Home लेखन कौशल्य Sanvaadlekhan in Marathi | संवाद लेखन मराठी

Sanvaadlekhan in Marathi | संवाद लेखन मराठी

0
संवाद लेखन

Sanvaadlekhan in Marathi | संवाद लेखन मराठी |उपयोजित लेखन 

दोन किंवा अधिक व्यक्ती एकत्र आल्या, की त्यांच्यामध्ये जे बोलणे किंवा भाषण होते त्याला ‘संभाषण’ असे म्हणतात. दोन माणसे सहज भेटली म्हणजे ती एकमेकांशी बोलतात. त्यांच्या बोलण्याला विशिष्ट असा विषय नसतो. एकमेकांचे कुशल विचारण्यापासून तो हवी असलेली माहिती विचारीपर्यंतचे विविध विषय त्यात येऊन जातात; पण एखाद्या निश्चित विषयावर जे संभाषण चालते त्याला ‘संवाद’ असे म्हणतात. अशा प्रकारचे संभाषण लिहून दाखविणे त्याला ‘संवादलेखन’ असे म्हणतात. संवादलेखनातं संभाषणाचे सारे गुणविशेष आढळून येतात. निबंधलेखनात मुद्देसूद विचारांची मांडणी असते; पण संभाषण ज्यावेळी चालते, त्यावेळी विशिष्ट क्रम आपण पाहात नाही. जो विचार ज्या क्रमाने सुचतो तसा तो आपण मांडतो. हे करताना भाषेत आपले विचार, त्यांना मिळणारी पृष्टी किंवा विरोध, विनोद, उपहास, टोमणे येतातच. त्यामुळे संवादलेखनाला अधिक जिवंतपणा येतो.

संवाद लेखन या घटकाचे प्रमुख उद्दिष्ट विद्यार्थ्यांना सुसंवादी बनवणे. ‘संवाद कौशल्य‘ हा प्रभावी व्यक्तिमत्त्वाचा अपरिहार्य पैलू आहे. उत्कृष्ट संवाद साधणारी व्यक्ती त्यांच्या कार्यक्षेत्रात स्वतःचे वेगळेपण सिद्ध करते. विशिष्ट विषयावर व्यक्त केलेली मतमतांतरे, त्याविषयावरचे चिंतन व विषयानुरूप सुसंगत असे संभाषण म्हणजे संवाद होय.

वाचा: अहमदनगर न्यूज 


संवादलेखन कसे असावे?

