मराठी व्याकरणातील विरामचिन्हे: प्रकार, उपयोग आणि उदाहरणांसह सविस्तर माहिती. लेखन कौशल्य सुधारण्यासाठी महत्त्वाची मार्गदर्शिका वाचा!
एखादा
मनुष्य बोलत असला म्हणजे त्याच्या आवाजाच्या चढउतारावरून त्याला काय म्हणायचे ते
पटकन समजते. पण हेच त्याने नुसतेच लिहून दाखविले असता, वाचताना कोणता उद्गार कोणाचा? त्याचे वाक्य कोठे संपले? दुसऱ्याचे बोलणे कोठून सुरू झाले?
हे समजत नाही.
शिवाय बोलणारा प्रश्न विचारतो का उद्गार काढतो? का साधे विधान करतो? हेही समजत नाही. बोलणाऱ्याच्या
मनातला आशय केवळ लिहून दाखविल्याने कळत नाही. हा आशय पूर्णपणे कळावा व कोठे किती
थांबावे हे समजण्यासाठी काही खुणा किंवा चिन्हे ठरविण्यात आली आहेत. ती चिन्हे
वापरली म्हणजे तेच लिखाण स्पष्ट होते. |
जेव्हा आपण बोलत असतो, तेव्हा मध्ये मध्ये थांबत बोलतो, या थांबण्याला विराम म्हणतात. लेखनामध्ये हा विराम वेगवेगळ्या खुणांनी किंवा चिन्हांनी दाखवला जातो, या चिन्हांना विरामचिन्हे म्हणतात.
विरामचिन्हांमुळे
आपण वाचताना कोठे व किती थांबावे हे समजते व बोलणाऱ्या व्यक्तीच्या मनातले भावही
समजतात. त्यामुळे गद्य उतारा सहज समजण्यास मदत होते. विरामचिन्हे आपल्या लेखनात
नसली, तर
वाक्य कोठे संपले, कोठे
सुरू झाले, ते
कसे उच्चारावयाचे हेच मुळीच समजणार नाही. म्हणून योग्य विरामचिन्हांचा
वापर कोठे व केव्हा करावा याची कल्पना आपणांस अवश्य हवी. विरामचिन्हे
दोन प्रकारची आहेत: (१) विराम दर्शविणारी व (२) अर्थबोध करणारी. |
👇💥मराठीत नऊ प्रमुख विरामचिन्हे आहेत.💥👇 |
COMMENTS