Home १० वी बालभारती उत्तमलक्षण /स्पष्टीकरण/ स्वाध्याय इयत्ता दहावी । Uttam lakshan marathi 10th class swadhyay...

उत्तमलक्षण /स्पष्टीकरण/ स्वाध्याय इयत्ता दहावी । Uttam lakshan marathi 10th class swadhyay iyatta dahavi

4
उत्तमलक्षण
.

४. उत्तमलक्षण

                                                      संत रामदास (१६०८ ते १६८२) :
संतकवी. संत रामदासांच्या काव्याची ठळक वैशिष्ट्ये म्हणजे त्यातील सामाजिक जाणीव. समाजाच्या नैतिक आणि आध्यात्मिक उन्नतीविषयी अखंड जागरूकता आणि अतीव तळमळ संत रामदास यांच्या काव्यात आढळते. आध्यात्मिक विचारांचे प्रतिपादन करणारे टीकाग्रंथ, स्फुट प्रकरणे, आख्यानकाव्ये, करुणाष्टके, उपदेशपर रचना, अभंग, पदे, भूपाळ्या, आरत्या, स्तोत्रे असे विविध प्रकारचे वाङ्मय त्यांनी निर्माण केले. ‘दासबोध’ ही त्यांची संपूर्ण स्वतंत्र कृती असून त्यातून त्यांचा व्यासंग, चिंतन, समाजाचे व जनरीतीचे त्यांनी केलेले सूक्ष्म अवलोकन प्रत्ययाला येते. ‘मनाचे श्लोक’ हे त्यांचे अत्यंत लोकप्रिय आणि सर्वतोमुखी असणारे काव्य आहे.
संत रामदास यांनी या रचनेत आदर्श व्यक्ती ची लक्षणे सांगि तली आहेत. आदर्शत्वाची संकल्पना स्पष्ट करताना त्यांनी ‘काय करावे’ आणि ‘काय करू नये’ याबाबत मार्गदर्शन केले आहे. सत्याचा मार्ग स्वीकारावा, विवेकाने वागावे, कीर्ती वाढवावी असा संदेश या रचनेतून संत रामदास देतात.

.

श्रोतीं व्हावें सावधान । आतां सांगतों उत्तम गुण ।
जेणें करितां बाणे खुण  । सर्वज्ञपणाची ।।१।।

वाट पुसल्याविण जाऊं नये । फळ ओळखिल्याविण खाऊं नये ।
पडिली वस्तु घेऊं नये । येकायेकीं ।।२।।

जनींआर्जव तोडूं नये । पापद्रव्य जोडूं नये ।
पुण्यमार्ग सोडूं नये । कदाकाळीं ।।३।।

तोंडाळासीं भांडों नये । वाचाळासीं तंडों नये ।
संतसंग खंडूं नये । अंतर्यामीं ।।४।।

आळसें सुख मानूं नये । चाहाडी मनास आणूं नये ।
शोधिल्याविण करूं नये । कार्य कांही ।।५।।

सभेमध्यें लाजों नये । बाष्कळपणें बोलों नये ।
पैज होड घालूं नये । कांहीं केल्या ।।६।।

कोणाचा उपकार घेऊं नये । घेतला तरी राखों नये ।
परपीडा करूं नये । विश्वासघात ।।७।।

व्यापकपण सांडूं नये । पराधेन होऊं नये ।
आपलें वोझें घालूं नये । कोणीयेकासी ।।८।।

सत्यमार्ग सांडूं नये । असत्य पंथें जाऊं नये ।
कदा अभिमान घेऊं नये । असत्याचा ।।९।।

अपकीर्ति ते सांडावी । सत्कीर्ति वाडवावी ।
विवेकें दृढ धरावी । वाट सत्याची ।।१०।।

    (श्रीदासबोध-दशक द्वितीय,समास दुसरा,’उत्तमलक्षण’)

.

 वितेचा भावार्थ 

श्रीदासबोध या ग्रंथातून घेतलेल्या रचनेत समर्थ रामदास यांनी आदर्श व्यक्तीची लक्षणे सांगितली आहे.व्यक्तीने जीवनात वागताना काय करू नये, हे सांगताना त्याने सत्याच्या मार्गावर चालावे, विवेकपूर्ण वागावे व स्वतःचे कल्याण करावे असा संदेश दिला आहे.