(१) संवाद हा दोन व्यक्तींमध्ये होतो. संवाद कोणा कोणात सुरू आहे, याची स्पष्ट कल्पना लेखनातून यावी. 
(२) दोन व्यक्ती एकमेकींना भेटल्या की त्यांचे बोलणे सुरू होते. त्या एकमेकींचे कुशल विचारतात, माहिती देतात, माहिती घेतात. त्या वेळी विषय-आशयाचे, वेळेचे कोणतेच बंधन नसते. आपल्या मनातील भावभावना दुसऱ्यापर्यंत पोहोचवणे आणि दुसऱ्याच्या मनातील भावभावना समजून घेणे, हेच कार्य त्या क्षणी चालू असते; दोन मने जोडली जात असतात. अशा या बोलण्याला संवाद म्हणतात.
(३) संवादांतील दोन व्यक्ती भिन्न स्तरावरील (वय, व्यवसाय, लिंग, सामाजिक व सांस्कृतिक पार्श्वभूमी) असतील तर त्यानुसार भाषा बदलती असावी.
(४) कधी कधी विशिष्ट विषयावर, विशिष्ट निर्णय घेण्यासाठी, निश्चित दिशेने निश्चित सूत्रानुसारही बोलणे होते. यालाही संवादच म्हणतात. हा संवादाचा दुसरा प्रकार आपल्या अभ्यासक्रमात अपेक्षित आहे.
(५) येथे संबंधित विषयाचा सर्व बाजूंनी विचार केलेला असावा. तसेच, बोलणाऱ्या व्यक्तीचे नाव, तिचे स्थान यांनुसार तिच्या तोंडी शोभेल अशी भाषा हवी. संवादात वाक्ये लहान, सुटसुटीत असावीत. शेवटी निष्कर्ष प्राप्त व्हावा.
(६) एकच व्यक्ती सलगपणे जास्त बोलते, असा संवाद लिहू नका. प्रतिसाद देत घेत संवाद घडला पाहिजे.
(७) तुमची स्वतःची भाषा वापरा. मात्र असभ्य वा अवमानकारकभाषा वापरू नका.
(८) कोणाचीही जात, धर्म, भाषा, प्रांत यांची टिंगलटवाळी करणारी भाषा वापरू नका.
(९) संवाद खूप विस्ताराचा नको.
(१०) केवळ ‘हो’ किंवा ‘नाही’ अशी उत्तरे येणारे संवाद नकोत.
(११) बोलणे पाल्हाळीक नको.
(१२) संवाद मुद्द्याला धरून घडला पाहिजे.
(१३) संवादातील वाक्ये सोपी, सुटसुटीत,अनौपचारिक असावीत.
(१४) संवादाला योग्य समारोप असावा.
(१५) संवाद वाचल्यावर त्या विषयावरचा सर्वांगीण विचार वाचकापर्यंत पोहोचावा.

Sanvaadlekhan in Marathi | संवाद लेखन मराठी | उपयोजित लेखन


 आपल्या मित्रांना शेअर करा. whatsapp.jpg


संवादलेखन नमुना कृती 

संगणकाचा महिमा 
आजोबा (रघुनाथराव)  नात ( शिवानी )

आजोबा :  बरेच दिवस झाले चेन्नईला येऊन! मला मुंबईला गेलं पाहिजे.

शिवानी  : आजोबा ‘तुम्ही खूप दिवस राहणार आहे’, असं म्हणाला होतात.

आजोबा : अग दिवसभर एकटा असतो घरात. इथे मराठी वर्तमानपत्रसुद्धा मिळत नाही. मी वेळ कसा घालवणार ?

शिवानी :  एवढंच ना आजोबा! तुम्हांला रोज मराठी वर्तमानपत्र वाचायला मिळेल, मी व्यवस्था करते.

आजोबा : ते कसं काय शक्य आहे बुवा ?

शिवानी : आजोबा, हे संगणकाचे युग आहे. नेटवरून काही सेकंदातच जगातील कोणतीही गोष्ट आपण घरबसल्या उपलब्ध करून घेऊ शकतो. आता जगात अशक्य असं काहीच राहिलं नाही.

आजोबा : पोरी, हे सगळं मी ऐकलंय खरं….

शिवानी : आजोबा, मी नेट सुरू केलंय. कोणतं वर्तमानपत्र वाचायचंय तुम्हांला?

आजोबा : ‘सर्वकाळ’.
शिवानी : थांबा हं, मी आता ही अक्षरे संगणकावर टाईप करते.

आजोबा : अरे व्वा! सगळी पाने दिसायला लागली की इथे… सगळ्या बातम्या वाचतो आता!

शिवानी : आजोबा, तुम्ही आता तुमच्या मित्रांना ई-मेल पण करू शकता.

आजोबा : खरंच पोरी, संगणकाचा महिमा अगाध आहे. या संगणकाने संपूर्ण जगालाच एकदम जवळ आणलंय!

Sanvaadlekhan in Marathi | संवाद लेखन मराठी | उपयोजित लेखन

Previous articleKathalekhan in Marathi | कथालेखन मराठी | इयत्ता दहावी
Next article[मराठी – कुमारभारती इयत्ता १० वी] गवताचे पाते Gavtache Pate
Email: marathistudymaterial@gmail.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here