आत्मकथन लेखन कसे करावे? मराठीत आत्मकथनाचे महत्त्व, उदाहरणे आणि लेखन तंत्र जाणून घ्या. प्रभावी आत्मकथनासाठी मार्गदर्शक वाचा!
उपयोजित लेखन| मराठी कुमारभारती | आत्मकथन | Upyojit lekhan | Marathi Kumarabharati | aatmkathan
उपयोजित लेखन मराठी कुमारभारती आत्मकथन , Upyojit lekhan Marathi Kumarabharati aatmkathn, उपयोजित लेखन मराठी, कुमारभारती आत्मकथन , Upyojit lekhan, Marathi Kumarabharati , aatmkathn, आत्मकथन इन मराठी, आत्मकथन मराठी, aatmkathn in marathi, आत्मकथन निबंध ,आत्मकथन कसें करावे
स्वविचारांचे प्रकटीकरण ही क्षमता/कौशल्य आत्मसात करण्यासाठी निबंध लेखन या घटकाचा अभ्यास आवश्यक असतो. निबंध लेखन म्हणजे विचारांची विषयानुरूप केलेली मुद्देसूद मांडणी, आज आपण आत्मकथन या निबंध लेखन प्रकाराचा अभ्यास करणार आहोत.
मराठीत आत्मकथन कसे लिहावे ?
आत्मकथन
आत्मचरित्र म्हणजे केवळ आत्मकथनात्मक निबंध नव्हे. अशा प्रकारच्या निबंधात ज्याचे 'आत्मकथन' करावयाचे त्याच्या अंतरंगात आपण मनाने शिरून त्याची सुख-दु:खे, अनुभव यांच्याशी एकरूप होऊन कथन करावयाचे. या कथनात कल्पनाविलासाला भरपूर वाव असतो. दिलेल्या विषयाच्या वैयक्तिक जीवनात घडलेल्या सर्वच प्रसंगांचे कथन करण्याऐवजी काही निवडक प्रसंग लिहिणे परिणामकारक ठरते.
आत्मकथनात्मक निबंधातील वाक्यरचना प्रथमपुरुषी असावयास हवी. या प्रकारच्या निबंधांना कोणी 'मनोगत, कैफियत, कहाणी, आत्मवृत्त' असे म्हणतात.
उदाहरणार्थ -
फळ्याचे आत्मवृत्त, रायगड बोलू लागला तर, राष्ट्रध्वज सांगतोय आपुली कहाणी, शाळेतील घंटेचे मनोगत वगैरे......
आत्मकथनात्मक निबंधातील आणखी काही
आपला आत्मकथनात्मक निबंध चांगला व्हावा असे वाटत असेल तर निबंधात येणारा तोचतोचपणा टाळला पाहिजे.त्यापेक्षा वेगळेपणा आपल्या आत्मकथनात्मक निबंधात आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. 'मी बोलत आहे अशी सुरुवात करावी.
पहिल्या परिच्छेदात कोण आत्मकथन करीत आहे हे स्पष्ट होणे आवश्यक आहे.
आत्मकथनेही वस्तूंची, वास्तूंची, प्राण्यांची, पक्ष्यांची, माणसांची असतात. त्यातून त्यांची सुखदुःखे, जीवनाविषयक दृष्टिकोन स्पष्ट व्हावेत. माणसामाणसांतील संबंध, माणसे व वस्तू किंवा वास्तू यांच्यातील संबंध स्पष्ट व्हावेत. मानवेतर सृष्टीतील वस्तू, वास्तू किंवा झाडे माणसांचे जीवन पाहात असतात. माणसांचे चुकते कोठे, हे त्यांना सांगावेसे वाटते. ते सारे अनेकदा माणसांच्या जगातील चांगल्यावाईट गोष्टींचे साक्षीदार असतात. त्यांना माणसांबद्दल, मुलांबद्दल काय वाटते ते आपण आत्मकथनात्मक निबंधातून सांगू शकतो. त्यामुळे आपल्या निबंधात वेगळेपणा येऊ शकतो.
