🔰 NMMS Scholarship Exam 2022-23 🔰 |
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यासाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) २०२२-२३ इ. ८ वी साठी परीक्षा दि. १८ डिसेंबर २०२२ प्रसिद्धी निवेदनाबाबत..राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) २०२२-२३ या परीक्षेची ऑनलाईन शाळा नोंदणी व विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या https://www.mscepune.in/ व https://nmmsmsce.in या संकेतस्थळावर भरण्याच्या वेळापत्रकात मुदतवाढ देण्यात येत आहे. याबाबतचे जाहीर प्रकटनाची प्रत सोबत जोडलेली आहे. महाराष्ट्रातील सर्व वर्तमानपत्रे, आकाशवाणी च दूरदर्शनवरुन या परीक्षेच्या जाहीर प्रकटनास विनामूल्य प्रसिध्दी देण्यात आली आहे. |
शाळा नोंदणी School Registration |
शाळा लॉग इन School Login |
NMMS २०२२-२३ – सन २००७-०८ पासून योजना सुरु आहे. इयत्ता ८ वी च्या आर्थिक दुर्बल घटकातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन बुध्दिमान विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने त्यांना आर्थिक सहाय्य करावे, त्यानुसार विद्यार्थ्यांचे उच्च माध्यमिक स्तरापर्यंतचे शिक्षण घेण्यास मदत व्हावी. आर्थिक दुर्बलतेमुळे प्रज्ञावान विद्यार्थ्यांची उच्च माध्यमिक स्तरापर्यंत होणारी गळती रोखावी हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.
अर्ज – दिनांक १०/१०/२०२२ पासून ऑनलाईन आवेदनपत्रे परिषदेच्या https://www.mscepune.in/ व https://nmmsmsce.in या संकेतस्थळावर शाळांना उपलब्ध होतील.
NMMS परीक्षा अर्ज करण्याची पध्दत | NMMS Exam Application Procedure
दिनांक 10/10/2022 पासून ऑनलाईन आवेदनपत्रे परिषदेच्या https://www.mscepune.in/ व https://nmmsmsce.in या संकेतस्थळावर शाळांना उपलब्ध होतील.
🔰 शाळा लॉग इन सूचना School Login Instruction 🔰 |
🔰 NMMS परीक्षा 2022-23 माहितीपत्रक येथे पहा. 🔰 |
प्रवाह चित्र
१) www.mscepune.in किंवा www.nmmsmsce.in संकेतस्थळास भेट देणे. |

२) संकेतस्थळावरील आवेदनपत्र भरण्याच्या सर्व सूचना परीक्षेचा आराखडा व अभ्यासक्रम, वेळापत्रक, आवश्यक प्रमाणपत्रे ,परीक्षा शुल्क व इतर माहितीचे बारकाईने वाचन करावे. |

३) सर्व सूचना व माहितीचे अवलोकन केल्यानंतरच शाळा नोंदणी या बटनावर क्लिक करा. |

४) उघडलेल्या ऑनलाईन अर्जात अचूकपणे शाळेची व मुख्याध्यापकाची माहिती भरा आणि माहिती अचूकपणे भरल्यानंतर सबमिट (Submit) बटनावर क्लिक करा. |

५) अर्जात नमूद केलेल्या मोबाईल क्रमांकावर प्राप्त झालेल्या SMS मधील Login Id व Password द्वारे Login करा. |

६) शाळा लॉगिन केल्यानंतर उजव्या बाजूला असलेल्या स्टुडन्ट रेजिस्ट्रेशन (Student Registration) या बटनावर क्लिक करा. |

७) उघडलेल्या ऑनलाईन अर्जात अचूकपणे माहिती भरा आणि नवीनतम फोटो, स्वाक्षरी इमेज अपलोड करा. माहिती अचूकपणे भरल्यानंतर सेव्ह (Save) बटनावर क्लिक करा. |

८) Preview या बटनावर क्लिक करून आपले भरलेले आवेदनपत्र पाहून अर्जातील माहितीची पडताळणी करा. |

