Home लेखन कौशल्य Saransh Lekhan In Marathi | उपयोजित लेखन – सारांश लेखन | मराठी

Saransh Lekhan In Marathi | उपयोजित लेखन – सारांश लेखन | मराठी

2
Saransh Lekhan In Marathi
Saransh Lekhan In Marathi

[t4b-ticker]
Saransh Lekhan In Marathi | उपयोजित लेखन – सारांश लेखन | मराठी

आजच्या धकाधकीच्या युगात आपले म्हणणे मोजक्या आणि नेमक्या शब्दांत सांगणे नितांत गरजेचे बनले आहे. एखादया विस्तृत लेखनाला त्यातील संपूर्ण आशय कळेल अशा पद्धतीने संक्षिप्त स्वरूपात मांडता येणे हे महत्त्वाचे कौशल्य आहे. हे कौशल्य विकसित व्हावे, म्हणून सारांशलेखन हा घटक अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आला आहे.

सारांश

‘सारांश’ या शब्दाची फोड ‘सार+अंश’ अशी आहे. ‘सार’ म्हणजे त्या उताऱ्याचा गाभा, मुख्य विचार, मध्यवर्ती असा विचार त्या उताऱ्यातील सार अंशरूपाने मांडणे, थोडक्यात मांडणे, मूळ उताऱ्यातील मुख्य विचार, उपविचार, सारांशात यावेत, त्यात द्विरुक्ती, पाल्हाळपणा नको. मूळ विचाराचे स्पष्टीकरण, दाखले व त्याचे स्पष्टीकरण, अलंकरण वजा करून मुख्य विचार सांगता येणे ही कला आहे. मूळ लेखकाचा तो विचार सांगण्याचा हेतू आपल्याला समजणेही महत्त्वाचे आहे. सारांशलेखन करताना मूळ उतारा पुनःपुन्हा वाचणे, त्यावर विचार करणे, तो विचार पचविणे महत्त्वाचे असते.


दिलेल्या उताऱ्यातून लेखकाचे विचार थोडक्यात मुद्देसूद व आपल्या भाषेत मांडणे म्हणजे सारांश लेखन होय.

सारांश लेखनाच्या पायऱ्या

१) दिलेल्या परिच्छेदाचे वाचन,
२) परिच्छेदातील आशयाचे आकलन होणे.
३) मध्यवती विचार जाणून घेणे.
४) समजलेला विचार स्वतःच्या शब्दांत थोडक्यात मांडणे.
(टीप : कमीत कमी शब्दांत सारांश लिहिणे व त्यातून परिच्छेदातील आशयाचा पूर्ण अर्थ प्रतिबिंबित होणे महत्त्वाचे आहे.)


सारांशलेखन यामध्ये पाठयपुस्तकाबाहेरील (अपठीत) उतारा दिला जातो. उताऱ्यातील आशय विद्यार्थ्यांनी आपल्या शब्दांत मूळ उताऱ्यातील विचाराला बाधा न आणता एक तृतीयांश शब्दांत लिहायचा असतो.


सारांशलेखनासाठी सूचना 

  • सारांशलेखन करण्यापूर्वी दिलेला उतारा शांत व काळजीपूर्वक वाचावा.
  • उताऱ्यात लेखकाने कोणता विचार मांडला तो समजावून घ्या व महत्वाच्या मुद्द्यांखाली (विचार) अधोरेखित करा.
  • मूळ उताऱ्यातील अनावश्यक भाग विस्तार, उदाहरणे, म्हणी, वाक्प्रचार, आलंकारिक शब्द रचना यांना वगळण्यात यावे.
  • मुद्दे (विचार) एकत्रित करा विचारांची गुंफण करा. 
  • मुद्दयांच्या आधारे विचार शक्य तितके स्वतःच्या भाषेत मांडावेत.
  • सारांश लेखन थोडक्यात मुद्देसूद परंतु महत्वाचे या स्वरुपाचे असावे.
  • लेखकाच्या मूळ विचारांशी प्रामाणिकपणा राखावा. आपले विचार मांडू नये.
  • आपले सारांश लेखन दिलेल्या उताऱ्याच्या तिसऱ्या हिश्याइतके असावे. अगदीच मोजमाप लावू नये.
  • तुम्ही लिहीलेल्या सारांशात मूळ उताऱ्यातील सर्व मुद्दे घेणे गरजेचे आहे.
  • सारांशाला उचित योग्य असा शीर्षक द्यावा.

सारांशलेखनाचे फायदे :

सारांशलेखन हे फक्त परीक्षेतच उपयोगी असते, असे नाही तर प्रत्यक्ष जीवनातही अनेक ठिकाणी त्याचा उपयोग होत असतो.
(१) पाठ्यपुस्तकातील एखादया पाठात किंवा इतिहास-विज्ञान यांसारख्या विषयांच्या पुस्तकांतील प्रकरणात काय सांगितले आहे. हे थोडक्यात सांगता येते.

