महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे माध्यमिक शालांत परीक्षा फेब्रुवारी / मार्च 2025 अंतर्गत मूल्यमापन
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे
माध्यमिक शालांत परीक्षा फेब्रुवारी / मार्च
अंतर्गत मूल्यमापन
गुण २०
इ. १० वी विषय- भाषा
अ) श्रवण कौशल्य : ०५ गुण
आ) भाषण कौशल्य : ०५ गुण
इ) स्वाध्याय : १० गुण
तोंडी परीक्षेकरिता खालीलपैकी कोणतीही दोन कौशल्ये निवडणे अपेक्षित आहे.
अ) श्रवण कौशल्य ( खालीलपैकी कोणतेही एक निवडणे.)
श्रवण कौशल्याची चाचणी 'श्रवण लेखन' स्वरुपात घेणे अपेक्षित आहे. विद्यार्थी संख्या आणि उपलब्ध वेळ यानुसार विद्यार्थ्यांचे गट करावेत. खालील चार पर्यायापैकी कोणताही एक पर्याय श्रवण कौशल्यासाठी निवडावा.
१) परिच्छेद ऐकून त्यांवर आधारित विचारलेल्या वस्तुनिष्ठ प्रश्नांची उत्तरे लिहिणे, (किमान ०५ प्रश्न) (योग्य उत्तरास प्रत्येकी ०१ गुण )
सूचना :
- निवडलेला परिच्छेद पाठ्यपुस्तकातील असावा. (शब्दमर्यादा १०० ते १२० शब्द )
- प्रस्तुत परिच्छेदावर किमान ०५ वस्तुनिष्ठ प्रश्न तयार करावेत.
- प्रश्न फळयावर लिहून द्यावेत.
- प्रस्तुत परिच्छेद किमान दोन वेळा सावकाश, स्पष्टपणे वाचून दाखवावा.
- फळयावर लिहिलेल्या पाच प्रश्नांची उत्तरे विद्याथ्र्यांनी स्वतंत्र उत्तरपत्रिकेच्या पुरवणीवर लिहिणे अपेक्षित आहे.
- प्रत्येक गटासाठी स्वतंत्र परिच्छेद निवडावा.
- प्रत्येक प्रश्नाला एक गुण याप्रमाणे योग्य उत्तरास गुणदान करावे.
- एकूण गुण पाचपैकी दयावेत.
- निवडलेले परिच्छेद, त्यावर आधारित वस्तुनिष्ठ प्रश्न, विद्यार्थ्याच्या तपासलेल्या उत्तरपत्रिका व गुणपत्रक शालेय स्तरावर जपून ठेवावे.
२) ५ वाक्ये किंवा १० शब्द ऐकून लिहिणे. ( योग्य वाक्यास प्रत्येकी ०१ गुण, योग्य १० शब्द लिहिल्यास प्रत्येकी १/२ गुण)
वाक्यासंदर्भात सूचना -
- पाठ्यपुस्तकातील कोणतीही ०५ वाक्ये निवडावीत.
- चार ते पाच शब्दांचे वाक्य असावे.
- २ सोपी, २ मध्यम व १ कठिण याप्रकारे वानये निवडावीत.
- प्रत्येक वाक्य किमान दोन वेळा सुस्पष्टपणे वाचून दाखवावे.
- एकेक वाक्य शिक्षकांनी वाचून विद्यार्थ्यांनी ते ऐकून उत्तरपत्रिकेच्या पुरवणीवर लिहिणे अपेक्षित आहे.
इयत्ता दहावी मराठी कुमारभारती तोंडी परीक्षा व स्वाध्याय प्रश्नपत्रिका पहा..
किंवा
शब्दांसंदर्भात सूचना -
- पाठ्यपुस्तकातील १० शब्दांची निवड करावी.
- ४ सोपे ४ मध्यम, २ कठीण याप्रकारे शब्दांची निवड करावी.
- शिक्षकांनी एकेक शब्द किमान दोन वेळा सुस्पष्टपणे वाचून दाखवावा.
- एकेक शब्द शिक्षकांनी वाचून विद्यार्थ्यांनी तो एकून उत्तरपत्रिकेच्या पुरवणीवर लिहिणे अपेक्षित आहे.
