|
|
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे १ मार्फत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्याथ्र्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) इ. ८ वी साठी परीक्षेचे आयोजन बुधवार दिनांक २१ डिसेंबर २०२२ रोजी करण्यात आले आहे. सदर परीक्षेसाठी प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे दिनांक १२.१२.२०१२ रोजी पासून परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. |
|
याबाबतचे प्रसिध्दी निवेदनाची प्रत सोबत जोडलेली आहे. महाराष्ट्रातील प्रज्ञावान विद्यार्थी शोधण्याच्या दृष्टीने या परीक्षेचे महत्व अनन्यसाधारण असे आहे, असे परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहेे. राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) इ. ८ वी साठी परीक्षा दिनांक २१ डिसेंबर २०२२ महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे- १ मार्फत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) इ. ८ वी साठी परीक्षेचे आयोजन बुधवार दिनांक २१ डिसेंबर २०२२ रोजी करण्यात आले आहे. ही परीक्षा महाराष्ट्रात एकूण ५६३ केंद्रावर घेण्यात येणार असून, सदर परीक्षेसाठी महाराष्ट्रातून एकूण १९३४६ शाळा व एकूण १९६७५० विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आलेली आहे. परीक्षेसाठी प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे परिषदेच्या संकेतस्थळावर शाळांना शाळा लॉगिनवर दिनांक १२ डिसेंबर २०२२ पासून उपलब्ध करुन देण्यात आलेली आहेत. सदर प्रवेशपत्रे विद्यार्थ्यांस उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांची असेल. सदर प्रवेशपत्रात विद्यार्थ्याचे नाव, वडीलांचे नाव, आडनाव, आईचे नाव यामधील स्पेलिंग दुरुस्ती असल्यास (कोणत्याही परिस्थितीत पूर्ण नावात बदल केला जाणार नाही.) तसेच जन्मतारीख, जात, आधारकार्ड इत्यादीमध्ये दुरुस्ती असल्यास सदर दुरुस्ती करण्यासाठी दिनांक २०.१२.२०२२ पर्यंत संबंधित शाळेच्या लॉगिनमध्ये ऑनलाईन अर्ज उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. ऑनलाईन आलेल्या अर्जा व्यतिरिक्त कोणत्याही पद्धतीने पाठविलेल्या दुरुस्त्या (टपाल, समक्ष अथवा ईमेलद्वारे) तसेच विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या दुरुस्त्या / अर्जाचा विचार केला जाणार नाही. सदरच्या दुरुस्त्या परीक्षा झाल्यानंतर करण्यात येणार आहेत. |
२१ डिसेंबर २०२२ रोजी घेण्यात येणाऱ्या NMMS परीक्षेची प्रवेशपत्रे शाळा लॉगिन वर उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत, तसेच विद्यार्थ्यांच्या फॉर्म मधील दुरुस्ती असल्यास संबंधित शाळेच्या लॉगिन मध्ये ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. |
NMMS Online Practice Question Paper (MAT)