वस्तू ( कविता) मराठी कुमारभारती इयत्ता : 10 वी. Vastu (kavita) Marathi Kumarabharati Class: 10th
द. भा. धामणस्कर (१९६०) : प्रसिद्ध कवी. भावोत्कटता, चिंंतनशीलता व प्रांजळपणा यांंमुळे धामणस्कर यांंच्या कविता वाचकांच्या मनाला स्पर्श करतात. सामाजिक तणावांमुळे आलेली अस्वस्थता व्यक्त करताना संवेदनक्षम मनाला येणारी व्याकूळता आणि अभिव्यक्तीतील संयम ही त्यांच्या कवितेची वैशिष्ट्ये होत. त्यांची कविता १९८० साली प्रथम ‘कविता दशकाची’ या संग्रहातून ठसठशीतपणे वाचकांच्या परिचयाची झाली. ‘प्राक्तनाचे संदर्भ ’ व ‘बरेच काही उगवून आलेले’ हे त्यांचे कविता संग्रह प्रकाशित आहेत. ही कविता मुक्तछंद या प्रकारातील आहे. कोणत्याही निर्जीव वस्तूशी मानवी भावना जोडली गेली, की ती वस्तू अनमोल ठरते. वस्तू माणसाला दीर्घ काळ साथ देतात. व्यक्ती आणि वस्तू यांंच्यामध्ये एक अतूट नाते तयार होते. त्यामुळेच थोर व्यक्तींच्या वापरातील वस्तू पुढे संग्रहालयात जतन केल्या जातात. वस्तूंनाही भावना असतात, हे समजून वस्तू वापराव्यात. वस्तूंशी निगडित स्नेह जपावा, ही भावना कवितेतून व्यक्त होते. |
प्रस्तुत कवितेत आपण श्री. द. भा. धामणस्कर यांच्या वस्तू या कवितेचे अध्ययन करणार आहोत. संवेदनशीलतेची जाणीव करून देणारी ही कविता आपल्याला भूतकाळात घेऊन जाते. जसे की लहानपणापासून आपण ज्या ज्या खेळण्यांशी खेळलो तसेच ज्या वस्तूचा वापर केला त्या सर्व वस्तू आपणास कवितेच्या निमित्ताने आठवतील. अडगळीत टाकलेल्या त्या वस्तू पुन्हा एकदा पाहाण्याची ओढ निर्माण होईल. प्रस्तुत कविता निर्जिव वस्तुत असलेल्या सजीवतेची जाणीव करून देते, त्या जाणिवेने आपण निर्जिव वस्तू बाबत तर जागृत होतोच परंतु सजीव घटकाबद्दलही तितकाच विचार करू लागतो.
: कवितेच्या आशयाचे आकलन करून घेताना : |
१) निर्जिव वस्तूनांही संवेदना असतात याची जाणीव व्हावी.
२) सजीव घटकांबद्दल जो विचार करतो तसाच वस्तूबाबतही करावा.
३) हाताळताना त्यांचा आदर राखावा तर निरोप देताना त्यांचा यथोचित सन्मान करावा.
४) मुक्तछंद या वृत प्रकारची ओळख करून घ्यावी.
५) वस्तूनाही भावना असतात, त्या माणसाप्रमाणे चालतात बोलतात कृती करतात ही वैशिष्ट्ये असणाऱ्या चेतनागुणोक्ती अलंकारांची ओळख व्हावी.
६) कवितेत आलेले उत्कट सर्वार्थ सूचित करणारे शब्द त्यांची आशयाला समर्पक अशी केलेली निवड.