आत्मकथन करताना लक्षात घ्यावयाचे मुद्दे
- आपण स्वतः ती वस्तू घटक आहोत अशी कल्पना करावी. आत्मकथनात सजीव व निर्जीव वस्तू स्वतः बोलत आहे, अशी कल्पना केलेली असल्याने या निबंधाचे लेखन प्रथमपुरुषी एकवचनी असावे.
- मानवाप्रमाणे निर्जीव वस्तूंनाही सुखदुःखे यासारख्या भावना असतात अशी कल्पना करून लेखन करावे.
- ज्या घटकाचे आपण आत्मकथन करणार आहोत त्या घटकाच्या जागी आपण आहोत असे मानून कल्पनेने त्याच्या सुख दुःखाचा अनुभव घेवून त्याचे लेखन करावे.
- ज्या घटकाचे आत्मकथन आपण करणार आहोत त्या घटकाचा जन्म, परिस्थिती, जगताना वाटणारी सुखदुःखे व त्या घटकाची असणारी आजची अपेक्षा या गोष्टींचा उल्लेख करावा.
- एखादे चित्र किंवा एकापेक्षा अधिक घटक एकत्र दिले जातील त्यातील कोणतातरी एक घटक अन्य घटकांशी किंवा त्यापैकी एकाशी बोलतो आहे अशी कल्पना करून त्याचे आत्मकथन लिहायला सांगितले जाईल.
- दिलेला घटक विद्यार्थ्याच्या अनुभव विश्वातलाच असतो.
आत्मकथन लेखन उदाहरणे, मराठीत आत्मकथन कसे लिहावे, आत्मकथन लेखन स्वरूप, मराठी निबंध आत्मकथन, विद्यार्थी आत्मकथन मराठीत, प्रसिद्ध आत्मकथा मराठी, आत्मकथन लेखन टिप्स, शाळेसाठी आत्मकथन लेखन, मराठी साहित्य आत्मकथन, सोपे आत्मकथन लेखन
उदा. 'फळ्याचे आत्मकथन'...... काही भाग
'फळ्याचे आत्मकथन' मध्ये फळा एका विद्यार्थ्याच्या जीवनातील प्रसंग कशा रीतीने सांगतो, ते पहा..... फळा बोलत आहे, हे लक्षात घेऊन पुढील परिच्छेद वाचा.
'आठवतं तुला? तेव्हा तू होतास पाचवीत. तास होता आठवा चित्रकलेचा! माझं लक्ष होत तुझ्याकडे, अगदी कंटाळून गेला होतास तू. त्यात तास चित्रकलेचा! तुझा नावडता! तुझ्या कपाळावर किती आठ्या दिसत होत्या. तेवढ्यात चित्रकलेचे सर वर्गात आले अगदी हसतमुख ! त्यांनी एकदा माझ्याकडे म्हणजे फळ्याकडे पाहिलं. हातातील खड्डूनं मोजक्या रंगरेषांतून एक 'मोर' त्यांनी साकार केला. माझ लक्ष होतं तुझ्याकडे. चित्रातील मोराकडे अगदी टक लावून तू पाहात होतास आणि..... अगदी नकळत तू आपल्या दप्तरातून चित्रकलेची वही काढलीस. पेन्सिल हाती घेतलीस एकदा तू माझ्याकडे पाहात होतास एकदा वहीकडे, तुझ्या वहीतल्या मोराचं चित्र पूर्ण झालं. डोळ्यांसमोर थोडं अंतर ठेवून तू वहीतील 'तुझ्या ' मोरांकडे पाहिलंस, खुदकन हसलास. मनातल्या मनात म्हणालास, "वा! काय छान जमलाय मोर! वाटतं टुणकन उडी मारून नाचायला लागेल वर्गभर!" तुझ्या मनातलं कुणी ऐकलं? मी ! फळ्यानं! मला खूप खूप आनंद झाला. कारण माहीत आहे? तुझा नावडता विषय आज आवडता झाला होता. आठव्या तासाचा कंटाळा निघून गेला होता. शिवाय तुझ्या रूपानं मी एक कलावंत पाहिला होता !”
