Home एम.एस. बोर्ड SSC / HSC Board Syllabus From Class First To Class Twelve Reduced

Syllabus From Class First To Class Twelve Reduced

0
Syllabus R

शिक्षण विभागाचा झालेला निर्णय ! 
इ. १ ली ते १२ वी च्या अभ्यासक्रमात २५ टक्के कपात

शैक्षणिक वर्ष २०२१-२२ साठी वर्ग 1ली ते इयत्ता 12 वी  पाठ्यक्रम २५ % कमी झाले बाबत

2021 -2022 या शैक्षणिक वर्षासाठी 25 % कमी केलेला अभ्यासक्रम...


मार्च २०२० पासून कोविड १९ या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव संपूर्ण जगामध्ये झालेला आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य शासनाने वेळोवेळी दिलेल्या आदेशानुसार मार्च २०२० पासून राज्यामध्ये सर्व शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आलेले आहेत. दरवर्षी साधारणतः जून मध्ये सर्व राज्यामध्ये शैक्षणिक वर्ष सुरु होत असते. तथापि सन २०२१-२२ मध्ये नेहमीप्रमाणे शाळा सुरु करता आलेल्या नाहीत. वेळेवर शाळा सुरु करता न आल्यामुळे विहीत वेळेत पाठ्यक्रम पूर्ण करणेबाबत समस्या निर्माण होऊ शकते. त्याअनुषंगाने राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांचा इयत्ता १ ली ते १२ वी चा पाठ्यक्रम सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षाकरिता कमी करणेबाबतची बाब शासनाच्या विचाराधीन होती.


शासन निर्णय:
कोविड १९ या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव सद्य परिस्थितीतही कमी झालेला दिसून येत नाही. या अनुषंगाने सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षाकरिता इयत्ता १ ली ते इयत्ता १२ वी चा २५ % पाठ्यक्रम कमी करण्यात आला होता. सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षाकरिता सुद्धा सन २०२०-२१ प्रमाणे २५% पाठ्यक्रम कमी करण्यास याद्वारे शासन मान्यता देण्यात येत आहे.
सदर कमी केलेल्या पाठ्यक्रमाची यादी संचालक, राज्य शैक्षणिक व संशोधन परिषद, महाराष्ट्र, पुणे यांनी त्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी तसेच याबाबत शाळांना, विद्यार्थ्यांना तसेच पालकांना अवगत होण्यासाठी आवश्यक प्रसिध्दी द्यावी.

Syllabus RSyllabus


R-3R 4


अभ्यासक्रम कमी डाऊनलोड करा

अ.न. इयत्ता डाउनलोड
इ 1 ली ते 8 वी.          Download
इयत्ता 9 व  10 Download
इयत्ता 11  व 12 Download
Previous articleबातमी लेखन मराठी इयत्ता दहावी batmi lekhan in marathi 10th
Next articleबोलतो मराठी पाठ स्पष्टीकरण स्वाध्याय इयत्ता दहावी | Bolto Marathi swadhyay

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here