकज, सरोज, नलिनी
🅞 घर ➜ सदन, भुवन, भवन, गृह, गेह, निवास, घाम
🅞 जमीन ➜ भूमी, भू, धरती
🅞 तलाव ➜ तळे सरोवर, सर, कासार
🅞 दुःख ➜ शोक, व्यथा, वेदना
🅞 दूध ➜ पय, दुग्ध, क्षीर, गोरस
🅞 पक्षी ➜ पाखरु, खग, विहग, विहंग, विहंगम
🅞 पती ➜ नवरा, नाथ, भ्रतार, स्वामी, कांत
🅞 पर्वत ➜ पहाड, गिरी, डोंगर, शैल
🅞 पाणी ➜ पय तोय, जल, सलिल, नीर, उदक, जीवन
🅞 फूल ➜ पुष्प, सुमन, कुसुम, सुम
🅞 भुंगा ➜ भ्रमर, भृंग, षट्पद, अली, मधुप, मधुकर, मिलिंद
🅞 माणूस ➜ मानव, मनुष्य, मनुज, नर, जन, इसम, व्यक्ती
🅞 मुलगा ➜ मुलगा पुत्र, तनय, सुत, नंदन
🅞 रात्र ➜ यामिनी, रात, रजनी, निशा
🅞 रान ➜ अरण्य, वन, कानन, विपिन, जंगल
🅞 वारा ➜ वात, मरुत, वायू, अनिल, पवन, समीर, समीरण
🅞 समुद्र ➜ सागर, पयोधी, जलधी, रत्नाकर
🅞 सूर्य ➜ भानू, भास्कर, रवी, सविता, आदित्य
🅞 सोने ➜ सुवर्ण, हेम, कनक, कांचन, हिरण्य )
🅞 हरीण ➜ हरीण कुरग, कुरंग, कुरंगम
🅞 हिंमत ➜ हिंमत- धैर्य, धाडस,
🅞 अंग ➜ शरीर, देह, कुडी, तनू, काया.
🅞 अंगारा ➜ उदी.
🅞 अंधार ➜ तम, तिमिर, काळोख, अंधकार
🅞 अग्नी ➜ अग्नी आग, अनल, अंगार, जाळ, वन्ही
🅞 अपाय ➜ इजा, जखम.
🅞 अमृत ➜ सुधा, पियूष
🅞 आई ➜ माता, जननी, माउली, माय, मातोश्री,
🅞 आकाश ➜ नभ, गगन, आभाळ, अंतराळ, अस्मान, अंतरिक्ष, व्योम
🅞 आनंद ➜ सुख, हर्ष, समाधान, संतोष, मोद
🅞 उजेड ➜ प्रकाश, उजाळा
🅞 उणीव ➜ कमतरता.
🅞 उत्साह ➜ स्फूर्ती.
🅞 उपद्रव ➜ त्रास.
🅞 ओंजळ ➜ पसा.
🅞 औत ➜ नांगर,
🅞 कंबर ➜ कमर, कटी
🅞 कपाळ ➜ ललाट, भाल, निटिल, निढळ
🅞 कमळ ➜ पद्म, अंबुज, सरोज, नीरज.
🅞 कष्ट ➜ मेहनत, परिश्रम, श्रम,
🅞 कसब ➜ कोशल्य.
🅞 काठ ➜ किनारा, तट, तीर.
🅞 केस ➜ कच, कुतल, अलक, रोम (शरीरावरील केस)
🅞 कोंब ➜ कोंब - अंकुर
🅞 खडतर ➜ कठीण, अवघड.
🅞 खुशामत ➜ स्तुती, प्रशंसा,
🅞 गोष्ट ➜ कथा, कहाणी, हकिकत,
🅞 घर ➜ गृह, सदन, निकेतन, आलय.
🅞 घोडा ➜ अध, हय, वारु, तुरग, तुरंग तुरंगम
🅞 चंद्र ➜ चंद्रमा, चांदोबा, शशी, रजनीनाथ, सुधाकर, तारापती
🅞 जग ➜ दुनिया, विश्व.
🅞 जीवन ➜ आयुष्य, हयात, जिणे.
🅞 झाड ➜ वृक्ष, द्रुम, पादप, तरू,
🅞 डोके ➜ मस्तक, माथा, शिर, शीर्ष
🅞 डोळा ➜ नेत्र, नयन, लोचन
🅞 ढग ➜ मेघ, जलद, पयोधर
🅞 तण ➜ गवत, तृण.