 उत्तम पुरुषाची (आदर्श व्यक्तीची) लक्षणे सांगताना संत रामदास श्रोत्यांना म्हणतात –
श्रोतेहो, तुम्हांला आता मी उत्तम, गुणवान व्यक्तीची लक्षणे सांगतो, ती सावध मनाने ऐकावीत. ही लक्षणे ऐकून तुम्ही सर्व गोष्टी जाणण्याची खूण अंगी बाणवावी. || १ ।।
पूर्ण माहिती असल्याशिवाय कुठल्याही रस्त्याने जाऊ नये वाटेमधील अडथळे जाणून घेतल्याशिवाय प्रवास करू नये फळाचे अंतरंग (गुण) ओळखल्याशिवाय ते खाऊ नये रस्त्यात पडलेली वस्तू अचानक पटकन उचलू नये. || २ ।।
लोकांनी केलेली विनंती लक्षात घ्यावी तिला अमान्य करू नये पाप किंवा कपट करून मिळवलेल्या संपत्तीचा साठा करू नये. कपट करुन पैसा मिळवू नये पुण्याचा मार्ग म्हणजे सच्छील मार्ग, सद्वर्तन कधीही सोडू नये ।।३।।
जी तोंडाळ, भांडकुदळ व्यक्ती असेल, त्या व्यक्तीशी कधीही भांडू नये व्यर्थ बडबड करणाऱ्या वाचाळ माणसाशी तंटा करू नये सज्जनाची संगत कधी मध्येच सोडू नये, (हे कायम मनात ठेवा.) मनापासून झालेली संतांची मैत्री सोडू नये. ॥४ ॥
काम न करता ऐदीपणे, आळस करून आनंद घेऊ नये. आळसात सुख नसते. ते कुणाबद्दल उखाळ्यापाखाळ्या करून चहाडी करू नये. दुसऱ्या बद्दल खोटेनाटे बोलणे मनातही आणू नये संपूर्ण शोध घेतल्याशिवाय कोणतेही ते काम करू नये. (काम अर्धवट सोडू नये ) ।।५ ॥
सभेमध्ये, समूहाच्या बैठकीमध्ये लाजू नये, मुखदुर्बळ राहू नये मोकळ्या मनाने बोलावे परंतु बालिशपणे बोलू नये. बाष्कळ बडबड करू नये. कोणत्याही प्रकारची पैज, शर्यत लावू नये कुणाशीही स्पर्धा करू नये ॥ ६॥
कोणाचे उपकार सहसा घेऊ नयेत आणि घेतलेच तर त्यांची लगेच परतफेड करावी. उपकारातून लवकर उतराई व्हावे. दुसऱ्यांना दुः ख देऊ नये त्यांना व्यथित करू नये. कुणाचा विश्वासघात किंवा बेइमानी मुळीच करू नये. ॥७ ॥
स्वत:च्या मनाचा मोठेपणा कधी सोडून देऊ नये. मन कोते करू नये, ते व्यापक ठेवावे. परावलंबी होऊ नये कुणावरी आपल्या आयुष्युयाचे ओझे लादू नये. ॥८।।
सत्याचा मार्ग कधी सोडू नये. खरेपणाने वागावे. असत्याच्या, खोटेपणाच्या मार्गाने जाऊ नये. खोटारडेपणा करून वागू नये. खोटेपणाचा कधीही वृथा अभिमान,व्यर्थ गर्व करू नये.॥९।।
कधीही अपकीर्ती होऊ देऊ नये, सत्कीर्ती वाढवावी, विवेकाने नेहमी ठामपणे सत्याचीच वाट धरावी. ॥१०।।

.

कवितेचा भावार्थ समजावून घेण्यासाठी येथे व्हिडीओ पहा.

मार्गदर्शक : श्री.बाबुराव कांबळे ,
                      कोल्हापूर.

.

उत्तमलक्षण  या कवितेवर आधारित सोडवलेला स्वाध्याय पाहण्यासाठी येथे क्लिक करा.👇👇
  Link Click GIF by Buzzstock

मराठी
कुमारभारती
इयत्ता : दहावी
बोलतो मराठी...  – डॉ.नीलिमा गुंडी 
आजी : कुटुंबाचं आगळ  -प्रा.महेंद्र कदम 
उत्तमलक्षण ( संतकाव्य ) -संत रामदास 
बालसाहित्यिका : गिरिजा कीर ( स्थूलवाचन ) -डॉ.विजया वाड
वस्तू ( कविता )  - द.भा.धामणस्कर 
गवताचे पाते   - वि.स.खांडेकर
  1. Sustainable Chemistry | Sustainable Chemistry conferences 2019 | Environmental conferences | UK | Worldwide Events | Europe | Asia | Middle East | 2019 | 2020

    आमचा  Whats App व Telegram Group ग्रुप जॉईन करा आणि शैक्षणिक व इतर  नवीन माहिती लवकर प्राप्त करा.

    ️▶️️▶️️▶️⚫⚫धन्यवाद⚫⚫◀️◀️◀️

 

Previous articleआजी : कुटुंबाचं आगळ मराठी : कुमारभारती इयत्ता १० वी aaji kutumbacha aagal
Next articleडॉ सर्वपल्ली राधाकृष्णन | Dr Sarvepalli Radhakrishnan
Email: marathistudymaterial@gmail.com

4 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here