श्रवणकौशल्यासाठी निवडलेली ०५ वाक्ये किंवा १० शब्द गटवार नियोजनानुसार लिखित स्वरुपात असावीत. ऐकून लिहिलेली वाक्ये किंवा शब्द यासंबंधीच्या तपासलेल्या उत्तरपत्रिकांच्या पुरवण्या व गुणपत्रक शालेय स्तरावर जपून ठेवावे.
३) कविता ऐकून त्यावर आधारित वस्तुनिष्ठ प्रश्नांची उत्तरे लिहिणे (किमान ०५ प्रश्न) (योग्य उत्तरास प्रत्येकी ०१ गुण)
सूचना :
- पाठ्यपुस्तकातील कविता निवडणे अपेक्षित.
- निवडलेल्या कवितेवर ०५ वस्तुनिष्ठ प्रश्न तयार करणे..
- कवितेवरील प्रश्न फळ्यावर लिहावेत.
- प्रस्तुत कविता किमान दोन वेळा सावकाश लयीत, स्पष्टपणे वाचून दाखवावी.
- फळ्यावर लिहिलेल्या पाच प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र उत्तरपत्रिकेच्या पुरवणीवर लिहिणे अपेक्षित आहे.
- प्रत्येक गटासाठी स्वतंत्र कविता निवडावी.
- प्रत्येक प्रश्नाला एक गुण याप्रमाणे योग्य उत्तरास गुणदान करावे.
- एकूण गुण पांचपैकी द्यावेत. निवडलेल्या कविता, त्यांवर आधारित वस्तुनिष्ठ प्रश्न, विद्यार्थ्यांच्या तपासलेल्या
- उत्तरपत्रिका व गुणपत्रक शालेय स्तरावर जपून ठेवावे.
इयत्ता दहावी
मराठी कुमारभारती तोंडी परीक्षा व स्वाध्याय प्रश्नपत्रिका पहा..
४) ऑडिओ क्लीप ऐकून त्यांवर आधारित वस्तुनिष्ठ प्रश्नांची उत्तरे लिहिणे. ( किमान ०५ प्रश्न) (योग्य उत्तरास प्रत्येकी ०१ गुण)
सूचना :
- पाठ्यपुस्तकातील पाठ्यांशावर आधारित ऑडिओ क्लीप ऐकवावी.
- ऑडिओ क्लीप स्वतः तयार करावी.
- निर्दोष असावी.
- प्रत्येक गटासाठी स्वतंत्र ऑडिओ क्लीप असावी.
- ऑडिओ क्लीपवर आधारित ०५ वस्तुनिष्ठ प्रश्न तयार करावेत.
- हे प्रश्न ऑडिओ क्लीप ऐकवण्यापूर्वी फळयावर लिहावेत.
- ऑडिओ क्लीप किमान दोन वेळा विद्यार्थ्यांना ऐकवून विद्यार्थ्यांनी संबंधित पाच प्रश्नांची उत्तरे उत्तरपत्रिकेच्या पुरवणीवर लिहिणे अपेक्षित आहे.
- प्रत्येक प्रश्नाला एक गुण याप्रमाणेयोग्य उत्तरास गुणदान करावे.
- एकूण गुण पाचपैकी द्यावेत,
- ऑडिओ क्लीप, त्यावर आधारित वस्तुनिष्ठ प्रश्न, विद्यार्थ्यांच्या तपासलेल्या उत्तरपत्रिका व गुणपत्रक शालेय स्तरावर जपून ठेवावे.
आ) भाषण कौशल्य (खालीलपैकी कोणतेही एक)
'भाषण' हे एक महत्वाचे भाषिक कौशल्य आहे. विदयाथ्यांनी ऐकलेला, वाचलेला अनुभवलेला प्रसंग भाषेद्वारे व्यक्त करणे किंवा स्वतःचे विचार, मत योग्य भाषेत प्रकट करणे, या कौशल्यात अभिप्रेत आहे. विचारांची स्पष्टता, मांडणी, समर्पक शब्दरचना, भाषिक समज, सभाधीटपणा इत्यादी मुद्दे भाषण कौशल्याच्या मूल्यमापनात विचारात घ्यावेत.
1) वाचन केलेल्या कोणत्याही एका पुस्तकाविषयीचे स्वमत प्रकट करणे.
सूचना -
- विदयार्थ्यांच्या वयोगटानुसार कोणतीही दहा पुस्तके निवडावीत. या पुस्तकांची यादी विदयार्थ्यांना वर्षाच्या सुरूवातीस दयावी.