: भावार्थ : |
वस्तुना जीव नसतो असे समजुन आपण त्यांना कसेही वापरतो, कुठेही ठेवतो. कवीला हे मान्य नाही. कवी म्हणतात वस्तूना मन आहे, असे समजुन आपण इतर सजीव घटकाप्रमाणे वागलो तर त्यांना तितकाच आनंद होईल, जितका सजीव घटकांना होतो. ज्याप्रमाणे आपला सेवक आपण सांगेल ती कामे करतो, त्याचप्रमाणे आपण आपल्या वस्तूकडूनही करवून घेत असतो. म्हणून सेवकाला ज्याप्रमाणे आपण सन्माने वागवतो त्याचप्रमाणे वस्तूनांही वागवावे. सेवकाला आपण स्वतंत्र खोली देतो, वस्तूला ती अपेक्षित नसते, तिच्या ठरलेल्या जागेवर तिला ठेवावी.( घेतलेली वस्तू जागेवर ठेवायची सवय यामुळे लागते.) तिची जागा बदलता कामा नये याची खात्री तिला असली पाहिजे. ( त्याचा फायदा आपल्यालाच होतो, पुढच्या वेळेस लवकर सापडते)
आपणास ज्याप्रमाणे स्वच्छ राहण्याची सवय असते तशी वस्तूंंना असते.( झाडांना पाणी घालतो,प्राण्यांना पाणी पाजतो) वस्तूही पाणी मागतात ही जाणीव आपणास असली की ती सवय आपोआपच हाताला लागते.ज्याप्रमाणे आपण आपल्या मुलांचे लाड पुरवतो.त्यांना हवे ते देतो, कारण आपला वसा आणि वारसा ते चालवणार असतात. आपण केलेले प्रेम, आपण केलेले लाड ते आठवणीत ठेवतील असे आपल्याला वाटत असते, परंतु वस्तुही तितकाच आपला स्नेह जपून ठेवत असतात. (यासाठी थोर व्यक्तीच्या वस्तू संग्रहीत केलेल्या असतात) अंतिम क्षणी माणसास सुध्दा आपल्या हक्काच्या घरात राहून देत नाही, मग वस्तूला कसे ठेवतील. हरकत नाही, परंतु माणसाला जसा सन्मानाने निरोप देतो तसाच वस्तूलाही द्यावा. त्या वस्तूने आपली जी सेवा केलेली असते. ती कृतज्ञता आपण त्या द्वारे व्यक्त करायची असते.
: कवितेतील वाक्प्रचार व त्यांचे अर्थ : |
- जीव नसणे : प्राण नसणे, अचेतन असणे.
- मान देणे : आदर करणे, सन्मान देणे.
- हमी देणे : आश्वासन देणे.
- लाडावून ठेवणे : सतत कौतुक करणे.
- आयुष्य संपणे : मरण येणे.
- शाबूत ठेवणे : जपून शिल्लक ठेवणे.
: कविता समजावून घेण्यासाठी येथे व्हिडिओ पहा : |
मार्गदर्शिका : मीनल भोळे, घाटकोपर, मुंबई. |
स्वाध्याय
(अ ) वस्तूंना जपावे आणि त्यांचे लाडही करावेत, कारण नंतरच्या काळातही त्या आपला स्नेह जिवंत ठेवणार आहेत.
(आ ) वस्तूंना हक्काच्या घरात राहू दिले जात नाही; कारण त्यांचे आयुष्य संपते.
(३) काव्यसौंदर्य :
(१) वस्तूंनाही असते आवड तुमचा दृष्टिकोन सांगा. स्वच्छ राहण्याची’ याबाबतचा तुमचा दृष्टिकोन सांगा.
उत्तर : द. भा. धामणस्कर यांनी वस्तू या कवितेमध्ये वस्तूंना कसे हाताळावे व जोपासावे याचा वस्तुपाठ देताना वस्तूंचे मानवीकरण केले आहे. बरीच माणसे वस्तूंना सजीव समजत नाहीत. त्यांनाही भावना असू शकतात. हे लक्षात घेत नाहीत. कवी म्हणतात की, त्यांनाही जीव आहे, मन आहे, असे आपण समजून त्यांच्याशी वागलो तर वस्तूता परमानंद होतो. वस्तूंना कसेही हाताळू नये. त्यांना एखादया लहान मुलांसारखे लाडावून मायेने हाताळावे. हाताळताना आपले अस्वच्छ हात लावू नयेत. कारण वस्तूंनाही स्वच्छतेची आवड असते. महात्मा गांपोंचे वचन आहे की स्वच्छता हा परमेश्वर आहे’, म्हणून केवळ माणसाने स्वच्छ राहावे असे नाही. आपण ज्या वस्तू वापरतो, त्यांनाही स्वच्छ राखता आले पाहिजे. वस्तूंना असते आवड स्वच्छ राहण्याची’ या ओळीतून माणसाला वस्तू हाताळण्याचा निकोप दृष्टिकोन दिलेला आहे.
