मराठी पत्रलेखन: औपचारिक आणि अनौपचारिक पत्रे लिहिण्याच्या सोप्या पद्धती, रचना, आणि उदाहरणे जाणून घ्या. शुद्धलेखन आणि स्पष्टतेसाठी उपयुक्त मार्गदर्शन.
पत्रलेखन ही एक कला मानली जाते. Letter writing in marathi आपल्या मनातील भाव किंवा विचार दुसऱ्यापर्यंत पोहोचवण्याचे तसेच आपल्या भावना किंवा विचारांना चांगल्या भाषेत संक्रमित करण्याचे पत्र हे एक उत्तम लिखित साधन आहे.
आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात संगणक, भ्रमणध्वनी, इंटरनेट, ई-मेल यांचा वापर करणे सहज शक्य झाल्याने प्रत्यक्ष पत्रलेखनाची गरज बऱ्याच प्रमाणात कमी झालेली असली तरी पत्रलेखनाकरता नव्या तंत्रज्ञानाचा वापर करणे ही आता काळाची गरज बनली आहे. Letter writing in marathi
अनौपचारिक पत्राद्वारे आपल्या भावना प्रभावीपणे व्यक्त करता येणे तसेच औपचारिक पत्राद्वारे आपले म्हणणे, विचार, मागणी, विनती इत्यादी बाबी योग्य व कमीत कमी शब्दांत संबंधित व्यक्तीपर्यंत पोहोचवणे हे अत्यंत महत्त्वाचे लेखन कौशल्य आहे. हे कौशल्य आत्मसात करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानानुसार, ई-मेल पाठवण्याच्या पद्धतीनुसार पत्रलेखन करणे आवश्यक आहे.
आज आपण पुढील पत्रांचा अभ्यास करणार आहोत. |
• मागणीपत्र • विनंतीपत्र • अभिनंदनपत्र कृतिपत्रिकेत पत्रलेखन प्रकारात निवेदन जाहिरात, बातमी, सूचनाफलक, यासारख्या शालेय स्तरावरील कार्यक्रमासंबंधी माहिती देऊन त्या आधारे पत्र लिहिण्यास सांगितले जाते. Letter writing in marathi |
: मागणी पत्र : |
■ मागणी पत्राचा अभ्यास करताना मागणीपत्रात खालील मुद्द्यांचा समावेश असावा. i) मागणी कोणत्या वस्तूची? (यादी देणे आवश्यक) ii) संख्या पुरेशी व योग्य लिहिली आहे का ? iii)दिनांक काळजीपूर्वक लिहावा iV)वस्तूची उपयुक्तता / आवश्यकता. V)वस्तूंच्या दर्जा व सवलत याविषयी विचारणा करावी. Vi) भावाचे दरपत्रक व बील देण्यासंदर्भात माहिती. Letter writing in marathi |
: विनंती पत्र
: विनंती पत्र : |
■ विनंती पत्राचा अभ्यास करताना विनंतीपत्रात खालील मुद्द्यांचा समावेश असावा. (i)कोणत्या विषयाच्या संदर्भात विनंती. (ii) विनंती पत्रासाठी योग्य मायना. (iii) समस्येचे गांभीर्य. iv) समस्या निवारणासाठी विनंती. Letter writing in marathi |
: अभिनंदन पत्र :
: अभिनंदन पत्र : |
■ अभिनंदन पत्र : व्यक्तीचा उल्लेख योग्य / नात्याप्रमाणे/ सन्मानपूर्वक करावे. व्यक्तीचे क्षेमकुशल विचारावे, भावना प्रभावी शब्दांत माडावी. नात्यातील जिव्हाळ्यानुसार विस्तृत लेखन करावे. या पत्रामध्ये पत्राचा विषय लिहिण्याची गरज नाही. पत्रात शेवटी डावीकडे पत्र पाठवणाऱ्याचा पत्ता लिहिणे आवश्यक. Letter writing in marathi |
: पत्र लिहिताना घ्यावयाची दक्षता :
: पत्र लिहिताना घ्यावयाची दक्षता : |