(२) वर्गात शिक्षकांनी काय शिकवले, ते थोडक्यात सांगता येते.
(३) एखादया ऐकलेल्या भाषणाचे सार सांगता येते.
(४) एखादी मालिका किंवा चित्रपट पाहिल्यावर त्याचे कथानक थोडक्यात सांगता येते.
(५) पाहिलेल्या किंवा ऐकलेल्या प्रसंगाचे थोडक्यात अचूक वर्णन करता येते.
(६) मोठेपणी कार्यालयात काम करताना अनेक कामांचे थोडक्यात अहवाल किंवा टिप्पणी लिहिता येते.

(७) आपल्या कोणत्याही अनुभवाचे संक्षिप्त वर्णन करता येते. अशा प्रकारे, सारांशलेखन हे कौशल्य आयुष्यभर वेळोवेळी उपयोगी पडते.

Saransh Lekhan In Marathi


सारांशलेखन PPT पाहण्यासाठी येथे पहा.

CLICK
CLICK

 

 नमुना कृती 
  फुले कोणाला आवडत नाहीत ? ती सर्वांनाच आवडतात. कोणाला ती पूजेसाठी हवी असतात. कोणाला ती हारतुरे, गजरे किंवा वेणीसाठी हवी असतात. पण ‘फुलांसाठी फुले’ या भावनेने त्यांच्याकडे कोणी पाहत नाही. फुले शक्यतो वेलीवर किंवा फुलझाडांवर राहू द्यावीत. ती गळून पडली तर गोळा करावीत. पारिजातकाचा सडा आपण सतत पाहतच असतो. वेलीवरची फुले कोमेजण्याची वेळ जाणून घेतली व त्यापूर्वी काही तास ती तोडली तर फुलांच्या दृष्टीने ते न्यायाचे होईल. फुलांचा विचार असा भावनात्मक पातळीवरून करू नये, असे अनेकांना वाटेल; पण फुलांची कोमलता भावनांना स्पर्श करणारी असते. फुले म्हणजे निसर्गाचे भावकाव्यच जणू!
  अशी ही फुले तशी कोणाचीच नसतात आणि तरीही ती सर्वाची असतात. रंग, रूप, गंध याची अखं उधळण करून आपले जीवन रसपूर्ण, अर्थपूर्ण, भावपूर्ण करण्याचे काम ती मृकपणे करीत राहतात. या फुलांचे उतराई व्हावे कसे ? जड वस्तूची पूजा फुलांनी करण्याऐवजी फुलांची पूजा भावनांनी केली तर ? ती अधिक फुलतील आणि जगाचे नंदनवन करतील. गावागावांत फुलांसाठी मंदिरे असावीत. घराघरात केवळ फुलांसाठी स्वतंत्र चौरंग असावा.

सारांश

फुलांसाठी फुले
  फुले सर्वांनाच आवडतात. पण ती कोणत्या तरी कारणाने आवडावी असे होता कामा नये. ती सुंदर फुले म्हणून आवडायला हवीत. फुले झाडावरून तोडू नयेत. ती कोमेजण्याच्या काही तास तोडायला हरकत नाही. ती झाडावरून गळून पडल्यावर वेचावीत. फुले रंग, रूप, गंध याची उधळण करून आपल्याला आनंद देतात. त्याबद्दल त्यांच्याशी कृतज्ञ राहिले पाहिजे. त्यांची मंदिरे उभारली पाहिजे. घरात त्यांना खास चौरंगाचे आसन असावे.

 

letter writing in marathi पत्रलेखन उपयोजित लेखन मराठी |इयत्ता दहावी
batmi lekhan in marathi बातमी लेखन मराठी इयत्ता दहावी 
Saransh Lekhan In Marathi | उपयोजित लेखन - सारांश लेखन मराठी
जाहिरात लेखन मराठी 9वी व 10वी marathi jahirat lekhan

आमचा  Whats App व Telegram Group ग्रुप जॉईन करा आणि शैक्षणिक व इतर  नवीन माहिती लवकर प्राप्त करा.
whatsapp group-1

️▶️️▶️️▶️⚫⚫धन्यवाद⚫⚫◀️◀️◀️

 

 

Previous articleLetter writing in marathi पत्रलेखन | उपयोजित लेखन | मराठी | इयत्ता दहावी |
Next articleइयत्ता दहावी | मराठी कुमारभारती | वाक्प्रचार व त्यांचे अर्थ | Vakprachar with Meaning in Marathi | iytta10 vi.
Email: marathistudymaterial@gmail.com

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here