- ही पुस्तके विदयार्थ्यांना शालेय वाचनालयात सहज उपलब्ध होतील, अशी व्यवस्था करावी.
- विदयार्थ्यांनी या व्यतिरिक्त स्वतःहून वेगळे पुस्तके निवडले तरी त्याचे स्वागत करावे.
- विदयार्थ्यांनी वाचलेल्या पुस्तकाविषयी स्वतःचे मत किमान ०३ मिनिटात व्यक्त करणेअपेक्षित आहे.
- स्वमत प्रकटीकरणात पुस्तकाचे नाव, लेखक, पुस्तकात मांडलेला विचार, लेखनशैली, - पुस्तक आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण पुस्तकाचा प्रभाव इत्यादी मुद्दे विचारात घ्यावेत.
- शालेय स्तरावर प्रत्येक विदयार्थ्याचे भाषण कौशल्य स्वतंत्रपणे तपासावे, गुणदान योजनेतील तक्त्यानुसार योग्य गुणदान करणे अपेक्षित आहे.
- प्रत्येक विदयाथ्र्यांची यासंबंधीची सविस्तर नोंद असलेली वही शालेय स्तरावर जपून ठेवणे आवश्यक आहे.
2) दिलेल्या विषयांवर विचार प्रकट करणे. (सदर विषय विदयार्थ्याच्या अनुभवविश्वाशी सुसंगत असावेत.)
सूचना : -
- विदयार्थ्यांच्या भावविश्वाशी निगडीत असे दहा ते पंधरा विषय विदयार्थ्यांसमोर ठेवावेत.
- या विषयांवर शिक्षकांनी विदयार्थ्यांना मार्गदर्शन करणे अपेक्षित आहे.
- विदयार्थ्यामा विषय निवडीचे स्वातंत्र्य दयावे.
- २ ते ३ मिनिटे कालमर्यादा असावी.
- या कौशल्याचा अंतिम परीक्षेआधी किमान तीन वेळा सराव व्हावा.
- विचारप्रकटीकरणात विषयाला धरून केलेला विचार, सूत्रबद्ध मांडणी, समर्पक भाषा, आत्मविश्वास इत्यादी मुद्दे विचारात घेऊन मूल्यमापन होणे अपेक्षित आहे.
- शालेय स्तरावर प्रत्येक विदयार्थ्यांचे विचार - प्रकटीकरण स्वतंत्रपणे तपासावे. गुणदान योजनेतील तक्त्यानुसार योग्य गुणदान करणे अपेक्षित आहे.
- प्रत्येक विदयार्थ्यांची यासंबंधीची सविस्तर नोंद असलेली वही शालेय स्तरावर जपून ठेवणे आवश्यक आहे.
इयत्ता दहावी
मराठी कुमारभारती तोंडी परीक्षा व स्वाध्याय प्रश्नपत्रिका पहा..
3) पाठयपुस्तकातील पाठ किंवा कविता यांवर ८ ते १० वाक्यांमध्ये आपले विचार प्रकट करणे. (विषयानुसार मांडणी, भाषाशैली, सभाधीटपणा, आकर्षक सुरूवात योग्य शेवट या मुद्द्यांचा विचार गुणदानासाठी करणे अपेक्षित)
सूचना -
- प्रस्तुत संदर्भानुसार शिक्षकांकडून विशिष्ट मार्गदर्शन अपेक्षित आहे.
- पाठ अथवा कवितेसंबंधी स्वतःचे विचार प्रकट करतांना विदयार्थ्यांनी खालील मुद्दे विचारात घ्यावेत. पाठ अथवा कवितेचे नाव, लेखक अथवा कवी, पाठाची / कवितेची मध्यवर्ती कल्पना, विचार, पाठ / कविता आवडणे वा न आवडणे यामागील विचार
- प्रत्येक विदयार्थ्यांचे संबंधित पाठ / कवितेवरील विचार स्वतंत्रपणे ऐकून मूल्यमापन करावे. iv) गुणदान योजनेतील तक्त्यानुसार योग्य गुणदान करणे अपेक्षित आहे.
- प्रत्येक विदयार्थ्यांची यासंबंधीची सविस्तर नोंद असलेली वही शालेय स्तरावर जपून ठेवणे आवश्यक आहे.
