Home १० वी बालभारती Online Quiz _इयत्ता दहावी मराठी कुमारभारती | बोलतो मराठी

Online Quiz _इयत्ता दहावी मराठी कुमारभारती | बोलतो मराठी

online Test_ Bolto marathi, Online Quiz_Bolto marathi, Marathi kumarbharti, Online Study, Marathi study,

0
पाठाचा आशय
मराठी भाषेतील विविध शब्दप्रयोगांमुळे विनोदाची निर्मिती कशी होते याचे वर्णन प्रस्तुत पाठात आले आहे. आपल्या जीवनात भाषेला महत्त्व दिल्यास मनातल्या भावभावनांचे अर्थसौंदर्य उलगडण्यास मदत होते.
पाठातील मुद्दे –
१) बोलण्यात योग्य क्रियापद वापरावे. नाहीतर विनोद निर्माण होतो. बनवणे म्हणजे फसवणे असा अर्थ मराठीत रूढ आहे. पण आपण भात बनवला, भाजी बनवली, वरण बनवले असे चुकीचे क्रियापद वापरत असतो.
(२) मराठी ढंगाचे शब्दप्रयोग- ही आपल्या भाषेची श्रीमंती आहे. उदा. मार या शब्दाचे गप्पा मार, उड्या मार, थापा मार असे कितीतरी अर्थ निघतात.
(३)वाक्प्रचार  – वाक्प्रचारात एका क्रियापदाऐवजी दुसरे वापरले तर अर्थाचा अनर्थ होतो. उदा. खांदयाला खांदा लावणे म्हणजे सहकार्य करणे आणि खांदा देणे म्हणजे प्रेताला खांदा देणे.
(४) नामाला योग्य प्रत्यय- कोणता लावायचा हे माहीत असायला हवे. उदा. तिच्याशी हसणे म्हणजे तिच्याबरोबर हसणे, तिला हसणे म्हणजे तिची चेष्टा करणे.
(५) इतर भाषेतील शब्दमराठीने इतर अनेक भाषातील शब्द आत्मसात केले आहेत. उदा. टेबल. पण गरज नसताना इंग्रजी शब्द वापरू नयेत. ‘मी स्टडी करतो’ म्हणण्याऐवजी ‘अभ्यास करतो’ म्हणावे.
(६) शब्दांची व्युत्पत्ती- शोधली तर मूळ व खरे अर्थ कळतात. अनसूया = अन्. असूया म्हणचे मत्सर नसलेली. म्हणून अनसूया लिहावे. अनुसया लिहिणे चुकीचे आहे.
(७) उच्चार नीट करावेत. उदा. जरा (दंतमूलीय) = थोडे, जरा (तालव्य) = वार्धक्याने विकल.
(८) शब्दरूपे सारखी पण अर्थ भिन्न. उदा. (१) कलेवर प्रेम (२) कलेवर (प्रेत). मराठी भाषेचे असे सौंदर्य व तिची शक्तिस्थळे जाणून घेतली तरच आपण ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी’ असे कविवर्य सुरेश भटांचे शब्द उच्चारायला पात्र ठरू.
Online Quiz _Class X Marathi Kumarbharti Bolto Marathi
[WpProQuiz 25]
संपूर्ण पाठ समजून घेण्यासाठी खालील लिंकवर जा👇👇
पाठाचे स्पष्टीकरण  बोलतो मराठी पाठाचे स्पष्टीकरण
पाठावर आधारित स्वाध्याय बोलतो मराठी पाठावर आधारित स्वाध्याय


आमचा  Whats App व Telegram Group ग्रुप जॉईन करा आणि शैक्षणिक व इतर  नवीन माहिती लवकर प्राप्त करा.

️▶️️▶️️▶️⚫⚫धन्यवाद⚫⚫◀️◀️◀️

Previous articleइयत्ता दहावी मराठी कुमारभारती | आजी : कुटुंबाचं आगळ_ online Test
Next articleकर्ते सुधारक कर्वे पाठाचे स्पष्ठीकरण व Online Quiz
Email: marathistudymaterial@gmail.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here