बालभारती पाठ्यपुस्तकांमध्येच वह्यांची पाने देण्याबाबत पालक / शिक्षकांनी अभिप्राय नोंदवावा. |
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे. बालभारती पाठ्यपुस्तकांमध्येच वह्यांची पाने देण्याबाबतचे नियोजन शासन स्तरावर सुरू असल्याने पाठ्यपुस्तकात पाने जोडण्याबाबत शिक्षकांसाठी ऑनलाइन फाॅर्म विकसित केला आहे. कृपया, हा फॉर्म आपण भरावा तसेच आपल्या परिचयातील बालभारती पाठ्यपुस्तकांमध्येच वह्यांची पाने देण्याबाबत शिक्षकांना अभिप्राय भरण्यासाठी प्रोत्साहित करावे, ही विनंती. वरील बाबी लक्षात घेऊन पाठ्यपुस्तकांमध्येच वह्यांची पाने देण्याबाबतचे नियोजन शासन स्तरावर सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून, शाळेत प्रत्यक्ष शिकवणाऱ्या शिक्षकांकडून या संदर्भाने वास्तववादी माहिती मिळवण्यासाठी ही छोटीशी प्रश्नावली तयार केलेली आहे. पाठ्यपुस्तकातील वह्यांची पाने समाविष्ट करण्याची निकड जाणून घेण्यासाठी आपल्या कामातून पाच मिनिटे वेळ यासाठी काढून ही प्रश्नावली जरूर भरून पाठवावी. तसेच विद्यार्थ्यांसाठी तळमळीने काम करणाऱ्या इतर शिक्षकांनादेखील ही प्रश्नावली भरण्यास प्रवृत्त करावे, ही विनंती. हा निर्णय महाराष्ट्रातल्या शिक्षण व्यवस्थेसाठी दूरगामी परिणाम करणारा ठरेल. आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे. शिक्षकांना विचारले प्रश्न नेमके कोणते आहेत? वाचा थोडक्यात.
|
useful informetion