👆👆आता वरील उताऱ्यात फळा बोलतो आहे, असा अनुभव आला की नाही? ज्याला बोलता येत नाही, त्याला बोलता येतं; ज्याला भावना नाहीत असं वाटतं, त्याला भावना आहेत; ज्याला माणसासारखं जीवन नाही त्याला माणसासारखं जीवन आहे अशी कल्पना करून मानवेतरांचे आत्मकथन लिहितात.या प्रमाणे आत्मकथन लिहण्याचा सराव करुया....
आत्मकथन लेखन उदाहरणे, मराठीत आत्मकथन कसे लिहावे, आत्मकथन लेखन स्वरूप, मराठी निबंध आत्मकथन, विद्यार्थी आत्मकथन मराठीत, प्रसिद्ध आत्मकथा मराठी, आत्मकथन लेखन टिप्स, शाळेसाठी आत्मकथन लेखन, मराठी साहित्य आत्मकथन, सोपे आत्मकथन लेखन
1) आत्मकथन ( Mar -24 )
- दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा..
मी आरसा बोलतोय
वा! वा! किती छान गुंग झाला आहेस ! तुम्हां माणसांना स्वप्न दाखवण्यासाठीच तर माझा जन्म झाला आहे! अरे, असा गोंधळून इकडे तिकडे बघू नकोस. मी तुझ्यासमोरचा आरसा बोलतोय !
हे बघ, प्रत्येक माणसाचं स्वतः वरच सर्वात जास्त प्रेम असतं. आपण इतरांपेक्षा वेगळं दिसावं म्हणून प्रत्येक जण काहीतरी वेगळी कृती करण्याच्या प्रयत्नात असतो. या धडपडीतूनच माणसाने या पृथ्वीतलावर अनंत पराक्रम गाजवले आहेत. म्हणून तर माणूस आज सर्व प्राण्यांचा राजा, या पृथ्वीता राजा म्हणून वावरतोय या पराक्रमी माणसांनी आपल्या प्रत्येक पराक्रमानंतर आरशात स्वतःला पाहिले असणारच आणि पाहता पाहता मुठी आवळून, हात उंचावून माझा विजय असो अशी मोठ्याने मनातल्या मनात घोषणा देत स्वतःचा जयजयकार केला असणारच, हे लक्षात ठेव तुमच्या मनातल्या या प्रेरणेचा निर्माता मीच आहे मीच तुमची प्रगती घडवून आणतो.
आठवते का रे? जत्रेत आपली भेट झाली होती! किती विविध रूपांत मी त्या आरसे महालात अवतरलो होतो. तू तर नुसता लोटपोट हसत होतास तुझ्याच किती भन्नाट प्रतिमा पाहायला मिळाल्या होत्या ! गोलगरगरीत, हडकुळी, एकदम बुटकी किती प्रतिमा! एका आरशातली प्रतिमा आठवते? डोकं मोठं भोपळयाएवढं बाकीचा देह दोनअडीच फूट फक्त काय हसत होता तुम्ही सगळेजण !