(२) एखादी वस्तू बिघडल्यामुळे तुमची कशी फजिती झाली, याचे वर्णन लिहा.
नमुना उत्तर : माझे दप्तर खूप छान आहे. मला ते खूप आवडते. पाठीवर त्याला घेऊन शाळेत मिरवत मिरवत जाण्यात एक वेगळा आनंद आहे. मी माझ्या दप्तराचे खूप लाड करतो. त्याला दर रविवारी धुतो, स्वच्छ करतो. पण एकदा काय झाले! गृहपाठ खूप असल्यामुळे माझ्या दप्तरात मी सर्व पुस्तके, वह्या कोंबल्या. त्यात खाऊचा डबा व पाण्याची बाटली ठेवली, त्यामुळे दप्तर जड झाले व फुगले होते. तसेच ते मी पाठीवर मारून रस्त्याने ऐटीत चालू लागलो. थोड्या वेळाने कोप्यात ते फाटले व त्यातून बऱ्याच वस्तू हळूहळू टपटपत खाली पडल्या. दहा-बारा पावले पुढे गेल्यावर मला कळले. मी परत फिरलो नि पुस्तके-वया गोळा करीत मागे आलो. रस्त्यावरची मंडळी मला हसत होती. माझी फजिती झाली. पण त्यातून मी घडा शिकलो की दप्तर असले म्हणून काय झाले? त्यालाही जीव आहे. किती पेलणार ते ओझे! मी दप्तराची क्षमा मागितली व पुन्हा असे होणार नाही, याची दक्षता घेतली. दप्तरावरचे माझे प्रेम खूप वाढले.
(३) तुमचा वर्गमित्र वर्गखोली/शालेय परिसरातील वस्तूंचे नुकसान करीत आहे. या प्रसंगी तुम्ही काय कराल, ते सांगा.
नमुना उत्तर : आमच्या शाळेच्या गेटपासून शाळेच्या मुख्य इमारतीपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा फुलझाडांच्या कुंड्या रांगेने लावलेल्या आहेत. स मित्र रमेश खूप खोडसाळ आहे. एकदा शाळेत शिरताना त्यान मुद्दाम एका कुंडीला लाथ मारून खाली पाडली. आतील फुलरोपासहित मातो विखुरली गेली. मी सोवतच होतो. मी त्याला या कृत्याबद्दल विचारले.तेव्हा ते चुकून झाले असे सांगितले. पण मला माहीत होते, त्याने ते मुद्दामहून केले आहे. मी त्याला समजावले ठीक आहे. तू चुकून लाथ लागली म्हणतोस ना! मग आता आपण ती नीट उचलून ठेवू! तो मानेना. तो पुढे जाऊ लागला तेव्हा मी त्याला या कुंड्या शाळेने फक्त शोभेसाठी लावलेल्या नाहीत. विदघार्थ्यांना शाळेत येताना प्रसन्न वाटावे, हाही त्यामध्ये चांगला हेतू आहे. तसेच शास्त्रात आपण शिकलो की दिवसा झाडे प्राणवायू सोडतात व कार्बन डायऑक्साइड घेतात. हा प्राणवायू आपल्याला मिळतो. शिवाय फुलांचे विविध रंग आपल्या डोळ्यांना सुखावतात- असे समजावून सांगितले तो मला ‘सॉरी’ म्हणाला व निमूटपणे आम्ही दोघांनी कुंडी जशी होती तशी करून ठेवली.
: काव्यपंक्तींंचे रसग्रहण : |
प्रश्न. पुढील ओळींचे रसग्रहण तुमच्या शब्दांत लिहा :
‘वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण ते
असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात.’
उत्तर : आशयसौंदर्य : ‘वस्तू’ या कवितेत कवी द. भा. धामणस्कर यांनी निर्जीव वस्तूंनाही सजीव प्राणिमात्रांसारख्या भावना असतात, त्या संवेदनशील असतात, हे बिंबवले आहे. तसेच वस्तूंना सहानुभूतीने समजून घ्यायला हवे व त्यांना प्रेमाने वागवायला हवे, असे प्रतिपादन केले आहे.