🅞 तरुण ➜ युवक.
🅞 तहान ➜ तृषा, तृष्णा.
🅞 तोंड ➜ वदन, आनन, मुख, मुखडा, चेहरा, मुद्रा
🅞 थंड ➜ गार, शीतल,
🅞 थोर ➜ महान, महा.
🅞 दारू ➜ मद्य, मदिरा, वारुणी, सुरा, नशा
🅞 दाह ➜ आग, जळजळ,
🅞 देव ➜ ईश्वर, ईश, परमेश्वर, सुर, परमात्मा)
🅞 धन ➜ धन संपत्ती, माया, दौलत
🅞 धरती ➜ धरणी, जमीन, धरित्री, भूमी, वर्षा, पर्जन्य, पाणकळा,
🅞 नदी ➜ सरिता, तटिनी, निर्झरिणी
🅞 पत्नी ➜ भार्या, जाया, कांता, अर्धांगी, सहधर्मचरिणी, बायको
🅞 पांडित्य ➜ विद्वत्ता.
🅞 पाऊस ➜ वर्षा, पर्जन्य, पाणकळा
🅞 पाणी ➜ जल, नीर, उदक, तोय.
🅞 पान ➜ पर्ण, दल.
🅞 पाय ➜ पद, चरण, पाऊल
🅞 पिता ➜ जनक, बाप, तात.
🅞 पुत्र ➜ मुलगा, तनय..
🅞 पृथ्वी ➜ धरा, धरणी, धरित्री, वसुधा, वसुंधरा, अवनी
🅞 प्रभा ➜ तेज, आभा.
🅞 प्राण ➜ जीव.
🅞 फूल ➜ पुष्प, सुम, कुसुम, सुमन
🅞 बटकी ➜ दासी, गुलाम.
🅞 बहीण ➜ भगिनी, स्वसा
🅞 बुद्धी ➜ मती, प्रज्ञा.
🅞 भाऊ ➜ भ्राता, बंधू
🅞 भ्रमर ➜ भुंगा, अली, प्रमर
🅞 मन ➜ चित्त, अंत:करण, अंतर, जिव्हार
🅞 महती ➜ मोठेपणा, महत्त्व, गौरव
🅞 मार्ग ➜ रस्ता, वाट, सडक, पथ.
🅞 मासा ➜ मत्स्य, मीन.
🅞 मुलगी ➜ कन्या, दुहिता, पुत्री, तनया, सुता नंदिनी.
🅞 मृत्यू ➜ मरण, अंत, देहान्त,
🅞 मोहिनी ➜ भुरळ, भूल.
🅞 रग्गड ➜ विपुल, खूप, पुष्कळ, बक्कळ, जास्त.
🅞 राग ➜ क्रोध, चीड, संताप..
🅞 राजा ➜ नृप, नृपती, भूप, भूपती, भूताल,राया, राणा
🅞 रूढी ➜ चालीरीती, पद्धती, रिवाज,
🅞 वडील ➜ बाप, पिता, जनक, तात
🅞 वाटसरू ➜ प्रवासी, पांथस्थ, पथिक
🅞 वारा ➜ वात, पवन, समीरण, मास्त, अनिल,
🅞 वीज ➜ विद्युत विद्युल्लता, सौदामिनी,चपला, बिजली
🅞 वीज ➜ विद्युत, सौदामिनी, चपला.
🅞 वेदना ➜ यातना, कळ.
🅞 व्याकूळ ➜ विव्हळ,
🅞 शत्रू ➜ वैरी, दुष्मन
🅞 शहर ➜ नगर.
🅞 शेत ➜ शिवार, वावर, क्षेत्र.
🅞 शौर्य ➜ पराक्रम, वीरता,
🅞 संकट ➜ आपत्ती.
🅞 समर ➜ लढाई, संगर, संग्राम, झुंज
🅞 सागर ➜ समुद्र, जलनिधी, सिंधू, प
🅞 साप ➜ सर्प, उरग, भुजग, भुजंग, भुजंगम
🅞 स्त्री ➜ महिला, वनिता, ललना, अबला, अंगना, रमणी, बाई, नारी.
🅞 हत्ती ➜ गज, करी, कुंजर
🅞 हरीण ➜ कुरंग.
🅞 हात ➜ हस्त, कर, बाहू, भुज (पाणि-संस्कृत)
COMMENTS