Home १० वी बालभारती मराठी व्याकरण | समास व समासाचे प्रकार | Marathi Grammar |...

मराठी व्याकरण | समास व समासाचे प्रकार | Marathi Grammar | Samas and types of Samas

2

मराठी व्याकरण | समास | Marathi Grammar  Samas

  भाषेचा उपयोग करताना आपण शब्दांची काटकसर करतो. दोन किंवा अधिक शब्दांऐवजी आपण एकाच शब्दाचा उपयोग करतो. उदाहरणार्थ, ‘चंद्राचा उदय’ असे न म्हणता आपण ‘चंद्रोदय’ असे म्हणतो. ‘पोळीसाठी पाट’ असे न म्हणता आपण ‘पोळपाट’ असे म्हणतो. ‘बटाटे घालून तयार केलेला वडा’ असे न म्हणता आपण ‘बटाटेवडा’ असे म्हणतो.
शब्दांच्या अशा एकत्रीकरणास ‘समास’ असे म्हणतात.
‘सम्+अस्’ या संस्कृत धातूपासून ‘समास’ हा शब्द तयार झाला असून त्याचा अर्थ ‘एकत्र करणे’ असा आहे. समासात एक जोडशब्द तयार करताना त्या शब्दांतील परस्परसंबंध दाखविताना त्यातील विभक्तिप्रत्यय किंवा शब्द आपण गाळतो. समास ही देखील भाषेतील काटकसर आहे.

शब्दांच्या एकत्रीकरणाने जो एक जोडशब्द तयार होतो त्याला ‘सामासिक शब्द’ असे म्हणतात.

हा सामासिक शब्द कोणत्या शब्दांपासून तयार झाला आहे, हे स्पष्ट करण्यासाठी आपण फोड करुन सांगतो. फोड करून दाखविण्याच्या पद्धतीला ‘विग्रह’ असे म्हणतात.
 विग्रह म्हणजे कमीत कमी शब्दांत सामासिक शब्दाचे केलेले स्पष्टीकरण होय.
उदा. ‘वनभोजन’ हा सामासिक शब्द असून ‘वनातील भोजन’ हा त्याचा विग्रह होय.
 💥समासाचे प्रकार 💥
समासात कमीत कमी दोन शब्द असतात.
समासातील शब्दांना ‘पद’ म्हणतात.
पहिला शब्द → पहिले पद
दुसरा शब्द →  दुसरे पद
⭐समासातील कोणते पद महत्त्वाचे म्हणजेच प्रधान आहे. यावरून समासाचे मुख्य चार प्रकार पडतात.

 💥इयत्ता 10 वी. मराठी कुमारभारती भाषाभ्यास घटकात विचारले जाणारे समास 💥
अनु. क्र.  समास   येथे पहा 
1. कर्मधारय समास 
2. द्विगू समास  
3. द्वंद्व समास 
dual compound, dvndv samas, karmadharaya samaas, Marathi Grammar, marathi grammar digu samasa, Marathi Grammar for mpsc, Marathi grammar karmadharaya samaas, Marathi Grammar Samas, marathi study material, Marathi vyaakran for mpsc, Samas, इतरेतर द्वंद्व समास, द्वंद्व समास, द्विगू समास, मराठी व्याकरण, मराठी व्याकरण इयत्ता 10 वी समास, मराठी व्याकरण द्विगू समास, मराठी व्याकरण समास, मराठी व्याकरण समास व समासाचे प्रकार, मराठी व्याकरण समासाचे प्रकार, वैकल्पिक द्वंद्व समास, समास, समास मराठी व्याकरण 10 वी., समास मराठी व्याकरण उदाहरण, समास मराठी व्याकरण दहावी, समाहार द्वंद्व समास
आमचा  Whats App व Telegram Group ग्रुप जॉईन करा आणि शैक्षणिक व इतर  नवीन माहिती लवकर प्राप्त करा.

️▶️️▶️️▶️⚫⚫धन्यवाद⚫⚫◀️◀️◀️

Previous article2022|आरोग्य व शारीरिक शिक्षण मूल्यांकन|इ. १० वी. |2022 Health and Physical Education Evaluation| iytta10 vi
Next articleमराठी व्याकरण | शब्दसिद्धी व शब्दसिद्धीचे प्रकार | Shabdasiddhi and types of Shabdasiddhi
Email: marathistudymaterial@gmail.com

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here