राज्यातील शिक्षक/मुख्याध्यापक/अध्यापकाचा र्य/प्राचार्य यांच्यासाठी वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांचेमार्फत ऑनलाईन स्वरूपामध्ये दिनांक १ जून २०२२ पासून सुरू होत आहे.
सदरचे प्रशिक्षण हे ऑनलाईन स्वरूपामध्ये राज्यातील एकूण ९४,५४१ नोंदणी केलेल्या प्रशिक्षणार्थीसाठी एकाच वेळी आयोजित करण्यात आले असून, यामध्ये राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील नोंदणीकृत प्रशिक्षणार्थी सहभागी होऊन ऑनलाईन प्रशिक्षण प्रणालीच्या माध्यमातून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र यांचे मार्फत विकसित प्रशिक्षण (ई- कोर्स) पूर्ण करून त्यावरील स्वाध्याय, चाचणी सोडवून वरिष्ठ वेतन श्रेणी / निवड श्रेणी प्रशिक्षण पूर्ण करू शकणार आहेत.
सदर ऑनलाईन प्रशिक्षण हे एकूण ५० ते ६० तासांचे असणार असून सदर प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी एकूण ३० दिवसांचा कालावधी देण्यात येईल. त्यामुळे प्रशिक्षणासाठी पात्र शिक्षक आपले प्रशिक्षण ऑनलाईन स्वरूपामध्ये एकूण ३० दिवसांच्या कालावधीमध्ये त्यांच्या उपलब्ध वेळेनुसार पूर्ण करू शकणार आहेत. सदरचे ऑनलाईन प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर पात्र प्रशिक्षणार्थ्यास त्याच ऑनलाईन
प्रशिक्षण प्रणालीच्या माध्यमातून प्रशिक्षण प्रमाणपत्र उपलब्ध होणार आहे. सदर प्रशिक्षणबाबतची सर्व माहिती दिनांक १ जून २०२२ रोजी सकाळी ११.०० वाजता
https://youtu.be/bOXSWx5NHIw या युट्यूब लाईव्ह सत्राद्वारे देण्यात येणार आहे. प्रशिक्षणार्थीनीं सदर उद्बोधन सत्रास उपस्थित रहावे.
तसेच सर्व पात्र प्रशिक्षणार्थ्यांसाठी दिनांक १ जून २०२२ पासून ३० जून २०२२ पर्यंत तांत्रिक अडचणी संदर्भात मार्गदर्शन सत्रांचे आयोजन देखील राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदे मार्फत केले जाणार आहे. याबाबतची सर्व माहिती दि. १ जून २०२२ रोजी आयोजित यु ट्यूब लाईव्ह सत्राद्वारे दिली जाणार आहे.
दि. 30 मे 2022 Updates
वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण अपडेट
वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण १ जून २०२२ पासून सुरू |मार्गदर्शक लाइव्ह सत्र
- मार्गदर्शक सत्र 1 जून रोजी
- सदर प्रशिक्षण ऑनलाईन करता येणार
- इ कोर्स व त्यावर आधारित स्वाध्याय सोडवणे
- 1 जून ते 30 जून
- 50 ते 60 तासाचे प्रशिक्षण
- 94541 शिक्षकांसाठी
- महत्त्वाची सूचना
मार्गदर्शक सत्र १ जून २०२२ रोजी सकाळी ११.०० वाजता |
निवड श्रेणी व वरिष्ठ श्रेणी प्रशिक्षणासाठी नावनोंदणी केलेल्या प्रशिक्षणार्थीचे चुकीचे ईमेल आयडी अथवा दुबार ईमेल आयडी असणाऱ्या प्रशिक्षणार्थी यांची यादी https://training.scertmaha.ac.in इथे प्रकाशित करण्यात आली आहे.
प्रशिक्षणार्थी यांनी पोर्टलवर जावून आपल्या सर्व तपशिलाची खात्री करून घ्यावी. प्रशिक्षण प्रकार बदल, गट बदल, ईमेल आय. डी दुरुस्ती याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येतआहे. प्रशिक्षणासाठी प्रशिक्षणार्थीचा ईमेल आय डी हाच लॉगिन आय डी म्हणून देण्यात येणार आहे.
निवड श्रेणी व वरिष्ठ श्रेणी प्रशिक्षण बाबत सर्व अधिकृत माहिती केवळ https://training.scertmaha.ac.in याच वेबसाईटवर उपलब्ध असेल. याची संबंधितांनी नोंद घ्यावी.