[t4b-ticker]
मराठी वाक्प्रचार व त्यांचे अर्थ इयत्ता दहावी
Vakprachar with Meaning in Marathi Std 10
💥वाक्प्रचार म्हणजे काय ? 💥
भाषेमध्ये काही शब्द किंवा शब्दसमूह असे असतात की, त्यांचा नेहमीचा प्रचलित अर्थ न राहता, त्यांना वेगळाच प्राप्त झालेला असतो, त्यांना वाक्प्रचार म्हणतात.
उदाहरणार्थ,
(१) पाण्यात पाहणे :
प्रचलित अर्थ – पाण्यात डोकावून पाहणे.
वेगळा अर्थ – द्वेष करणे.
(२) कान पिळणे –
प्रचलित अर्थ – ‘कान’ हा अवयव पिळणे.
वेगळा अर्थ – शिक्षा करणे, अद्दल घडवणे.
vakprachar-in-marathi
💥भाषाभ्यास : वाक्प्रचार 💥 |
विद्यार्थी मित्रांनो इयत्ता दहावी मराठी कुमारभारती या विषयाच्या कृतीपत्रिकेत भाषाभ्यास या विभागात व्याकरण घटकावर आधारित कृती मध्ये वाक्प्रचार हे ०४ गुणांसाठी विचारले जाते. वाक्प्रचारांचा जर आपल्याला अर्थ माहीत असेल तर सहज त्या वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग करता येतो. म्हणून खालील प्रमाणे इयत्ता दहावी मराठी कुमारभारती पाठ्यपुस्तकातील पाठानुसार वाक्प्रचार व त्यांचे अर्थ दिले आहे. त्यांचा स्वतःच्या भाषेत वाक्यात उपयोग करण्याचा प्रयत्न करा..
|
(i) कपाळाला आठ्या पाडणे – नाराजी व्यक्त करणे.
वाक्य : कुठलेही काम सांगितले की विजय कपाळाला आठ्या पाडत असे.
(ii) डोळ्यांतले पाणी पुसणे – अश्रू पुसणे, सांत्वन करणे.
वाक्य : दुःखितांच्या डोळ्यांतले पाणी पुसणे, हीच खरी समाजसेवा होय.
(iii) वाया जाणे – फुकट जाणे.
वाक्य : अवकाळी पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांची मेहनत वाया गेली.
(iv) आनंद गगनात न मावणे : खूप आनंद होणे.
वाक्य : विजयला वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाल्यामुळे त्याच्या आईबाबांचा आनंद गगनात मावला नाही.
💥पाठानुसार वाक्प्रचार व त्यांचे अर्थ पाहण्यासाठी येथे क्लिक करा 💥 |
आमचा Whats App व Telegram Group ग्रुप जॉईन करा आणि शैक्षणिक व इतर नवीन माहिती लवकर प्राप्त करा.
![]() |
️▶️️▶️️▶️⚫⚫धन्यवाद⚫⚫◀️◀️◀️
Nice App
Thanks
Nice website
Good to study