१) कृतीत दिलेला मजकूर कंटाळा न करता वाचावा व नीट समजावून घ्यावा. २) दिलेल्या माहितीत विषय काय आहे. आयोजक कोण ते शोधा त्याचा तपशील पहावा, नाव, पत्ता इ. ३)यामध्ये कोण पत्र लिहितो, कशासाठी, (विषय) व कोणाला याचा शोध घ्यावा, ४) दिलेल्या विषयाच्या रोधाने साध्या व सुटसुटीत वाक्यात सहज समजेल अशा शब्दांत लेखन करा. ५)मुख्य मजकूरात तीन परिच्छेद करावेत ६) ई-मेल प्रारुपात पत्राचे लेखन करताना, दिनांक- प्रति – मायना-विषय – महोदय – मुख्य मजकूर – समारोप – पत्र लिहिणाऱ्याचा पत्ता. असा आराखडा असावा. ७) प्रेषक, प्रति यांचे पत्ते कृतिपत्रिकेत दिलेले असतील तेच लिहावे. ८) पत्राच्या समारोपात आपला विश्वासू , आपला कृपाभिलाषी या शब्दांनी शेवट करून आवश्यकतेप्रमाणे अ.ब.क. किंवा कृतिपत्रिकेत असणारे नाव व पत्ता लिहावा, ९) पत्राच्या शेवटी पत्र लिहिणाऱ्याचे नाव, पत्ता व काल्पनिक ई-मेल आय डी लिहावा. या सर्व मुद्यांचा पत्रलेखनात विचार करावा. Letter writing in marathi |
: औपचारिक ई त्राचा आराखडा :
: औपचारिक ई – पत्राचा आराखडा : |

: अनौपचारक ई – पत्राचा आराखडा
: अनौपचारिक ई – पत्राचा आराखडा : |

पुढील कृती सोडवा :
पत्रलेखन : पुढील निवेदन वाचा व त्याखालील कोणतीही एक कृती सोडवा : Mar - 2024
: मागणीपत्र :
दिनांक : १० जून २०२४
प्रति,
मा.व्यवस्थापक,
आम्रपाली रोपवाटिका,
यशवंतनगर,सांगली.
ई-मेल: amrapali06@gmail.com
विषय : वृक्षारोपणासाठी रोपांची मागणी करण्याबाबात...
महोदय,
मी मधुर कुलकर्णी, ज्ञानदीप विदयालयात शिकत असून विदयार्थी प्रतिनिधी या नात्याने मा. मुख्याध्यापकांच्या परवानगीने रोपांची मागणी करण्यासाठी हे पत्र लिहीत आहे. ५ जून या 'जागतिक पर्यावरण दिना' चे औचित्य साधून आमच्या शाळेत पर्यावरण पंधरवडा साजरा केला जाणार आहे. यातील एक उपक्रम म्हणून आम्ही वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबवणार आहोत. आपण आपल्या रोपवाटिकेतर्फे शाळांना फळे, फुले आणि उपयुक्त झाडांच्या रोपांचे मोफत वाटप १५ जून ते २० जून दरम्यान करणार आहात. आपण तशी जाहिरात वर्तमान पत्रात दिली आहे. वृक्षारोपणासाठी आमच्या शाळेलाही काही रोपे हवी आहेत. 'ती आम्हांला ५ ते १० जून दरम्यान मिळतील का?' जास्तीत जास्त रोपे नेऊन संवर्धन करणाऱ्यास बक्षीस' या उपक्रमातही आम्ही सहभागी होऊ इच्छितो, याची नोंद घ्यावी. रोपे घेण्यासाठी प्रतिनिर्धाना तेथे यावे लागेल का? की आपण शाळेच्या पत्त्यावर पाठवू शकाल, याबाबत कळवल्यास सोयीचे होईल.
रोपांची यादी पुढे दिली आहे:
आंबा - 25 नग
पेरू - 50 नग
सीताफळ - 25 नग
विविध फुलझाडे - 25 नग
तरी वरीलप्रमाणे रोपे पाठवण्याची कृपा करावी व आमच्या विद्यालयाला 'एक सुंदर उपक्रम व स्पर्धा' यात सहभागी होण्याची संधी द्यावी ही नम्र विनंती.
कळावे.
आपला कृपाभिलाषी,
मधुर कुलकर्णी,
(विद्यार्थी प्रतिनिधी)
ज्ञानदीप विदयालय,सांगली.
ई-मेल: dnyandeep@xxxx.com
किंवा
: अभिनंदन पत्र :
दिनांक : २२ जून २०२४
प्रति,
मा. व्यवस्थापक,
आम्रपाली रोपवाटिका,
यशवंतनगर,सांगली.
ई-मेल: amrapali06@gmail.com
महोदय,
मी मधुरा कुलकर्णी, ज्ञानदीप विदयालयाची विदयार्थी प्रतिनिधी या नात्याने हे पत्र लिहीत आहे.
सर्वप्रथम आमच्या शाळेतर्फे तुमचे मनापासून अभिनंदन करते. शाळां-शाळांमधून वृक्षारोपण कार्यक्रमास प्रोत्साहन देण्यासाठी आपल्या आम्रपाली रोपवाटिकेमार्फत दि. १५ जून ते २० जून दरम्यान मोफत रोपांचे वाटप केले गेले. हा खरोखरच स्तुत्य उपक्रम होता.
