Home इतर शालेय शिक्षण मंत्र्यांचा राज्यातील मुख्याध्यापक, शिक्षकांशी संवाद | Minister of School Education...

शालेय शिक्षण मंत्र्यांचा राज्यातील मुख्याध्यापक, शिक्षकांशी संवाद | Minister of School Education interacts with the headmaster and teachers of the state

0

शालेय शिक्षण मंत्र्यांचा राज्यातील मुख्याध्यापक, शिक्षकांशी संवाद | Minister of School Education interacts with the headmaster and teachers of the state

महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र 

 
मा. मंत्री, शालेय शिक्षण विभाग यांच्या समवेत राज्यातील राज्य मंडळाशी संलग्नित माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक विद्यालयांमधील इ. १० वी व इ. १२ वीस अध्यापन करणारे शिक्षक व मुख्याध्यापक यांच्याशी संवाद कार्यक्रम 
💥 उपरोक्त विषयान्वये मा. ना. प्रा. वर्षा एकनाथ गायकवाड, मंत्री, शालेय शिक्षण या राज्यातील राज्य मंडळाशी संलग्नित माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक विद्यालयांमधील इ. १० वी व इ. १२ वीस अध्यापन करणाऱ्या शिक्षक व मुख्याध्यापक/ प्राचार्य यांच्याशी दि. १० फेब्रुवारी २०२२ रोजी ४.३० वा. ऑनलाईन संवाद साधणार आहेत.
💥सदर बैठकीस मा. वंदना कृष्णा, अपर मुख्य सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मा. विशाल सोळंकी, आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य व सर्व शिक्षण संचालक, अध्यक्ष, राज्य मंडळ हे उपस्थित राहणार आहेत. 
 
💥सदर संवाद कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी राज्यातील सर्व संबंधित शिक्षक, मुख्याध्यापक व प्राचार्य यांनी खालील लिंकवर अथवा सोबतचा QR कोड स्कॅन करून सदरच्या संवाद कार्यक्रमासाठी नावनोंदणी करणे अनिवार्य आहे.
💥 नावनोंदणी केलेनंतरच संबंधितांच्या मोबाईल क्रमांकावर व ईमेलवर प्राप्त झालेल्या Unique लिंकवरूनच सदर ऑनलाईन कार्यक्रमास उपस्थित राहता येईल व त्याद्वारेच संबंधितांची उपस्थितीची नोंद घेतली जाणार आहे. सदर नाव नोंदणी दि. १० फेब्रुवारी २०२२ रोजी संध्याकाळी ४.१५ वाजता बंद होईल.
तरी आपल्या कार्यक्षेत्रातील राज्य मंडळाशी संलग्नित सर्व इ. १० वी व इ. १२ वीस अध्यापन करणाऱ्या माध्यमिक शाळा व उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक व मुख्याध्यापक/ प्राचार्य यांना सदरच्या संवाद कार्यक्रमास उपस्थित राहणेबाबत आवाहन करण्यात आले आहे.
नावनोंदणी साठी खालील लिंक ओपन करून आपली माहिती भरा.
 https://jiomeetpro.jio.com/jioconf/attendee/sm-804c7127-6c03-4ecf-98d1- d24d6eed2e82/join/_eM9K-HDd6964512a1afee01644406410944
किंवा खालील QR कोड स्कॅन करून लिंकवर जा व सदरच्या संवाद कार्यक्रमासाठी नावनोंदणी करा. 


Previous article2022|आरोग्य व शारीरिक शिक्षण मूल्यांकन|इ. १० वी. |2022 Health and Physical Education Evaluation| iytta10 vi
Next articleदि. ११ फेब्रुवारी २०२२ | स्वतःला ओळखा व करियर निवडा | महाकरियर पोर्टल | Live वेबिनार | Get to know yourself and choose a career | Mahacareer Portal | Live Webinar | On February 11, 2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here