९) आवेदनपत्र काळजीपूर्वक तपासून पाहावे कारण आवेदनपत्र सबमिट झाल्यानंतर कोणताही बदल करता येणार नाही. |

१०) प्रीव्हयुव (Preview) मध्ये काही बदल करावयाचा असल्यास Edit बटणाचा वापर करून पुन्हा बदल करू शकता.खात्री झाल्यास प्रोसिड टु पे (Proceed to pay ) या बटणाचा वापर करून ऑनलाईन पध्द्तीने ऑनलाईन बँकिंग ,क्रेडिट /डेबिट कार्ड इ. द्वारे ऑनलाईन पध्द्तीने शुल्क भरावे लागेल. |

११) विहित मुदतीत आवेदनपत्राची प्रिंट घ्या. |

१२) आवेदन एक प्रत तुमचा माहितीसाठी शाळांकडे जतन करून ठेवावी. |
NMMS परीक्षा पात्रता | NMMS Exam Eligibility
1. महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही शासकीय, शासनमान्य अनुदानित, स्थानिक स्वराज्य संस्थेतील इयत्ता ८ वी मध्ये शिकत असलेल्या आणि खालील अटी पूर्ण करणाऱ्या नियमित विद्यार्थी/ विद्यार्थीनीस या परीक्षेस बसता येते.
2. पालकांचे (आई व वडील दोघांचे मिळून) वार्षिक उत्पन्न 3,50,000/- पेक्षा कमी असावे. नोकरीत असलेल्या पालकांनी आपल्या आस्थापना प्रमुखांचा व इतरांनी तहसीलदारांचा / तलाठयाचा सन २०२०-२१ च्या आर्थिक वर्षाचा उत्पन्नाचा दाखला शाळेच्या मुख्याध्यापकांकडे जमा करावा. सदरचा उत्पन्नाचा दाखला मुख्याध्यापकांनी शाळेत जतन करुन ठेवावा.
3. विद्यार्थी विद्यार्थ्यांनी इ.७ वी मध्ये किमान ५५% गुण मिळवून उत्तीर्ण झालेला असावा. (अनुसूचीत जाती (SC) अनुसूचित जमाती (ST) चा विद्यार्थी किमान ५०% गुण मिळवून उत्तीर्ण झालेला असावा.)
4. खालील विद्यार्थी NMMS परीक्षेसाठी अपात्र आहेत.
- विनाअनुदानित शाळेत शिकणारे विद्यार्थी.
- केंद्रीय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी.
- जवाहर नवोदय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी,
- शासकीय वसतिगृहाच्या सवलतीचा, भोजनव्यवस्थेचा व शैक्षणिक सुविधांचा लाभ घेणारे विद्यार्थी.
- सैनिकी शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी
विद्यार्थ्यांची निवड
विद्यार्थ्यांची निवड लेखी परीक्षेमधून करण्यात येईल. संबंधित लेखी परीक्षेतील गुणांच्या आधारे व राज्याने निश्चित केलेल्या मागासवर्गीयांसाठीच्या आरक्षणानुसार विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल.
NMMS परीक्षेचे वेळापत्रक
महाराष्ट्रातील विविध केंद्रावर, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) किंवा शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई यांचे मार्फत दिनांक १८ डिसेंबर २०२२ रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद ही परीक्षा घेणार आहे.
सदर परीक्षेसाठी दोन्ही विषयात मिळून विद्यार्थ्यांसाठी पात्रता गुण ४०% मिळणे आवश्यक आहेत. (SC, ST, व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी पात्रता गुण ३२% मिळणे आवश्यक आहेत.)
NMMS परीक्षेसाठी विषय | Subject for NMMS exam
सदर परीक्षेसाठी २ विषय असतील.
