Home ८ वी बालभारती नव्या युगाचे गाणे( कविता ) मराठी बालभारती इयत्ता आठवी Navya yugache gane...

नव्या युगाचे गाणे( कविता ) मराठी बालभारती इयत्ता आठवी Navya yugache gane marathi balbharti aathvi

0
nvya yugache gaane
nvya yugache gaane

नव्या युगाचे गाणे ( कविता ) मराठी बालभारती इयत्ता आठवी Navya yugache gane marathi balbharti aathvi

वि. भा. नेमाडे (१९२०-२०१६) : कवी, लेखक. त्यांच्या विविध विषयांवरील काव्यरचना प्रसिद्ध आहेत. त्यांच्या काव्यातून बदलत्या काळातील मानवी जीवनावरील मार्मिक भाष्य आढळून येते.
  अतिशय वेगाने घडणाऱ्या वैज्ञानिक प्रगतीमुळे मानवी जीवनात मोठी क्रांती घडून येत आहे. विज्ञानाच्या पाठिंब्यामुळे शून्यातूननवे विश्व उभारण्या ची जिद्द मानवामध्ये निर्मा ण होत आहे, मानवी जीवनातील दैन्य दूर होत आहे, नव्या प्रगतीच्या आशा पल्लवीत होत आहेत, हे या कवितेतून कवीने स्पष्ट केले आहे. प्रस्तुत कविता ही ‘कि शोर’, जानेवारी १९९८ या मासिकातून घेतली आहे.        #857e7e

  ऐका. वाचा. म्हणा.

 nvya yugache gaane-1


 वाक्प्रचार व शब्द  

शून्यातून विश्व उभारणे – प्रतिकूल परिस्थितीतून नवनिर्मिती करणे.

(१) युग :- सुमारे शंभर वर्षांचा कालखंड.
(२) होळी :- एक मराठी सण (इथे अर्थ) सर्व बुरसटलेले विचार व प्रथा जाळून टाकणे.
  कवितेचा भावार्थ 

विज्ञानाच्या प्रगतीमुळे नवे युग निर्माण झाले आहे. निराशा झटकून आपण उत्कर्षाच्या मार्गावर पुढे चालत जाऊया असा विश्वास कवींनी या कवितेत जनमानसाला दिला आहे.
अणुरेणूच्या अतिसूक्ष्म कणाकणातून शब्द प्रकटत आहे ‘जन हो, चला, चला पुढे चला.’ विज्ञानाचे तेज आल्यामुळे दिव्य क्रांती घडत आहे. विज्ञानाचे नवीन युग अवतरले आहे. त्याची तेजस्वी आभा सर्वत्र दिसते आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून शून्यातून नवीन जग निर्माण करण्याची प्रचंड हिंमत आम्हांला आली आहे.

मनामनात खोलवर असलेली अस्वस्थतेची अशांतीची मोठी आग पटकन विझली आहे; कारण उन्नतीचा आणि प्रगतीचा नवा मार्ग सापडला आहे.
नवचैतन्य मनामनात स्फुरण पावल्यामुळे सगळी दुर्बलता नाहीशी झाली आहे. निराशेची होळी करून नवीन विचारांचे तेज अवतरले आहे. माणुसकीच्या मागांवर द्वेषाच्या, नश्वरतेच्या घोड्याशा ज्वाला जरी शिल्लक राहिल्या असल्या तरी चिरंजिवीतेची, अमरत्वाची फुले वेचून ती एकत्र गुंफून आपण एकात्मतेची माळ तयार करूया.
आता उदासपणा नको, दैन्यदारिद्र्य नको. या खिन्नतेच्या अंधाराला भेदणारा नवीन सूर्य उगवतो आहे. उत्कर्षाचा, प्रगतीचा प्रकाश दाहीदिशांत झळकतो आहे. देन्याच्या अंधाराला चिरणारा लढा मनामनात फुलतो आहे.
रक्तारक्तात नवीन जोश, नवीन उत्साह उसळत आहे. नवीन आशा मनामनात रुजल्या आहेत. या उज्ज्वल विज्ञानयुगातील अणुरेणूतन शब्द प्रकटत आहे. लोकहो, पुढे चला, प्रगती करा.
  “““““““““““““““ स्वाध्याय “““““““““““““““

प्रश्न १ ला : हे केव्हा घडेल ते लिहा.
(अ) दिव्य क्रांती
उत्तर विज्ञानाचा प्रकाश आल्यावर म्हणजेच विज्ञान विषयक नवनवीन शोध लागल्यावर, 

(आ) शून्यामधून विश्व उभारेल
उत्तर विज्ञानाच्या नवयुगाची सकाळ झाल्यावर

(इ) दुबळेपणाचा शेवट
उत्तर अंत:करणात नवीन चेतना निर्माण झाल्यावर

प्रश्न २ रा : खालील चौकटीतील घटनांचा पद्य पाठाआधारे योग्य क्रम लावा.
उत्तर

विज्ञानाचा प्रकाश आला.
 क्रांती घडली.
हृदयातील अशांततेचा वणवा विझला.
उत्कर्षाचा अन् प्रगतीचा मार्ग दिसला.
नैराश्य नष्ट झाले.