काव्यसौंदर्य : बहुतेक माणसे वस्तूंना निर्जीव समजतात व त्यांच्याशी निर्दयतेने वागतात. त्यांना कसेही हाताळतात. माणसांच्या या कठोर कृत्यावर भाष्य करताना वरील ओळींत कवी म्हणतात की कदाचित वस्तूंना जीव नसेलही आणि मनही नसेल, म्हणून त्यांना आपण कठोरपणे वागवावे का? वस्तूंना मन आहे, असे समजून जर त्यांच्याशी आपण चांगले वर्तन केले तर वस्तूंना खूप आनंद होतो. त्या सुखावतात. आपल्या कुटुंबातील त्या घटक आहेत, अशी आपुलकी आपण दाखवली तर वस्तूही आपल्याला प्रेम व माया देतील.
भाषिक सौंदर्य : मुक्तशैलीतल्या या रचनेमुळे कवींनी या ओळीतून रसिकांशी थेट संवाद साधला आहे. अगदी साध्या पण आवाहक शब्दांत मोठे तत्त्व बिंबवले आहे. वस्तू व माणूस यांतील स्नेहबंध आत्मीयतेने जपायला हवा, हा संदेश अगदी हळूवार पद्धतीने कवींनी दिला आहे.
मराठी कुमारभारती इयत्ता : दहावी |
बोलतो मराठी... – डॉ.नीलिमा गुंडी
आजी : कुटुंबाचं आगळ -प्रा.महेंद्र कदम
उत्तमलक्षण ( संतकाव्य ) -संत रामदास
बालसाहित्यिका : गिरिजा कीर ( स्थूलवाचन ) -डॉ.विजया वाड
वस्तू ( कविता ) - द.भा.धामणस्कर
गवताचे पाते - वि.स.खांडेकर
वाट पाहताना - अरुणा ढेरे
:दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा : |
कृतिपत्रिकेत खालील मुद्द्यांच्या आधारे कोणत्याही एका कवितेसंबधी कृती सोडवा. अशी ०४ गुणांची कृती विचारली जाते.
कविता : वस्तू
( कवितेतील कोणत्याही दोन ओळी दिल्या जातील त्याचा फक्त सरळ अर्थ लिहावा.)
(८) कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे : ही कविता सुंदर आहे. आधुनिक जगात वावरणाऱ्या कोणालाही ही कविता आवडेल अशी आहे. एक वेगळाच चाकोरीबाहेरचा विचार कवींनी या कवितेतून मांडला आहे. सहसा आपण वस्तू आणि ती वापरणारा माणूस यांना वेगळे वेगळे मानतो. वापरकर्त्या व्यक्तीच्या मनाप्रमाणे वस्तूचे स्वरूप घडते. म्हणजे वस्तूवरून वापरकर्त्याचे मन कळते. आपण वस्तूशी प्रेमाने वागतो. स्वतःशीच प्रेमाने वागत असतो, असा वेगळा नावीन्यपूर्ण भाव या कवितेतून व्यक्त होतो. म्हणून ही कविता मला आवडते.
वरीलपैंंकी कोणत्याही ०४ गुणांसाठी कृती विचारल्या जातील. प्रत्येक कृती १ किंवा २ गुणांसाठी असेल. |
letter writing in marathi पत्रलेखन | उपयोजित लेखन | मराठी |इयत्ता दहावी
batmi lekhan in marathi बातमी लेखन मराठी इयत्ता दहावी
Saransh Lekhan In Marathi | उपयोजित लेखन - सारांश लेखन | मराठी
जाहिरात लेखन मराठी 9वी व 10वी marathi jahirat lekhan
आमचा Whats App व Telegram Group ग्रुप जॉईन करा आणि शैक्षणिक व इतर नवीन माहिती लवकर प्राप्त करा.
![]() |
️▶️️▶️️▶️⚫⚫धन्यवाद⚫⚫◀️◀️◀️
Greetings! Very helpful advice in this particular post!
It is the littlle changes that make the largest changes.
Thanks a lot for sharing! https://online-Casino-47.webselfsite.net/