Home ८ वी बालभारती इयत्ता आठवी _ मराठी बालभारती _माझ्या देशावर माझे प्रेम आहे _स्वाध्याय

इयत्ता आठवी _ मराठी बालभारती _माझ्या देशावर माझे प्रेम आहे _स्वाध्याय

1
पाठातील मह्त्त्वाचे मुद्दे
१) लेखक एकदा शाळेत गेले होते. तेथे, ‘भारत माझा देश आहे’, ही प्रतिज्ञा मुले मोठ्याने म्हणत होती. लेखकांना खूप आनंद झाला.

(२) आपण देशावर प्रेम करतो, याचा अर्थ काय ? आई मुलावर प्रेम करते म्हणजे ती मुलाचे पालनपोषण करते आणि त्याला वाढवते. देशाचे पालनपोषण करणे आणि त्याचा गौरव वाढवणे म्हणजे देशावर प्रेम करणे होय.


(३) देश = देशाची भूमी + देशातील लोक. देशातील लोक म्हणजेच देशबांधव. देशावर प्रेम करणे म्हणजे देशाच्या भूमीवर प्रेम करणे आणि देशबांधवांवर प्रेम करणे.


(४) आता भगतसिंग, राजगुरू यांच्यासारख्या क्रांतिवीरांप्रमाणे देशावर प्रेम करण्याची गरज नाही. त्या वेळी देश गुलाम होता. राज्यकर्ते परकीय होते. आता आपण स्वतंत्र आहोत. आपणच जनता आणि आपणच राज्यकर्ते आहोत. देश संकटात असला तरच देशावर प्रेम करायचे असते, असे नाही.


(५) देशबांधवांवर प्रेम करायचे म्हणजे त्यांच्या आनंदात आपण आनंदी व्हायचे आणि त्यांच्या दुःखात त्यांना मदत करायला धावायचे.


(६) शांततेच्या काळात आपल्या छोट्या छोट्या कृतींद्वारे आपण देशावर प्रेम करू शकतो. ती कृती करताना तिचा देशबांधवांवर कोणता परिणाम होईल, याचा विचार केला पाहिजे. देशबांधवांचे भले होईल अशीच कृती आपण केली पाहिजे.


(७) आपल्या कृतीत देश बांधवांविषयी आत्मीयता असेल तर आपली कृती देशप्रेमाची ठरते. आपल्या मनात स्वतःविषयी जशी आत्मीयता असते, प्रेम असते, , तशीच आत्मीयता, प्रेम देशबांधवांविषयी असले पाहिजे. देशबांधवांना न्याय, स्वातंत्र्य, समता व आपुलकी देणे म्हणजे त्यांच्याविषयी आत्मीयता असणे होय. हेच देशप्रेम आहे.

Read more


Sustainable Chemistry | Sustainable Chemistry conferences 2019 | Environmental conferences | UK | Worldwide Events | Europe | Asia | Middle East | 2019 | 2020


आमचा  Whats App व Telegram Group ग्रुप जॉईन करा आणि शैक्षणिक व इतर  नवीन माहिती लवकर प्राप्त करा.

️▶️️▶️️▶️⚫⚫धन्यवाद⚫⚫◀️◀️◀️

 

Previous articleइयत्ता बारावी_ मराठी _युवकभारती _ कृतिपत्रिका आराखडा
Next articleOnline test _माझ्या देशावर माझे प्रेम आहे_इयत्ता आठवी _ मराठी बालभारती

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here