Home न्यूज पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती...

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) | Scholarship Exam 2023 Application Form Start

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी)

0

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) दि. १२ फेब्रुवारी, २०२३ रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार आहे. सदर परीक्षेची अधिसूचना परिषदेच्या www.mscepune.in व https://www.mscepuppss.in या संकेतस्थळावर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदने प्रसिध्द केली आली आहे.

त्याकरीता शाळा नोंदणी व ऑनलाईन विद्यार्थी अर्ज भरण्यासाठी दि. 16/11/२०२२ ते दि. 15/12/२०२२ या कालावधीत देण्यात आलेली आहे. कोणत्याही परिस्थितीत दि. ३१/१२/२०२२ नंतर ऑनलाईन अथवा ऑफलाईन पध्दतीने आवेदनपत्र तसेच नंतर शुल्क भरता येणार नाही, याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.


  • परीक्षा दिनांक– १२ फेब्रुवारी २०२३
  • शाळा नोंदणी व ऑनलाईन विद्यार्थी अर्ज भरण्यासाठी दिनांक- १६/११/२०२२ ते दि. १५/१२/२०२२

शिष्यवृत्ती परीक्षेचे स्वरूप :


पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या दोन्ही प्रश्नपत्रिकेतील सर्व प्रश्न वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरुपाचे असतील. प्रत्येक पेपरसाठी A, B, C, D संचाच्या प्रश्नपत्रिका देण्यात येतील.पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी) साठी उत्तरांच्या ४ पर्यायांपैकी एकच पर्याय अचूक असेल परंतु पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी) ठीच्या प्रत्येक पेपरमध्ये कमाल २०% प्रश्नांच्या बाबतीत उत्तरांच्या ४ पर्यायांपैकी दोन पर्याय अचूक असतील. ते दोन्ही पर्याय नोंदविणे बंधनकारक असेल.


शिष्यवृत्ती परीक्षेसाठी पात्रता :
१. विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा म्हणजेच पालकांचे महाराष्ट्रात किमान १५ वर्षे वास्तव्य असावे.

२. विद्यार्थी शासनमान्य शासकीय / अनुदानित / विनाअनुदानित / कायम विनाअनुदानित / स्वयंअर्थसहाय्यित शाळेत इ. ५ वी किंवा इ. ८ वी मध्ये शिकत असावा.


शाळा नोंदणी School Registration



शाळा लॉगइन School Login

शाळा नोंदणी करणे व शाळा माहिती पत्रक भरणे बाबत सूचना



आवेदनपत्र भरण्याचे वेळापत्रक

परीक्षेचे  वेळापत्रक


आमचा  Whats App व Telegram Group ग्रुप जॉईन करा आणि शैक्षणिक व इतर  नवीन माहिती लवकर प्राप्त करा.

️▶️️▶️️▶️⚫⚫धन्यवाद⚫⚫◀️◀️◀️

Previous articleपूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी ) अंतरिम निकाल
Next articleकर्ते सुधारक कर्वे पाठाचे स्पष्ठीकरण व Online Quiz

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here