वृक्षारोपणाबरोबरच वृक्षसंवर्धनाच्या जबाबदारीची जाणीव राहावी म्हणून तुम्ही बक्षीसही जाहीर केले होते. त्यामुळे जास्तीत जास्त शाळांनी या उपक्रमात सहभाग नोंदवला. आमच्या शाळेतही अधिक उत्साहपूर्ण वातावरणात वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला. लावलेल्या रोपांची विदयार्थी काळजीही घेत आहेत. पर्यावरण रक्षणाच्या कर्तव्याची जाणीव करून देत नवीन पिढीला निसर्गाशी जोडण्याची कल्पना वाखाणण्याजोगी आहे. या माध्यमातून आपण एक पर्यावरण चळवळच राबवली आहे.
या सर्व गोष्टींसाठी आपले पुन्हा एकदा मनःपूर्वक अभिनंदन !
आपली नम्र,
मधुरा कुलकर्णी,
(विदयार्थी प्रतिनिधी)
ज्ञानदीप विद्यालय,सांगली.
ई-मेल: dnyandeepvid@gmail.com
- पुढील निवेदन वाचा व त्याखालील कोणतीही एक कृती सोडवा : मार्च 2023
: मागणीपत्र :
दिनांक : ०१-१२-२०२५
प्रति,
मा. व्यवस्थापक,
मनोज पुस्तकालय,
६९/३१४, आनंद नगर,
अकोला. XXX XXX
विषय: पुस्तकांची मागणी करण्याबाबत...
महोदय,
मी कु. श्रेयस इनामदार 'सर्वोदय विद्यालयात ' शिकत असून विदयार्थी प्रतिनिधी या नात्याने आमच्या शाळेतील ग्रंथालयासाठी आवश्यक पुस्तकांची मागणी करीत आहे. आपल्या निवेदनानुसार दि. ०८ डिसेंबर रोजी तुम्ही २०% सवलतीने पुस्तक विक्री करणार आहात, त्याचबरोबर ₹२०००/- च्या खरेदीवर एक पुस्तक मोफत असे जाहीर केले आहे. या संधीचा लाभ शाळेसाठी व्हावा, ही अपेक्षा ठेवून खाली यादीत दिलेली पुस्तके मी मागवत आहे:
(१) ययाती लेखक - वि. स. खांडेकर १० प्रती
(२) ऋतुचक्र लेखिका - दुर्गा भागवत ५ प्रती
(३) बोलकी पाने लेखिका - डॉ. विजया वाड १० प्रती
पुस्तकांसोबत बिल आणि आपल्या बँक खात्याचा तपशील पाठवावा, म्हणजे आपल्या खात्यात रक्कम ऑनलाइन जमा करता येईल.
हे पत्र मी मा. मुख्याध्यापकांच्या परवानगीने लिहीत आहे.
कळावे,
आपला नम्र,
श्रेयस इनामदार
विदयार्थी प्रतिनिधी,
सर्वोदय विदयालय, अकोला.
ई-मेल: adarshavidya@xxxx.com
किंवा
: माहिती देणारे पत्र :
दिनांक : ०१-१२-२०२५
प्रिय मैत्रीण ईशा,
सप्रेम नमस्कार,
आपण परवाच प्रत्यक्ष भेटलो आणि आज अचानक हे पत्र पाहून तू आश्चर्यचकित होशीलः पण तसंच महत्त्वाचं कारण असल्यामुळे मी पत्राद्वारे संवाद साधत आहे.
तुला आनंदाची बातमी दयायची म्हणजे आपल्या जिल्हयातील आनंदनगर येथील 'मनोज पुस्तकालय' या ग्रंथभांडाराचा वर्धापनदिन दि. ८ डिसेंबर रोजी संपन्न होत आहे. या निमित्ताने त्यांनी प्रत्येक पुस्तकावर २०% सवलत आणि ₹२००० च्या खरेदीवर एक पुस्तक मोफत अशी योजना आखली आहे. तुझी वाचनाची आवड आणि पुस्तकांची भूक मला चांगलीच ठाऊक आहे. या संधीचा तुला लाभ व्हावा अशी माझी इच्छा आहे. तेव्हा लगेच वरील ठिकाणी संपर्क साधावास आणि जास्तीत जास्त पुस्तके खरेदी करावीत, हीच अपेक्षा.. लवकरच पुन्हा भेटूया. घरातील सर्वांना माझा नमस्कार सांग.
स्वतःची काळजी घे.
कळावे,
तुझी मैत्रीण,
श्रेया इनामदार,
ममता निवास,
कर्वे रोड,अकोला.
ई-मेल: shreya@xxxx.com
COMMENTS