लक्षात ठेव ही गाझी रूपं केवल विनोद करण्यासाठी निर्माण झालेली नाहीत. ड्रायव्हरला पाठीमागून येणाऱ्या गाडया दाखवण्यासाठी मीच तर गाडीच्या कडेवर बसतो. वेगवेगल्ली भिंगे ही माझीच रूपे आहेत प्रयोगशाळेतल्या सूक्ष्मदर्शकापासून अवकाशातल्या ग्रहगोलांचे निरीक्षण करणाऱ्या दुर्बिणी पर्यंत सर्वत्र मीच असतो घरात, दारात, कपड्यांवर, दुकानांत, रस्त्यांवर, भाडयांमध्ये, जत्रांमध्ये, इथे तिथे सर्वत्र मीच असतो. पण लक्षात ठेव. मी कधी स्वतःच्या मिजाशीत राहिलो नाही.
पाणी पिण्यासाठी माणूस प्रथम नदीत वाकला तेव्हा त्याला स्वतःलाच स्वतःचे दर्शन घडले असणार तेव्हापासून मी त्याच्यासोबत आहे. मी स्वतःला बाजूला ठेवून माणसाला मदत केली आहे तूसुद्या अशीच मदत करीत सहा. पाहा, केवढा मोठा होशील तू!

2) आत्मकथन ( Mar -20 )
- दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा..
मी झाड बोलत आहे...
होय होय मित्रांनो मी झाड बोलतोय. आज मी रस्त्याच्या कडेला एकटाच उभा आहे. एका चिमुकल्या मुलाने माझे संगोपन केले. मोठ्या आवडीने माझी काळजी घेत मला मोठे केले. त्या लहान मुलाला माझे महत्व समजले होते. माझे वय आता जास्त झाले आहे. मला तुम्हाला माझ्याबद्दल काहीतरी सांगायचे आहे.
संत तुकाराम महाराजांनी निसर्गाबद्दल खूप छान शब्दात म्हणतात-
वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे
पक्षीही सुस्वरे। आळविती ।।
येणे सुख रुचे एकांताचा वास ।
नाही गुणदोष। अंगी येत।।
आधी माझ्या आजूबाजूला भरपूर झाडे होती. लहान लहान मुले माझी फळे खाण्यासाठी माझ्यावर दगड मारतात आणि माझी फळे मोठ्या आनंदात खात असत. तरीही मी त्या लहान मुलांवर रागवत नाही. माझ्या फांद्यांना झोका बांधून लहान लहान मुले झोका झोका खेळतात. आता माझ्या शेजारी एक मोठी कंपनी झालीये त्यामुळे माझ्या आजूबाजूची सर्व झाडे नाहीशी करण्यात आली. मला भीती वाटते की मलाही नष्ट करतील की काय? परंतु झाडे लावा देश वाचवा, झाडे लावा झाडे जगवा या घोषणा ऐकल्या की थोडासा दिलासा मिळतो.
काल माझ्या सावलीत शाळेतील मुले गप्पा मारत बसली होती. शाळेतील एका कार्यक्रमात वृक्ष वाटप करण्यात आले त्याबद्दल मुलांच्यात चर्चा चालू होती. असे कार्यक्रम शाळेत आयोजित करतात हे ऐकून मी मनातल्या मनात आनंदित झालो. मी तर नेहमी तुमच्यासाठी उपयुक्तच आहे. तरीही माझ्या फांद्या कापल्या जातात. तुम्हाला काही लागले तर तुम्ही लगेच आई ग असे उद्गार काढता तसेच माझेही आहे. माझ्या फांद्या तोडल्या तर मलाही वेदना होतात.
कडक उन्हाळ्यात तुम्ही घामाने जेव्हा ओलेचिंब होता उन्हाळ्यात आणि जेव्हा माझ्या फांद्यांखाली येऊन थोडासा विसावा घेता तेव्हा मला खूप छान वाटते. तुम्ही जेव्हा माझे मानभरून कौतुक करता तेव्हा मलाही खूप आनंद होतो. बाळांनो मी तुम्हाला केवळ सावलीच देत नाही तर मी कार्बन डायऑक्साइड स्वतःकडे घेऊन तुम्हाला जीवनावश्यक स्वछ ऑक्सिजन देत असतो. वातावरणामधील कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण कमी झाले नाहीतर जागतिक पातळीवर तापमान वाढीच्या समस्येला समोर जावे लागेल.