A. बौध्दिक क्षमता चाचणी (MAT) :- ही मानशास्त्रीय चाचणी असून, त्यामध्ये कार्यकारणभाव, विश्लेषण, संकलन इत्यादी संकल्पनांवर आधारित ९० बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्न असतात.
B. शालेय क्षमता चाचणी (SAT) :- ही सामान्यत: इयत्ता ७ वी व इयत्ता ८ वीच्या अभ्यासक्रमांवर आधारित असेल त्यामध्ये…
१. सामान्य विज्ञान एकूण (गुण-३५)
२. समाजशास्त्र (एकूण गुण -३५)
३. गणित (एकूण गुण – २०)
असे तीन विषय असतील.या तीन विषयांचे एकूण ९० प्रश्न सोडवायचे असतात.
उपविषयावर गुणांची विभागणी खालीलप्रमाणे असेल.
- सामान्य विज्ञान ३५ गुण:- भौतिकशास्त्र ११ गुण, रसानशास्त्र ११ गुण, जीवशास्त्र १३ गुण.
- समाजशास्त्र ३५ गुण :- इतिहास १५ गुण, नागरिकशास्त्र ०५ गुण, भूगोल १५ गुण
- गणित २० गुण.
माध्यम :-
प्रश्नपत्रिका मराठी, इंग्रजी, हिंदी, गुजराथी, उर्दू, सिंधी, कन्नड व तेलुगू या आठ माध्यमातून उपलब्ध असतील.(सर्व विद्यार्थ्यांना मूळमाध्यमाबरोबर इंग्रजी माध्यमाची प्रश्नपत्रिका एकत्र देण्यात येणार आहे.) यापैकी कोणतेही एकच माध्यम घेता येईल.
दोन्ही प्रश्नपत्रिकांसाठी स्वतंत्र उत्तरपत्रिका दिल्या जातील.
प्रत्येक प्रश्नक्रमांकापुढे पर्यायांसाठी ४ वर्तुळे असतील. योग्य पर्यायाचे वर्तुळ निळे/काळे बॉलपेनने पूर्णत: रंगवून उत्तर नोंदवायचे आहे.
पेन्सिलचा वापर केलेली/अपुरी/अशंत: रंगवलेली उत्तरे यांना गुण दिले जाणार नाहीत.
एकापेक्षा अधिक वर्तुळात नोंदविलेली/उत्तरे/चुकीच्या पध्दतीने नोंदवलेली उत्तरे/व्हाईटनर/खाडाखोड करुन नोंदविलेली किंवा गिरवलेली उत्तरे यांना गुण दिले जाणार नाहीत.
NMMS परीक्षेचा निकाल | NMMS Exam result
सदर परीक्षेचा निकाल साधारण फेब्रुवारी २०२३ च्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवडयात जाहीर करण्यात येईल. सदर परीक्षेचा निकाल व निवडयादी फक्त परिषदेच्या संकेतस्थळावरच उपलब्ध केली जाईल. जिल्हयांनी, शाळांनी व विद्यार्थ्यांनी सदरचा निकाल परिषदेच्या संकेतस्थळावरुनच काढून घेणे आवश्यक आहे.
NMMS शिष्यवृत्ती | NMMS Scholarship
- शिष्यवत्तीस पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यास ५ वर्षांसाठी दरमहा रु.१,०००/- (वार्षिक रु. १२,०००/-) शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.
- शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्यासाठी इ. ९ वी तून इ. १०वी व इ. ११ वी तून इ. १२ वी प्रथम संधीमध्ये पास होणे आवश्यक आहे.
- इ. १० वी मध्ये किमान ६०% गुण मिळणे आवश्यक आहेत. (SC/ST विद्यार्थ्यांना किमान ५५% गुणांची आवश्यकता आहे.)
- सदर शिष्यवृत्ती वितरणाचे काम शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षणाधिकारी (माध्य.) व मा. शिक्षण संचालक (माध्य. व उच्च माध्य.) यांचे मार्फत केले जाते.
आमचा Whats App व Telegram Group ग्रुप जॉईन करा आणि शैक्षणिक व इतर नवीन माहिती लवकर प्राप्त करा.
️▶️️▶️️▶️⚫⚫धन्यवाद⚫⚫◀️◀️◀️