च्या ओळी शोधा.
(अ) माणसाच्या अंगी चिकाटी असली तर तो काहीही साध्य करू शकतो.
उत्तर शून्यामधुनी विश्व उभारू जिद्द असे भव्य

(आ) माणसाच्या अंगात जोश आणि नवीन आशा निर्माण होतात. 
उत्तरनवी चेतना अंतरि स्फुरली दुबळेपण गेले

प्रश्न ४ था : तक्ता पूर्ण करा.

कवीला नको असणाऱ्या गोष्टी  विज्ञानामुळे प्राप्त होणाऱ्या गोष्टी
खिन्नता/दीनता दिव्यक्रांती
दुबळेपणा मनामध्ये जोश
नैराश्य  नवीन आशा 
अशांतता  नवी चेतना 

प्रश्न ५ वा : तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
(अ) नबसूर्य पहा उगवतो‘, ‘संघर्ष पहा बहरतोया शब्दसमूहातील कल्पना सोदाहरण स्पष्ट करा,
उत्तर   नवीन सूर्य उगवतो म्हणजेच मनात नवीन आशा निर्माण होतात. मनात नव चेतना निर्माण होते. अशांतता, दुबळेपण,नैराश्य नाहीसे होते. एखादे काम पूर्ण करण्यासाठी माणूस संघर्ष करतो आणि त्या संघर्षातून त्याच्या हातून काहीतरी चांगले महान कार्य घडते. उदा. एडिसन, एडिसनच्या मनात विज्ञानाचा नवीन सूर्योदय झाला. त्याने त्याचे विविध प्रयोग करण्यासाठी खूप संघर्ष केला. शेवटी जगाला उजळून टाकणा-या दिव्याचा शोध लावून एडिसनने सगळे जग उजळून टाकले.

(आ) कवीनेतून व्यक्त होणारा कवीचा आशावाद स्पष्ट करा.
उत्तर   कवी म्हणतात, विज्ञानाने दिव्य क्रांती घडते. त्यामुळे हृदयातील अशांतता, निराश्य, दुबळेपण नाहीसे होवून माणूस नव्या आशेने, चेतनेने, जिद्दीने कामाला लागतो. स्वतःचे काम करण्यासाठी संघर्ष करतो आणि त्यातूनच उत्कर्ष म्हणजेच प्रगती होते.
 

  खेळूया शब्दाशी.

(अ) कवीतेतील यमक जुळणा-या शब्दांच्या जोड्या शोधा व लिहा.
उत्तर
        दिव्य – भव्य,
गेले  – आले,
ज्वाला – माला,
चित्ती – पुढती. याप्रमाणे…

(आ) खालील शब्दांचे समानार्थी शब्द कवितेतून शोधून लिहा.
उत्तर
         उजेड  = प्रकाश
         तेज  =  प्रभा
         रस्ता = मार्ग
         उत्साह = चेतना

  उपक्रम :

(अ) विज्ञानविषयक आणखी काही कविता मिळवून वाचा व त्यांचा संग्रह करा.
(आ) वैज्ञानिक प्रगतीमुळे घरात आलेल्या व जीवन सुलभ करणाऱ्या वस्तूंची यादी करा.

  प्रकल्प :

विज्ञानातील प्रगतीमुळे विविध क्षेत्रांत नवनवीन साधनांची भर पडली आहे. त्यांचा शोध घ्या व या  क्षेत्रांतील साधनांची खालील तक्त्यात नाव  लिहा.

क्षेत्र  या क्षेत्रांतील नवनवीन साधने
(१) बांधकाम- रोडरोलर, बार कटिंग मशीन, सिमेंट कॉन्क्रिट मशीन, पॅन मिक्सर…
(२) शिक्षण – स्मार्ट बोर्ड, प्रोजेक्टर, मोबाईल, टॅब, स्टडी टेबल…
(३) वैद्यकीय- MRI मशीन, लेझर मशीन, X-ray मशीन, व्हेंटीलेटर,ब्लड प्रेशर मशीन, डिजिटल अल्ट्रा साउंड मशीन…
(४) हवामानशास्त्र- अँनोमीटर, रडार, मानव निर्मित उपग्रह, उडत्या हवामान वेधशाळा, पल्स डॉप्लर…
(५) कृषी- हार्वेस्टर, ट्रॅक्टर, ग्रेन ड्रायर, कल्टीव्हेटर, रोलर, रोटर, स्प्रेयर…
(६) मनोरंजन- मोबाईल गेम, कम्प्युटर गेम, होम थेटर, थ्री डी पिक्चर टॉकीज, वाटर पार्क, गार्डन, टी.व्ही…
(७) खगोलशास्त्र- तरल यंत्र (fluid machine), अॅस्ट्रोनॉमी गेयर, टेलीस्कोप, बायनोक्यूलर, कॅमेरा…
(८) संरक्षण शास्त्र- लढाऊ विमान, आकाश क्षेपणास्त्र, प्रतिभेदक क्षेपणास्त्र, रॉकेट, बंदूक…
aabhar
aabhar
Previous article[ स्पॅनिश धावपटूची प्रेरणादायक कथा ] Inspiring Story Of Spanish Runner
Next articleKatha बालपण शास्त्रज्ञांचे The childhood of scientists
Email: marathistudymaterial@gmail.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here