श्रवण व भाषण कौशल्यांचे अंतर्गत मूल्यमापन शालेयस्तरावर होणार असले तरी ते पारदर्शक व्हावे. अंतर्गत मूल्यमापनाचे गांभीर्य लक्षात ठेवावे. श्रवण व भाषण कौशल्यांच्या अंतिम मूल्यमापनापूर्वी उपलब्ध वेळेनुसार साधारणत: तीन वेळा सराव द्यावा.
इ)स्वाध्याय १० गुण
सूचना -
- प्रत्येक विदयार्थ्याने संपूर्ण वर्षात दोन स्वाध्याय पूर्ण करणे अपेक्षित आहे..
- प्रत्येक स्वाध्यायास ०५ गुण.
- दोन पैकी एक स्वाध्याय गदय अथवा पदय घटकावर आधारित असावा. स्वाध्यायात आकलन, स्वमत, अभिव्यक्ती इत्यादी प्रकारांच्या कृती असणे अपेक्षित आहे.
इयत्ता दहावी
मराठी कुमारभारती तोंडी परीक्षा व स्वाध्याय प्रश्नपत्रिका पहा..
इयत्ता | इ. | 10 वी | दहावी | 9 वी | नववी | आरोग्य व शारीरिक शिक्षण | अंतर्गत मूल्यमापन | प्रात्यक्षिक कार्य | लेखन कार्य | परीक्षा | 2023 | Iyatta | Etc. | 10th | X | 9th | Ninth Health & Physical Education | Internal Evaluation | Demonstration work Writing work Exam | आरोग्य-व-शारीरिक-शिक्षण-अंतर्गत-मूल्यमापन | TAGS10 TH 2023 HEALTH AND PHYSICAL EDUCATION EVALUATION१० वी परीक्षा मार्च २०२२10TH2023 HEALTH AND PHYSICAL EDUCATION EVALUATION2023 आरोग्य व शारीरिक शिक्षण मूल्यांकन9 THEVALUATION IYTTA10 VIHEALTH AND PHYSICAL EDUCATIONIYTTA10 VISSC BORD EXAMअभ्यासक्रमावर आधारीत लेखन कार्यआरोग्य व शारीरिक शिक्षण २०२3 साठी मूल्यांकनइ. १० वीइ. १० वी. 2023 HEALTH AND PHYSICAL EDUCATION EVALUATIONमाध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च २०२3मार्च २०२3 साठी मूल्यांकन पध्दत
विषय संपूर्ण अंतर्गत मूल्यमापन नोंदी भाषा (मराठी, हिंदी, इंग्रजी) तोंडी परीक्षा गुणदान नोंदी गणित गृहपाठ, प्रात्यक्षिक परीक्षा, बहुपर्यायी चाचणी MCQ विज्ञान व तंत्रज्ञान प्रात्यक्षिक परीक्षा, उपक्रम सामाजिक शास्रे गृहपाठ, प्रात्यक्षिक परीक्षा, बहुपर्यायी चाचणी MCQ आरोग्य व शारीरिक शिक्षण अभ्यासक्रमावर आधारीत लेखन कार्य व प्रात्यक्षिक परीक्षा जलसुरक्षा उपक्रम, प्रकल्प, लेखी, तोंडी संरक्षण शास्र उपक्रम, प्रकल्प, लेखी, तोंडी
विषय | संपूर्ण अंतर्गत मूल्यमापन नोंदी |
---|---|
भाषा (मराठी, हिंदी, इंग्रजी) | तोंडी परीक्षा गुणदान नोंदी |
गणित | गृहपाठ, प्रात्यक्षिक परीक्षा, बहुपर्यायी चाचणी MCQ |
विज्ञान व तंत्रज्ञान | प्रात्यक्षिक परीक्षा, उपक्रम |
सामाजिक शास्रे | गृहपाठ, प्रात्यक्षिक परीक्षा, बहुपर्यायी चाचणी MCQ |
आरोग्य व शारीरिक शिक्षण | अभ्यासक्रमावर आधारीत लेखन कार्य व प्रात्यक्षिक परीक्षा |
जलसुरक्षा | उपक्रम, प्रकल्प, लेखी, तोंडी |
संरक्षण शास्र | उपक्रम, प्रकल्प, लेखी, तोंडी |
COMMENTS