मी नेहमी तुमच्या मदतीसाठी तयार असतो. मी मातीला घट्ट पकडून ठेवतो त्यामुळे मातीची होणारी धूप कमी होते. मित्रांनो महत्त्वाचे म्हणजे माझ्यामुळे आणि माझ्या आजूबाजूच्या झाडांमध्ये औषधी गुणधर्म असल्यामुळे कितीतरी आजारांवर, रोगांवर औषधे उपलब्ध होतात. झाडे लावा झाडे जगवा अशा घोषणा ऐकल्या मला तुमचा खूप अभिमान वाटतो. माझी काळजी घेण्यासाठी अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. शाळांमध्ये आणि कॉलेजमध्ये वृक्षारोपणाचे अनेक कार्यक्रम घेतले जातात. सरकार झाडे वाढवण्यासाठी नवनवीन उपक्रम राबवतात हे पाहून मला खूप आनंद वाटतो.
लहान मुले आवडीने माझ्या आजूबाजूला झाडे लावतात. आम्ही झाडे तर सर्वांच्या मदतीला येतो मग आम्हाला का तोडले जाते? विकास करणे गरजेचे आहे पण आमचे अस्तित्व टिकणे सुद्धा तेवढेच गरजेचे आहे. आम्हाला तोडून कंपन्या, रोड मॉल तयार करून विकास तर होतोय पण आमची संख्यासुद्धा कमी होत आहे. झाडांवर खूप सारे प्राणी, पक्षी यांचे जीवन अवलंबून आहे. कंपन्यांची संख्या वाढत असल्यामुळे जंगल नष्ट होत आहे. त्यामुळे प्राण्यांचे जीवन अवघड होतं आहे. माझ्या फांद्यांवर अनेक पक्षी घरटी बांधून विश्रांती घेत असतात. परंतु त्या फांद्या तोडल्यामुळे पक्ष्याची घरटी नाहीशी होतात. आम्ही झाडे तुम्हाला ऑक्सिजन, औषधे देतो तरीही वृक्षतोड केली जाते. खूप कुटुंबाचा उदरनिर्वाह आमच्यामुळे होतो. माझी फळे विक्रीसाठी घेऊन जातात व त्यातून येणाऱ्या पैश्यामध्ये आपला उदरनिर्वाह केला जातो.
अनेक सुशोभीकरणाच्या वस्तू माझ्यापासून तयार केल्या जातात. आम्ही पाऊस पाडण्यासाठी पोषक वातावरण तयार करण्यास मदत करतो.
अलीकडे काही गोष्टी पाहून मला आनंद होतो. काही लोक वृक्षतोड होत असेन तरी ती होऊन देत नाहीत, वृक्षतोडीस विरोध करतात. कारण वृक्षतोडीमुळे होणारे नुकसान मनुष्याला समजले आहे. तुम्हाला जीवनावश्यक ऑक्सिजन मिळतो. भरपूर लोकांचा उदरनिर्वाह होतो. प्राणी पक्षी माझ्या मध्ये स्वतःचे घरटे बांधून विसावा घेतात. माझी फळे, फुले विकून तुम्ही सर्वजण तुमचा उदारनिर्वाह करता म्हणून मला वाटते की तुम्हीही माझी काळजी घेतली पाहिजे.
तुम्ही सर्वांनी वृक्षारोपण केले पाहिजे. शाळांमध्ये, कॉलेजमध्ये रस्त्यांच्या कडेला झाडे लावली पाहिजे. मला भीती वाटते की मला तोडून टाकले जाईल पण तरीही मी तुमच्या उपयोगी पडेल. मी माझे कर्तव्य नेहमी करत राहील तसेच तुम्हीही तुमचे कर्तव्य करत राहा.
COMMENTS